DIY सौंदर्य

चारकोल पील ऑफ मास्क नक्की कोणी वापरावा, जाणून घ्या

Leenal Gawade  |  Jan 14, 2021
चारकोल पील ऑफ मास्क नक्की कोणी वापरावा, जाणून घ्या

पील ऑफ मास्कची जाहिरात पाहिल्यानंतर त्वचेवर होणारा कमालीचा बदल कोणाला नकोसा होईल. अशाच जाहिरातींना बळी पडून अनेकांना पील ऑफ मास्क घेतले असतील. इन्स्टंट ग्लो आणि चमकदार त्वचेसाठी जर तुम्ही सध्याच्या ट्रेंडमधील चारकोल पील ऑफ मास्क वापरत असाल तर तुम्हाला त्याची गरज आहे का? ह जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? चारकोल मास्क हा त्वचेसाठी चांगला असला तरी तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी किंवा तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तो योग्य आहे की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. चारकोल मास्कचा उपयोग करण्यापूर्वी ही महत्वाची माहिती जाणून घ्या.

त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरता येतात चारकोल ब्युटी उत्पादनं, काय आहेत फायदे

चारकोल पील ऑफ मास्क म्हणजे काय?

Instagram

चारकोल म्हणजे कोळसा. कोळशाच्या पावडरचा उपयोग स्किनकेअरमध्ये हल्ली मोठ्या प्रमाणात याचा उपयोग केला जातो. चारकोलच्या पावडरचा उपयोग करुन त्यापासून पील ऑफ मास्क तयार करण्यात येतो. या पील ऑफच्या मास्कने चेहरा स्वच्छ होते. त्यामधील घटक त्वचेला तजेला आणण्याचे काम करतात. पील ऑफ मास्क हा चिकट असल्यामुळे तो काढताना फार काळजी घ्यावी लागते.महिन्यातून दोन- तीनवेळा पील ऑफ मास्क लावल्यानंतर चेहरा अधिक सुंदर आणि चांगला दिसतो.

झोपताना लावा हा अप्रतिम फेसमास्क, मिळेल तजेलदार त्वचा

चारकोल पील ऑफ मास्क यांनी टाळावा

जर तुम्ही चारकोल मास्कचे फायदे वाचून त्याचा वापर करुन त्याचा वापर करण्याचा विचार करत असाल तर नेमका कोणी याचा वापर टाळायला हवा हे देखील जाणून घ्या.

  संवेदनशील त्वचा: 
जर तुमची त्वचा संवदेनशील असेल तर तुम्ही चारकोल पील ऑफ मास्क मुळीच वापरु नका. कारण असे पील ऑफ मास्क काढल्यामुळे तुमच्या त्वचेवर लालिमा येऊ शकते. तुमची त्वचा ताणली जाते. जर तुम्हाला त्वचा ओढली जाण्याने त्रास होत असेल तर तुम्ही चारकोल पील ऑफ मास्क अजिबात वापरु नका. कारण असे मास्क वापरल्यानंतर तुमची त्वचा निघण्याची शक्यता असते. 

कोरडी त्वचा : 
कोरड्या त्वचेला मॉईश्चरायझरची गरज असते. पण कधी कधी पील ऑफ मास्क वापरणे अशा त्वचेसाठी घातक ठरु शकते. अनेक चारकोल पील ऑफ मास्क हे त्वचेवर इतके घट्ट बसतात की, ते काढताना त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. जर तुम्ही त्वचा ही फार कोरडीअसेल तर तुम्ही अशा प्रकारचा पील ऑफ मास्क सतत वापरु नका. त्याऐवजी तुम्ही पील ऑफ मास्कचा वापर करा. त्यामुळेही तुम्हाला चारकोलचा फायदा मिळण्यास मदत होईल. 

अॅक्नेप्रोन त्वचा : 

ज्या त्वचेवर सतत पिंपल्स येतात अशा त्वचा असणाऱ्यांनी देखील चारकोल मास्कचा वापर टाळायला हवा. कारण अशा प्रकराची त्वचा ही फार नाजूक असते. त्वचेवर असलेल्या पिंपल्सना जरासा त्रासही झाला.  तर त्यामुळे तुमच्या त्वचेवर डाग पडण्याची शक्यता असते. तुम्हाला पिंपल्स आले असतील अशावेळी तुम्ही असा पील ऑफ मास्क लावू नका. 
पिंपल्स असताना त्वचेवर कोणताही पील ऑफ मास्क मुळीच लावू नका. 


आता जर तुम्ही चारकोल पील ऑफ मास्क वापरत असाल तर आधी या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. 

चारकोल मास्क लावताना तुम्ही करता या चुका

Read More From DIY सौंदर्य