DIY फॅशन

‘व्हिंटेज डेनिम फॅशन’ची पुन्हा चलती!90 च्या दशकातील फॅशन

Dipali Naphade  |  Oct 21, 2019
‘व्हिंटेज डेनिम फॅशन’ची पुन्हा चलती!90 च्या दशकातील फॅशन

फॅशन म्हणजे नक्की काय तर काही कालावधीनंतर एखाद्या जुन्या फॅशनमध्ये बदल करून त्याला एखादा तडका लावून नवे कपडे तयार करणं म्हणजे फॅशन. इतिहासाची पुनरावृत्ती होते असं नेहमीच म्हटलं जातं आणि हे फॅशनच्या बाबतीतही लागू होतं. 90 च्या दशकातील फॅशनचा काळ हा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. त्याकाळी अनेक नवीन फॅशन स्टाईलची ओळख आणि विविध ट्रेंडचा जन्म झाला आणि त्या आजही आजच्या फॅशनशी संबंधित वाटतात. काही विंटेज ट्रेंड क्लासिक असतात आणि कधीही फॅशनच्या दुनियेतून बाहेर फेकले जात नाहीत. हाय वेस्टपॅंटपासून ते नेहमीच्या क्लासिक डेझी ड्यूक्स आणि व्हिंटेज वॉश डेनिमपर्यंत. अशीच पुन्हा विंटेज डेनिम फॅशन पुन्हा आली आहे. त्यासाठी POPxo मराठीने डिझाईन तज्ज्ञ – अभिषेक यादव, डिझाईन हेड, स्पायकर लाइफस्टाइल आणि नेल्सन जाफरी, हेड ऑफ डिझाईन लिवा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी  90 च्या दशकाच्या शैलीतदेखील आपण कसं स्टायलिस्ट दिसावं याबद्दल काही सूचना केल्या आहेत. या सूचना वापरून नक्की कसं स्टायलिश दिसावं हे पाहूया  – 

हाय वेस्ट पँट्स : (High Waist Pant)

हाय वेस्ट पँट्स जीन्सच्या व्यतिरिक्त 90 च्या फॅशननिस्टांनीदेखील हाय वेस्ट पॅलाझोस आणि पँट्स खूप प्रसिद्ध केली. व्हिस्कोस सामग्री पासून बनलेली मुलायम कापडाचे कपडे तुम्ही यासाठी निवडू शकता. तसंच स्टायलिश लुकसाठी तुम्ही याबरोबर पॉपलिन क्रॉप टॉप वापरू शकता आणि या लुकसह तुम्ही पायामध्ये ब्लॉक हिल्स घातल्यास, तुमचा लुक परफेक्ट होतो. आजही तुम्ही ही फॅशन कॅरी करू शकता. 

स्कीनी पॅंट्स बद्दल देखील वाचा

जॅकेट्स आणि कोट्स: (Jackets and Coats)

बऱ्याचदा आपण कळत- नकळत काही फॅशन स्टेटमेंट्ससाठी किंचित जास्त आकार असलेले कोट्स आणि जॅकेट घेतो. पण अशावेळी परत देणंसुद्धा आपल्याला जमत नाही. जॅकेट्स हे इतर सामान्य पोशाखांपेक्षा उत्कृष्ट रचना आणि अनेक लेयर्सने (स्तर) जोडलेले असतात. त्यामुळे ते अधिक बोल्ड आणि स्टायलिश दिसते. यामध्ये तुम्हाला अधिक आराम मिळण्यासाठी व्हिस्कोस मॉडेल मिश्रित कपडे घेऊ शकता. जॅकेट्ससह तुम्ही प्लेड स्कर्ट किंवा काही स्ट्रेट कट पॅन्ट घातली तरीही तुमचा लुक अधिक सुंदर दिसेल. 

जुन्या कपड्यांचा करा असा पुनर्वापर, व्हा स्टायलिश

व्हिंटेज जीन्स: (Vintage Jeans)

सध्या फॅशनमध्ये 90 च्या दशकातील उत्साह पुन्हा दिसू लागला आहे. व्हिंटेज जीन्सच्या आधुनिक कटसह व्हिंटेज लुक आहे. आता तुम्ही नवद्दीची 2019 मध्ये सुधारित विंटेज डेनिम बाजारामध्ये सहज खरेदी करू शकता. व्हिंटेज डेनिम प्री-एजेड पासून प्रेरित होती. वास्तविक अशी जीन्स तुम्हाला तुम्ही तरूण असल्याचा अनुभव देते. तसंच तुमचं व्हिंटेज कलेक्शनदेखील पूर्ण बनवते.  जी वयाच्या 18 व्या वर्षाचा अनुभव देते आणि तसेच व्हिंटेज कलेक्शन परिपूर्ण बनवते. अधिक चांगल्या लुकसाठी व्हिंटेज डेनिम प्लेड शर्ट किंवा पांढरा टी-शर्ट आणि पायामध्ये कॉम्बट बूटसह घालू शकता. 

Also Read How To Choose Straight Fit Pants In Marathi

ओव्हरऑल (सैल पायजमा) : (Overall)

90च्या फॅशन आठवणी ओव्हरऑल (सैल पायजमा) शिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. तुम्ही ते एका पट्ट्यासह किंवा दोन्ही पट्ट्यांसह परिधान करू शकता किंवा स्लिव्हलेस टर्टलनेक, प्लेड शर्ट आणि डॅड स्नीकर्ससह आपले सर्व आवडते 90चे ट्रेंडी कपडे एकत्र करून भन्नाट लुक्स मिळवू शकता. तुम्हाला आवडो अथवा न आवडो 90 चा ओव्हरऑल ट्रेंड पुन्हा आले आहे यात शंका नाही.

फेस्टिव्ह सीझनमध्ये बदला ड्रेसिंग स्टाईल आणि दिसा Slim Trim

बॉम्बर जॅकेट: (Bomber Jacket)

90 च्या दशकात बॉम्बर जॅकेटचा ट्रेंड प्रचंड होता आणि आता अलीकडच्या दिवसातही तो खूपच चांगलं पुनरागमन करत आहे. एथलिझर आणि स्ट्रीटवेअर फॅशनच्या दिशेने सध्या ही इंडस्ट्री आकर्षित होत आहे. बॉम्बर जॅकेट मुळात मोठ्या आकारात आणि बॅगी स्टाईलचे असते. हे जॅकेट कट्स असलेल्या जीन्स आणि स्नीकर्ससह घातल्यास उत्कृष्ट दिसतात. तुम्हाला युनिक दिसायचं असेल आणि लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर हा एक अप्रतिम पर्याय आहे.  

वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात अशा डेनिम जीन्स

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From DIY फॅशन