ADVERTISEMENT
home / आरोग्य
after-pregnancy-care

बाळंतपण आणि नंतरची काळजी

बाळंतपणानंतर नकळत गोष्टी बदलत असतात. वाढलेली जबाबदारी शारीरिक आणि मानसिक आघाड्यांवर व्यवस्थित सांभाळण्यासाठी काय करायला हवं? आहार- व्यायाम कसा हवा? याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. डॉ. मिता नखरे, प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, लोकमान्य रूग्णालय, पुणे यांच्याकडून आम्ही अधिक जाणून घेतले.  बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर एका दिवसात मुलगा आई होते. आणि आईपण निभवयाचं म्हणजे काय, याची कल्पना तिला पहिल्या काही तासांत पहिल्या काही दिवसांतच येते. बाळंतपण कोणत्या पद्धतीनं झालं, यावर निश्चितच काही गोष्टी अवलंबून असतात. 

नैसर्गिक प्रसूती-कोणतीही नैसर्गिक गोष्ट साधी आणि सोपी असते. निसर्ग आपल्या नियमांनुसार बाळाला जन्म घ्यायला भाग पाडतो. यात बाळ स्वतः वेदना सहन करत, रडत बाहेर येतं. याचा त्रास त्यावेळी आई आणि बाळ दोघांनाही होतो. मात्रा या त्रासातून आई लवकर बाहेर पडते. नैसर्गिक प्रसूतीमुळेही आईस काही वेळा टाके घालावे लागतात. पहिले काही दिवस तिच्यासाठी वेदनांचे असतात; पण त्यानंतर तिला कसलाच त्रास होत नाही. 

काय असतात वेदना

सिझेरियल सेक्शन – या प्रकारात विविध कारणांमुळे आईच्या पोटावर छेद देऊन बाळाला पोटातून बाहेर काढलं जात. प्रसूती कोणत्याही प्रकाराने झाली, तरी त्यानंतर आपली काळजी आपणच घेतली पाहिजे, हे स्त्रियांनी स्वतःच्या मनावर ठसवलं पाहिजे. बाळंतपणानंतर स्त्रियांना काही गोष्टींना प्राधान्य घ्यावं लागते. 

अधिक वाचा – सी – सेक्शन (सिझेरियन) समज आणि गैरसमज

ADVERTISEMENT

शारीरिक वेदना – प्रसूतिसमय म्हणजे वेदना, हे तर खरंच….पण हल्ली मोठ्या हॉस्पिटलमध्ये वेदनारहित प्रसूती होते. त्यामुळे आईला कोणताही त्रास न होता बाळ जन्माला येतं. यासाठी आईला पाठीत एक इंजेक्शन घ्यावं लागतं.  बाळाला घेऊन हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर काही जणींना दुखणं, रक्तस्त्राव होणं, स्तनाच गाठी होणं, असं कधी-कधी होतं. त्या प्रत्येक वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नेमकं याचवेळी आई बाळाचं पोट भरणं, त्याची शू-शी यात दिवसरात्र अडकलेली असते. तिला स्वतःच्या वेदनांकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. अशा स्थितीत तिने दुर्लक्ष केलं, की पुढे त्याचा त्रास भोगावाच लागतो. तो विविध आजारांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. 

भावनिक एकटेपण – बाळ झाल्यानंतर अनेक स्त्रियांना भावनिक एकटेपणाचा त्रास होता. याला वैद्यकीय भाषेत प्युपेरिअल ब्लूज किंवना बेबी ब्लूज असं म्हणतात. या काळात आई खूप निराश असते. तिच्याजवळ असलेल्या बाळाला पाहून ती रडत असते. खरंतर आई होणं ही आनंदाची गोष्ट असते. पण तिला मात्र रडायला येत असतं. याच एक कारण असं सांगतात की, बाळ होईपर्यंत नऊ महिने सर्वांच लक्ष आईकडे असतं. बाळ झाल्यावर मात्र आईकडे कोणीच लक्ष देत नाही, यामुळे असं होतं. पण असं होण्यामागे हे एकमेव कारण नाही. अचानक येणारी जबाबदारी, आई होण्यामुळे आलेली थोडी-फार बंधन, हार्मोनल चेंज यामुळे आईला भावनिकदृष्ट्या एकाकी वाटतं. 

अधिक वाचा – मातृत्वानंतरचे मानसिक आरोग्य, नैराश्याची कारणे आणि उपाय (Postpartum Depression In Marathi)

आईच्या मनात अशा भावना निर्माण होण्यामागे बऱ्याचदा विभक्त कुटुंबपद्धती कारणीभूत आहे, असं दिसतं. पूर्वी घरात खूप माणसं असायची. बोलायला कोणी ना कोणी असायचं. मन मोकळं केलं जायचं. मन जाणणारी नातीही असायची. पण आता जर नवरा आणि बाळ या दोघांच्याच संगतीत ही नवबाळंतीण असेल, तर तिला भावनिक एकटेपणा वाटू लागतो. मात्र, यावर बोलणं हा एक चांगला उपाय आहे. यासाठी याबाबत डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलणे अतिशय गरजेचं आहे. 

ADVERTISEMENT

आईचा आहार कसा असावा….

बाळंतपणानंतर झालेली झीज भरू काढण्यासाठी भरपूर दूध-तुप डिंकाचे लाडू द्यायची पद्धत आपल्याकडे होती. अजूनही आहे. आता डॉक्टर्स आणि आहार शास्त्रज्ञ बाळंतीण स्त्रीला पहिल्या दिवसापासून चौरस आहार घ्यायला सांगतात. बाळंतपणानंतर प्रथिनयुक्त आहार घेण्यावर भर द्यावा. नियमित आहारात सोयाबिन, अंडी, दूध, मासे, मटण, डाळी, कडधान्ये व तेलबिया यांचा समावेश करावा. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे स्तनपान करणाऱ्या आईला पहिल्या सहा महिन्यांत रोज 16 ग्रॅम, पुढच्या सहा महिन्यांत दररोज 12 ग्रॅम आणि त्यानंतर रोज 11 ग्रॅम प्रथिनांची गरज असते. परंतु, हल्लीच्या मुलींचा आहारकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. गर्भावस्थेच्या नऊ महिन्यांत आणि बाळंतपणाच्या तीन महिन्यांत मुलींनी जर सुडौल शरीर राखण्याकडे लक्ष दिलं तर त्यापासून होणारे त्रास पुढे त्यांना सहन करावे लागतील. हल्लीच्या फिगर कॉन्शसनेस मुळे मुली आहार व्यवस्थित घेत नाहीत. काही मुली बाळाला स्तनपान करायलाही राजी नसतात. ही फारच वाईट गोष्ट आहे. बाळंतपणात योग्य आहार घेतल्यास शरीराला ताकद मिळते. याशिवाय बाळाचे आरोग्याही उत्तम राहते. हे मुलींनी विसरून चालणार नाही. 

अधिक वाचा – प्रसूतीनंतर महिलांनी का प्यावे ओव्याचे पाणी, जाणून घ्या फायदे

या व्यतिरिक्त प्रसूतीनंतर शरीराच्या अंतर्गत भागात बरीच मोठी उलथापालथ झालेली असते. बाळासाठी ताणलेलं गर्भाशय बाळ बाहेर आल्यानतर सैल पडतं. त्यामुळे पोट अजूनही मोठंच दिसतं. पूर्वी हे पोट आत जाण्यासाठी पोटपट्टा बांधण्याची पदधत होती. परंतु, आता डॉक्टर व्यायाम करण्याचा सल्ला देतात. परंतु, व्यायाम कधीपासून करायचा, कसा करायचा याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. 

अधिक वाचा – गरोदरपणानंतर काय घ्यावी काळजी, जाणून घ्या (After Pregnancy Tips In Marathi)

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT