भ्रमंती

काय आहे वॅक्सिन पासपोर्ट, कसा करावा उपयोग जाणून घ्या माहिती

Trupti Paradkar  |  Jul 4, 2021
काय आहे वॅक्सिन पासपोर्ट, कसा करावा उपयोग जाणून घ्या माहिती

पर्यटन हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र सध्या कोरोनामुळे फिरण्यासाठी अनेक कठीण नियम पर्यंटकांना पाळावे लागत आहेत. कोरोनाच्या काळात माणसाची संपूर्ण जीवनशैलीच बदलली आहे. यापुढे तुम्हाला कामानिमित्त अथवा फिरण्यासाठी परदेशात जाण्याची गरज असेल तर तुम्हाला सोबत एक महत्वाचे कागदपत्र कॅरी करावे लागणार आहे. ते म्हणजे वॅक्सिन पासपोर्ट. वॅक्सिन पासपोर्ट नसेल तर तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही. यासाठी जाणून घ्या या महत्त्वाच्या कागदपत्राविषयी महत्त्वाची माहिती…. काय आहे हे वॅक्सिन पासपोर्ट, ते कसे मिळवावे आणि कसा आणि कुठे करावा या कागदपत्राचा वापर. 

काय आहे वॅक्सिन पासपोर्ट

वॅक्सिन पासपोर्ट इम्युनिटी पासपोर्ट या नावानेही ओळखले जाणार आहे. परदेशात प्रवास करण्यासाठी यापुढे प्रवाशांना वॅक्सिन पासपोर्ट बंधनकारक असणार आहे. वॅक्सिन पासपोर्ट हे प्रवाशांनी कोविड वॅक्सिन घेतले आहे याचा एक पुरावा दाखवणारे कागदपत्र आहे. पर्यटकांना जर कोविडच्या काळात परदेशात प्रवास करायचा असेल तर तर तुम्ही त्वरित वॅक्सिन पासपोर्ट काढायला हवा. 

भारतात कसा मिळणार वॅक्सिन पासपोर्ट

कोरोनाच्या काळात जशी जशी परिस्थिती नॉर्मल होत आहे तस तशी पर्यंटकांनी परदेशात जाण्याची तयारी सुरू केली आहे. भारतात नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोविडशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्फुटनिक या तीन प्रकारच्या लशी दिल्या जात आहे. लसीकरण मोहिम जोरदारपणे सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र या तीन लशींपैकी कोवॅक्सिनला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशने परवानगी दिलेली नसल्यामुळे ही लस घेतलेल्या लोकांना सध्या परदेशात जाताना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोविडशिल्ड घेतलेल्या लोकांनाही युरोपिअन देशात जाताना समस्या सहन कराव्या लागत आहेत. भारतात राहणाऱ्या नागरिकांना कदाचित या लस घेतल्यामुळे युरोपिअन ग्रीन कार्ड मिळणं कठीण होऊ शकते. मात्र आता यावर उपाय म्हणून प्रत्येक देशातील नागरिकांना वॅक्सिन पासपोर्ट द्वारे परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. याबाबत सध्या भारतात चर्चा सुरू असून लवकरच याबाबत योग्य तो निर्णय सरकार द्वारा जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

कसा घ्यावा वॅक्सिन पासपोर्ट

भारत सरकार द्वारा आरोग्य सेतू अॅपवर याबाबत अपटेड देण्यात आलेलं आहे. ज्यामुळे नागरिक त्यांच्या वॅक्सिन स्टेटसनुसार पासपोर्टसाठी अप्लाय करू शकतात. यासाठी या स्टेप बाय स्टेप्स फॉलो करा. 

या स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा वॅक्सिन पासपोर्ट मिळवा. शिवाय सुरक्षितपणे परदेशात प्रवास करण्यासाठी आणि वॅक्सिन पासपोर्ट मिळवण्यासाठी तुमचे कोविड वॅक्सिनचे दोन्ही डोस वेळेत घ्या. काळजी घ्या आणि परदेशात मुक्तपणे फिरण्याचा आनंद घ्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि  याबाबत तुम्हाला आणखी कोणती माहिती हवी ते आम्हाला कंंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – पिक्सेल्स

अधिक वाचा –

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर होऊ शकतात हे त्रास, काळजी करु नका

तुम्हालाही वाटते का इंजेक्शनची भीती, जाणून घ्या नीडल फोबियाविषयी

विमानातून प्रवास करताना तुमच्या सामानात नसाव्यात ‘या’ गोष्टी

Read More From भ्रमंती