ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
surkutya kami karnyasathi upay

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय | Chehryavaril Surkutya Kami Karnyasathi Upay

चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणं ही समस्या कोणत्याही महिलेसाठी एखादया वाईट स्वप्नाप्रमाणे असू शकते. कारण सुरकुत्यांमुळे सैल पडलेली तिची त्वचा तिला सतत वाढत्या वयाची जाणीव करून देत राहते. वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्यांची दिसण्याची समस्या हळूहळू डोकं वर काढू लागते.सहाजिकच चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी महिला बाजारातील अॅंटि एजिंग क्रीमचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागतात. मात्र अशा एजिंग क्रीम खूप महाग असतात. शिवाय त्यात वापरण्यात आलेल्या केमिकल्सचा त्वचेवर हळू हळू दुष्परिणाम होऊ शकतो. यासाठी अनेकींना कमीतकमी खर्चात चेहऱ्यावरील सुरकुत्या कशा कमी कराव्या हे जाणून घ्यायचं असतं.
जर तुम्हाला देखील या सौदर्य समस्येला तोंड द्यावं लागत असेल तर हे सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय (Surkutya Kami Karnyasathi Upay) जरूर करून पहा. नियमित जर तुम्ही हे चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी उपाय केले तर तुम्ही नक्कीच तुमच्या वयाच्या किमान दहा वर्ष तरी लहान दिसू शकाल. त्यासोबतच वाढतं वय लपवण्यासाठी काही अँटीएजिंग टीप्स आणि घरच्या घरी बनवता येतील असे अँटिएजिंग फेसपॅक (Anti Aging Face Packs In Marathi)
चला तर बघूया, घरच्याघरी चला तर बघूया, घरच्याघरी सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय,

Table of Contents

  1. घरच्याघरी सुरकुत्या घालवण्यासाठी 12 घरगुती उपाय
  2. कोरफड आणि अंडी चेहेर्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फायदेशीर आहेत
  3. पपई आणि केळी चेहऱ्यासाठी उत्तम
  4. बदाम व दूध चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवू शकतात
  5. अंडे, मिल्क क्रीम व लिंबू चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात
  6. गुलाबपाणी, लिंबू आणि ग्लिसरीन – Rose Water, Lemon And Glycerine For Anti Aging In Marathi
  7. नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईल कमी करतील चेहऱ्यावरील सुरकुत्या
  8. लिंबू आणि मध – Lemon and Honey To Cure Anti Aging In Marathi
  9. योगर्ट, काकडी आणि पुदिना सुद्धा सुरकुत्या घालवण्यात आहेत योग्य
  10. अॅव्होकॅडो – Avocado
  11. मसाज मुळे चेहऱ्याच्या सुरकुत्या जातात (Massage)
  12. जोजोबा ऑईल वापरून घालवा सुरकुत्या (Jojoba Oil)
  13. तांदूळ वापरून करा सुरकुत्या कमी

घरच्याघरी सुरकुत्या घालवण्यासाठी 12 घरगुती उपाय

कोरफड आणि अंडी चेहेर्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फायदेशीर आहेत

कोरफड आणि अंडे - सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय
कोरफड आणि अंडे

Aloe Vera And Eggs For Anti-Aging – चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर हा एक अगदी सोपा आणि कमी खर्चाचा उपाय आहे. विशेष म्हणजे कोरफड आणि अंडे (Aloe vera and eggs) या दोन्ही गोष्टी तुमच्या त्वचेसाठी अतिशय पुरक आणि पोषक असतात. कोरफडीचे फायदे अनेक असून त्यात व्हिटॅमिन ई चे नैसर्गिक गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा ओढली जाऊन सुरकुत्या कमी होतात. त्याचप्रमाणे कोरफड व अंड्याच्या मिश्रणामुळे तुमची डेड स्कीन निघून जाते आणि त्वचा तजेलदार दिसू लागते. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी आणि त्वचेला थंडावा मिळण्यासाठी कोरफड आणि अंड्याचा फेसमास्क खूप फायदेशीर ठरतो. 

कसा कराल वापर –

  • एका भांड्यामध्ये दोन चमचे कोरफडाचा रस आणि एका अंड्याचा पांढरा भाग घ्या.
  • या मिश्रणाची एक छान पेस्ट तयार करा व ती चेहऱ्यावर लावून काही वेळ मसाज करा.
  • अर्धा तास हा फेसपॅक चेहऱ्यावर तसाच ठेवा व नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

पपई आणि केळी चेहऱ्यासाठी उत्तम

Papaya and Banana For Anti Aging In Marathi – पपई हा एक सुंदर आणि सोप्पा असा सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय (Surkutya Var Upay) आहे. कारण पपईच्या गरामुळे तुमची सैल त्वचा खेचली जाऊन सुरकुत्या कमी होतात. केळ्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी होतात. केळ्यामधील पोषक तत्त्वांमुळे तुमच्या त्वचेला ओलावा मिळतो. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि नवीन पेशींच्या निर्मितीला चालना मिळते. 

ADVERTISEMENT

कसा कराल वापर –

  • पपईचा गर आणि केळं मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • वाटलेले मिश्रण तुमच्या सुरकुतलेल्या त्वचेवर लावा.
  • पंधरा मिनीटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

वाचाकपाळावर दिसणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

बदाम व दूध चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवू शकतात

बदाम व दूध - सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय
बदाम व दूध

Almond and Milk For Anti Aging In Marathi – बदामामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि तुमची त्वचा पुन्हा सतेज व उजळ दिसू लागते. दुधामुळे तुमची त्वचा मॉईस्चराईझ होते आणि मुलायम होते. विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार कष्ट घेण्याची मुळीच गरज नाही. कारण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात तुम्ही हा उपाय घरच्या घरी करू शकता.

कसा कराल उपाय –

ADVERTISEMENT
  • पाच ते सहा बदाम रात्रभर दूधात भिजत ठेवा.
  • सकाळी या बदामांची साले काढून दुधासह बदाम मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • चेहऱ्यावर हे मिश्रण लावून वीस मिनीट चेहरा तसाच ठेऊन नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून काढा.

अंडे, मिल्क क्रीम व लिंबू चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात

Egg, Milk Cream and Lemon (Cheheryavaril Surkutya Ghalvnyasathi Upay)
अंड्यामध्ये अॅंटि एजिंग गुणधर्म असतात. त्यामुळे तुमची त्वचा खेचली जाऊन तुमचे वाढते वय कमी दिसू लागते. अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या त्वचेमधील टीश्यू दुरुस्त होतात.  अंडे, दूध आणि लिबांच्या रसामुळे त्वचेमधील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात आणि त्वचेच्या पुर्ननिर्मितीला चालना मिळते. अंड्यामधील पोषक घटक हळू हळू तुमची एजिंग प्रोसेस कमी करतात आणि दुधामुळे तुमच्या त्वचेचे योग्य पोषण होते. 

कसा कराल उपाय –

  • एका अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये अर्धा चमचा मिल्क क्रीम व एक चमचा लिंबूरस मिसळा.
  • हे मिश्रण चेहऱ्यावर लावून पंधरा मिनीटांनी चेहरा पाण्याने धुवून काढा.
  • हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून किमान तीनदा वापरू शकता.

वाचाडोळ्याखालील सुरकुत्या करा घरगुती उपायांनी कमी

गुलाबपाणी, लिंबू आणि ग्लिसरीन – Rose Water, Lemon And Glycerine For Anti Aging In Marathi

गुलाबपाणी, लिंबू आणि ग्लिसरीन - Rose Water, Lemon and Glycerine For Anti Aging In Marathi
गुलाबपाणी, लिंबू आणि ग्लिसरीन

त्वचा कोरडी पडल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या निर्माण होतात.एकदा तुमच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागल्या की फाईन लाईन्स आणि इतर समस्याही वाढू लागतात. त्यामुळे लगेच सुरकुत्या कमी करण्यासाठी उपाय करायला हवेत. ज्यामुळे त्वचा हायड्रेट आणि मऊ राहिल. गुलाबपाणी, लिंबू आणि ग्लिसरिनमुळे तुमची त्वचा स्वच्छ, मुलायम आणि चमकदार होते. गुलाबपाण्यामुळे तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे देखील कमी होण्यास मदत होते. त्वचेला तजेला आल्यामुळे त्वचेचा सैलपणा कमी होतो आणि तुम्ही तरूण दिसू लागता. 

