ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
खीर रेसिपी मराठी

तांदळाची खीर आणि इतर खीर रेसिपी मराठी | Kheer Recipe In Marathi

सणासुदीच्या दिवशी प्रत्येक घरात गोडाधोडाचा बेत असतो. घरी गोड बनवण्यासाठी खास जातीबांधवाचा सण असावा लागत नाही. उदा. महाराष्ट्रात पाडव्याच्या दिवशी खीर बनवली जाते. ईदच्या दिवसात मुस्लिम बांधवांच्या घरी शीरकुर्मा आणि खीरीचा बेत असतो. दक्षिणेकडील सणांच्या वेळी पायसम बनवले जाते. वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या पद्धतीच्या खीर बनवण्याल्या जातात . पूर्णान्न म्हणून मानले जाणारे दूध या दूधाला गोडवा देत त्याची चव अधिक वाढवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी घातल्या जातात. त्यामुळे त्याचा गोडवा अधिकच लागतो. एखाद्या पदार्थाचा शोध कसा लागला किंवा इतिहासात त्याची काही नोंद आहे का? असे तुम्हाला देखील जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर खीरीचा शोध हा फार फार वर्षांपूर्वीचा आहे. 

अनेक संस्कृत आणि जैन धर्माच्या ग्रंथात याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.  संस्कृतमधील क्षीर अर्थात दूध या शब्दाचा अपभ्रंश होत याला खीर असे नाव पडले आहे. खीरीची नोंद ही अनेक जुन्या खान-पानांच्या उल्लेखात दिसून येते. त्यामुळे खीर हा आताचा असा पदार्थ नाही. तर फार पूर्वीपासूनचा आहे. खीरीचे वेगवेगळे प्रकार सध्या आपण खातो. यात तांदळाची खीर, शेवयाची खीर, बदामाची खीर अशा अनेक खीर रेसिपी यांचा समावेश होतो. चला जाणून घेऊया अशाच काही खीर रेसिपी मराठीतून. कडक मसाला चाय घरी बनवायची असेल तर जाणून घ्या रेसिपी

तांदळाची खीर रेसिपी मराठी – Rice Kheer Recipe In Marathi

tandalachi kheer recipe in marathi
तांदळाची खीर

तांदळाची खीर ही सगळ्यात झटपट होणारी अशी खीर आहे. अनेक ठिकाणी तांदळाची खीर अगदी हमखास बनवली जाते. ही खीर घरी नक्की बनवून पाहा. 

साहित्य:  2 कप आंबेमोहेर किंवा सुगंधी तांदूळ, ½ लीटर दूध, साखर(चवीनुसार), केशर, बदाम, काजू, पिस्ता

कृती:

ADVERTISEMENT
  • तांदळाची खीर म्हटल्यावर तांदूळ हा यामध्ये फारच महत्वाचा असा भाग आहे. यासाठी चांगल्या सुंगधाचा तांदूळ निवडणे कधीही चांगले. तांदूळ घेऊन ते जरा जाडसर मिक्सरमध्ये भरडा.
  • गॅसवर दूध उकळण्यासाठी ठेवा. दूधाला दोन उकळी आल्या की, त्यामध्ये वाटलेल्या तांदूळाची पूड घाला. चांगली व्यवस्थित ढवळून घ्या.
  • गॅस मंद करुन तांदूळाला  दूध शोषून घ्यायला आणि शिजायला थोडा वेळ द्या. खीर जाड झाली की. त्यातील तांदूळाची पूड फुललेली दिसेल. ती चेपून शिजली असेल तर त्यामध्ये साखर, बदाम, काजू, पिस्ता, केशराच्या काड्या घाला चांगले ढवळून घ्या. मस्त तांदुळाची खीर तयार

शेवयाची खीर रेसिपी मराठी – Shevayachi Kheer Recipe In Marathi

shevayachi kheer recipe in marathi
शेवयाची खीर रेसिपी मराठी – shevayachi kheer recipe in marathi

शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi) ही देखील खूपच टेस्टी आणि यमी लागते. बाजारात विविध फ्लेवर्सच्या शेवया मिळतात. त्यापासून ही झटपट खीर बनवता येते.या शिवाय मुलांसाठी पौष्टिक लाडू रेसिपी देखील तुम्ही बनवू शकता.

साहित्य: रेडीमेड खीर शेव, दूध, साखर, ड्रायफ्रुट्स, तूप

कृती: 

  • एका भांड्यात तूप घेऊन त्यामध्ये खीरीचा शेव घालून चांगला परतून घ्या. कुरकुरीत परता.
  • दुसऱ्या बाजूला दूध गरम करायला ठेवून त्यामध्ये साखर घालून दूध आटवून घ्या.
  • दूध आटले की, त्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि शेवया घालून ते चांगले उकळून घ्या.
  • सोपी आणि मस्त गोड शेवयाची खीर तयार.

साबुदाणा खीर रेसिपी मराठी

sabudana kheer recipe in marathi
साबुदाणा खीर रेसिपी मराठी

साबुदाण्याची खिचडी खायला आवडत असेल तर तुम्हाला साबुदाण्याची खीर ही देखील तुम्ही ट्राय करायला हवी. ही खीर उपवासाला देखील चालू शकते.

ADVERTISEMENT

साहित्य: एक वाटी भिजवलेले साबुदाणे, ½ लीटर दूध, ड्रायफ्रुट्स, साखर, सजावटीसाठी
पिस्त्याचे काप

कृती:

  • एका भांड्यात दूध उकळायला ठेवा. दूध चांगले उकळले की, त्यामध्ये भिजवलेले साबुदाणे घाला.
  • साखर घालून साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत शिजवा.
  • त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून चांगली उकळ काढा.
  • ही खीर थंड करुन अधिक चांगली लागते.
  • रुम टेंपरेचरवर आल्यावर ही खीर फ्रिजमध्ये ठेवा. 

बदाम खीर रेसिपी मराठी

kheer recipe in marathi
बदाम खीर रेसिपी

तुम्हाला काहीतरी रॉयल असे खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही बदामाची खीर देखील नक्की ट्राय करा. ही खीर एकदम छान जाड असते. त्यामुळे ती खाताना त्याचा आनंद घेता येतो.  वेगळे काहीतरी खायचे असेल तर बालुशाही रेसिपी देखील नक्की ट्राय करा

साहित्य: सालं काढून केलेली बदामाची पूड, खवा, फुल क्रिम मिल्क, साखर (चवीनुसार),वेलची पूड

ADVERTISEMENT

कृती:

  • बाजारात बदामाची पावडर मिळते. ती थेट वापरता येते. पण जर तुम्हाला घरी बदामाची पूड करायची असेल तर त्याची सालं काढून पूड करा. साल काढणं शक्य नसेल तर बदाम भिजवून मग त्याची सालं काढून त्याची पेस्ट करुन घ्या. 
  • एका पातेल्यात दूध गरम करुन त्यात खवा, साखर (आवश्यकतेनुसार) सगळे चांगले विरघळू द्या. एक उकळी आली की, मग त्यामध्ये बदामाची पूड घाला. ती चांगली जाड होईल.त्यावर शेवटी वेलची पूड घाला.  ही खीर गरम खाऊ नका. मस्त थंड करुन खा. त्याची चव अधिक लागेल.

गव्हाची खीर रेसिपी मराठी

gavhachi kheer recipe in marathi
गव्हाची खीर

काहीतरी गोड आणि पौष्टिक असे खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही गव्हाची खीर देखील करु शकता.  या शिवाय या सीझनमध्ये थंडगार मँगो लस्सी देखील करुन पिऊ शकता.

साहित्य:1 वाटी खपली गहू, तूप, बदामाचे काप, ड्रायफ्रुट्सचे काप, गुळ, दूध, वेलदोड्याची पूड 

कृती:

ADVERTISEMENT
  • गव्हाची खीर ही चांगली फायबरयुक्त असते. त्यामुळे ही अगदी कोणीही खाऊ शकते. हे गहू शिजवावे लागतात. कुकरच्या भांड्यांमध्ये भिजवलेले गहू घेऊन ते चांगले शिजवून घ्या. साधारण 10-12 शिट्टया काढा.
  • गव्हाचा कुकर थंड झाला की, मिक्सरमध्ये त्याची भरड काढून घ्या.
  • आता एका पॅनमध्ये तूप गरम करुन त्यामध्ये ड्रायफ्रुट्सचे काप भाजून घ्या. त्यामध्ये गहू घेऊन ते भाजून घ्या. त्यात गुळ घालून गुळ चांगला एकजीव होऊ द्या. आता सगळ्यात शेवटी त्यात दूध घालून त्याला उकळ्या येऊ द्या. ही खीर थोडी जाड होते. याची चव खूपच मस्त लागते. त्यामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पूड घाला.  लापसी आवडत असेल तर त्याची चव साधारण अशीच असते.

रवा खीर रेसिपी मराठी

rava kheer recipe in marathi
रवा खीर रेसिपी मराठी

 रव्यापासूनही तुम्हाला झटपट अशी खीर करता येते. रवा हा सगळ्यांकडेच घरी उपलब्ध असते.

साहित्य: 1 वाटी रवा, 2 मोठे चमचे तूप, ड्रायफ्रुट्स, फुल क्रिम दूध वेलची पूड

कृती:

  •  एका खोलगट पॅनमध्ये तूप गरम करा. त्यामध्ये रवा चांगला भाजून घ्या. त्यात दूध घाला.
  • खीरसाठी थोडे जास्त दूध लागेल. त्यामुळे थोडे जास्त दूध घाला. त्यात आवडीचे ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड घाला.
  • तुमची रव्याची खीर मस्त तयार 

दुधीची खीर रेसिपी मराठी

kheer recipe in marathi
दुधीची खीर रेसिपी मराठी

दुधीची खीर तुम्ही कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर एकदा तुम्ही नक्की दुधीची खीर करुन बघा. मुलांसाठी झटपट स्नॅक्स रेसिपी नक्की ट्राय करा

ADVERTISEMENT

साहित्य:एक वाटी किसलेला दुधी, दूध, ड्रायफ्रुट्सचे काप, वेलची पूड, तूप, खवा

कृती:

  • एका पॅनमध्ये तूप गरम करुन त्यामध्ये किसलेला दुधी घाला.
  • दूधी किसल्यानंतर त्याचे पाणी काढून टाका. म्हणजे तूपात टाकल्यानंतर त्याचा आवाज येणार नाही.
  • दुधी चांगला परतल्यानंतर त्यामध्ये खवा घाला. तो परता.
  • त्यात उकळलेले दूध, साखर घाला. सगळ्यात शेवटी वेलची पूड घालून ही दुधीची खीर मस्त सर्व्ह करा.

पायसम

paysam recipe in marathi
पायसम

साऊथ इंडियन असा हा खीरीचा प्रकार खूप ठिकाणी केला जातो. पायसम हा प्रकार खास समारंभासाठी केला जातो. पायसम खीर ही फार पातळ आणि फार जाड नसते. पण ती फारच टेस्टी असते.

साहित्य: फुल फॅट मिल्क, साखर किंवा गुळ, ड्रायफ्रुट्स, भाजलेल्या शेवया, केशराच्या काड्या, वेलची पूड

ADVERTISEMENT

कृती:

  • पायसम बनवणे फारच सोपे आहे. पायसम बनवण्यासाठी सगळ्यात आधी दूध गरम करायला घ्या.
  • त्यामध्ये भाजलेल्या शेवया घालून त्या चांगल्या शिजवून घ्या.
  • त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घाला. वरुन वेलची पूड आणि केशराच्या काड्या घालून खीर सर्व्ह करा. 

छेना खीर रेसिपी मराठी

छेना खीर रेसिपी मराठी - kheer recipe in marathi
छेना खीर रेसिपी मराठी

फ्रेश पनीर पासून जी खीर बनवली जाते त्याला छेना खीर असे म्हणतात. ही अत्यंत चविष्ट लागते. ही खीर पोटभरीची असून एकदा तरी ही खीर खायला हवी. 

साहित्य:  तुम्हाला जर फ्रेश पनीर मिळाले तर चांगलीच गोष्ट, फुल क्रिम मिल्क 2 लीटर, सायट्रिक ॲसिड, साखर, ड्रायफ्रुट्स

कृती: 

ADVERTISEMENT
  •  एका भांड्यामध्ये दुध तापवायला ठेवा. त्यामध्ये सायट्रिक ॲसिड घालून ते दूध फाडून घ्या. त्याचे पनीर काढून घ्या.
  • दुसऱ्या एका पातेल्यात दूध गरम करुन त्यामध्ये हे फाडलेले दूध घाला. त्यात साखर आणि ड्रायफ्रुट घालून ते चांगले उकळून घ्या.
  • तुमची छेना खीर तयार.

डाळींची खीर रेसिपी मराठी

डाळींची खीर रेसिपी मराठी
डाळींची खीर रेसिपी मराठी

मुगाच्या डाळीची खीर ही देखील खूपच चविष्ट लागते. मुगाच्या डाळीचे कढण देखील याला अनेक ठिकाणी म्हणतात. कढण असेल तर त्यामध्ये दूध घातले जात नाही. जर तुम्हाला दूध घालायचे असेल तर तु्म्ही त्यामध्ये दूध घालू शकता. 

साहित्य:  मुग डाळ, गूळ, दूध, वेलची पूड, तूप

कृती:

  • सगळ्यात आधी मूग डाळ चांगली भाजून घ्या. तूपात ती खरपूस भाजली की, नंतर त्यामध्ये गूळ घालून गुळासोबत डाळ शिजवा.
  • डाळ चांगली बोट चेपी शिजायला हवी.त्यानंतर त्यामध्ये दूध घालून ते चांगले उकळून घ्या.
  • ही खीर थोडी जाड असायला हवी. तरच त्याची चव लागते. यामध्ये थोडे वरुन तूप घातले तर ती अधिक चांगली लागते.

FAQs

प्रश्न: फाटलेल्या दूधापासून खीर करता येते का?
उत्तर : नाही, फाटलेल्या दूधापासून तुम्हाला कलाकंद बनवता येतो. किंवा तयार पनीर तुम्हाला खीरीत घालता येतो. पण त्यापासून खीर अजिबात बनवता येत नाही. 

ADVERTISEMENT

प्रश्न : खीर थंड अधिक चांगली लागते का? 
उत्तर: खीर खाण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. काही जण नुसती खीर खात नाही तर त्यासोबत पुरी खातात. काही जण केवळ स्वीट डिश म्हणून खीर खातात. त्यामुळे प्रत्येकाची स्वतंत्र आवड ही खीर खाण्याच्या बाबतीत असू शकते.

प्रश्न:  खीरीत कॅलरीज किती असतात?
उत्तर: खीर हा खूप गोड असा पदार्थ आहे यामध्ये बऱ्याच कॅलरीज असतात. या कॅलरीज वजन वाढवू शकतात. त्यामुळे खीर ही रोज खाता कामा नये. खीर ही काही खास कार्यक्रमांसाठी खाल्ले तर तुमचे वजन नियंत्रणात राहील. 

आज आम्ही तुमच्यासोबत तांदळाची खीर, खीर रेसिपी, शेवयाची खीर रेसिपी मराठी, साबुदाणा खीर रेसिपी मराठी, खीर रेसिपी मराठी, रवा खीर रेसिपी मराठी, गव्हाची खीर रेसिपी मराठी, रव्याची खीर मराठी रेसिपी, बादाम खीर रेसिपी मराठी शेअर केली आहे. आता या वेगवेगळ्या पद्धतीच्या खीर रेसिपी (kheer recipe in marathi) तुम्ही नक्की बनवा आणि तुमचा दिवस गोड करा.

11 May 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT