ADVERTISEMENT
home / Bridal Hair Styles
लग्नसोहळ्याआधी नववधूने केसांबाबत करू नयेत ‘या’ चुका

लग्नसोहळ्याआधी नववधूने केसांबाबत करू नयेत ‘या’ चुका

लग्नसोहळा हा प्रत्येक नववधूसाठी खास असतो. आपल्या लग्नात आपण सर्वात सुंदर दिसावं अशी तिची इच्छा असते. ज्यासाठी कितीतरी महिने आधीच ती तिच्या त्वचा आणि केसांची अधिक काळजी घेण्यास सुरूवात करते. लग्नाआधी तीन  ते सहा महिने व्यवस्थित ब्युटी रूटीन फॉलो केलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. मात्र होतं काय कधी कधी या काळात तुमच्याकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे तुमचा लग्नाचा लुक खराब होऊ शकतो. यासाठीच त्वचेसोबतच तुम्ही तुमच्या केसांचीदेखील विशेष काळजी घ्यायला हवी.

लग्नाआधी केसांबाबत मुळीच करू नका या चुका –

लग्न ठरल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचा आणि केसांबाबत विशेष काळजी घेण्याची गरज असते. कधी कधी  छोट्या छोट्या चुका तुमचा लग्नातला लुक बिघडवू शकतात.

लग्नाच्या दिवशी केस धुणे –

काही मुलींना दररोज हेअरवॉश करण्याची सवय असते. पण लग्नाच्या दिवशी केस धुणं हा मुळीच योग्य निर्णय नाही. जर तुम्ही ही चुक केली तर त्याचा परिणाम तुमच्या लुकवर होऊ शकतो. यासाठीच ब्युटी एक्सपर्टच्या सल्लानूसार लग्नाच्या आदल्या दिवशी अथवा दोन दिवस आधी तुम्ही केस धुणं गरजेचं आहे. आदल्या दिवशी हळदी समारंभासाठी केस धुणं योग्य आहे. मात्र लग्नाच्या दिवशी केस मुळीच धुवू नका. कारण ओलसर केसांवर हेअरस्टाईल चांगल्या पद्धतीने केली जाणार नाही.

ब्रायडल फुटवेअरचे प्रकार

ADVERTISEMENT

हेअरस्टाईलसाठी ट्रायल न घेणं –

ब्रायडल लुकसाठी मेकअप, हेअरस्टाईल आणि पेहरावाची आधी एक ट्रायल घेतली जाते. काही जणी मेकअप आणि कपड्यांची ट्रायल घेतात. मात्र हेअरस्टाईलची ट्रायल घेणं टाळतात. असं मुळीच करू नका. कारण तुमच्या मनात असलेली हेअरस्टाईल तुमच्या केसांवर चांगली दिसेलच असं नाही. तुम्हाला आवडणारी हेअरस्टाईल तुमच्या चेहरा आणि  वेषभूषेला साजेशी आहे का हे तुम्हाला आधीच पाहावं लागेल. यासाठी कमीतकमी पंधरा दिवस आधी ब्रायडल लुकची ट्रायल जरूर घ्या.

Instagram

लग्नाच्या एक-दोन दिवस आधी हेअर कलर करणं –

केस कलर केल्यावर ते सेट व्हायला काही दिवस नक्कीच जातात. यासाठीच हेअर कलर काही दिवस आधी करणं गरजेचं असतं. पंधरा दिवस आधी अथवा महिनाभर आधी हेअर कलर करणं एक चांगला पर्याय आहे.

ADVERTISEMENT

एक-दोन दिवसआधी हेअर कट करणं –

कलरप्रमाणेच हेअर कटदेखील कधीच लग्नाच्या आदल्या दिवशी अथवा एक- दोन दिवस आधी करू नका. कोणताही हेअर कट सेट होण्यासाठी कमीत कमी एक महिना जाणं गरजेचं असतं. तुम्ही या काळात केस फक्त ट्रिम करू शकता. कारण  हेअर कटनंतर तुमचा संपूर्ण लुकच बदलून जाणार असतो. यासाठी तुमच्या हेअरस्टाईलिस्ट सोबत नीट बोलणं करा आणि एक महिनाआधी हेअर कट करा.

हेअरस्टाईलसाधी योग्य अॅक्सेसरिज न निवडणं –

हेअरस्टाईलच्या सजावटीसाठी आजकाल अनेक पर्याय बाजारात सहज मिळतात. त्यामुळे ते विकत आणणं खूपच सोपं आहे. मात्र ते तुमच्या हेअरस्टाईल आणि चेहऱ्याला साजेसे दिसतील का हे  आधीच पाहायला हवं. कधीकधी असा प्रयोग लग्नाच्या दिवशी अचानक केल्यास तुमची पार फजिती होऊ शकते. यासाठीच हे साहित्य तुमच्या ब्रायडल हेअर ट्रायलसाठी सोबत नक्की घेऊन जा.

कोणताही बॅक प्लॅन नसणं –

कधीकधी तुम्ही ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडत नाही. मात्र यात काहीच चुकीचं नाही. त्यामुळे उगीच चिडचिड करत बसू नका. प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी तशी घडेलच असं नाही. यासाठी ब्लॅन बी नेहमी तयार ठेवा. जसं की कदाचित तुमची हेअरस्टाईलिस्ट वेळेवर पोहचू शकली नाही तर तुमच्याकडे पटकन हेअरस्टाईल करता येईल अशी व्यवस्था हवी. काही प्रकारच्या हेअर अॅक्सेसरीज, बॉबी पिन, हेअरब्रश, स्ट्रेटनर, कर्लर गोष्टी  तुमच्या जवळ असू द्या. ज्यामुळे वेळप्रसंगी तुम्हाला त्या पटकन वापरता येतील. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा – 

मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांनी खुलू शकतो नववधूचा शृगांर

ADVERTISEMENT

या कारणासाठी लग्नात नववधूच्या हातावर काढली जाते मेंदी

नववधूवर खुलून दिसतील बाजूबंदच्या या ’15’ डिझाईन्स

08 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT