मुंबई म्हटलं की खाण्यापिण्याची कायम रेलचेल. त्यातही पावभाजी ही तर मुंबईची शान आहे. अगदी हॉटेल असो अथवा स्ट्रीट फूड असो, पावभाजी मुंबईत कधीही मिळते. मात्र रस्त्यावर मिळणाऱ्या पावभाजीची चवच न्यारी असते. मुंबईत पावभाजीची अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहे. पण इथल्या प्रत्येक ठिकाणच्या पावभाजीची चव वेगळी आहे आणि म्हणूनच या पावभाजी प्रसिद्ध आहेत. पावभाजी म्हणजे मुंबईकरांसाठी भावना आहेत. त्यामुळे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी नक्की कुठे प्रसिद्ध पावभाजी मिळते याचा खास लेख आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. मुंबईमध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही जर या ठिकाणची पावभाजीचा आस्वाद घेतला नाहीत तर मग तुम्ही काहीच केलं नाही. या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच पावभाजी खाल्ली पाहिजे. इथला पावभाजीचा स्वाद आणि त्याची चव ही तुमच्या जिभेवर नक्कीच राहते. आम्ही तुम्हाला मुंबईतील 15 प्रसिद्ध पावभाजीची ठिकाणं सांगणार आहोत. इथे जाऊन तुम्ही नक्कीच पावभाजीची चव चाखायला हवी.
मुंबईतील 15 पावभाजीची प्रसिद्ध ठिकाणं (Famous Pav Bhaji Places In Mumbai)
मुंबईत पावभाजी खाण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत. त्यापैकीच काही ठिकाणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जिथे जाऊन तुम्ही पावभाजीचा मनसोक्त आनंद लुटू शकता.
1. कॅनन, सीएसटी (Canon, CST)
वैशिष्ट्य : सीएसटी स्टेशनसमोर असणारं कॅननचं पावभाजीचं दुकान हे गेले कित्येक वर्ष प्रसिद्ध आहे. हा बीएमसी ऑफिससमोर असणारा लहानसा स्टॉल दिवसभर चालू असतो. इथल्या तव्यावर सतत पावभाजी चालू असते. दिवसाला हजारो लोक इथे पावभाजी खाऊन जातात. इथली भाजी थोडी मसालेदार आणि तिखट असून पाव व्यवस्थित रोस्ट केलेला असतो. ही पावभाजी स्वस्त आणि मस्त असल्यामुळेच इथे नेहमीच गर्दी असते. इथल्या काऊंटवर बऱ्याचदा उभं राहूनही खायला जागा नसते. दुपारच्या आणि रात्रीच्या वेळी तर हमखास इथे खवय्यांची गर्दी पाहायला मिळते.
पत्ता – सीएसटी स्टेशनसमोर, बृहन्मुंबई महानगर पालिका इमारतीसमोर, सीएसटी
किंमत – रू. 100/-
वाचा – साबुदाणा म्हणजे काय
2. सरदार पावभाजी, ताडदेव (Sardar Pavbhaji, Tardeo)
वैशिष्ट्य : दक्षिण मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि अप्रतिम पावभाजी म्हणजे सरदार पावभाजी. तुम्ही जर कॅलरी कॉन्शस असाल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकत नाही. पण तुम्ही पावभाजी वेडे असाल तर तुम्ही इथे नक्कीच जायला हवं. याचं वैशिष्ट्य म्हणजे या भाजीमध्ये तुम्हाला पूर्ण अमूल बटरचं पाकिट मिक्स केलेलं दिसून येईल. केवळ भाजीच नाही तर पावदेखील पूर्ण बटरमध्ये भिजवून दिलेला असतो. तुम्ही जर अमूल बटरमध्ये बुडालेली भाजी आणि पाव खाण्यास उत्सुक असाल तर तुम्ही नक्कीच इथे जायला पाहिजे. जास्त बटरचा स्वाद या भाजी आणि पावामध्ये संपूर्णतः उतरलेला तुम्हाला कळून येतो. इथे नेहमीच गर्दी असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे हॉटेल एसी नसूनही तुफान गर्दी असते ते केवळ पावभाजीच्या स्वादामुळे.
पत्ता – ताडदेव रोड जंक्शन, ताडदेव बस डेपोसमोर, ताडदेव
किंमत – रू. 110/-
वाचा – डोसा रेसिपी मराठी
3. सुख सागर, चौपाटी (Sukh Sagar, Chowpaty)
वैशिष्ट्य : चौपाटीला फिरायला गेल्यानंतर तुम्ही सुख सागरची पावभाजी खाल्ली नाहीत तर काहीच केलं नाहीत. गेल्या कित्येक दशकापासून सुखसागरची पावभाजी प्रसिद्ध आहे. इथे आल्यानंतर पावभाजीचा खमंग दरवळणारा वास हेच याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. या पावभाजीच्या सुगंधानेच तोंडाला पाणी सुटतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावभाजीची ऑर्डर दिल्यानंतर काही मिनिट्समध्येच तुम्हाला ही पावभाजी समोर मिळते आणि तुम्ही मनसोक्त खाऊ शकता. मसालेदार आणि आंबट तिखट अशा या पावभाजीची मजा तुम्ही घेऊ शकता.
पत्ता – मरिना मेन्शन, एसव्हीपी रोड, चौपाटी, गिरगाव
किंमत – रू. 100/- पासून पुढे
4. श्री सिद्धिविनायक फास्ट फूड, जुहू बीच (Shree Siddhivinayak Fast Food, Juhu beach)
वैशिष्ट्य : चौपाटीला फिरायला गेल्यानंतर तुम्ही सुख सागरची पावभाजी खाल्ली नाहीत तर काहीच केलं नाहीत. गेल्या कित्येक दशकापासून सुखसागरची पावभाजी प्रसिद्ध आहे. इथे आल्यानंतर पावभाजीचा खमंग दरवळणारा वास हेच याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. या पावभाजीच्या सुगंधानेच तोंडाला पाणी सुटतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावभाजीची ऑर्डर दिल्यानंतर काही मिनिट्समध्येच तुम्हाला ही पावभाजी समोर मिळते आणि तुम्ही मनसोक्त खाऊ शकता. मसालेदार आणि आंबट तिखट अशा या पावभाजीची मजा तुम्ही घेऊ शकता.
पत्ता – मरिना मेन्शन, एसव्हीपी रोड, चौपाटी, गिरगाव
किंमत – रू. 100/- पासून पुढे
5. द स्क्वेअर, नोव्होटेल, जुहू (The Square, Novotel, Juhu)
वैशिष्ट्य : नोव्होटेल हे खरं तर थोडं फॅन्सी आणि महाग ठिकाण आहे. पण इथे तुम्ही एकदा पावभाजी खाऊन पाहायलाच हवी. तुम्ही स्ट्रीट पावभाजी आस्वाद तर नेहमीच घेत असता पण तुम्हाला मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पावभाजी खायची असेल तर तुम्हाला तसा आस्वाद मिळत नाही. पण या ठिकाणी तुम्हाला तोच आस्वाद पण अधिक चांगल्या डायनिंगसह घेता येतो. तुमच्या जवळच्या व्यक्तीसह येऊन तुम्हाला स्ट्रीटवर उभं राहून खायला आवडत नसेल तर इथे येऊन पावभाजी खाऊ शकता. तुम्हाला तीच चव इथे मिळेल.
पत्ता – नोव्होटेल, जुहू बीच, बलराज साहनी मार्ग, जुहू, मुंबई
किंमत – रू. 500/-
6. अमर ज्युस सेंटर, विलेपार्ले (Amar Juice Centre, Vile Parle)
वैशिष्ट्य : रात्री अपरात्री तुम्हाला फिरायला आवडतं का? मग अशावेळी भूक लागल्यानंतर खायला काय असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपल्याला पावभाजीशिवाय पर्याय सुचत नाही. त्यासाठी एक अप्रतिम ठिकाण आहे ते म्हणजे विलेपार्लेमधील अमर ज्युस सेंटर. रात्री इथे येऊन पावभाजी खाण्याची मजाच वेगळी. इथे नेहमीच गर्दी असते. रात्रीच्या वेळी आपल्या मित्रमैत्रिणींसह इथे जाऊन पावभाजी खाण्याची मजा नक्कीच वेगळी आहे.
पत्ता – 3, आरएन कूपर हॉस्पिटल कंपाऊंड, गुलमोहर रोड, विलेपार्ले पश्चिम, मुंबई
किंमत – 120/-
7. सद्गुरू व्हेज डाएट (Sadguru Veg Diet)
वैशिष्ट्य : चेंबूरमधील पावभाजी किंग असणारं सद्गुरू व्हेज डाएट. गेल्या पन्नास वर्षांपासून पावभाजीसाठी सद्गुरू प्रसिद्ध आहे. इथली चीज पावभाजी चवीला अप्रतिम असते. इतकंच नाही बरेच लोक इथली पावभाजी खास घरी पार्सल करूनही घेऊन जातात. इतकंच नाही याची पावभाजी इतकी प्रसिद्ध आहे की याची अनेक ठिकाणी आऊटलेट्स आहेत.
पत्ता – जनता मार्केट, स्टेशन रोड, चेंबूर, मुंबई
किंमत – रू. 240/-
8. शर्मा पावभाजी, चौपाटी (Sharma Pav Bhaji, Chowpaty)
वैशिष्ट्य : चौपाटीवर मस्त वाळूत खेळून झाल्यावर आणि समुद्राचा मस्त गारेगार वारा घेतल्यानंतर गिरगाव चौपाटीवर असणाऱ्या स्टॉलकडे वळावंच लागतं. इथे अनेक स्टॉल्स आहेत. पण त्यापैकी शर्मा पावभाजीचा स्टॉल हा पावभाजीसाठी प्रसिद्ध आहे. इथे पावभाजी खाण्यासाठी तुफान गर्दी असते. कमी पैसे आणि चवही मस्त. त्यामुळे तुमच्या खिशाला चाटही पडत नाही आणि पावभाजीची मजाही लुटता येते.
पत्ता – गिरगाव चौपाटी, मुंबई
किंमत – रू. 75/-
मुंबईतील या ठिकाणी तुम्हाला चाखता येतील ‘झक्कास’ Street Food
9. डीपीज फास्ट फूड सेंटर, माटुंगा सेंट्रल (DP’s Fast Food Centre, Matunga Central)
वैशिष्ट्य : रूईया कॉलेजसमोर असलेलं डीपीज हेदेखील पावभाजीसाठी प्रसिद्ध आहे. इथे मिळणारी बटरी पावभाजी ही इथल्या कॉलेजमधील मुलांचीच आवडती आहे असं नाही तर इतर व्यक्तींसाठीही इथली पावभाजी स्वादिष्ट ठरते. याबरोबर मिळणारी फ्रूट बीअर हीदेखील इथली स्पेशालिटी आहे. पावभाजी आणि फ्रूट बीअर हे कॉम्बिनेशन इथे सहसा ऑर्डर करण्यात येतं. त्यासाठी डीपीज प्रसिद्ध आहे.
पत्ता – डीपीज फास्ट फूड सेंटर, रूईया कॉलेजसमोर, एलएन रोड, माटुंगा पूर्व, मुंबई
किंमत – रू. 190/-
10. वसंत सागर, नरिमन पॉईंट (Vasant Sagar, Nariman Point)
वैशिष्ट्य : अनेक जण इथे गाड्या घेऊन फक्त पावभाजी खायला येतात. विधान भवनच्या समोर कॉर्नरला असणारं हे वसंत सागर खरं तर सगळ्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. पण विशेषतः इथली पावभाजी खाण्यासाठी अनेक जणांची रांग लागते. शनिवार आणि रविवारी तर याठिकाणी अनेक गाड्या लावून पावभाजी खाल्ली जाते. इथल्या पावभाजीचा आंबट आणि तिखट स्वाद अफलातून लागतो. त्यामुळे याठिकाणी पावभाजीसाठी जास्त गर्दी असते. शिवाय विधान भवनातील येणारेदेखील इथेच पावभाजी खायला येत असतात.
पत्ता – वसंत सागर, विधान भवनसमोर, नरिमन पॉईंट, फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई
किंमत – रू. 120/-
मुंबईत आवर्जून भेट द्यायला हवी अशा फॅशन स्ट्रीट्स
11. लेनिन पावभाजी, मरिन लाईन्स (Lenin Pav Bhaji, Marine Lines)
वैशिष्ट्य : लेनिन हे थोडं वेगळं नाव असलं तरीही रस्त्यावरची ही पावभाजी चवीला अप्रतिम आहे. त्यांचे चायनीज पदार्थ तर प्रसिद्ध आहेतच, पण त्याहीपेक्षा इथे पावभाजी अत्यंत चवीची मिळते. लेनिन पावभाजी खायला खूप गर्दी असते. याचं दुकान केवळ रात्री 10 पर्यंतच चालू राहतं. कारण याची पावभाजी पटकन विकली जाते. शिवाय इथे वेगवेगळ्या चवीची पावभाजी मिळते. महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला सर्व्हिस पटकन मिळते. तुम्हाला जास्त वेळ वाट पहायला लागत नाही.
पत्ता – लेनिन पावभाजी सेंटर, 35/37, न्यू मरिन लाईन्स, मुंबई
किंमत – रू. 40/- पासून पुढे
12. अमृत सागर फास्ट फूड, वांद्रे (Amrut Sagar, Bandra)
वैशिष्ट्य : वांद्रे हा असा भाग आहे जिथे अनेक खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल्स आणि अनेक रेस्टॉरंट्स आहेत. पण त्यातही इथे येऊन तुम्हाला जर चविष्ट पावभाजीचा आस्वाद घ्यायचा असेल तर अमृत सागर फास्ट फूडला पर्याय नाही. इथली चीज पावभाजी जास्त प्रसिद्ध आहे. मुव्ही बघायला गेल्यानंतर पावभाजीची चव घ्यायला तर या ठिकाणी जायलाच हवं. तसंच इथे तुम्हाला कायम गर्दी असते. तसंच कॉलेज विद्यार्थ्यांची गर्दीही असते.
पत्ता – रिझवी प्लेस सोसायटी, मार्क्स अँड स्पेन्सर शोरूमसमोर, 31, हिल रोड, वांद्रा पश्चिम, मुंबई
किंमत – रू. 150/-
13. मनोहर पावभाजी, गिरगाव (Manohar Pav Bhaji, Girgaon)
वैशिष्ट्य : गिरगावच्या मध्यस्थानी असलेले मनोहर हे छोटेखानी पावभाजीचं दुकान अत्यंत प्रसिद्ध आहे. गिरगावात गेल्यानंतर इथली पावभाजी न खाता जाणं शक्यच नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथली भाजी आणि पाव हा अतिशय बटरी तर असतोच. पण त्याशिवाय इथल्या भाजीला एक वेगळीच चव आहे. प्रत्येकाकडून तुम्हाला या पावभाजीची प्रशंसाच ऐकू येते. सर्व भाज्या अतिशय व्यवस्थित मॅश करून बनवलेली ही पावभाजी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची आहे. कारण ही जास्त तिखटही नसते. त्यामुळे प्रत्येकाला ही हवीहवीशी वाटते.
