ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
दिवाळीत या कारणासाठी करायला हवे दीपदान

का आहे दिवाळीत दीपदानाचे महत्व

हिंदू धर्मात अशा अनेक संकल्पना आहेत. ज्याचा काही गोष्टींशी खूपच जवळचा संबंध असतो. प्रत्येक सणांचे जसे महत्व आहे तसेच ते साजरे करण्याच्या पद्धतीमध्येही नक्कीच काही शास्त्र दडलेले आहे. दिवाळी आता अगदी काहीच दिवसांवर आलेली आहे. या दिवाळीत दीपदान करण्याची पद्धत आहे. दीपदान म्हणजेच आपण दिवाळीत दारोदारी दिवे लावतो. यालाच ‘दीपदान’ असे म्हटले जाते. दीपदान म्हणजे प्रत्यक्ष दान असे होत नाही. दीपदान म्हणजे दिवे लावणे. पण दिवाळीत खास दीपदान का केले जाते यामागेही काही कारणं आहेत जी जाणून घेणे फारच गरजेचे आहे. दिवाळीच्या शुभेच्छा पाठवून दिवाळीचा आनंद साजरा करा. या शिवाय दिवाळीची माहिती इत्यंभूत जाणून घ्या

या दिवशी करावे दीपदान

Instagram

दिवाळीत  दीपदान करण्याची पद्धत आहे. दिवाळीत नरक चतुर्दशी आणि यम द्वितीयेच्या दिवशी दीपदान करण्याची पद्धत आहे. दिवाळीमध्ये अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी दीपदान केले जाते. या शिवाय दिवाळीच्या पाचही दिवस दीपदान केले जाते.असे म्हणतात की दिवाळीत दीपदान केल्यामुळे तुमच्या सगळ्या मनोकामना या पूर्ण होतात.

दीपदान करण्याचे कारण 2

मनोकामना पूर्ण करण्यासाठी दीपदान करा असे सांगितले असले तरी दीपदान करण्यामागे आणखी एक  कारण सांगितले जाते. पुराणातील एका कथेनुसार अकाल मृत्यू येऊ नये यासाठी दिवाळीतील यम द्वितीयेच्या दिवशी दाराबाहेर दिवा लावणे फारच जास्त गरजेचे असते. यमराजासंदर्भातील एक कथा सांगितली जाते ती अशी की, एकदा यमराजाने एक कथा सांगितली. एक हंस नावाचा राजा शिकार करत असताना दुसऱ्या राज्याच्या सीमेत जाऊन पोहोचला. दुसऱ्या राज्याच्या राजाने हंस राजाचे स्वागत करत त्याचे आदरातिथ्य केले. त्याचदिवशी हेमराजाला पुत्र झाला. षष्ठीच्या दिवशी सटवाईने येऊन त्याचे भविष्य सांगितले, राजाच्या पुत्राचा सोळाव्या मृत्यू होईल… म्हणजेच लग्नाच्या चौथ्यादिवशी तो मरेल. हे ऐकून राजा व्याकूळ झाला त्याने आपल्या पुत्राला मृत्यू येऊ नये म्हणून एका गुहेत लपवून ठेवलं. विधीवत सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळे राजपुत्राचा वयाच्या सोळाव्या वर्षी हंस राजाच्या मुलीशी विवाह झाला. त्याचे प्राण घेण्यासाठी यमराज तिथे गेले. लग्नाच्या चौथ्या दिवशी त्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यावेळी एवढ्या आनंदाच्या दिवशी अनर्थ कोसळलेला पाहून यमराजालाही दु:ख झाले. असा प्रसंग कोणावरही येऊ नये म्हणून त्यांनी धनत्रयोदशीपासून पाच दिवस जो दीपदान करेल  त्याला अपमृत्यू येणार नाही. असे सांगितले म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी येणारे लक्ष्मीपूजन विधी ही जाणून घेऊन त्या पद्धतीने पूजा करा

असे करावे दीपदान

हल्ली फॅन्सी दिवे मिळत असले तरी देखील दिवाळीत मिळणारे मातीचे दिवे हेच सगळ्यात उत्तम आणि पारंपरिक मानले जातात. बाजारात मिळणारे खास मातीचे दिवे घेऊन त्यामध्ये तेलाचे दिवे तयार करावे. असे दिवे घराबाहेर अंगणात किंवा एखाद्या जवळच्या मंदिरात जाऊन दिवे प्रज्वलित करावे आणि आपल्या मनोकामना मागाव्यात. असे म्हणतात मनोभावे केलेले दीपदान हे नक्कीच फायद्याचे असते. 

ADVERTISEMENT

आता या दिवाळीत नक्की करा दीपदान आणि इतरांनाही द्या याची माहिती

अधिक वाचा

Lakshmi Puja Wishes In Marathi 2021 | लक्ष्मीपूजा शुभेच्छा मराठी

50+ Dhantrayodashi Wishes, Quotes And Messages In Marathi | धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

दिवाळीसाठी बनवा खवा पासून बनणारे पदार्थ | Khava Recipe In Marathi

28 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT