नैसर्गिक खोबरेल तेल, शिया बटर ऑइल, जोजोबा ऑइल, अव्हाकाडो ऑइल, ऑलिव्ह ऑइल यांसारखी नैसर्गिक तेले शतकानुशतके त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी वापरली जातात. या तेलांमध्ये असणारे नैसर्गिक औषधी घटक त्वचा मॉइश्चराइझ करतात. त्वचेचे संरक्षण करतात आणि काहींमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे औषधी घटक असतात.
मध्यंतरीच्या काळात आधुनिक कॉस्मेटिक्सचा उदय झाल्याने या नैसर्गिक गोष्टींकडे दुर्लक्ष झाले परंतु गेल्या दशकात लोकांना परत नैसर्गिक, ऑरगॅनिक ,केमिकल फ्री गोष्टींचे महत्व पटले आणि लोक परत नैसर्गिक गोष्टींकडे वळू लागले. नॅचरल ऑईल्स हा त्वचा नितळ व निरोगी ठेवण्याचा एक नैसर्गिक व सुरक्षित उपाय आहे. केसांना कंडिशन करण्यासाठी, त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी, ऍक्ने कमी करण्यासाठी आणि नखे मजबूत करण्यासाठी नॅचरल ऑईल्स हा एक उत्तम पर्याय आहे.
टी ट्री ऑइल
जेव्हा बॅक्टेरिया त्वचेच्या पोअर्स मध्ये अडकतात तेव्हा आपल्याला ऍक्ने , पुरळ यांचा त्रास होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की टी ट्री ऑइल त्या जीवाणूंना नष्ट करण्यात मदत करते. मुरुमांवर उपचार करण्यासाठी आणि जळजळ शांत करण्यासाठी देखील टी ट्री ऑइलचा उपयोग होतो. दुसर्या अभ्यासात असे आढळून आले की टी ट्री ऑईल हे बेंझॉयल पेरोक्साइड सारखेच प्रभावी आहे.
अधिक वाचा – काय आहेत एसेन्शियल ऑईलचे उपयोग
आर्गन ऑइल
आर्गन ऑइलला लिक्विड गोल्ड म्हटले जाते. आर्गन ऑइलमध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेचे एजिंग साईन्स कमी करू शकतात. डर्माटॉलॉजिस्ट असेही म्हणतात की आर्गन ऑइल मध्ये असलेले ओमेगा -3 फॅटी ऍसिड हे कोलेजनच्या वाढीस चालना देतात आणि तुमची त्वचा मऊ करतात. तुमची त्वचा कोरडी, तेलकट किंवा सामान्य अश्या कुठल्याही प्रकारची असली तरी तुम्ही आर्गन ऑइल वापरू शकता. आर्गन ऑइलचा त्वचेला फायदाच होतो. आर्गन ऑइल हे केसांना देखील कंडिशन करते. इतर तेलांप्रमाणे आर्गन ऑइलमुळे केस चिकट -तेलकट होत नाहीत. हे ऑईल लावून सुद्धा तुम्ही तुमची इतर हेअर केअर उत्पादने वापरू शकता.
रोझमेरी व एरंडेल
तुमचे केस खूप पातळ झाले असतील किंवा खूप गळत असतील किंवा केस निर्जीव व खूप कोरडे दिसत असतील किंवा केस गळल्यामुळे टक्कल पडल्यासारखे दिसत असेल तर रोझमेरी ऑइल तुमच्यासाठी बेस्ट आहे. रोझमेरी ऑइलमुळे केसगळती थांबू शकते तसेच केसांना दाटपणा येतो. केस मऊ होतात आणि केसांची मुळे मजबूत होतात. केसांमध्ये जर खाज येत असेल तर रोझमेरी ऑइल केसांच्या मुळाशी लावल्याने खाज थांबते. रोझमेरी ऑईलने केस चमकदार होतात आणि केसांचे आरोग्य सुधारते. याचप्रमाणे कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल सुद्धा आपल्या पापण्या व भुवयांच्या केसांच्या वाढीसाठी उपयोगी आहे. परंतु ते लावण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा कारण भुवया व पापण्यांना लावताना चुकून एरंडेल डोळ्यात गेले तर त्रास होऊ शकतो.
अधिक वाचा – संवेदनशील त्वचेसाठी 3 महत्त्वाचे घटक, घेतील त्वचेची काळजी
ऑलिव्ह ऑइल आणि अवाकाडो ऑइल
तुमची नखं जर कमजोर असतील किंवा मध्येच तुटत असतील किंवा नखांची नीट वाढ होत नसेल तर रोज रात्री झोपण्याच्या आधी नखांवर ऑलिव्ह ऑइल किंवा अवाकाडो ऑइल चोळा. रात्रभर हे तेल नखांमध्ये मुरेल आणि काही दिवसांतच तुमची नखं चांगली होतील. या तेलांमध्ये असणारे फॅटी ऍसिड्स नखांचे आरोग्य सुधारतील. ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.
या नैसर्गिक तेलांचा उपयोग करून नितळ त्वचा, चमकदार दाट केस व निरोगी नखं तुम्ही मिळवू शकता.
अधिक वाचा – अंघोळीच्या पाण्यात मिसळा हे नैसर्गिक घटक, त्वचा राहिल मऊ आणि मुलायम
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm एक कडून मोफत लिपस्टिक