तुमच्या बाळाचे नाव ठेवणे हा एक मोठा निर्णय आहे. बाळ होणार ही बातमी कळल्यापासूनच बाळाच्या आगमनाची तयारी उत्साहाने सुरु होते आणि बाळाचे नाव काय असावे यावर देखील घरात चर्चा होते. बाळाच्या आईबाबांबरोबरच आजी आजोबा, आत्या काका, मावशी मामा सगळेच लोक बाळासाठी छान छान नावे शोधायला सुरुवात करतात. बाळाच्या आगमनानंतर बाळाचे नाव ठेवणे ही सर्वात खास गोष्ट आहे. लक्षात ठेवा की तुमच्या बाळाचे नाव चांगले अर्थपूर्ण असणे हे महत्वाचे आहे कारण ते नाव बाळाबरोबर आयुष्यभर राहील. बाळाचे नाव केवळ बालपणासाठीच नव्हे तर ते पुढे जाऊन एका प्रौढ व्यक्तीचे नाव देखील असणार आहे. त्यामुळे त्या नावाचा सिरियसली विचार करण्याची आवश्यकता आहे.पालकत्व हा या जगातील सर्वात चित्तथरारक अनुभव आहे. ज्या क्षणी तुम्ही पालक बनता त्या क्षणी, बाळापेक्षा इतर काहीही महत्त्वाचे वाटत नाही. हा एक सुंदर अनुभव असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाचे या जगात स्वागत करता तेव्हा तुम्ही त्यांना एक नाव देता जे त्यांची आयुष्यभराची ओळख बनते. त्यामुळे हा निर्णय घेताना नीट विचार केला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी “ग” अक्षराने सुरू होणारे सुंदर आणि अर्थपूर्ण नाव शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही सुंदर अर्थपूर्ण नावांची यादी दिली आहे. यातील एक नाव तुम्हाला तुमच्या राजकुमारासाठी नक्कीच आवडेल.
Table of Contents
कधीकधी मुलांचे नाव ठेवणे हे खूप आव्हानात्मक काम असते. विशेषत: जेव्हा नाव विशिष्ट अक्षराने ठेवावे लागते किंवा मुलाच्या जन्मपत्रिकेप्रमाणे काही विशिष्ट आद्याक्षरावर आधारित नाव ठेवायचे असते तेव्हा असे घडते. असेच एक अक्षर म्हणजे ‘ग’ होय. ‘ग’ वरून मुलांची नावे खूप लोकप्रिय असली तरी ती नावे आता जुनी आणि कॉमन वाटतात. या लेखात ग वरून मुलांची नावे नवीन ट्रेंडनुसार कुठली आहेत त्याची यादी दिलेली आहे. ग अक्षरापासून सुरू होणारी तुलनेने नवीन परंतु अर्थपूर्ण नावे येथे दिलेली आहेत. पालक या नात्याने तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाचे काही निकष जरी ठरवले असतील, तर नावांची ही यादी नक्कीच तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल. हा लेख लहान नावे, आधुनिक नावे, पारंपारिक नावे, प्रचलित नावे आणि विशेष अर्थ असलेल्या नावांसह अशा सर्व नावांचे संकलन आहे. असे म्हटले जाते की ज्या लोकांचे नाव ‘ग’ अक्षराने सुरू होते ते हेतूपूर्ण, पद्धतशीर, आविष्कारशील ,सर्जनशील असतात आणि ते धर्माकडे खूप आकर्षित होतात.
पारंपारिक अशी ग वरून मुलांची नावे – G Varun Mulanchi Traditional Nave
आपल्या संस्कृतीत नामकरणाची प्रथा प्राचीन काळापासून प्रचलित आहे.आपल्याकडे पूर्वीपासूनच नुकत्याच जन्मलेल्या मुलाला असे नाव दिले जाते ज्याचा काही चांगला अर्थ आहे. नामकरण करण्यासाठी प्रत्येक धर्मात एक विशिष्ट पद्धत आहे. आपले नाव ही आपली ओळख असते. किंबहुना, आपल्या संस्कृतीत नामकरणाचा उद्देश एखाद्या व्यक्तीला इतर लोकांपेक्षा वेगळी ओळख देणे हा आहे. भारताशिवाय जगात असे अनेक देश आहेत, ज्यात लोक वर्षानुवर्षे नामकरणाची प्रक्रिया स्वीकारत आहेत. हिंदू धर्मात असे मानले जाते की मुलाचे नाव शुभ, सुंदर आणि चांगला अर्थाचे असावे. मुलाचे नाव चांगले ठेवल्याने समाजात चांगली प्रतिष्ठा मिळते आणि लोक त्याच्याकडे आकर्षित होतात असा समज आहे. जर देवाच्या नावावरून मुलाचे नाव ठेवले तर त्यानिमित्ताने आपल्या तोंडून देवाचे नाव घेतले जाते असाही एक उद्देश असतो. काही लोक भगवान शिव वरून मुलांची नावे ठेवणे पसंत करतात. खालील लिस्टमध्ये ग अक्षरावरून मुलांची काही पारंपरिक नावे दिलेली आहेत.
नाव | नावाचा अर्थ |
गगन | आकाश |
गदाधर | गदा धारण करणारा |
गंगाधर | भगवान शंकर |
गुरुनाथ | गुरु |
गिरीधर | श्रीकृष्ण |
गणेश | गणपती , सर्व गणांचा ईश |
गौरांग | गोरा |
गतिक | प्रगतिशील |
गर्वित | गर्व |
गौतम | भगवान गौतम बुद्ध |
ग्रंथ | पवित्र |
गौरांश | देवी पार्वतीचा अंश |
गीतांश | गीतेचा अंश |
गार्विक | लालित्य असलेला , गर्व |
गिरीकर्ण | भगवान शंकर |
गीतिक | आकर्षक आणि अद्भुत आवाज असलेला |
गजबाहू | बाहुंमध्ये हत्तीची ताकद असलेला |
गीतेश | श्रीकृष्ण |
गुंजल | उत्तम गुण असलेला |
गुरुदत्त | गुरूंनी दिलेला प्रसाद |
अधिक वाचा – द वरून मुलांची नावे, अर्थपूर्ण आणि युनिक
ग वरून मुलांची युनिक नावे – G Varun Mulanchi Unique Nave
हिंदू धर्माशी संबंधित लोकांचा असा विश्वास आहे की काही प्रमाणात नावाचे गुण हे मुलाच्या स्वभावात उतरतात. तुमचे चांगले आणि वाईट गुण, स्वभाव आणि तुमचे बोलणे कसे आहे, या गोष्टींची झलक तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरात म्हणजेच ग अक्षरात दिसते. हिंदू धर्मात असे मानले जाते की ज्या मुलाचे नाव ‘ग’ अक्षराने सुरू होते, तो यशस्वी होतो. कोणत्याही आव्हानांना तो पूर्ण धैर्याने आणि साहसाने सामोरे जातो. पूर्वी मुलाच्या जन्मानंतरच त्याचे नाव ठरवले जात असे. पण आजकाल काही पालक जन्मापूर्वीच्या गृहीतकाच्या आधारे मुलाचे नाव ठरवतात किंवा त्याचा अभ्यास करतात. नाव चांगलं असायला हवं हाच त्यांचा यामागचा हेतू असतो. नावाचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. विशेषत: नावाच्या पहिल्या अक्षराचा मुलाच्या भविष्यावर, करिअरवर व व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. म्हणूनच अनेक लोक बाळासाठी अर्थासह आधुनिक श्री गणेशाची नावे शोधतात. येथे ग अक्षरावरून काही युनिक नावे दिलेली आहेत. यापैकी काही तुम्हाला तुमच्या बाळासाठी नक्कीच आवडतील.
गंधार | सूर ‘ग’ |
गर्वी | अभिमान |
गंधिक | सुवासिक |
गर्गेय | गर्ग ऋषींचे वंशज |
गुणज्ञ | गुण देणारा |
गुणिन | सदाचारी |
ग्रहिष | ग्रहांचे स्वामी |
गौरेश | भगवान शंकर |
गंगज | गंगापुत्र |
गंतव्य | लक्ष्य |
गौरवान्वित | गौरवास पात्र |
गुणवित | धार्मिक |
गुरुतम | सर्वोत्कृष्ट शिक्षक |
गजदन्त | श्रीगणेश |
गजपती | श्रीगणेश |
गजेन्द्र | इंद्रदेव |
गणाध्यक्ष | श्रीगणेश |
गणनायक | श्रीगणेश |
गुणेश | श्रीगणेश |
गुणाधिश | श्रीगणेश |
अधिक वाचा –च आणि छ वरून मुलामुलींची नावे, नवीन आणि अर्थासह
ग वरून मुलांची नावे 2022 – G Varun Mulanchi Nave 2022
आपल्या नवजात बाळाच्या आगमनाने प्रत्येक आईवडिलांना किती आनंद वाटतो हे केवळ तेच सांगू शकतात. या अनुभवाचे वर्णन शब्दांत करणे खूप कठीण आहे. घरात बाळ येणार याचा नुसता विचारच करून सर्वांचे मन आनंदित होते.घरभर उत्सवाचे वातावरण असते. कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक, परिचित आनंद साजरा करतात. या सगळ्यात बाळासाठी नावाची शोधाशोध सुरु होते. बाळाचे परिपूर्ण नाव शोधण्यात थोडा वेळ लागू शकतो आणि त्याचे टेन्शन देखील येऊ शकते. पण हा अनुभव परंतु ते खूप मजेदार देखील असू शकतो. खरं तर, नवीन पालक म्हणून तुम्ही घेतलेल्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या निर्णयांपैकी बाळाचे नाव ठेवणे हा एक मोठा निर्णय असतो. तुमच्या बाळाचे आद्याक्षर जर ग आले असेल आणि तुम्ही कौटुंबिक किंवा सांस्कृतिक परंपरेचा आदर करणारे नाव तुम्ही शोधत असाल किंवा तुमची इच्छा असेल तुम्ही तुमच्या मुलासाठी पूर्णपणे वेगळे आणि खास नाव असावे तर खालील लिस्ट वाचा. तुमच्या बाळासाठी कृष्णाची नावे देखील दिलेली आहेत. यातून तुम्हाला तुमच्या बाळासाठी एखादे छानसे नाव नक्कीच क्लिक होईल.
ग्राहील | श्रीकृष्ण |
गमन | प्रवास |
गणक | ज्योतिषी |
गणनाथ | भगवान शंकर |
गंधराज | सुगंधाचा राजा |
गंधर्व | स्वर्गातील गायक, सूर्याचे दुसरे नाव |
गितांशू | भगवद्गीतेचा एक भाग |
गिरिनाथ | श्रीकृष्ण |
गिरिक | भगवान शंकर |
गोविंद | श्रीकृष्ण |
गोपाल | गायींचे पालन करणारा/ श्रीकृष्ण |
ग्रीष्म | एक ऋतू /उन्हाळा |
गोवर्धन | एका पर्वताचे नाव |
गुरुदास | गुरूंचा सेवक |
गोपीकृष्ण | गोपींचा कृष्ण |
गोपीचंद | एक प्रसिद्ध राजा |
गौरीहर | भगवान शंकर |
गोपीनाथ | श्रीकृष्ण |
गुंजन | गुणगुणणे |
गांगेय | गंगापुत्र |
अधिक वाचा – प वरून मुलांची नावे जाणून घ्या
ग वरून मुलांची मॉडर्न नावे – G Varun Mulanchi Nave Modern Nave
बाळाचे नाव ठेवणे हे वाटते तितके सोपे नाही. तुम्ही तुमच्या बाळाचे नाव ठेवण्यासाठी इंटरनेट, पुस्तके आणि इतर स्रोत शोधले असतील आणि तुम्हाला लोकांच्या सल्ल्यानुसार अनेक नावे देखील सापडली असतील. साहजिकच, इतक्या नावांमध्ये काही नावे अशीही असतात जी तुम्हाला आवडत नाहीत, काही तुमच्या जोडीदाराला आणि कुटुंबातील सदस्यांना आवडत नाहीत आणि काही नावांचा अर्थ तुम्हाला आवडत नाही. अनेकदा पालकांना त्यांच्या मुलाला राशीच्या चिन्हानुसार एक युनिक, आधुनिक परंतु पारंपारिक आणि चांगले नाव द्यायचे असते. त्यांना असे नाव हवे असते जे त्यांच्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर, भावनांवर, विचारांवर आणि वागणुकीवर चांगला प्रभाव टाकू शकेल जेणेकरुन मूल मोठे होऊन एक चांगली आणि आदर्श व्यक्ती बनू शकेल. तुमच्या घरी जर डबल आनंद म्हणजे जुळी मुले झाली असतील तर जुळ्या मुला मुलींची नावे, युनिक नावे तुम्ही खालील लिस्ट मधून फायनल करू शकता. तुम्ही तुमच्या मुलासाठी ‘ग’ अक्षर असलेले आधुनिक आणि उत्तम नाव शोधत असाल, तर काळजी करू नका, ग’ आद्याक्षर आलेल्या बाळांसाठी ही काही उत्तम नावे आहेत.
गुणेंदू | गुणांचा चंद्र |
गुणरत्न | गुणांचे रत्न |
गोरक्ष | गाईंचे रक्षण करणारा |
गदीन | श्रीकृष्ण |
गीर्वाण | देव |
गिरीध्वज | पर्वतांपेक्षाही उंच असे |
गार्थ | संरक्षण |
गियान | प्रतिभावान |
गोस्वामी | गायींचा देव |
गंगेश | श्रीशंकर |
गंजन | श्रेष्ठ |
ग्रितिक | पर्वत |
गोपेश | एका प्राचीन राजाचे नाव |
गभस्ती | प्रकाश |
गंधपुष्प | सुगंधित फुल |
गुज | गुपित |
गरीस्थ | सन्मानित |
गुणनिधी | गुणांचा सागर |
गुडाकेश | भगवान शंकर |
गांडीव | अर्जुनाचे धनुष्य |
तुम्हाला ‘ग’ अक्षरावरून मुलांची अनेक नावे सापडतील पण त्या नावाचा अर्थही प्रभावी असावा. मुलाचे नाव असे असावे की त्याचा अर्थ त्याच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकेल. जर तुम्हाला ‘ग वरून मुलांची नावे हवी असतील तर या सूचीमध्ये चांगला अर्थ असलेली अनेक आधुनिक आणि क्युट नावे दिली आहेत.
स वरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे