ADVERTISEMENT
home / Care
केस पातळ असल्याने हैराण असाल तर फॉलो करा या टिप्स

केस पातळ असल्याने हैराण असाल तर फॉलो करा या टिप्स

प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या वेगळी असली तरीही सुंदर केस हे प्रत्येकाच्या सौंदर्याच्या व्याख्येत असतातच. पण आपल्या बदलत्या लाईफस्टाईल आणि प्रदूषण, धुळीमुळे केसांचे खूपच नुकसान होते. प्रदुषणामुळे केसगळती ही तर मोठीच समस्या झाली आहे. त्यातही केस पातळ होणे ही समस्याही मोठी होत चालली आहे. त्याशिवाय केसांचा व्हॉल्युमही कमी होतो. केस पातळ असल्याने बऱ्याच महिला हैराण असतात. अनेक जणी त्यासाठी वेगवेगळे केमिकल उत्पादनेही वापरतात. पण पातळ केसांवर सतत पार्लरमध्ये जाऊन आणि केसांवर केमिकल्स लावणं हा उपाय असू शकत नाही. यामुळे केस अधिक पातळ होतात आणि त्याशिवाय निस्तेजही होतात. पण तुम्ही काही घरगुती उपाय करूनही यावर तोडगा काढू शकता.  तुम्ही दिलेल्या काही टिप्स फॉलो केल्यात तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळू शकतो. अगदी आपल्या स्वयंपाकघरातील काही घरगुती वस्तूंचा वापर करून आपण या समस्येपासून सुटका मिळवू शकतो. आता नक्की काय वापरायचे आणि कसे वापरायचे हे आम्ही तुम्हाला सांगतो. 

दही

Shutterstock

प्रत्येकाच्या घरी दही हे अगदी सहज मिळते. दही तुम्ही तुमच्या केसांना लावल्याने केसांची लांबी तर वाढतेच. पण तुम्ही दह्यासह मध मिक्स करा आणि केसांना लावा. काही वेळ हे तसंच ठेवा आणि मग थंड पाण्याने केस धुवा. केस धुताना माईल्ड शँपूचा वापर करा. असं केल्याने तुमचे केस वाढतात आणि केसांचा पातळपणा कमी होतो. दह्यातील गुणधर्मामुळे तुमच्या केसांना अधिक घनदाटपणा मिळतो. मात्र एक लक्षात ठेवा तुम्हाला जर डोक्याला थंडपणा जास्त सहन होत नसेल तर तुम्ही दह्याचा हा उपाय तुम्ही वापरू नका. तुमच्यासाठी इतर उपायही आहेत.

ADVERTISEMENT

कढीपत्त्याचा हेअर मास्क तयार करून मिळवा सुंदर केस

मेथी दाणे

Shutterstock

मेथी दाण्यामध्ये निकोटिनिक अॅसिड आढळते. जे  केसांना अधिक मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच मेथी दाण्यात प्रोटीन अधिक प्रमाणात आढळते. केसांसाठी प्रोटीनची अत्यंत आवश्यकता असते. मेथी दाणे तुम्ही रात्रभर पाण्यात भिजत घाला. हे पाणी सकाळी केस धुताना तुम्ही वापरा. यामुळे केसात कोंडा असेल तर तोदेखील कमी होण्यास मदत मिळते. मेथी दाण्यामुळे केसांचा हेअरफॉल कमी होऊन केस अधिक घनदाट होण्यास फायदा होतो. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही रात्रभर भिजत घातलेल्या मेथी दाण्याची पेस्ट बनवा आणि या पेस्टमध्ये एक चमचा नारळाचे तेल मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही केसांना आंघोळ करण्याआधी एक तास लावा. त्यानंतर माईल्ड शँपूने केस धुवा. आठवड्यातून 3 वेळा तुम्ही हा उपाय केलात तर तुम्हाला केस पातळ असण्याच्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही. यामुळे केस अधिक घनदाट आणि चमकदार होतात. 

ADVERTISEMENT

केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स

 

कांद्याचा रस

Shutterstock

ADVERTISEMENT

प्रत्येक मुलीला आपले केस घनदाट आणि सिल्की असावेत असं वाटत असते. पण त्यासाठी काय करायचे हा प्रश्न असणं स्वाभाविक आहे. यावर उत्तर म्हणजे घरात असणारा कांदा. केसांची वाढ होण्यासाठी आणि पातळ केसांवर उत्तम उपाय म्हणजे कांद्याचा रस. कांद्याच्या रसामध्ये बॅक्टिरियल असतात जे केसांमधील कोंडा कमी होतात. केस गळतीचे मुख्य कारण म्हणजे केसातील कोंडा असतो. कोंडा गेल्यास, ही समस्या निघून जाते. केसही घनदाट होतात. 

मजबूत आणि चमकदार केसांसाठी करा कांद्याच्या रसाचा असा वापर

 

मेंदी

ADVERTISEMENT

Shutterstock

मेंदी ही केसांसाठी अत्यंत फायदेशीर असते. मेंदीचा नियमित वापर केल्याने केस पातळ राहात नाहीत. पण कोणतीह मेंदी आणि किती कालावधीने लावायला हवी याचीही पद्धत असते. ती वापरूनच तुम्ही मेंदीचा वापर करा. तसेच मेंदी केसांना उत्तम रंग आणून देते. त्यामुळे तुम्ही इतर केमिकलयुक्त रंगाचा वापर करण्यापेक्षा मेंदीचा वापर करा.

17 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT