आपलं जग

पावसाळ्याआधी मुलींच्या मनात येऊ शकतात ‘हे’ विचार

Trupti Paradkar  |  Jun 3, 2019
पावसाळ्याआधी मुलींच्या मनात येऊ शकतात ‘हे’ विचार

उन्हाळा संपत आलाय. त्यामुळे सर्वांनाच पावसाचे वेध लागले आहेत. पाऊस हा सर्वांनाच आवडणारा आणि हवाहवासा वाटणारा एक ऋतू आहे. कुणाला पावसात मनसोक्त भिजायला आवडतं तर कुणाला पावसाची रिमझिम खिडकीत बसून पहायला मौज येते. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच पावसाची ओढ असते. पावसासोबत प्रत्येकाच्या काही आठवणी जोडलेल्या असतात. म्हणूनच घरातील मोठी माणसं आम्ही इतके पावसाळे पाहिलेत असं अभिमानाने सांगत असतात. पहिला पाऊस आनंद, उत्साह आणि  समाधान असं सर्व काही घेऊन येत असतो. सर्वांसाठी आकर्षणाचा विषय असलेल्या या पावसाची जून महिन्यात सर्वजण चातकाप्रमाणेच वाट पाहत असतात. यासाठीच पावसाळ्याआधी मुलींच्या मनात नेमके कोणते विचार येतात याचा घेतलेला हा वेध.

1. पावसात मनसोक्त भिजणे –

सर्वांनाच पाऊस फार आवडतो. त्यामुळे पावसाळा तोंडावर आल्यावर मुलींच्या मनात सर्वात प्रथम पावसात मनसोक्त भिजण्याचा विचार येऊ शकतो. कारण उन्हाच्या काहिलीमुळे आधीच सर्वजण त्रस्त झालेले असतात. त्यामुळे पावसाचा गारवा आणि आल्हाद अनुभवण्यासाठी असा विचार कोणत्याही मुलीच्या मनात येणं स्वाभाविक आहे.

2. पावसात भिजताना नाचणे –

पाऊस सुरू झाल्यावर अंगणात अथवा टेसेवर भिजत मनसोक्त नाचण्याचा विचार देखील मुलींच्या मनात येऊ शकतात. पाऊस आणि नृत्य यांचे एक अनोखे नाते आहे. पावसाची चाहुल लागताच मोरही आमराईत नाचू लागतो. चित्रपटात पावसातील गाणं हिरॉईनच्या नृत्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे पावसाळ्यात मुलींना भिजण्याचा आणि नाचण्याचा मोह आवरता येत नाही.

3.  कुठे फिरायला जायचं –

पावसाळा सुरू होण्याआधीच यंदा पावसाळ्यात कुठे कुठे पिकनिकला जायचं याचा बेत ठरतो.  त्यामुळे पावसाळ्यात फिरण्यासाठी कोणती पर्यटन स्थळे योग्य आहेत अथवा आतापर्यंत न बघितलेल्या पर्यटन स्थळांचा शोध सुरू होतो. सहाजिकच पावसाळ्याआधी मुलींच्या मनात पावसाळी पिकनिकचा विचार येऊ शकतो.

4. चहा, भजी आणि भुट्टा –

पाऊस, चहा, कांदाभजी आणि भुट्टा यांचंदेखील एक वेगळंच नातं आहे. मुसळधार पावसात गरमागरम भजी आणि चहा अथवा मीठ आणि तिखट लावलेला खरपूस भाजलेलं मक्याचं कणीस अगदी चविष्ट लागतं. त्यामुळे पाऊस पडण्याआधीच या गोष्टींची आठवण मुलींच्या मनात येऊ शकते.

5. जोडीदारासोबत रोमॅंटिक होणे-

पावसाळा प्रियकर आणि प्रेयसीला अधिक जवळ आणणारा  एक ऋतू आहे. त्यामुळे रोमॅंटिक होण्यासाठी पावसासारखं दुसरं कारण असूच शकत नाही. म्हणूनच पावसाच्या सुरूवातीला प्रेयसीला तिच्या प्रियकरच्या आठवणी मनात दाटून येणं स्वाभाविक आहे.

6. कविता मनात येणंं –

जर ती कवयित्री असेल तर पावसाच्या आगमनामुळे तिच्या मनात कविता स्फुरू शकतात. पाऊस आणि कविता एक बेस्ट कॉंम्बिनेशन आहे. त्यामुळे पावसाच्या आधी तिला कविता सूचणं शक्य  आहे.

7. मासिक पाळीविषयी जाणिव होणं –

पाऊस आणि पावसात भिजणं एक मस्तच अनुभव असतो. शिवाय पहिल्या पावसात भिजण्याची मजाच काही और आहे. मात्र पावसाच्या आगमनाचे दिवस आणि तिच्या मासिक पाळीचे दिवस जवळ आले असतील तर तिच्या मनात हा विचार नक्कीच घुटमळू शकतो. मासिक पाळी आल्यास तिला पहिल्या पावसात भिजता येणार नाही म्हणून तिचं मन निराशदेखील होऊ शकतं.

पिरेड्समध्ये तुम्ही तर करत नाही या 5 चुका (5 mistakes every girl do in her periods)

8. पावसाळ्याआधीची शॉपिंग –

पावसाळा सुरू होण्याआधीच अनेक ठिकाणी मॉन्सून सेलला सुरूवात होते. त्यामुळे पावसाळ्याआधीच अनेक शॉपिंग मॉल्समध्ये खरेदीसाठी झुंबड लागलेली असते. शिवाय पावसाळ्यातील नवीन ट्रेंड आणि त्यानुसार खरेदी करण्याचा विचार कोणाच्याही मनात येऊ शकतो. त्यामुळे या काळात मुलींच्या मनात पावसाळी खरेदी करण्याचा विचार येऊ शकतो.

9. ऑफिसला जाण्यासाठी बॅग बदलणं –

पावसाच्याआधी ऑफिसची बॅग बदलण्याचा विचारदेखील तिच्या मनात येऊ शकतो. कारण पावसात तुमची ब्रॅंडेड लेदर बॅग खराब होऊ शकते. शिवाय पावसाळ्यात तुम्हाला अशी बॅग हवी असते ज्यामुळे तुमच्या बॅगेमधील वस्तू खराब होणार नाहीत.

10. हेअर आणि स्कीन केअर-

पावसाआधीच मुली त्यांच्या हेअर आणि स्किन केअर विषयी विचार करू शकतात. कारण पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे अधिक नुकसान होते. त्यामुळे भिजण्याआधी त्वचा आणि केसांंवर सिरम अथवा संरक्षणासाठी इतर गोष्टीची काळजी घेणं प्रत्येक मुलीसाठी गरजेचं असतं.

थोडक्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी एखाद्या मुलीच्या मनात हे विचार नक्की येऊ शकतात. तुमच्या मनातदेखील हे विचार येतात का, अथवा या व्यतिरिक्त तुमच्या मनात  आणखी कोणते विचार येतात ते आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

#friendshipday साठी शुभेच्छा संदेश आणि स्टेटस

उंची जास्त असलेल्या मुलींसाठी खास फॅशन टीप्स – Fashion Tips For Tall Girl In Marathi

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From आपलं जग