ADVERTISEMENT

कसा कराल उपाय –

  • दोन चमचे गुलाबपाण्यामध्ये अर्धा चमचा लिंबूरस मिसळा.
  • या मिश्रणामध्ये काही थेंब ग्लिसरीनचे टाका.
  • सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा.
  • कापसाच्या सहाय्याने हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या.
  • दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे मिश्रण चेह-यावर लावू शकता

नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईल कमी करतील चेहऱ्यावरील सुरकुत्या

Coconut Oil & Olive Oil To Reduce Anti Aginng In Marathi– नारळाचे तेल  त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी ठरते. नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईलमध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. त्वचाला मऊपणा मिळतो ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेचा सैलपणा कमी होऊन सुरकुत्या कमी होतात.

कसा कराल उपाय –

  • एक चमचा नारळाचे तेल आणि अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल एकत्र करा
  • रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर या मिश्रणाने हळूवार मसाज करा
  • रात्रभर तेल तुमच्या त्वचेत मुरू द्या.

वाचा – घरच्या घरी बनवा अँटिएजिंग फेसपॅक आणि मिळवा सुंदर त्वचा

ADVERTISEMENT

लिंबू आणि मध – Lemon and Honey To Cure Anti Aging In Marathi

लिंबू आणि मध - चेहेर्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय
लिंबू आणि मध

लिंबामध्ये त्वचा स्वच्छ करणारे गुणधर्म असतात तर मध त्वचेसाठी पोषक असतं. त्वचेच्या आत असलेल्या कोलेजीनच्या निर्मितीला चालना मिळण्यासाठी मधाचा उपयोग होतो. ज्यामुळे नवीन त्वचापेशी निर्माण होतात. त्वचा फ्रेश आणि तजेलदार झाल्यामुळे सुरकुत्या कमी होतात

कसा कराल उपाय –

  • लिंबाच्या रसात थोडं मध मिसळा.
  • त्वचेवर कॉटन पॅडने हे मिश्रण डॅब करा.
  • पंधरा मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा. 

योगर्ट, काकडी आणि पुदिना सुद्धा सुरकुत्या घालवण्यात आहेत योग्य

चेहऱ्याच्या सुरकुत्या कशा घालवू शकतात? बघा ! काकडीमध्ये असलेले व्हिटॅंमिन्स, लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि झिंक त्वचेसाठी पोषक असतं. त्वचा नैसर्गिक पद्धतीने घट्ट होण्यासाठी आणि त्वचा मऊ, हायड्रेट राहण्यासाठी त्वचेला दही आणि काकडीचा रस एकत्र लावणं फायदेशीर ठरू शकतं. पुदिनामुळे त्वचेला तजेला येतो.

कसा कराल उपाय –

ADVERTISEMENT
  • योगर्ट अथवा घट्ट दही आणि काकडीचा रस आणि पुदिनाच्या पाने वाटून एकत्र करा.
  • मिश्रण दहा मिनीटे तसेच ठेवा.
  • मास्क चेहऱ्यावर लावा
  • पंधरा मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा.

अॅव्होकॅडो – Avocado To Cure Anti Aging In Marathi

अॅव्होकॅडो - चेहेर्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय
अॅव्होकॅडो

अॅव्होकॅडोमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असते. शिवाय यातील व्हिटॅमिन ए, डी आणि ई त्वचेसाठी उपयुक्त ठरते. अॅव्होकॅडोचा गर त्वचेत व्यवस्थित मुरतो आणि त्वचेला पोषण देतो. त्वचा दुरूस्त करून पुर्ननिर्मितीसाठी ते योग्य असते. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी उपाय करताना हा एक बेस्ट पर्याय ठरू शकतो. 

कसा कराल उपाय –

  • अॅव्होकॅडो सोलून त्याची पेस्ट करा
  • पेस्ट चेहरा आणि मानेवर पॅकप्रमाणे लावा
  • पंधरा मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा. 

मसाज मुळे चेहऱ्याच्या सुरकुत्या जातात (Massage)

सुरकुत्या घालवण्यासाठी चेहऱ्याला मसाज करणे गरजेचे आहे. त्वचेला नियमित मसाज केल्यास त्वचा निरोगी आणि तरूण राहण्यास मदत होते. त्वचेवरील डेड स्किन निघून गेल्यास, त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारल्यास त्वचेतील नव्या पेशींच्या निर्मितीला चालना मिळते. ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा घट्ट होते. यासाठी महिन्यातून एकदा त्वचेला मसाज करणं गरजेचं असतं. 

कसा कराल उपाय –

ADVERTISEMENT
  • फेशिअल मसाजसाठी तत्ज्ञांचा सल्ला घ्या.
  • अनेक पार्लर, स्पामध्ये अॅंटि एजिंग मसाज ट्रिटमेंट केल्या जातात
  • घरच्या घरी नैसर्गिक तेलाचा वापर करून तुम्ही हाताने दररोज दोन ते पाच मिनीट त्वचेवर मसाज करू शकता.
  • मसाज करताना तो नेहमी चेहऱ्यावर खालून वरच्या दिशेने आणि गोलाकार पद्धतीने करावा. 

जोजोबा ऑईल वापरून घालवा सुरकुत्या (Jojoba Oil)

जोजोबा ऑईलमध्ये त्वचेसाठी अतिशय पोषक गुणधर्म असतात. त्वचेत ते व्यवस्थित मुरतं आणि अॅंटि रिंकल असल्यामुळे त्वचेला घट्ट करतं. त्वचेवरील सुरकुत्या अथवा फाईन लाईन्स दूर करण्याचा हा एक चांगला नैसर्गिक उपाय आहे.

कसा कराल उपाय –

  • तळहातावर दोन ते तीन थेंब जोजोबा ऑईल घ्या 
  • चेहऱ्यावर या तेलाने हलका मसाज करा
  • वीस ते तीस मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. 

तांदूळ वापरून करा सुरकुत्या कमी

तांदूळ वापरून करा सुरकुत्या कमी
तांदूळ

तांदळाची पेस्ट अथवा तांदूळ धुतलेलं पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. तांदळामध्ये त्वचा घट्ट करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे घरच्या घरी उपाय करत चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी हा सोपा आणि स्वस्त पर्याय आहे.

कसा करा उपाय –

ADVERTISEMENT
  • तांदळाचे पीठ साध्या पाण्याने अथवा दूधात भिजवून पेस्ट तयार करा
  • चेहऱ्यावर ही पेस्ट लावा
  • पंधरा मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा. 

FAQs चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी उपाय आणि निवडक प्रश्न

प्रश्न. कोणते पदार्थ तुम्हाला तरूण ठेवतात ?

उत्तर – त्वचा तजेलदार राहण्यासाठी नियमित आहारात मासे, तेल, कोका पावडर, फ्रेश भाज्या, अळशी, डाळिंब, अॅव्हाकॅडो, टोमॅटो असे पदार्थ असणं गरजेचं आहे. ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक तेलाचा पूरवठा होतो आणि त्वचा सैल पडत नाही.

प्रश्न. एजिंगच्या खुणा कोणत्या ?

उत्तर – वयानुसार त्वचा सैल पडते आणि त्वचेवर सुरकुत्या येणं, फाईन लाईन्स दिसणं, डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होणं, त्वचेचा रंग बदलणं, त्वचा कोरडी होणं अशा समस्या जाणवतात. ज्यांना आपण एजिंगमार्क्स असं म्हणतो. 

प्रश्न. एजिंगची प्रोसेस पुढे कशी ढकलावी ?

उत्तर – वय वाढणं आपल्याला थांबवता येत नसलं तरी वयानुसार त्वचेत होणारे बदल पुढे ढकलता येतात. जीवनशैलीत चांगले बदल करून, नियमित व्यायाम, संतुलित आहार आमि ताणतणाव दूर ठेवत, पुरेशी झोप घेत, व्यसनांपासून दूर राहत तुम्ही एजिंगची प्रोसेस पुढे ढकलू शकता.

हे हि वाचा,

ADVERTISEMENT

घरातील ट्यूबलाईटमुळेही येऊ शकतात चेहऱ्यावर सुरकुत्या, जाणून घ्या कारण

29 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT