ADVERTISEMENT
home / पालकत्व
1st Month Of Pregnancy Care

गरोदर पहिला महिना लक्षणे आणि घ्यायची काळजी जाणून घ्या (Pregnancy First Month Care Tips)

आपण गरोदर आहोत हे कळणं हा प्रत्येक महिलासाठी सर्वाधिक अत्यानंदाचा क्षण असतो. हा आनंद इतका खास असतो की, काय करू आणि काय नको असं होतं. पहिल्या महिन्यातच साधारण याचा अंदाज येतो. पहिल्यांदाच आई होणार असाल तर याचा नीटसा अंदाजही येत नाही. पण पहिल्यांदाच आई होणार असाल आणि गरोदरपणाचा पहिला महिना कसा असतो, साधारण या महिन्यात कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी (1st Month Of Pregnancy And Care Tips) या सगळ्याची माहिती असणं गरजेचे आहे. हीच माहिती आम्ही या लेखातून देत आहोत. तुम्हीही गरोदर असाल अथवा गरोदर होण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती नक्की उपयुक्त ठरू शकते. पहिला महिना अर्थात पहिल्या आठवड्यापासून ते चौथ्या आठवड्यापर्यंत नक्की काय बदल होतात आणि कशी काळजी घ्यायला हवी, गरोदरपणात बाळाची वाढ, गरोदरपणाचा हा अनुभव कसा असोत याची इत्यंभूत माहिती तुम्हाला या लेखातून मिळेल. सुरूवात करूया आपण पहिल्या महिन्या दिसणाऱ्या लक्षणांवरून.

गरोदरपणातील सुरूवातीची लक्षणे (1st Month Symptoms)

1st Month Symptoms

गरोदर पहिला महिना लक्षणे

ADVERTISEMENT

गरोदरपणाच्या  पहिल्या महिन्यात महिलेच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलाबद्दल पहिल्यांदाच आई होणार असाल तर मुलींंना कल्पना नसते. योग्य माहिती नसेल तर बऱ्याच महिला घाबरून जातात. पण असं होऊ नये यासाठी तुम्ही आधी गरोदरपणच्या पहिल्या महिन्यात कोणती लक्षणं दिसतात ते जाणून घ्यायला हवे. 

मासिक पाळी थांबणे – सर्वात पहिले लक्षण म्हणजे मासिक पाळी थांबणे. वास्तविक महिला जेव्हा गरोदर होतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये प्रोजस्टेरॉन हार्मोन तयार व्हायला सुरूवात होते. या हार्मोनमुळे मासिक पाळी बंद होते.  

रक्तस्राव आणि शरीरात गोळा येणे – जेव्हा गर्भाशयामध्ये अंडे निर्माण होते, तेव्हा गर्भधारण करणाऱ्या महिलेला (काही महिलांच्या बाबतीत हे होत नाही) सुरूवातील रक्तस्राव होऊ शकतो. तसंच शरीरामध्ये गोळा येतो. शरीरा आखडते. गर्भधारणा झाल्यावर पहिल्या आठवड्यात साधारण ही दोन्ही लक्षणं दिसून येतात.

मूड स्विंग – पहिल्या महिन्यात तुमच्या वागण्यात खूपच बदल होऊ लागतो. हार्मोनल बदलांमुळे गर्भवती महिलेच्या मनात सतत काही ना काहीतरी चालू राहते. सतत चिडचिड अथवा उगीच रडावंसं वाटणं, क्षणात हसावंसं वाटणं हे बदल अत्यंत नॉर्मल आहेत. 

ADVERTISEMENT

स्तन कडक होणे – गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात काही महिलांचे स्तन कडक होतात आणि त्यांच्या स्तनांमध्ये थोडेसे दुखतेदेखील. यादरम्यान गर्भवती महिलांच्या स्तनांना सूज येण्याचीही शक्यता असते.  मात्र हे लक्षण प्रत्येक महिलेला जाणवेल असे नाही. 

निप्पलचा रंग बदलणे – या दरम्यान तुमच्या निप्पलचा रंग बदलायला लागतो. हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलामुळे मेलानोसाईट्स प्रभावित होतात. मेलनिनच्या उत्पादनामुळे त्वचेचा रंग अधिक गडद होऊ लागतो. त्यामुळे तुमचे निप्पल अधिक काळसर होऊ लागतात. 

थकवा येणे – गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात काहीही न करता पण थकवा जाणवतो. तसंच झोप येण्यासही त्रास होतो. झोप न झाल्यामुळेही  थकवा येतो.  

सतत लघ्वी होणे – शरीरातील प्रोजस्टरॉन हार्मोनचा स्तर वाढल्यामुळे गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात सतत लघ्वी होण्याचा त्रास  महिलांना सहसा होतो. हेदेखील महत्वाचे लक्षण आहे. 

ADVERTISEMENT

मॉर्निंग सिकनेस (Morning Sickness) – गर्भारपणाच्या पहिल्या महिन्या सकाळी सकाळी कोणत्याही वासामुळे तुम्हाला उलटीसारखे होऊ शकते. तसंच उठल्यानंतर चक्कर येणे हे अत्यंत कॉमन लक्षण आहे. यावर तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता. तसंच खाण्याच्या आवडीनिवडही बदलतात. एखादा न आवडणारा पदार्थ अचानक खावासा वाटू लागतो. सतत भूक लागते. काही महिलांना भूकच लागत नाही. ही दोन्ही लक्षणे दिसून येतात.

वाचा – 3rd Month Of Pregnancy And Care Tips

शरीरामध्ये नक्की काय बदल होतो (Change In Body)

Change In Body

ADVERTISEMENT

गर्भधारणा पहिला महिना

गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात काही जणांना पटकन समजून येत नाही. पण तरीही तुमच्या शरीरामध्ये काही बदल हे होत असतात. त्यापैकी महत्वाचे बदल नक्की कोणते ते जाणून घेऊया. 

  • ज्या गर्भवती महिला असतात त्यांना आपले शरीर नेहमीपेक्षा अधिक जड वाटू लागते. तसंच शरीराला सूज आल्यासारखेही वाटते. याशिवाय पाठीचा भाग अत्यंत दुखायला लागतो
  • शरीरातील अॅस्ट्रोजनची पातळी वाढल्यामुळे स्तनांच्या ग्रंथीमध्ये बदल होतात आणि स्तन अधिक कडक जाणवतात. तसंच काही महिलांचे स्तन दुखतात. स्तनांचा आकार पहिल्याच महिन्यात वाढलेलाही जाणवतो 
  • निप्पल जास्त काळे आणि मोठे होतात. तसंच त्याला थोडे जास्त टोक आल्यासारखेही जाणवते 
  • अंडोत्सर्जन (Ovulation) च्या एका आठवड्यानंतर अथवा दहा दिवसानंतर महिलांना स्पॉटिंगचा त्रास होऊ शकतो. योनितून रक्तस्राव होऊ शकतो  
  • शौचाला जाताना त्रास होऊ शकतो. असं अचानक झालं तर सर्वात पहिले डॉक्टरांना संपर्क साधणे गरजेचे आहे
    सतत डोकेदुखी होऊ लागते. पहिल्या महिन्यात काहीही कारण नसताना डोकं दुखायला लागतं. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष द्यावं
  • पोटाच्या खालच्या भागात सतत दुखायला लागतं. गर्भ निर्माण झाल्यामुळे शरीरामध्ये हा बदल होतो

गरोदर महिलांसाठी सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय

ADVERTISEMENT

गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात कशी काळजी घ्यावी (How To Take Care In 1st Month)

How To Take Care In 1st Month Of Pregnancy

Pregnancy Ke First Month

आपण गरोदर आहोत हे साधारण पहिल्या महिन्यातच कळतं. त्यावेळी नक्की कशी काळजी घ्यायची हे पहिल्यांदा आई होणाऱ्यांना माहीत नसतं. अनेक सल्लेही देण्यात येतात. पण तुमच्या प्रकृतीप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही ही काळजी घ्या. यावेळी काय खावे आणि काय खाऊ नये हेदेखील खूपच महत्वाचे आहे. यासंदर्भात काही महत्वाची माहिती जाणून घ्या.

काय खावे (What To Eat)

What To Eat

ADVERTISEMENT

गरोदरपणात काय खावे

  • सुरूवातीच्या महिन्यात गर्भ राहिल्यावर महिलांना फोलेटयुक्त खाद्यपदार्थ खाण्याची  गरज असते. आपल्या आहारामध्ये ब्रोकोली, संत्र,  सफरचंद अशा पदार्थांचा समावेश करून घ्या 
  • त्याचप्रमाणे गर्भधारणा झाल्यावर विटामिन बी6 ने युक्त असणारे अर्थात केळे, गव्हाची पोळी, सुका मेवा यासारख्या गोष्टी  खायला सुरूवात करावी
  • फायबरयुक्त फळांचे सेवन करावे. दिवसातून कमीत कमी तुम्ही तीन फळं खायलाच हवीत. यामुळे मुलाची त्वचा चांगली होते. यामध्ये आवळा, सफरचंद, द्राक्ष, चिकू, संत्र याचा समावेश करावा
  • दुधाने तयार करण्यात आलेले पदार्थ खावेत. दूध हे गर्भवती महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. कॅल्शिमय मिळण्यासाठी अगदी पहिल्या महिन्यापासून तुम्ही दूध किमान एक ग्लास तरी प्यावे 
  • मांसाहारी असाल तर तुम्ही मांसाहार नक्कीच करू शकता. पण शिजलेले मांस खाण्याचा सल्ला यावेळी देण्यात येतो
    पालक, बीट यासारख्या भाज्यांचा आहारामध्ये  समावेश करून घ्यावा, जेणेकरून गरोदरपणात महिलांना शरीरामध्ये योग्य प्रमाणात लोह मिळते
  • सुरूवातीच्या काळात अतिरिक्त कार्बोहायड्रेटची गरज भासते. त्यामुळे साखरयुक्त पदार्थांचाही आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्यावा

काय खाऊ नये (What Not To Eat)

What Not To Eat

गरोदर पहिला महिना काय खाऊ नये

गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात काही पदार्थ न खाणेच योग्य आहे. कारण यामुळे बाळाच्या वाढीला त्रास होऊ शकतो. अशा काही गोष्टी टाळाव्यात 

ADVERTISEMENT
  • समुद्री पदार्थ – गर्भारपणाच्या पहिल्या महिन्यात समुद्रातील मासे खाणे टाळावे. याचे जास्त सेवन केल्यास, बाळाला नुकसान पोहचू शकते 
  • सॉफ्ट चीज – गर्भवती महिलांना गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात पाश्चराईज्ड दुधापासून तयार करण्यात आलेले चीज देऊ नये. या चीजमध्ये हानिकारक बॅक्टेरिया असल्यामुळे शरीरात विष पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे हे चीज खाणे टाळावे
  • पॅकेटबंद पदार्थ – डब्यातील बंद पदार्थ खाणे टाळावे. उदाहरणार्थ मायक्रोवेव्हमध्ये बनविण्यात आलेले केक, बिस्किट्स हे पदार्थ टाळावेत
  • कच्चे अंडे आणि कच्चे मांस – कच्चे मांस आणि कच्चे अंडे यामध्ये सालमोनेला आणि लिस्टेरिया नावाचे बॅक्टेरिया असतात. जे पोटातील बाळावर अत्यंत वाईट परिणाम करतात. त्यामुळे याचे सेवन करू नये  
  • कच्ची पपई आणि अननस – ही दोन्ही फळं अत्यंत उष्ण असतात.  त्यामुळे या दोन्ही फळांचे सेवन करू नये. पहिल्या महिन्यात तर अजिबात खाऊ नये 
  • जंक फूड आणि दारू – गर्भावस्थादरम्यान जंक फूड, दारू, तंबाखू यापैकी कोणत्याही पदार्थांचे सेवन करणे योग्य नाही. तसंच चहा, कॉफी आणि चॉकलेटचे अतिसेवन यादरम्यान करू नये. 

महत्वाची सूचना – आपल्या सुविधेसाठी गर्भवती असणाऱ्या महिलांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहार घ्यावा. 

पहिल्या महिन्यासाठी व्यायाम (Exercise For 1st Month)

Exercise For 1st Month

पहिल्या महिन्यासाठी व्यायाम

गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यात व्यायाम करणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीरामध्ये ऊर्जा राहते आणि सुरूवातीच्या महिन्यात येणाऱ्या तणावापासूनही महिला दूर राहतात. मात्र तुम्ही जे व्यायाम करणार आहात ते योग्य माणसाच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखालीच करा. स्वतःच्या मनाने कोणतेही व्यायाम करू नका. कोणते व्यायाम करू शकता ते जाणून घ्या. 

ADVERTISEMENT

एरोबिक – एरोबिक हे शरीरासाठी उत्तम असते. तसंच यामुळे नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढते. यासाठी तुम्ही तुमच्या इन्स्ट्रक्टरची मदत घ्या 

तैराकी – पाण्यामध्ये आपले वजन जमिनीच्या तुलनेत दहा पट जास्त असते. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी तैराकी हा सर्वात सोपा आणि परिणामकारक असा व्यायाम मानला जातो. गर्भावस्थेच्या सुरूवातीला 15-20 मिनिट्स तैराकी करू शकता. यासाठी तुम्ही पाण्यात मात्र एकट्याने उतरू नका. आजूबाजूला कोणाला तरी नक्की ठेवा

पिलेट्स – या व्यायाममुळे पोट, पाठीला मजबूती मिळते. यासाठी योग्य मार्गदर्शकाकडून शिकून मगच हा व्यायाम करावा

योगासन – गर्भारपणाच्या पहिल्याच महिन्यापासून तुम्ही योगासन सुरू केले तर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होण्यास फायदा मिळतो. यासाठी काही खास आसनं आहेत. तुम्ही योगा इन्स्ट्रक्चरच्या सल्ल्याने नक्की योगासने करा

ADVERTISEMENT

महत्वाची सूचना – प्रत्येक गर्भवती महिलेची शारीरिक प्रकृती ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणत्याही व्यायामाला सुरूवात करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे विसरू नका. 

गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात काय करावे (What To Do In 1st Month)

आपण गरोदर आहोत हे कळल्यानंतर आपल्याला आपली आणि आपल्या बाळाची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी हे तर नक्कीच. त्यासाठी नक्की पहिल्या महिन्यात आपण काय करायला हवे ते जाणून घ्या 

  • रोज थोडा थोडा व्यायाम करावा 
  • फायबरयुक्त जेवण जेवा. यामुळे बद्धकोष्ठ आणि अपचनासारख्या समस्या उद्भवणार नाहीत आणि पोटावर ताण येणार नाही 
  • दिवसातून कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्या 
  • नेहमी सकारात्मक विचार करा आणि आनंदी राहा 
  • डॉक्टरांचा सल्ला घेऊन विटामिन्स आणि सप्लीमेंट्सचे सेवन सुरू करा 
  • आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये आणि जेवणाच्या वेळांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने बदल करून घ्या. डाईट चार्ट बनवा 
  • ज्या व्यक्तींना गरोदरपणाचा अनुभव आहे त्यांच्याकडून त्यांचे योग्य अनुभव ऐका आणि आपल्याला यापैकी काही अनुभव येत आहेत का अथवा जाणवत आहेत का पाहा 
  • जास्तीत जास्त आराम करा आणि व्यवस्थित झोप घ्या
  • डॉक्टरांनी दिलेली औषधं न विसरता आणि वेळेवर घ्या
  • आपल्या येणाऱ्या बाळासाठी योग्य वित्तीय योजना बनवा 

काय करू नये (What Not To Do In 1st Month Of Pregnancy)

  • पटकन उठू नये आणि खाली वाकू नये 
  • तणावापासून दूर राहा
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध खाऊ नये 
  • डाएटिंग अजिबात करू नका 
  • सतत झोपून राहू नका
  • हॉट टब बाथ अथवा सोना बाथ अजिबात घेऊ नका 

ADVERTISEMENT

पहिल्या महिन्यासाठी काही महत्वाच्या टिप्स (Tips For 1st Month)

बाळ होणार म्हटल्यानंतर आई आणि वडील दोघांच्याही जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे अगदी पहिल्या महिन्यापासून काही गोष्टी करून ठेवा. 

  • सर्व कागदी काम – आरोग्य विमा असो अथवा किती खर्च येणार आहे याचा हिशेब हे सर्व पहिल्याच महिन्यात तपासून घ्या. त्याचे सर्व कागदी काम स्वतः करा
  • गरोदरपणात वाचायची पुस्तके विकत घ्या. यातून आपल्या बाळाच्या वाढीसाठी लागणारी माहिती नक्की गोळा करा.  आपल्या भावना आणि आपल्याला काय हवं आहे ते या पुस्तकांमधील माहितीवरून जाणून घ्या  
  • संयम ठेवा. सतत होणारी चिडचिड कमी करण्याचा प्रयत्न करा. नेहमी आनंदी राहा. जे खावंसं वाटत आहे ते खा
    कोणत्याही गोष्टी मनात न ठेवता, आपल्या जवळच्या माणसांसह बोला

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात रक्तस्राव होतो म्हणजे काय होते ?

पहिल्या महिन्यात गर्भ राहिल्यानंतर काही महिलांना रक्तस्राव होऊ शकतो. पण घाबरून जायची गरज नाही. त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपाय करून घ्यावा. आराम करावा

2. गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यात सेक्स (Sex) करणे सुरक्षित आहे का ?

गर्भपात अथवा प्रिमॅच्युअर डिलिव्हरी सारखी कोणतीही समस्या नसेल तर गर्भावस्थेदरम्यान पहिल्या महिन्यात तुम्ही सेक्स करू शकता. पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच पोटावर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.

3. गर्भावस्थेत पोटाच्या खालच्या भागात जास्त दुखते का ?

पहिल्या महिन्यात पोटाच्या खालच्या भागात दुखते. गर्भ राहिल्यामुळे असे होते. पण अत्यंत कॉमन आहे. साधारण दोन ते तीन दिवस दुखून नंतर हे दुखणे बंद होते.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

19 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT