आपले केस लांबसडक, चमकदार आणि सुंदर असावेत असं कोणाला वाटत नाही. लहान केस लवकर वाढावेत आणि सुंदर दिसावेत म्हणून आपण खूप उपाय करत असतो. कधी केसांना तेल लावून ठेवतो तर कधी पार्लरमध्ये जाऊन महाग पॅकेज खरेदी करतो. पण त्यानंतरसुद्धा आपले केस आपल्याला हवे तसे लांबसडक होतातच असं नाही. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, हे सर्व न करताही केस लांब करता येऊ शकतात तर? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. आपल्या घरीच असे काही केस वाढवण्याचे उपाय आहेत, ज्यामुळे केस महिनाभरात लांबसडक वाढण्यास मदत होते. आयुर्वेदिक पद्धतीनेदेखील केसांची काळजी घेता येते. फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य केस वाढीसाठी उपाय करण्याची गरज आहे. हे उपाय (Hair Growth Tips In Marathi) आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि ते तुम्ही घरच्याघरी नक्की करून पाहा.
Table of Contents
- केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय | Home Remedies For Hair Growth In Marathi
- अशी घ्यावी केसांची काळजी | Hair Growth Tips In Marathi
- केसांच्या वाढीसाठी उत्कृष्ट तेल | Oil For Hair Growth In Marathi
- केस वाढवण्यासाठी शँपू | Shampoo For Hair Growth In Marathi
- केस वाढवण्यासाठी आवश्यक आहार | Food For Hair Growth In Marathi
- केस वाढवण्यासाठी प्रश्न – उत्तर / FAQ’s
केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय | Home Remedies For Hair Growth In Marathi
केस वाढवण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण घरातल्या घरात अनेक उपाय करून केसांची वाढ करू शकतो. पाहूया असे घरगुती केस वाढवण्यासाठी उपाय –
1. केसांच्या वाढीसाठी बायोटिन्स
काय गरेजेचं आहे
- 2-3 बायोटिन्सच्या गोळ्या
- ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाचं तेल
तुम्ही काय करायला हवं?
- गोळ्यांची पावडर करून घ्या आणि असलेल्या तेलामध्ये मिक्स करा
- हे मिक्स केलेलं मिश्रण तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांपासून लावा आणि रात्रभर हे तसंच लावून ठेवा
सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे तुमचे केस धुऊन टाका
किती वेळा करू शकता?
आठवड्यातून दोन वेळा तुमच्या केसांवर हा प्रयोग तुम्ही करू शकता.
याचा उपयोग कसा होतो?
बायोटिन्समध्ये हिरव्या पालेभाज्यांमधील विटामिन बी चं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे केसगळती थांबवण्यासाठी याची मदत होते. याचा वापर केल्यामुळे तुमचे केस अधिक जाड आणि निरोगी होतात. तसंच केसगळतीची समस्या असल्यास, निघून जाते.
2. केसांच्या वाढीसाठी विटामिन्स
बायोटिन्स हा विटामिन्सचा एक प्रकार आहे, ज्यामुळे केसगळती थांबते अशीच अनेक विटामिन्स आहेत ज्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी मदत होते. तुमच्या केसांचा निरोगीपणा जपण्यासाठी ही विटामिन्स मदत करतात. तुमच्या केसांचा ताण विटामिन्स ई कमी करण्यासाठी मदत करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विटामिन ई मुळे केसांवर खूप चांगला परिणाम होतो. इतकंच नाही तर हे ट्रॉपिकल लाईफ सायन्सेस रिसर्च जर्नलने केलेल्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे. दुसरं विटामिन जे केसांसाठी सर्वात चांगलं काम करतं ते म्हणजे विटामिन सी. केसांच्या मुळांमध्ये होत असणारे डेड सेल्स संपवण्याचं काम हे विटामिन सी करतं. यामुळेदेखील केसांच्या वाढीला मदत होते. तर विटामिन्स सी च्या गोळ्या घेतल्यामुळे केसांचे मूळ मजबूत होण्यास मदत मिळते.
3. केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस
काय गरेजेचं आहे
- 2 लाल कांदे
- कापूस
तुम्ही काय करायला हवं?
- कांदे व्यवस्थित कापून घ्या
- कापलेल्या कांद्याचा मिक्सरमधून ज्युस काढून घ्या
- अतिशय काळजीपूर्वक कांद्याचा रस तुमच्या केसांना मुळापासून लावा तेही कापसाच्या सहाय्याने. अजिबात केसावर रस थापू नका आणि साधारण 15 मिनिट्स लावून ठेऊन द्या
- शँपूने त्यानंतर केस धुवा
किती वेळा करू शकता?
याचा निकाल नक्की कसा लागतोय ते पाहून आठवड्यातून एक वेळ तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता.
याचा उपयोग कसा होतो?
कांद्याच्या रसामध्ये असलेल्या सल्फरमुळे केसांच्या वाढीला वेग येतो. केस वाढवण्यासाठी हा सर्वात जुना आणि अगदी योग्य उपाय आहे. कांदा केसांप्रमाणे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे कांदा खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत असायला हवे.
4. केसांच्या वाढीसाठी कोरफड जेल
काय गरेजेचं आहे
कोरफड
तुम्ही काय करायला हवं?
- कोरफड फाडून घेतल्यानंतर त्यातील जेल काढा
- त्यातील जेल तुमच्या केसांना मुळापासून लावा
- एक तास हे असंच राहू द्या आणि नंतर शँपूने तुमचे केस धुवा
किती वेळा करू शकता?
आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता.
याचा उपयोग कसा होतो?
तुमच्या मुळातील डेड सेल्स काढून टाकण्यात कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. कोरफडीमध्ये केसांसाठी आवश्यक अनेक पोषक तत्व असतात आणि त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. त्वचा आणि केसांसाठीही ऑलिव्ह तेलाचे फायदे होतात.
वाचा – केसांसाठी कडूलिंब (Neem Benefits For Hair In Marathi)
5. केसांच्या वाढीसाठी मध
काय गरेजेचं आहे
- 1 चमचा मध
- 2 चमचे शँपू
तुम्ही काय करायला हवं?
मध आणि शँपू एकत्र करून घ्या आणि तुमचे केस नेहमीप्रमाणे धुवा
किती वेळा करू शकता?
आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हे करा
याचा उपयोग कसा होतो?
तुमचे केस बळकट आणि मजबूत होण्यासाठी मध हा चांगला पर्याय आहे. तुमच्या केसांना पोषक तत्व मधामुळे मिळतात. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या केसांना हानी पोहचवण्यापासून संरक्षण देतात.
6. केसांच्या वाढीसाठी चहा पावडर
काय गरेजेचं आहे
- 1 ग्रीन टी बॅग
- 2 कप गरम पाणी
तुम्ही काय करायला हवं?
- गरम पाण्यामध्ये 7-8 मिनिट्स ग्रीन टी बॅग ठेऊन द्या
- हे पाणी तुमच्या केसांना मुळांपासून लावा
- एका तासासाठी केस तसेच ठेवा
- गार पाण्याने केस धुवा
किती वेळा करू शकता?
जेव्हा जेव्हा तुम्ही केस धुणार असाल तेव्हा तुम्ही हे करू शकता
याचा उपयोग कसा होतो?
केसगळती थांबवण्यासाठी ग्रीन टीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स मदत करतात. शिवाय बऱ्याच हर्बल टी मध्ये तुमच्या केसांच्या वाढीसाठी असणारी पोषक तत्व असतात. याचा परिणाम केसांवर खूप चांगला आणि सकारात्मक होतो. यासाठी तुम्ही बँबू टी, नेटल टी, सेज टी अथवा नेहमीच्या वापरातील चहा पावडरचादेखील उपयोग करू शकता.
7. केसांच्या वाढीसाठी मेंदी
काय गरेजेचं आहे
- 1 कप कोरडी मेंदी
- अर्धा कप दही
तुम्ही काय करायला हवं?
- मेंदी आणि दही एकत्र करून भिजवून घ्या
- तुमच्या केसांच्या मुळांपासून हे मिश्रण लावा
- हे मिश्रण सुकेपर्यंत तसंच केसांमध्ये राहू द्या
- नंतर शँपूने धुवा
किती वेळा करू शकता?
महिन्यातून एकदा तुमच्या केसांना मेंदी लावा
याचा उपयोग कसा होतो?
नैसर्गिक कंडिशनर म्हणून मेंदीचा वापर होतो शिवाय मेंदीमुळे तुमचे कोरडे केस मऊ मुलायम होतात. त्याशिवाय तुमच्या केसांना एक वेगळा रंगही मेंदीमुळे येतो. तुमच्या केसांचे मूळ मेंदीमुळे चांगले राहते.
8. केसांच्या वाढीसाठी अंडे
काय गरेजेचं आहे
- 1 अंडे
- 1 चमचा ऑलिव्ह ऑईल
- 1 चमचा मध
तुम्ही काय करायला हवं?
- एका भांड्यात अंडं फोडा आणि त्यामध्ये ऑलिव्ह ऑईल आणि मध मिक्स करा
- नीट मिक्स करून त्याची पेस्ट बनवा
- काळजीपूर्वक तुमच्या केसांना हे मिश्रण लावा. साधारणतः 20 मिनिट्स हे तसंच केसांना लावून ठेवा
- थंड पाण्याने शँपू लावून केस धुवा
किती वेळा करू शकता?
लांब आणि चमकदार केसांसाठी आठवड्यातून एकदा हे नक्की करा
याचा उपयोग कसा होतो?
अंड्यामध्ये प्रोटीन्स, सल्फर, झिंक, लोह, सिलेनियम, फॉस्फरस आणि आयोडिन या सर्व गोष्टी असतात. केसांच्या वाढीसाठी अंड्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पोषक तत्व असतात. नैसर्गिकरित्या केसांची वाढ होण्यासाठी अंडं हे उपयुक्त असून हे चांगल्या प्रकारे केसांना मॉईस्चराईज करून पोषण देतं. यामध्ये विटामिन ए, ई आणि डी असल्यामुळे केसगळती थांबते. तुमच्या केसांचं टेक्स्चर चांगलं होतं आणि तुमच्या केसांना चमक मिळते.
9. केसांच्या वाढीसाठी हळद
काय गरेजेचं आहे
- 3-4 चमचे हळद पावडर
- एक कप कच्चं दूध
- 2 चमचे मध
तुम्ही काय करायला हवं?
- दुधामध्ये हळद आणि मध मिक्स करून घ्या
- हे तुम्ही तुमच्या केसांना लावा
- साधारण अर्धा तास तसंच ठेवा. नंतर शँपू आणि कोमट पाण्याने केस धुवा
किती वेळा करू शकता?
आठवड्यातून एक वा दोन वेळा हे करून पाहा
याचा उपयोग कसा होतो?
हळद ही बऱ्याच आजारांवरही गुणकारी असते. त्याचप्रमाणे केसांसाठीदेखील गुणाकारी आहे. यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे तुमच्या केसांची त्वचा चांगली राहते आणि यामधील अँटीऑक्सिडंट, अँटीसेप्टीक आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणांमुळे केसांची वाढ चांगली होते.
10. ऑलिव्ह ऑईलने होतील केस लांबसडक
काय गरजेचं आहे
- 1 चमचा नारळ तेल,
- 1 चमचा ऑलिव्ह ऑईल,
- 1 चमचा मध
- एक अंड
तुम्ही काय करायला हवं?
- एका वाटीमध्ये 1 चमचा नारळ तेल, 1 चमचा ऑलिव्ह ऑईल, 1 चमचा मध आणि एक अंड हे सर्व एकत्र करून चांगलं मिश्रण बनवून घ्या.
- हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळापासून लावा आणि साधारण एक तासापर्यंत ठेवून द्या.
- त्यानंतर केस थंड पाण्याने धुवून घ्या.
- हे मिश्रण लावल्यानंतर कधीही गरम पाण्याने धुऊ नये हे कायम लक्षात ठेवा.
किती वेळा करू शकता?
आठवड्यातून एक वा दोन वेळा हे करून पाहा
याचा उपयोग कसा होतो?
गरम पाण्याने धुतल्यास, तुमच्या केसांना अपाय होऊ शकतो. या उपायामुळे तुमचे केस लांबसडक आणि चमकदार होतील. केसांवर याचा चांगला परिणाम होण्यासाठी तुम्ही साधारण आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग तुमच्या केसांवर करू शकता. एका महिन्यामध्ये तुमचे केस लांबसडक होण्यास सुरुवात होईल आणि केसांवर सकारात्मक परिणाम दिसेल.
11. अॅप्पल साईड व्हिनेगरचा करा वापर
काय गरजेचं आहे
- एक अंडे,
- दोन ते अडीच चमचे ऑलिव्ह ऑईल,
- एक व्हिटामिन ई कॅप्सूल,
- एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर
- २ थेंब इसेन्शियल ऑईल
तुम्ही काय करायला हवं?
- हे सर्व एकत्र करून पेस्ट बनवून घ्या.
- इसेन्शियल ऑईल हे अंड आणि अॅप्पल सायडर व्हिनेगरचा वास कमी करण्यासाठी तुम्ही वापरू शकता.
- ही पेस्ट तुम्ही केसांच्या मुळांपासून लावा
- आणि एक तासानंतर शॅम्पूने केस धुवा.
- केस धुतल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही कंडिशनरचादेखील वापर करू शकता.
किती वेळा करू शकता?
15 दिवसातून एक वेळा तुम्ही केसांवर ही पेस्ट लावू शकता.
याचा उपयोग कसा होतो?
अॅप्पल साईड व्हिनेगरमध्ये केसांना आवश्यक असणारे पोषक तत्व असतात. जे मुळापासून लावल्यामुळे केस अधिक चमकदार आणि घनदाट होण्यास मदत होते.
12. केळं आहे फायदेशीर
काय गरजेचं आहे
- मध्यम आकाराचा अव्हॅकॅडो
- एक छोटं केळं
तुम्ही काय करायला हवं?
- वरील दोन्ही वस्तू मॅश करून घ्या.
- आता त्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि व्हिट जर्म ऑईल मिक्स करा.
- हे मिश्रण तुम्ही तुमच्या केसांना लावून केसांना हलक्या हाताने मसाज करा आणि साधारणतः अर्धा तास केस तसेच ठेवा.
- त्यानंतर केस शॅम्पू लावून थंड पाण्याने धुवा.
किती वेळा करू शकता?
असं आठवड्यातून तुम्ही दोन वेळा केल्यास, तुमचे केस झटपट वाढण्यास मदत होते.
याचा उपयोग कसा होतो?
केळं आणि अव्हॅकॅडो तुमच्या केसांना मजबूती देण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही किमान पंधरा दिवसातून याचा उपयोग केल्यास, तुमच्या केसांना याचा फायदा होतो.
13. आवळा आहे रामबाण उपाय
काय गरजेचं आहे
- एक चमचा आवळ्याचा रस,
- 1 चमचा शिकाकाई पावडर,
- 2 चमचे नारळाचे तेल
तुम्ही काय करायला हवं?
- एका भांड्यात एक चमचा आवळ्याचा रस, 1 चमचा शिकाकाई पावडर, 2 चमचे नारळाचे तेल हे सर्व एकत्र घालून उकळून घ्या.
- थोडं थंड झाल्यानंतर आपल्या केसांवर लावून मसाज करा.
- रात्री झोपण्यापूर्वी हे करा आणि सकाळी तुमचे केस शँपूने धुवा.
किती वेळा करू शकता?
हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शकता.
याचा उपयोग कसा होतो?
आवळा हे केसांसाठी नैसर्गिक औषध आहे. यातील गुणधर्म तुमच्या केसांना अधिक सुंदर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे याचा नियमित वापर केल्यास, तुमचे केस झटपट वाढण्यास मदत होते.
14. ग्लिसरीन
काय गरजेचं आहे
- केळं
- नारळ तेल
- ग्लिसरीन
- मध
तुम्ही काय करायला हवं?
- तुमचे केस जर कोरडे आणि डॅमेज असतील तर एका केळ्यामध्ये 4 चमचे नारळाचे तेल, 1 चमचा ग्लिसरीन आणि 2 चमचा मध घालून त्यामध्ये मिक्स करून घ्या.
- आता हे मिक्स्चर केसांना लावा
- मग शॉवर कॅपच्या सहाय्याने केस कव्हर करून घ्या. काही आठवड्यातच तुमचे केस चमकदार होतील.
किती वेळा करू शकता?
हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शकता.
याचा उपयोग कसा होतो?
नारळाचं तेल आणि ग्लिसरीन हे कॉम्बिनेशन केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरतं. त्यामुळे हे मिश्रण तुमच्या केसांमध्ये मुरून तुमच्या केसांना अधिक घनदाट बनवतं
15. मध आणि ऑलिव्ह ऑईलची कमाल
काय गरजेचं आहे
- मध
- ऑलिव्ह ऑईल
तुम्ही काय करायला हवं?
- एका बाऊलमध्ये अर्धा कप मध घ्या
- आणि त्यामध्ये 4 चमचे ऑलिव्ह ऑईल घालून मिश्रण तयार करा.
- आता हे मिश्रण एका बाटलीमध्ये भरून ठेवा.
- हे कंडिशनर आता केसांना लावा आणि 30 ते 40 मिनट्ससाठी शॉवर कॅप घालून ठेवून द्या. त्यानंतर केस नीट धुवून घ्या.
किती वेळा करू शकता?
हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शकता.
याचा उपयोग कसा होतो?
मध आणि ऑलिव्ह ऑईल केसांना उपयुक्त पोषण देतं. त्यामुळे तुम्हाला केस घनदाट होण्यासाठी याचा फायदा होतो. ऑलिव्ह ऑईल केसांमध्ये मुरतं.
16. नाशपातीचा करून घ्या उपयोग
काय गरजेचं आहे
- नाशपाती
- पाणी
- ऑलिव्ह ऑईल
- मलई
तुम्ही काय करायला हवं?
- एक नाशपाती घेऊन पेस्ट बनवा.
- आता या पेस्टमध्ये 2 चमचे पाणी, 3 चमचे ऑलिव्ह ऑईल आणि 2 चमचे मलई घालून थोडं घट्ट मिश्रण तयार करा.
- आता हे मिश्रण आपल्या केसांवर लावून 20 ते 30 मिनिट्स लाऊन ठेवा आणि शॉवर कॅपच्या मदतीने केस झाकून ठेवा.
- त्यानंतर केसांना साध्या पाण्याने धुवा.
किती वेळा करू शकता?
हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शता.
याचा उपयोग कसा होतो?
नाशपतीमध्ये केसांची चमक वाढवण्याची मात्रा जास्त असते. त्यामुळे केस चमकदार होतात.
17. कडिलिंबाची कमाल
काय गरजेचं आहे
- कडिलिंब
- पाणी
तुम्ही काय करायला हवं
- कडिलिंबाची काही पानं घेऊन 4 कप पाण्यात घालून उकळून घ्या.
- त्यानंतर ही पानं थंड झाल्यावर काढून घ्या.
- आता जे पाणी शिल्लक राहिलं आहे त्याने केस धुवावे. त्यामुळे केस लवकर वाढतील.
किती वेळा करू शकता?
हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शता.
याचा उपयोग कसा होतो?
कडिलिंबामध्ये केसांना घनदाट बनवण्याची नैसर्गिक क्षमता असते. तुमच्या केसांमधील धूळ आणि प्रदूषणाचा प्रभाव यामुळे कमी होऊन केस वाढण्यास मदत होते.
18. कडिपत्तादेखील करतं काम
काय गरजेचं आहे
- कढीपत्ता
- लिंबाचं साल
- नट पावडर
- हिरवे चणे
- मेथी दाणे
तुम्ही काय करायला हवं
- 15 ते 20 कढीपत्ते आणि एका लिंबाची सालं घ्या.
- यामध्ये सोप नट पावडर, हिरवे चणे आणि मेथीचे दाणे कुटून घ्या. मेथी दाणे केसांसाठी उत्तम आहे. आता हे मिश्रण केसांना लावा आणि काही वेळाने शँपूने धुवून घ्या..
किती वेळा करू शकता?
हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शता.
याचा उपयोग कसा होतो?
कढीपत्त्यांमध्ये नैसर्गिक केसांना पोषण देणारे गुणधर्म असतात. त्यामुळे याचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांची वाढ झटपट करू शकता.
19. कांद्याच्या बिया
काय गरजेचं आहे
- कांदा बी
- मेथी दाणे
- कोरफड जेल
- व्हिटामिन ई कॅप्सूल
- कॅस्टर ऑईल
तुम्ही काय करायला हवं
- 3 वाटलेल्या कांद्याच्या बियांमध्ये 3 चमचे वाटलेले मेथीचे दाणे मिसळून घ्या.
- आता यामध्ये थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. यानंतर यामध्ये 1 चमचा कोरफड जेल आणि दोन व्हिटामिन ई कॅप्सूल अथवा कॅस्टर ऑईल घालून मिश्रण करावं.
- तुमच्या केसांमध्ये जर कोंड्याची समस्या असेल तर यामध्ये तुम्ही 2 चमचे नारळाचे तेलदेखील घालू शकता.
- हे मिश्रण तुम्ही केसांच्या मुळावर लावा.
- एक तासाने केस शँपूने धुवा.
किती वेळा करू शकता?
हा उपाय तुम्ही पंधरा दिवसातून एकदा करू शता.
याचा उपयोग कसा होतो?
केसांसाठी कांदा हा एक रामबाण उपाय ठरतो. तुमचे केस कांद्याच्या रसामुळे अतिशय मऊ आणि मुलायम तर होतातच शिवाय तुमच्या केसांची वाढ होण्यासाठीदेखील हे उत्तम ठरतं.
अशी घ्यावी केसांची काळजी | Hair Growth Tips In Marathi
कोणत्याही ऋतूत विशेषतः पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी वापरा सोप्या टिप्स
1. तुमच्या केसांना दर 5 ते 6 आठवड्यांनी ट्रीम करत राहायला हवं आणि केसांना वाढण्यासाठी याची मदत होते. वेळोवेळी केस ट्रीम करत राहिल्यास, केसदेखील दाट राहतात.
2. आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा शँपू करा आणि शँपू करण्याच्या आधी तेलाने मालिश करणं विसरू नका. असं केल्यामुळे केसांना फाटे फुटणार नाहीत आणि कोरडेदेखील होणार नाहीत.
3. आठवड्यातून दोन वेळा केसांना अंड्याच्या बलकाने 5 मिनिट्स मसाज नक्की करा. मसाजनंतर केसांना शँपूने धुऊन घ्या. आपल्या केसांना अधिक मऊ आणि चमकदार बनवतात.
4. केस कधीही गरम पाण्याने धुऊ नका कारण तुमचे केस मुळापासून त्यामुळे कोरडे होतात. मुळापासून केस कोरडे झाल्यास, कोंडा आणि खाज होण्याची शक्यता असते.
5. कधी कुरळे तर केस सरळ करण्यासाठी बऱ्याचदा स्टायलिंग टूल्सचा वापर करू नका. यामुळे तुमच्या केसांना नुकसान पोहचू शकतं.
6. केस धुतल्यानंतर कधीही टॉवेलने घासू नका. असं केल्यामुळे केस तुटू लागतात. याऐवजी तुम्ही कोणत्या तरी कॉटनच्या कपड्याने केसांना हलकं-हलकं पुसून घेऊ शकता. त्यामुळे केसांचा मुलायमपणा टिकून राहतो.
7. तुम्ही जर बऱ्याच वर्षांपासून एकच शँपू वापरत असाल तर कदाचित तुमच्या केसांना त्या शँपूची सवय झालेली असते. त्यामुळे तुमच्या केसांवर त्या शँपूचा परिणाम होत नसतो आणि तुमच्या केसांतील नैसर्गिक तेलदेखील निघून जाते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, तुम्ही शँपू बदलत राहायला हवे कारण त्यामुळे तुमच्या डोक्याला शांतता मिळते आणि कोणत्याही एका शँपूची सवयदेखील तुमच्या केसांना होत नाही.
8. शँपू आणि कंडिशनर लावल्यानंतर केसांना अॅप्पल सायडर व्हिनेगर लावा आणि मग धुवा. कोणत्याही घाण वासाशिवाय केस मऊ होतील आणि केसांमध्ये चमकदेखील येईल.
9. फ्रिजी केस कोरडे, गुंतलेले आणि वाईट दिसतात. त्यासाठी कंडिशनिंग केल्यानंतर डोकं खाली करून गार पाण्याने थोडा शॉट मारा. त्यामुळे तुमचे हेअर क्युटिकल्स सील होतात आणि फ्रिजी केसांपासून सुटका मिळते.
केसांच्या वाढीसाठी उत्कृष्ट तेल | Oil For Hair Growth In Marathi
तेलाशिवाय केसांची वाढ व्यवस्थित होऊ शकत नाही असं नेहमीच सांगितलं जातं. पण केस वाढवण्यासाठी कोणतं तेल योग्य आहे हेदेखील जाणून घेणं गरजेचं आहे.
1) केसांच्या वाढीसाठी नारळाचं तेल
काय गरजेचं आहे
- नारळाचं तेल
तुम्ही काय करायला हवं?
- तेल गरम करून तुम्ही त्याने मुळापासून केसांना मसाज करा
- दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे केस धुऊन घ्या
किती वेळा करू शकता?
तुम्ही केस धुणार असाल त्याच्या आदल्या रात्री नेहमी तेलाचा असा मसाज करून ठेवा. पण आठवड्यातून दोन वेळा असं केल्यास केसांवर जास्त चांगला परिणाम होतो.
याचा उपयोग कसा होतो?
नारळाचं तेल हा सर्वात चांगला नैसर्गिक घरगुती उपाय आहे. नारळाचं तेल तुमचे केस मुळापासून चांगलं राखण्यासस मदत करतं. शिवाय केसांमधील कोंडा होण्यासाठी रोख लावतं, केस तुटण्यापासून नारळाचं तेल वाचवतं. नारळाचं तेल म्हणजे केसांसाठी प्रिकंडिशनिंग आहे.
2) केसांच्या वाढीसाठी विटामिन ई तेल
काय गरेजेचं आहे
- 7-8 विटामिन ई कॅप्सुल्स
तुम्ही काय करायला हवं?
- एका वाटीत काळजीपूर्वक कॅप्सूल फोडून त्यातील तेल काढून घ्या
- तुमच्या केसांना मुळापासून या तेलाने मसाज करा
- रात्रभर हे तेल केसांना असंच राहू द्या
- दुसऱ्या दिवशी मऊ आणि सुंदर केसांसाठी शँपू लावून केस धुऊन टाका
किती वेळा करू शकता?
आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग करू शकता
याचा उपयोग कसा होतो?
विटामिन ई चा केस वाढवण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून उपयोग होत आहे. विटामिन ई च्या तेलामध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्याचा रॅडिकल्सशी लढण्यासाठी उपयोग होतो. तुमच्या शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि तुमच्या केसांतील ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासही हे मदत करतं. याचा नियमित वापर केल्यास, हे तेल केसांच्या वाढीसाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी उपयोगी ठरतं. शिवाय तुमचे केस या तेलामुळे अधिक मऊ आणि मुलायम होतात.
3) केसांच्या वाढीसाठी रोझमेरी ऑईल
काय गरेजेचं आहे
- 1 चमचा रोझमेरी ऑईल
- 2 चमचे नारळाचं तेल
तुम्ही काय करायला हवं?
- एका वाटीत रोझमेरी आणि नारळाचं तेल मिक्स करून घ्या आणि हे मिक्स्चर केसाला मुळापासून लावा
- रात्रभर हे असंच केसांना लाऊन ठेवा आणि सकाळी केस धुवा
- तुम्ही रोझमेरी ऑईलसह तुमचा शँपू आणि कंडिशनरदेखील मिक्स करू शकता हे लक्षात ठेवा
किती वेळा करू शकता?
चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा रोझमेरी ऑईलचा वापर करू शकता
याचा उपयोग कसा होतो?
रोझमेरी हर्बपासून हे ऑईल बनवण्यात येतं. या तेलामुळे तुमच्या डोक्यातील नसा विस्तारण्यास मदत होते. शिवाय ब्लड सर्क्युलेशनही चांगलं होतं. केस वाढीसाठी आणि केसांना टॉनिक म्हणून हे खूपच उपयुक्त आहे.
4) केसांच्या वाढीसाठी आर्गन ऑईल
काय गरेजेचं आहे
- आर्गन ऑईल
तुम्ही काय करायला हवं?
- हे तेल घेऊन तुम्ही तुमच्या मुळांपासून लाऊन मसाज करा
- एक तास ते तेल मुरण्यासाठी वाट बघा
- तुम्ही संपूर्ण रात्रदेखील तेल लाऊन ठेऊ शकता. त्यानंतर आंघोळ करून केस धुऊन टाका
किती वेळा करू शकता?
मऊ, मुलायम आणि चमकदार केसांसाठी आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग तुम्ही करू शकता.
याचा उपयोग कसा होतो?
घट्ट आणि मजबूत घनदाट केसांसाठी आर्गन ऑईल हे एक नैसर्गिक वरदान आहे. याला ‘लिक्विड गोल्ड’ असंही म्हटलं जातं. केसांची वाढ होण्यासाठी हे तेल खूपच उपयुक्त असून केसांना हे चांगलं मॉईस्चराईज करतं. तसंच तुटायला आलेले केसांची हे तेल दुरुस्तीही करतं. केसांमधील नैसर्गिक तेल जपण्याचा प्रयत्न हे ऑईल करतं.
5) केसांच्या वाढीसाठी सेज ऑईल
काय गरेजेचं आहे
- 1 चमचा सेज ऑईल
- 2 चमचे नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल
तुम्ही काय करायला हवं?
- नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यात सेज ऑईल मिक्स करा आणि ते तुमच्या केसांना मुळापासून लावा
- रात्रभर तसंच ठेऊन सकाळी धुऊन टाका
किती वेळा करू शकता?
चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता
याचा उपयोग कसा होतो?
निरोगी राहण्यासाठी या ऑईलचा उपयोग होतो. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स केसांची वाढ होण्यासाठी मदत करतात.
6) केसांच्या वाढीसाठी लव्हेंडर ऑईल
काय गरेजेचं आहे
- 3-4 थेंब लव्हेंडर ऑईल
- 2 चमचे नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल
- शॉवर कॅप
तुम्ही काय करायला हवं?
- वरीलपैकी तुमच्या आवडीच्या तेलामध्ये लव्हेंडर ऑईलचे थेंब टाका.
- तुमच्या केसांच्या मुळांपासून हे तेल लावा आणि नंतर शॉवर कॅपने केस झाकून टाका
- तासाभर हे असंच ठेऊन द्या
- तासाभराने तुमचे केस धुऊन टाका
किती वेळा करू शकता?
तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता
याचा उपयोग कसा होतो?
लव्हेंडर ऑईलची ओळख ब्युटी ऑईल अशी आहे. पण याचा उपयोग केसांच्या वाढीसाठीदेखील होतो. शिवाय कोणताही ताणतणाव असल्यास या तेलाचा वापर केल्यास, त्याचा परिणाम चांगला होतो.
7) केसांच्या वाढीसाठी जोजोबा ऑईल
काय गरेजेचं आहे
- 1 चमचा जोजोबा ऑईल
- 2 चमचे नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल
तुम्ही काय करायला हवं?
- एका वाटीमध्ये नारळाचं तेल (अथवा ऑलिव्ह ऑईल) आणि जोजोबा ऑईल मिक्स करून घ्या आणि त्यानंतर
- योग्य ब्लेंड करून तुमच्या केसांना लावा
- रात्रभर हे केसांना लाऊन ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका
किती वेळा करू शकता?
चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता
याचा उपयोग कसा होतो?
मॉईस्चराईज आणि हायड्रेट करण्यासाठी जोजोबा ऑईलचा उपयोग होतो याची सर्वांनाच माहिती आहे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी आणि मॉईस्चराईज करण्यासाठी याचा केसांमध्ये चांगला उपयोग होतो. कोरडे आणि हानीकारक केसांना पुन्हा चांगलं बनवण्यासाठी या तेलाचा चांगला उपयोग होतो.
8) केसांच्या वाढीसाठी फ्लॅक्स्ड ऑईल
काय गरेजेचं आहे
- 1 चमचा फ्लॅक्स्ड ऑईल
- 2 चमचे नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल
तुम्ही काय करायला हवं?
- दोन्ही तेल मिक्स करून घ्या आणि व्यवस्थित ब्लेंड करून केसांना लावा
- रात्रभर तसंच राहू द्या
- दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका
किती वेळा करू शकता?
चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा या तेलाचा वापर करू शकता
याचा उपयोग कसा होतो?
फॅटी अॅसिडचा फ्लॅक्सच्या बी हा चांगला स्रोत आहे. कोरडे केस मऊ आणि मुलायम करण्यामध्ये या तेलाचा चांगला हातभार लागतो. निरोगी केसांसाठी यामध्ये असलेलं ओमेगा – 3 फॅटी अॅसिड मदत करतं.
9) केसांच्या वाढीसाठी ऑलिव्ह ऑईल
काय गरेजेचं आहे
- नुसतं ऑलिव्ह ऑईल
- टॉवेल
- गरम पाणी
तुम्ही काय करायला हवं?
- तेल गरम करून घ्या आणि त्या तेलाने केसाला मुळापासून मसाज करा
- गरम पाण्यात टॉवेल भिजवून घ्या आणि त्यातील जादा पाणी काढून टाका
- हा भिजलेला टॉवेल तुमच्या केसांभोवती लपेटून घ्या आणि साधारण 15-20 मिनिट्स ठेवा
- त्यानंतर नेहमीप्रमाणे केस धुऊन टाका
किती वेळा करू शकता?
हा गरम टॉवेलचा प्रयोग तुम्ही चार ते पाच दिवसांनी एकदा नक्की करा
याचा उपयोग कसा होतो?
केसगळती तशीच केसांची काळजी घेण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा चांगला उपयोग होतो. केसांची नवी वाढ होण्यास यामुळे मदत होते. तुमच्या डीटीएच हार्मोनची काळजी आणि केसांच्या वाढीसाठी हे ऑलिव्ह ऑईल उपयुक्त आहे. तुमचे केस मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी याची मदत होते. या तेलामध्ये असणारं अँटीऑक्सिडंट हे तुमच्या केसांची वाढ होण्यासाठी उत्कृष्ट आहे.
10) केसांच्या वाढीसाठी कॅस्टर ऑईल
काय गरेजेचं आहे
- कॅस्टर ऑईल
- गरम टॉवेल
तुम्ही काय करायला हवं?
- कॅस्टर ऑईल गरम करून घ्या
- केसांच्या मुळापासून लाऊन नीट मसाज करा
- साधारण 20 मिनिट्ससाठी कोमट टॉवेल तुम्ही तुमच्या केसांना गुंडाळून ठेवा
- हे तेल अतिशय तेलकट असल्यामुळे तुम्ही त्यामध्ये लिंबाचा रसही घालू शकता. यामुळे तुम्हाला कोंड्याचा त्रास असल्यास, तोदेखील कमी होऊ शकतो.
किती वेळा करू शकता?
चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता
याचा उपयोग कसा होतो?
तुमचे केस लवकर वाढावे, घनदाट आणि सुंदर व्हावे यासाठी कॅस्टर ऑईलसारखा दुसरा पर्याय नाही. केसांच्या वाढीसाठी हा उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे. तुम्हाला टक्कल पडत असेल तर या तेलाचा वापर करा. तुमच्या केसाला हे चांगलं मॉईस्चराईज करतं आणि केसांना फाटे फुटत असतील तर त्यावरही याचा चांगला उपयोग होतो.
11) केसांच्या वाढीसाठी बदाम तेल
काय गरेजेचं आहे
- बदाम तेल
तुम्ही काय करायला हवं?
- बदामाच्या तेलाने केसांना मुळापासून चांगला मसाज करून घ्या
- रात्रभर हे तेल लाऊन ठेऊन द्या आणि सकाळी केस धुवा
किती वेळा करू शकता?
बदामाचं तेल आठवड्यातून दोन वेळा वापरा
याचा उपयोग कसा होतो?
केस आणि मुळांमधील समतोल बदामाचं तेल राखतं. तसंच तुमच्या केसांमध्ये येत असलेली खाज, कोरडेपणा या गोष्टी कमी करण्यास बदामाचा उपयोग होतो. तुमच्या केसांना मजबूती देण्याचं कामही हे तेल करतं. शिवाय केस चमकदार करण्यासाठी याची मदत होते.
केस वाढवण्यासाठी शँपू | Shampoo For Hair Growth In Marathi
केसांची काळजी घेण्यासाठी शँपूदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या केसांसाठी नक्की कोणता शँपू वापरायला हवा याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
Aroma Magic Triphla Shampoo
अरोमा मॅजिक त्रिफला शँपूमध्ये तीन वनस्पती असून या पोषक आहेत. या वनस्पतींचा सर्वात जास्त उपयोग घरगुती उपचारांसाठी केला जातो. यामुळे तुमच्या मुळापासून साफ करतात आणि तुमच्या केसांना चांगलं पोषण देऊन मजबूती मिळते. तुमचे केस जर तेलकट असतील आणि दर दोन दिवसांनी जर तुमच्या केसांमध्ये तेल जमा होत असेल तर, तुम्ही हा शँपू नक्की वापरा. तेलकट केसांसाठी हा शँपू खूप चांगलं काम करतो. तुमचे केस जर कोरडे असतील तर, हा शँपू वापरू नका कारण यातील शिकाकाई कोरड्या केसांसाठी अजून वाईट ठरू शकते. त्यामुळे या शँपूमुळे केस अजून कोरडे होण्याची शक्यता असते.
VLCC Natural Sciences Soya Protein Conditioning Shampoo
केसांच्या पोषणासाठी तुम्हाला प्रोटीन आणि विटामिनची सर्वात जास्त आवश्यकता असते. प्रोटीन आणि विटामिनच्या भरपूर मात्रेमुळे हा शँपू केसांना लवकर वाढ देण्यास मदत होते. सोया प्रोटीनचा आर्क आणि बदामाच्या तेलाने समृद्ध असल्याने केसांच्या मुळापर्यंत जाऊन हा शँपू काम करतो. यामध्ये हळद असून अँटीबॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक दोन्ही असते. यामुळे हळूहळू केसांतील घाण साफ होते, कोंडाही होत नाही आणि केसांचे मूळ मजबूत होते. याचं वैशिष्ट्य असं आहे की, हा शँपू तेलकट आणि कोरडे अशा दोन्ही केसांसाठी उपयोगी आहे.
Biotique Bio Kelp Fresh Growth Protein Shampoo
तुमचे केस गळण्याची बरीच कारणं असू शकतात. स्कॅल्प इन्फेक्शन, कोरडेपणा, कोंडा इत्यादी कारणं आहेत. तुमचे केसदेखील यापैकी कोणत्याही समस्येचे शिकार असतील तर हा बायोटिकचा प्रोटीन शँपू नक्की वापरून पाहा. यामध्ये लिंबू आणि आवळ्याचे भरपूर गुण आहेत. तुमच्या केसातील घाण साफ हा शँपू करतो आणि तुमचे केस अधिक पोषक बनवण्यसाठी मदत होते. बायोटिकची उत्पादनं ही नैसर्गिक असून केमिकलमुक्त असतात. जी त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे या ब्रँडच्या विश्वासनीयतेबाबत तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. तेलकट आणि कोरड्या दोन्ही केसांसाठी हे उपयुक्त आहेत.
केस वाढवण्यासाठी आवश्यक आहार | Food For Hair Growth In Marathi
केसांच्या वाढीसाठी इतर गोष्टींप्रमाणे योग्य आणि पोषक आहारही आवश्यक आहे. त्यासाठी नक्की काय काय करायला हवे ते जाणून घेऊया.
1. ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे केस आणि त्वचेला पोषण देण्याचं काम करत असतं. यामुळे केसांच्या वाढीवरही परिणाम होत असतो. त्यामुळे ओमेगा 3 जास्त असणारे पदार्थ खायला सुरुवात करायला हवी. तुम्हाला हवं तर डाएटमध्ये मच्छी, अक्रोड आणि दुधी यासारख्या पदार्थांचा समावेश करा. या पदार्थांमध्ये ओमेगा 3 चं प्रमाण जास्त असते.
2. प्रोटीनमुळे केवळ केसांचा विकासच होत नाही तर प्रोटीन केसांना पोषकही असतो. अशामध्ये लांबसडक केस हवे असल्यास, आजपासूनच अंडे, चिकन, मच्छी, डाळी, दूध आणि यापासून बनलेले पदार्थ खायला सुरुवात करा. या सर्व पदार्थांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे केसांची वाढ लवकर होते.
3. केस वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये व्हिटामिन सी चं प्रमाण वाढवा. तुमच्या डाएटमध्ये संत्रे, ब्रोकोली, आवळा आणि अन्य फळांचं प्रमाण वाढवा आणि तुमच्या केसांना लागणाऱ्या आवश्यकता पूर्ण करा.
4. शरीरात आयर्नचं प्रमाण कमी असल्यास, जास्त प्रमाणात केसगळती होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या फळभाज्या खा.
5. रोज गाजराचं ज्युस प्यायल्यास, केस लवकर वाढतात. हे केसांच्या त्वचेवर नैसर्गिक तेल राखून ठेवण्यास मदत करतं आणि त्यामुळे केस मजबूत होतात आणि लवकर वाढतात.
6. अव्हाकॅडो विटामिन ई साठी सर्वात चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये याचा सलाड म्हणून वापर करू शकता.
केस वाढवण्यासाठी प्रश्न – उत्तर / FAQ’s
1. केस वाढवण्यासाठी सर्वात आवश्यक विटामिन कोणते आहेत?
केसांना स्वस्थ आणि सुंदर ठेवण्यासाठी विटामिन ए, बी, सी, डी, ई, बी कॉम्प्लेक्स याची गरज असते.
2. केस वाढण्यासाठी आयोडिनचा कशा प्रकारे उपयोग होतो?
आयोडिन म्हटलं की, सर्वात पहिले मनात येतं ते मीठ. पण तुम्हाला माहीत आहे का आयोडिन हे केसांसाठीदेखील फायदेशीर असतं. आयोडिनमध्ये झिंक, आयर्न आणि मॅग्नेशियमचं प्रमाण असतं. याचा उपयोग केवळ केसांची वाढ होण्यासाठीच नाही तर केसांच्या मजबूतीसाठीदेखील होतो. आयोडिनमध्ये अँटीबॅक्टेरिया, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुण असतात जे कोणत्याही संक्रमणाशी दोन हात करू शकतात. यामुळे केसगळती थांबते. तुमच्या केसांचा मुळापासून यामुळे पोषण होतं. आयोडिन केसांचा कोरडेपणा, केसगळती आणि वेळेपूर्वी केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका देते. तसंच मुळापासून केसांना यामुळे मजबूती मिळते आणि केस दाट आणि घनघोर बनविण्यासाठी मदत होते.