पत्ता – मनोहर पावभाजी, 104 बी, पिरभाई टेरेस बिल्डिंग, जेएसएस रोड, गिरगाव नाका, गिरगाव, मुंबई
किंमत – रू. 75/-
14. जलसा पावभाजी, गिरगाव (Jalsa Pav Bhaji, Girgaon)
वैशिष्ट्य : मनोहर आणि जलसा पावभाजी ही दोन्ही नावं नेहमीच एकत्र घेतली जातात. पण या दोन्ही ठिकाणच्या पावभाजीची चव वेगळी असूनही दोन्ही ठिकाणांनी आपलं वैशिष्ट्य जपून ठेवलं आहे. जलसाची पावभाजीदेखील प्रसिद्ध आहे. या दोन्ही दुकानांमध्ये तुम्हाला कायम गर्दी बघायला मिळते ती इथल्या पावभाजीच्या चवीमुळे. जलसा पावभाजीदेखील मनोहरप्रमाणेच तिखट नसते आणि बटरी असते. शिवाय इथलं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला या दोन्ही ठिकाणी सर्व्हिस अगदी पटापट मिळते.
पत्ता – जलसा पावभाजी, 104 बी, पिरभाई टेरेस बिल्डिंग, जेएसएस रोड, गिरगाव नाका, गिरगाव, मुंबई
किंमत – रू. 75/-
मुंबईतील नाईट लाईफ अनुभवायचं आहे, मग या ठिकाणांना जरूर भेट द्या
15. जिप्सी कॉर्नर, दादर (Gpysy Corner, Dadar)
वैशिष्ट्य : दादर हे खरं तर खरेदीचं मध्यवर्ती ठिकाण. खरेदी झाल्यानंतर बरेच जण जिप्सीला आवर्जून भेट देतात ते इथली पावभाजी आणि मराठमोळे पदार्थ खाण्यासाठी. इथली पावभाजी ही थोडी वेगळ्या चवीची आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने ही पावभाजी बनवण्यात येते. अगदी घरामध्ये आपण ज्या पद्धतीने पावभाजी करतो तशीच इथली पावभाजी तुम्हाला मिळते. ही पावभाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला दिवसभर घशात जळजळ होत राहणार नाही. त्यामुळे इथे जाऊन आवर्जून नक्की पावभाजी खा.
पत्ता – जिप्सी कॉर्नर, शिवसेना भवनच्या समोर, केळुस्कर रोड, दादर शिवाजी पार्क, मुंबई
किंमत – रू. 100/- च्या पुढे
पावभाजीची रेसिपी मराठीमध्ये (Pav Bhaji Recipe In Marathi)
पावभाजी बाहेर जाऊन तर आपण खातोच. पण आपल्याला घरीदेखील बनवायची असेल तर पावभाजीची रेसिपी मराठीमध्ये खास आम्ही तुम्हाला देत आहोत –
साहित्य –
2 ते 3 मध्यम आकाराचे बटाटे (उकडवलेले), 1 कप फ्लॉवर (उकडलेले), 1 कप भोपळी मिरचीचे तुकडे, 2 बारीक चिरलेला कांदा, 4 बारीक चिरलेले टॉमेटो, 1 वाटी उकडवलेले मटार, आलं – लसून पेस्ट, हळद, तिखट, 3 चमचे पावभाजी मसाला, पाव, अमूल बटर, तेल, मीठ, कोथिंबीर.
कृती –
एका कढईत तेल आणि बटर घाला. त्यात तुम्ही चिरलेला कांदा आणि आलं लसूण पेस्ट मिक्स करा. वरून हळद आणि तिखट मिक्स करा. कांदा ब्राऊन होत आल्यानंतर टोमेटो, उकडलेले बटाटे, फ्लॉवर, भोपळी मिरची आणि मटार मिक्स करा. ते स्मॅश करा. थोडंसं पाणी घालून त्यावर झाकण ठेवा आणि शिजू द्या. त्यानंतर वरून पावभाजी मसाला आणि बटर आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही त्यामध्ये चीजदेखील किसून घालू शकता. व्यवस्थित स्मॅश झाली आहे की नाही हे बघून मगच कढई खाली उतरवा. वरून कोथिंबीर घाला. त्यानंतर पाव बटर लाऊन तव्यावर खरपूस भाजून घ्या.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.