ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
रणबीरच्या त्या चुकीमुळे आलिया दुरावली

रणबीरच्या त्या चुकीमुळे आलिया दुरावली

बॉलीवूडमधील क्युट आणि बबली अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या अफेयरच्या आणि लग्नाच्या चर्चा गेले कित्येक महिने रंगत आहेत. नुकतंच आलियाच्या वाढदिवसाच्या दिवशी व्हायरल झाला या कपलचा किस करतानाचा भारताबाहेरचा फोटो. पण दुसरीकडे आलियासोबत केक कापताना मात्र काही रणबीर दिसला नाही. नेमकी इथेच माशी शिंकली आणि या कपलमध्ये दुरावा आल्या बाबतच्या चर्चा नेटीझन्समध्ये रंगू लागल्या. नेमकं गौडबंगाल काय आहे जाणून घेऊया…

आलिया आणि रणबीरचा ब्रेकअप

ऐरवी प्रत्येक अवॉर्ड फंक्शनला किंवा रेस्टॉरंट असो वा चित्रपटाचं स्क्रीनिंग असो रालिया म्हणजेच रणबीर-आलिया एकत्र दिसतात. अशीही चर्चा आहे की, दोघांचं लवकरच लग्नही होणार आहे. पण आता मात्र चित्र वेगळं असल्याचं दिसतंय. एका प्रसिद्ध वर्तमानपत्रानुसार रणबीरने आलियाशी गैरवर्तवणूक केल्याने दोघांमध्ये ब्रेकअप झाला आहे. पण सूत्रानुसार मात्र असं काहीच नाहीयं. हे दोघंही अजून एकत्रच आहेत. पण नक्की खरं काय मानायचं हा प्रश्न फॅन्सच्या मनात आहे कारण आलियाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनलाही रणबीर नव्हता. कोरोनामुळे मुंबईत असूनही रणबीरने आलियाला विश केल्याचं किंवा फोटो पोस्ट केल्याचं दिसलं नाही. पण त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिधिमाने मात्र आलिया सोशल मीडियावर बर्थडे विश केलं होतं. एकीकडे आलियाने रणबीरच्या वाढदिवसाला स्वतःच्या हाताने केक बनवला होता पण रणबीरने मात्र असं काहीच केल्याचं दिसलं नाही.

ब्रम्हास्त्रच्या सेटवर जुळलं प्रेम

जेव्हापासून करण जोहरचा मल्टीस्टारर चित्रपट ब्रम्हास्त्रमध्ये रणबीर-आलियाचं कास्टिंग झालं . तेव्हापासून त्यांच्या अफेयरच्या चर्चा रंगू लागल्या. या चित्रपटांमध्येच ही जोडी पहिल्यांदा एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या दोघांनीही ऑफिशियली आपल्या नात्याबाबत कोणतीही घोषणा केली नसली तरी दोघंही नेहमीच एकत्र फिरताना दिसतात. एवढंच नाहीतर रणबीरच्या आत्येभावाच्या म्हणजेच अरमान जैनच्या लग्नातही हे दोघंही जोडीने पोचले होते. विशेष म्हणजे दोघांसोबत रणबीरची आई नीतू कपूरसुद्धा होती. आता यावरून फॅन्सना तर वाटणं साहजिक आहे ना की, दोघांचं ठरल्यातच जमा आहे.

बॉलीवूडमध्ये प्रत्येक चित्रपट येण्याआधी एक तर जोडी जुळते किंवा ब्रेकअप तरी होतंच. आता रालियाच्या बाबतीत काय होतं माहित नाही. आगामी ब्रम्हास्त्र या चित्रपटाचं दिग्दर्शन रणबीरचा मित्र अयान मुखर्जी करत आहे. तर मुख्य भूमिकेत महानायक अमिताभ बच्चनही दिसणार आहे. या चित्रपटाचा विषयही हटके असल्याची चर्चा आहे. आता पाहूया तोपर्यंत रालियामध्ये सगळं आलबेल राहत की, पुन्हा रणबीर सिंगल होतो ते. कारण तसंही रणबीरच्या फॅन्सना त्याच्या अफेयर्स आणि ब्रेकअप्सची सवय झाली आहे. आलियाच्या बाबतीत तो गंभीर असल्याचं वाटलं होतं पण जसं दिसतं तसं नसतं. हेही आहेच ना.

ADVERTISEMENT

लग्न ठरवण्यापूर्वी रणबीर-आलिया शोधताहेत हनिमूनसाठी जागा

‘बह्मास्त्र’च्या सेटवरील आलिया-रणबीरचा ‘हा’ फोटो व्हायरल

तुम्हाला आवडते का आलिया आणि रणबीरची जोडी, आम्हाला कमेंट करून सांगा. ब्रम्हास्त्र चित्रपटाबाबतही तुम्हाला उत्सुकता आहे का?

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

ADVERTISEMENT

 

19 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT