घरात चिमुकला पाहुणा जन्माला येणं म्हणजे साऱ्या घरासाठी आनंदोत्सव असतो. घरात येणारं बाळ घराचं गोकुळ करतं असं म्हणतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं आकर्षण केंद्र घरातील हा चिमुकला जीव असतो. हिंदू संस्कृतीत पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी असंच मानलं जातं. त्यामुळे तुमच्या घरीही अशी ऐश्वर्यलक्ष्मी जन्माला आली असेल तर तिचे लाडही तितक्याच ऐश्वर्यात व्हायला हवेत. मुलगा असो वा मुलगी बाळाचा नामकरण विधी अविस्मरणीय व्हावा आणि बाळाला एक सुंदर नाव मिळावं असं प्रत्येक नवजात आईबाबांना वाटत असतं. तुमच्या बाळाच्या बारशासाठी सर्वांना पाठवा हे नामकरण विधीसाठी सुंदर मेसेज. बारशात तुमच्या राजकन्येला तुम्हाला एखादे हटके आणि युनिक नाव द्यावं अशी तुमची नक्कीच इच्छा असेल. हिंदू संस्कृतीत नावरास पाहण्याची पद्धत आहे. बाळाच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेनुसार नावरास काढण्यात येते. ज्यात काही अक्षरे येतात त्या अक्षरावरून बाळाचं नाव ठेवलं तर ते त्याच्यासाठी आयुष्यभर शुभ मानलं जातं. नावराशीवरून येणारी अक्षरं कधी कधी खूपच अवघड असल्यामुळे ती पाळण्यात ठेवण्यापूरतीच मर्यादित राहतात. ज्यामुळे बऱ्याचदा बाळाचं पाळण्यातील नाव आणि खरं नाव वेगवेगळं असतं. असं असेल तर मोठं झाल्यावर मुलांना आपल्या नावात असलेला हा बदल संभ्रमात टाकू शकतो. कारण नाव ही प्रत्येकाची खास ओळख असते. यासाठीच तुमच्या मुलीच्या नावराशीत जर थ अक्षर असेल तर तुम्ही तिची कायमस्वरूपी ओळख ठरेल असं हटके नाव तिला देऊ शकता. यासाठी निवडा यातील थ वरून मुलींची नावे (Th Varun Mulinchi Nave) यासोबतच जर तुम्हाला मुलांची नावे हवी असतील तर निवडा थ वरून मुलांची नावे देखील.
Table of Contents
‘थ’ वरून मुलींची नावे | Girl Names Starting with Th
घरात तान्हुलीचे आगमन झाले की अख्या घराचं नंदनवन होतं. तिच्या गोड आणि निरागस हास्यात तुम्हाला तुमच्या जीवनातील सुखदुःखाचा अक्षरशः विसर पडतो. पण आता तिला योग्य नाव देत जगात एक ओळख देण्याची वेळ आली आहे. तेव्हा तिला चिऊ, काऊ, माऊ अशी हाक मारण्यापेक्षा काहीतरी हटके आणि छान नाव तिच्यासाठी शोधा. तुम्ही तुमच्या तान्हुलीसाठी थ अक्षरावरून सुरू होणारी नावे शोधत असाल तर तर निवडा यातील एक हटके नाव
मुलींचे नावे | अर्थ |
थितिक्षा | धैर्यवान |
थवनी | तेजस्वी |
थरानी | धरणी |
थारिणी | धरणी |
थान्वी | नाजूक |
थायरा | स्त्रीचे एक रूप |
थानिमा | सुंदर |
थान्मई | एकाग्रता |
थामाराई | कमळ |
थायालन | दयाळू |
थाली | पावसाचे थेंब |
थावामानी | देवाची भेट |
थास्विका | माता पार्वती |
थिरूमगल | माता लक्ष्मी |
थीरावल्ली | पराक्रमी मुलगी |
थालिनी | एक औषधी झाड |
थालिसा | समुद्रातून आलेली |
थमन्ना | इच्छा |
थंसी | सुंदर राजकन्या |
थनुजा | मुलगी |
थनुश्री | सुंदर |
थनुशिया | भक्त |
थनुविका | स्वतःवरील प्रेम |
त वरून मुलींची नावे | T Varun Mulinchi Nave Marathi
‘थ’ वरून मुलींची नावे, युनिक आणि अर्थपूर्ण | Unique Girl Names Starting with Th
तुमच्या तान्हुलीला तुम्ही तान्हुलीला चिऊ, माऊ, परी, लाडोबा अशी कोणत्याही टोपण नावाने हाक मारू शकता. मात्र मोठं झाल्यावर तिची एक अनोखी ओळख व्हावी आणि सारं जग तिला तिच्या हटके नावाने ओळखावं असं वाटत असेल तर तुमच्या तान्हुलीला द्या युनिक आणि अर्थपूर्ण नाव यासाठी निवडा खास थ वरून मुलींची नावे (Th Varun Mulinchi Nave)
मुलींची नावे | अर्थ |
थोलाक्षी | भगवान शंकराची पत्नी |
थना | कौतुक |
थोराया | तारा |
थमिनाह | मौल्यवान |
थारिका | सुंदर |
थुलजा | दयाळू |
थेनमोली | मोहक |
थ्रिजा | तीन देवींचे रूप |
थ्रेशा | थोर |
थ्रिदा | माता दुर्गा |
थ्राया | तीन देवींची शक्ती |
थिरिष्का | हुशार |
थेजोरशी | तेजस्वी |
थरूशी | यशस्वी |
थेजोवती | देवीचे रुप |
थिरूचंद्रा | सुंदर |
थर्शिनी | दान देणे |
थरसाना | भक्त |
थंसिका | राणी |
थबशीरा | चांगली वार्ता |
थनिया | सुरावट |
थैया | फुलाचे नाव |
थमिना | मौल्यवान |
थन्विया | सोने |
थनविता | योग्य |
थेजल | हुशार |
‘श’ वरून मुलींची नावे, साजेशी आणि अर्थपूर्ण (Sha Varun Mulinchi Nave In Marathi)
‘थ’ वरून मुलींची मॉर्डन नावे | Modern The Varun Mulinchi Nave Marathi
प्रत्येक पालकांना वाटत असतं आपल्या मुलांना एखादं मॉर्डन नाव द्यावं, मात्र जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी नावराशीवरून नाव शोधत असाल तर त्याच नावावरून तुम्हाला नाव शोधावं लागतं जे त्यांच्या नावराशीमध्ये आहे. कधी कधी नावराशीवरून येणारं अक्षर इतकं कठीण असतं की त्यावरून नाव शोधणं पालकांसाठी डोकेदुखीचं काम ठरू शकतं. पण जर तुमच्या लेकीच्या नावराशीत थ अक्षर असेल तर आमच्याकडे आहेत तिच्यासाठी खास थ वरून मुलींची नावे (Th Varun Mulinchi Nave) ज्या नावात वेगळेपण आहेच शिवाय एक चांगला अर्थही आहे.
मुलींची नावे | अर्थ |
थोलाक्षी | शक्ती |
थारण्या | आकर्षक |
थीस्वरी | देवीचे रूप |
थेंनावनी | ईश्वरी |
थनिका | अप्सरा |
थनिमा | सुंदर |
थरानिका | धरणीवरील राणी |
थोगयी | सुंदर पंख |
थ्राया | तीन शक्ती |
थिया | पवित्र |
थुरैया | तारा |
थुमी | बुद्धीवान |
थरिशा | इच्छा |
थन्वी | आकर्षक |
थनुषा | सुंदर |
थिरावल्ली | पराक्रमी |
थालांबू | फुलांचा सुंगध |
थंगा | सोनं |
थनिष्ठा | प्रामाणिक |
वाचा – La Varun Mulinchi Nave Marathi
आम्ही शेअर केलेली थ वरून मुलींची नावे (Th Varun Mulinchi Nave) तुम्हाला कशी वाटली आणि यातील कोणतं नाव तुम्ही तुमच्या तान्हुलीसाठी निवडलं हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.
Read More From xSEO
Sankashti Chaturthi Wishes, Quotes, Status In Marathi | संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Dipali Naphade
अष्टविनायक दर्शन संपूर्ण माहिती | Ashtavinayak Darshan Information In Marathi
Vaidehi Raje