ADVERTISEMENT
home / केसांसाठी उत्पादने
सौंदर्य प्रसाधनं खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जरूर जाणून घ्या

सौंदर्य प्रसाधनं खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जरूर जाणून घ्या

सौंदर्य प्रसाधने तुमच्या मुळ सौंदर्यात अधिकच भर घालतात. दररोजच्या वापरासाठी आपल्याला सतत सौंदर्यप्रसाधनांची गरज लागत असते. बॉडी केअर, स्कीन केअर, हेअर केअर अशा अनेक गोष्टींसाठी विविध सौंदर्यप्रसाधनं आपण सतत खरेदी करत असतो. ज्यामुळे आपलं डेली स्कीन केअर रूटीन पाळणं नक्कीच सोपं आणि सहज होतं. मात्र त्यासाठी सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. असं न केल्यास फायद्याच्या ऐवजी नुकसान होण्याची शक्यता अधिक असू शकते. 

1. उत्पादनांवरील लेबल नीट वाचा

प्रत्येक उत्पादनावरील लेबलवर त्यात असलेले घटक लिहीलेले असतात. कोणतेही सौंदर्यप्रसाधन खरेदी करण्यापूर्वी त्यावरील लेबल जरूर वाचा. कारण  त्यामुळे तुम्हाला त्या सौंदर्यप्रसाधनामध्ये वापरण्यात आलेल घटक पदार्थ समजतील. त्यात तुम्हाला सूट होणारे पदार्थ आहेत का ? एखाद्या पदार्थाची तुम्हाला अॅलर्जी आहे का? अशा अनेक गोष्टींचा यामुळे उलगडा होऊ शकतो. जर तुम्हाला  एखाद्या घटक पदार्थाची अॅलर्जी असेल तर तुम्ही त्या सौंदर्यप्रसाधनाचा वापर टाळून तुमचे नुकसान आधीच टाळू शकता. यासाठी सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी जरूर तपासा. 

shutterstock

ADVERTISEMENT

2. तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखा

प्रत्येक व्यक्तीची त्वचा, केसांचा प्रकार नेहमी वेगवेगळा असतो. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार  सौंदर्य उत्पादने वापरावी लागतात. आजकाल बाजारात प्रत्येक त्वचा प्रकार आणि केसांच्या प्रकारासाठी सौंदर्यप्रसाधने तयार केली जातात. मात्र जर तुम्हाला तुमच्या त्वचेचा अथवा केसांचा प्रकार माहीत नसेल तर तुम्ही चुकीचे सौंदर्य प्रसाधन वापरण्याची दाट शक्यता असते. ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. यासाठी तुमच्या त्वचेचा आणि केसांचा प्रकार ओळखा आणि त्यानुसार सौंदर्यप्रसाधन खरेदी करा. 

shutterstock

3. पॅच टेस्ट घ्या

सौंदर्यप्रसाधन असो वा मेकअपचं साहित्य प्रत्येक गोष्टीची पॅच टेस्टही घ्यायलाच हवी. कारण त्यामुळे तुम्हाला नवीन उत्पादन सूट होत आहे का नाही ते समजू शकते. जर तुम्ही एखादे नवे उत्पादन ट्राय करणार असाल तर ते थेट वापरण्यापूर्वी हातावर अथवा मानेवर त्याची पॅच टेस्ट घ्या. आजकाल दुकानदारांकडे टेस्टर उपलब्ध असतात. ज्यामुळे ते तुम्ही वापरून योग्य तो निर्णय घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

4. तज्ञ्जांचा सल्ला घ्या

आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा जमाना आहे. ज्यामुळे एकाच ठिकाणी बसून कंप्युटर अथवा मोबाईलवर तुम्हाला अनेक गोष्टी क्षणात खरेदी करता येतात. मात्र अशा प्रकारे मेकअपचं साहित्य खरेदी करताना एखाद्या कॉस्टमेटिक तज्ञ्जांचा अथवा ब्युटिशिअनचा सल्ला जरूर घ्या. ज्यामुळे तुम्हाला सूट होणारी उत्पादने खरेदी करणं सोपं जाईल. शिवाय प्रत्येक व्यक्तीचा स्कीन टोनदेखील वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शेडची मेकअप साहित्य खरेदी करणं गरजेचं आहे. तज्ञ्ज व्यक्तीमुळे तुमचे नुकसान टळू शकते आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या वस्तूंची खरेदी करता येऊ शकते. 

5. सौंदर्य प्रसाधनांवरील एक्सपायरी डेट बघा

कधी कधी दुकानातील अथवा ऑनलाईन शॉपिंगमध्ये जुना माल विकला जातो. सेलच्या नावाखाली दुकानदार जुना माल विकतात. पण जर तुम्ही विकत घेतलेल्या वस्तूंची एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर मात्र ते फारच धोकादायक असू शकते. यासाठी वस्तू खरेदी करण्यापूर्वीच याची नीट काळजी घ्या. या दक्षता बाळगा आणि बिनधास्त खरेदी करा तुमच्या आवडीची सौंदर्यप्रसाधने. 

अधिक वाचा

मेकअपचं साहित्य एक्स्पायर्ड झालं आहे हे कसं ओळखाल

ADVERTISEMENT

तुमच्या मेकअप किट मध्ये हे ‘5’ मेकअप ब्रश आहेत का

मेकअप न करता सुंदर दिसण्यासाठी सोप्या टिप्स

फोटोसौजन्य -इन्स्टाग्राम  

27 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT