DIY सौंदर्य

ब्युटीपार्लर किंवा सलोन निवडताना महत्त्वाच्या आहेत या गोष्टी

Aaditi Datar  |  Sep 23, 2019
ब्युटीपार्लर किंवा सलोन निवडताना महत्त्वाच्या आहेत या गोष्टी

आजकाल प्रत्येक महिलेची गरज बनलं आहे चांगलं ब्युटी पार्लर. कारण पूर्वीप्रमाणे महिला आता फक्त लग्नाच्या किंवा एखाद्या फंक्शनच्या वेळी पार्लरमध्ये जात नाहीत. तर दर महिन्याला आवर्जून पार्लरला जातात. त्यामुळे फक्त आयब्रो करणं असो वा इतर काही ब्युटी सर्व्हिस करून घेणं असो. पार्लर निवडताना तुम्ही काही ठराविक गोष्टी लक्षात घेतल्याच पाहिजेत. कारण शेवटी ब्युटी पार्लरमधील ब्युटीशियन जसं तुम्हाला सुंदर बनवू शकते. तसंच एखाद्या चुकीने तुमचं सौंदर्य बिघडवूही शकते. त्यामुळे पुढच्या वेळी एखाद्या पार्लरमध्ये गेल्यावर किंवा नव्या पार्लरला भेट दिल्यावर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.

सर्वात आधी हायजिन आणि प्रोडक्ट नॉलेज

कोणत्याही ब्युटीपार्लरमध्ये गेल्यावर सर्वात आधी महत्त्वाचं आहे ते हायजिन. कारण त्या पार्लरमध्ये हायजिन नसेल तर तुमच्या त्वचेला किंवा तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि त्याचे परिणाम नंतर जाणवू शकतात. त्यासोबतच त्या पार्लरमधील ब्युटीशियनला प्रोडक्टबद्दल किती नॉलेज आहे. हे पाहणंही महत्वाचं आहे. याबद्दल सांगताना डोंबिवलीतील बी यू सलोन या ब्युटीपार्लर ओनर आणि ब्युटी एक्सपर्ट हेमाली नाईक सांगते की, कोणीही ब्युटीपार्लर निवडताना सर्वात महत्त्वाचं आहे हायजिन. फक्त कमी किंमती आणि चांगलं इंटिरिअर उपयोगाचं नाही. कारण पार्लरमधील सर्व वस्तूंचा थेट तुमच्या त्वचेशी संबंध येतो. जसं हायजिन महत्वाचं आहे तसंच प्रोडक्ट नॉलेज महत्त्वाचं आहे, असंही हेमाली सांगते. हेमालीच्या मते, जसं डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला तपासून ते औषधं देतात. तसंच पार्लरमध्ये गेल्यावर ब्युटीशियनने तुमची त्वचा पाहून आणि समस्या समजून तुम्हाला ब्युटी ट्रीटमेंट सुचवली पाहिजे. तसंच ब्युटी एज्युकेशन हे मस्ट आहे. फक्त कोर्स करून फायदा नाही. वेळोवेळी ब्युटी वर्कशॉप आणि टेक्नोलॉजीबद्दल अपडेट असणं गरजेचं आहे. कारण या क्षेत्रातील टेक्नोलॉजीही दरवर्षी अपडेट होतेय. 

अपॉइंटमेंट इज मस्ट

सध्या ब्युटी पार्लरबाबत अजून एक ट्रेंड दिसून येतोय. तो म्हणजे अपॉइंटमेंट घेऊन पार्लरला जाण्याचा. हे फार महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही पार्लरमध्ये वेळ घेऊन गेलात तर ब्युटी सर्व्हिसेसही चांगल्या मिळतात आणि ऐनवेळची गर्दीही टाळता येते. कारण तुम्ही गेलात आणि पार्लरमधल्या ब्युटीशियनने घाईघाईत तुमचं फेशियल किंवा वॅक्स केल्यास तुम्हाला हवे ते ब्युटी रिजल्ट्स मिळणार नाहीत.

ब्रँडचं महत्त्व किती?

आजकाल ब्रँडेड सलोन्सच्या संपूर्ण देशात ब्रँच असलेल्या दिसून येतात. पण फक्त ब्रँडनेम आहे म्हणूनही त्या ठिकाणी चांगली सर्व्हिस मिळेलच असं नाही. तसंच अशा ब्रँडेड सलोनमध्ये ब्युटी सर्व्हिसेसच्या किंमतीही जास्त असतात. तसंच ते तुमच्या खिशालाही परवडलं पाहिजे. 

मैत्रिणी किंवा शेजारणींचा सल्ला

बरेचदा एखाद्या चांगल्या ब्युटी पार्लरसाठी आपण मैत्रिणीला किंवा ओळखीच्यांना विचारतो. पण त्यांना जो अनुभव आला तो तुम्हाला येईलच असं नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन मगच ठरवावं.

ट्रायल व्हिजीट करा

जर तुम्ही कोणत्याही पहिल्यांदाच जाणार असाल तर फक्त ट्रायल व्हिजीट करा. सलोन किंवा ब्युटीपार्लरमध्ये गेल्यावर ब्युटी सर्व्हिसेसची चौकशी करा आणि प्राईजेस विचारा. चौकशी करताना पार्लरचं निरीक्षण करा. यामुळे तुम्हाला सलोन किंवा पार्लर कसं आहे याबाबत आयडिया येईल.

ऑनलाईन रिव्ह्यूज

सलोन किंवा ब्युटीपार्लरची चौकशी केल्यावर ते सोशल मीडियावर किंवा जस्ट डायलवर असल्यास त्यांचे रिव्ह्यूजही बघा. कारण बरेचदा पाहून जरी एखादं ठिकाण चांगलं वाटलं तरी रिव्ह्यूज आणि रेटींगवरूनही तुम्हाला योग्य कल्पना येऊ शकते.

पार्लरमधली आवडती व्यक्ती

अनेकजणींची एखाद्या पार्लरमध्ये ठराविक ब्युटीशियन आवडती असते. जिच्याकडून तुम्हाला आयब्रो किंवा फेशियल करून घ्यायला आवडतं. तुमचीही अशी आवडती व्यक्ती असेल तर त्यामुळे तुम्हाला ब्युटीसोबत कंफर्टही मिळेल. अशा पार्लरमध्ये तुम्हालाही वारंवार जायला आवडते नाही का? 

खरंतर सर्व महिलांनी स्वतःकडे काळजी देण्यासोबतच योग्य ब्युटी एक्सपर्ट आणि परिणामी योग्य पार्लर निवडणं आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही ब्युटीपार्लर किंवा सलोनमध्ये गेल्यावर तुमचा वेळ सत्कारणी लागला पाहिजे. मग तुम्हीही सलोन किंवा ब्युटीपार्लर निवडताना या गोष्टींना नक्की महत्त्व द्या.

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

हेही वाचा –

घरीच पार्लरप्रमाणे Facial Clean-up कसं कराल

फेशिअलपेक्षाही जास्त ग्लो आणतील या बजेट ‘Skin treatments’

‘या’ विचित्र 12 ब्युटी टिप्स देतील तुम्हाला सुंदर लुक

Read More From DIY सौंदर्य