ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
green-tea-face-pack-for-skin-in-marathi

तुमच्या स्किन टाईपनुसार बनवा ग्रीन टी फेसपॅक, त्वचेसाठी होईल फायदा

चेहऱ्याला नेहमी तजेलदार ठेवण्यासाठी आपण अनेकदा पार्लरच्या पायऱ्या झिजवत असतो. तसंच अनेक सौंदर्य उत्पादनांचा वापरही करत असतो. पण तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार ग्रीन टी फेसपॅक वापरूनही चेहऱ्याची अधिक काळजी घेता येतो. त्वचेसाठी याचा नक्कीच फायदा होतो. ग्रीन टी आपल्या सौंदर्यात अधिक भर घालण्यासाठी फायदेशीर ठरते. केवळ वजन कमी करण्यासाठी नाही तर त्वचेला उजळपणा देण्यासाठीही ग्रीन टी चा उपयोग करून घेता येतो. ग्रीन टी चे अनेक फायदे आहेत.  यासाठी तुम्ही ग्रीन टी चा फेसपॅक कसा वापरायचा आणि तुमच्या स्किन टाईपनुसार याचा कसा उपयोग करून घ्यायचा याबाबत माहिती. घरच्या घरी तुम्ही हा फेसपॅक करा तयार आणि दिसा अधिक सुंदर आणि घ्या आपल्या त्वचेची काळजी!

तेलकट त्वचेसाठी खास (For Oily Skin)

ग्रीन टी (Green Tea) हे तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी वरदान आहे. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुम्ही ग्रीन टी चा फेसपॅक नक्की लावा. हे तुमची त्वचा अधिक स्वच्छ राखण्यासाठी आणि डागविरहित त्वचा ठेवण्यासाठी अधिक परिणामकारक आहे. यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा ग्रीन टी च्या पाण्याने स्वच्छ चेहरा धुवा अन्यथा ग्रीन चे पाणी काही काळ चेहऱ्याला लावा आणि साधारण अर्धा तासानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येईल. 

नॉर्मल त्वचेसाठी (Normal Skin)

नॉर्मल स्किनवर तसं तर कोणतेही सौंदर्य उत्पादन वापरले तर त्रासदायक ठरत नाही. तुम्ही कॉम्बिनेशन स्किनसाठी ग्रीन टी चा वापर करू शकता. 

  • 2 चिमूट हळद, 1 चमचा ग्रीन टी आणि 1 चमचा बेसन मिसळून पेस्ट तयार करून घ्या 
  • चेहरा स्वच्छ धुवा आणि त्यानंतर ही तयार पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा 
  • साधारण 20 मिनिट्सनंतर कापसाला गुलाबपाणी लावा आणि सुकलेल्या चेहऱ्यावरील हा फेसपॅक या कापसाने तुम्ही स्वच्छ करा 
  • त्यानंतर दोन्ही हाताने सर्क्युलर पद्धतीने फेसपॅक काढा आणि ताज्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा

यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरूमं घालविण्यास मदत मिळते आणि चेहरा अधिक तजेलदार होतो. तसंच चेहरा उजविण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. 

ADVERTISEMENT

कॉम्बिनेशन त्वचेसाठी (For Combination Skin)

काही महिलांच्या चेहऱ्याचा टी-शेप हा तेलकट असतो अर्थात कपाळ, नाक आणि हनुवटी इतकाच भाग तेलकट असतो आणि बाकी त्वचा ही कोरडी असते. त्याला कॉम्बिनेशन त्वचा असे म्हणतात. यासाठी तुम्ही ऑरेंज पील आणि ग्रीन टी चा फेसपॅक वापरू शकता. 

  • यासाठी तुम्ही अर्धा चमचा मध, एक चमचा ग्रीन टी आणि एक चमचा संत्र्यांच्या सालाची पावडर घ्या आणि याची पेस्ट बनवा 
  • ही पेस्ट बनविण्यासाठी तुम्ही गुलाबपाण्याचा वापर करा 
  • साधारण 20 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग सुकल्यावर हलक्या हाताने रगडून चेहरा स्वच्छ करा

काही दिवसातच तुम्हाला त्वचेवर फरक दिसून येईल. तसंच त्वचा अधिक चांगली होईल. 

कोरड्या त्वचेसाठी ग्रीन टी पॅक 

तुमची त्वचा कोरडी असेल तर त्यासाठी तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने ग्रीन टी चा फेसपॅक वापरा आणि त्वचा अधिक सुंदर करा. 

  • 2 चमचे मध आणि एक चमचा ग्रीन टी मिक्स करून पेस्ट बनवा
  • चेहरा स्वच्छ करा आणि ही पेस्ट लावा 
  • त्वचेवर साधारण 20 मिनिट्स लावा आणि त्यानंतर ताज्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा 

यामुळे तुमची त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होते आणि याचा वापर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता. 

ADVERTISEMENT

आम्ही कोणताही दावा करत नाही. तसंच तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही याचा वापर करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

17 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT