आय मेकअप (Eye Makeup) म्हटल्यानंतर सर्वात कठीण काम वाटतं ते म्हणजे आयलायनर (Eyeliner) आणि मस्कारा (Mascara) डोळ्यांना लावणं. तुम्ही जर पहिल्यांदाच मस्कारा लावणार असाल तर तुमच्या पापण्यांना मस्कारा लावणं हे नक्कीच तुमच्यासाठी एक मोठा टास्क ठरू शकते. मस्काराचे नक्की काम काय तर, तुमच्या पापण्या अधिक भरलेल्या आणि सुंदर दाखवणे. यामुळे तुमच्या पापण्यांना सुंदर आकार मिळतो, कर्ल देता येतात आणि त्यामुळे तुमचे डोळे अधिक सुंदर दिसतात. पण तुम्हाला मस्कारा लावता येत नसेल अथवा मस्कारा लावल्यानंतर स्मज होत असेल आणि मग डोळे खराब दिसत असतील तर काही सोप्या पद्धती आणि मेकअप ट्रिक्स आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत. या लेखातून मस्कारा लावण्यासाठी अगदी स्टेप बाय स्टेप आम्ही तुम्हाला सांगत आहोत. अशा पद्धतीने मस्कारा लावल्यास तुम्हाला नक्की योग्य लुक मिळवता येईल.
स्टेप 1 – पापण्यांवर कोणताही मेकअप लाऊ नये
सर्वात पहिले तुमच्या पापण्या स्वच्छ आहेत याची खात्री करून घ्या. या पापण्यांवर कोणत्याही स्वरूपाचा मेकअप लागला नसेल तर त्यामुळे पापण्या क्लंप होणार नाहीत. यानंतर कर्लरच्या मदतीने तुम्ही तुमच्या पापण्या कर्ल करून घ्या. असं करताना लक्षात ठेवा की, तुम्ही डोळ्यांना जास्त ताकद लाऊ नका. तुम्हाला कर्लर वापरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या बोटांनीदेखील तुमच्या पापण्या कर्ल करू शकता.
स्टेप 2 – असा लावा मस्कारा
मस्कारा लावण्यापूर्वी तुम्ही अधिक लागलेला मस्कारा हा ट्यूबवरच स्वच्छ करून घ्या. आता एकदम समोर बघा आणि मस्कारा तुमच्या पापण्यांना मधून लावायला सुरूवात करा. अॅप्लिकेटर तुम्ही आयलॅशच्या खालच्या भागाकडून वरच्या भागाकडे अशा स्वरूपात लावा. जेणेकरून सगळ्या बाजूने मस्कारा व्यवस्थित लागू शकतो.
स्टेप 3 – कॉर्नरला लावा अशा पद्धतीने मस्कारा
डोळ्यांच्या कोपऱ्यात अर्थात कॉर्नरला मस्कारा लावणे हा सर्वात कठीण भाग आहे. कारण तुम्ही मधल्या भागात सोप्या पद्धतीने मस्कारा लाऊन घेऊ शकता, पण कोपऱ्यात मस्काराला लावणे थोडे कठीण असते. त्यासाठी तुम्ही अॅप्लिकेटरचा वापर पूर्ण करण्यापेक्षा कॉर्नरला आपल्या आयलॅशेसना मस्कारा लावा.
स्टेप 4 – खालच्या आयलॅशना असा लावा मस्कारा
आपल्यापैकी अधिकांश महिला या केवळ वरच्या पापण्यांनाच मस्कारा लावतात. तुम्ही जोपर्यंत खालच्या पापण्यांना मस्कारा लावणार नाही तोपर्यंत तुमचा लुक पूर्ण होत नाही. खालच्या बाजूच्या पापण्यांना मस्कारा लावण्यापूर्वी तुम्ही पहिले टिश्यू पेपर डोळ्यांखाली नीट सेट करून घ्या. त्यानंतर अॅप्लिकेटरच्या मदतीने तुम्ही मधल्या भागापासून सुरूवात करा आणि मग कॉर्नरला मस्कारा लावा.
स्टेप 5 – डबल कोट लावा
तुम्हाला काय वाटलं मस्कारा लावण्याच्या स्टेप्स संपल्या? नाही अजिबात नाही. तुमच्या डोळ्यांवर मस्कारा दिसायला हवा असेल तर तुम्हाला अजून एक कोट लावायला हवा. लक्षात ठेवा की, मस्कारा डबल कोट (Double Quote Mascara) नक्की लावा, कारण यामुळे डोळे मोठे दिसण्यास मदत मिळते. वरच्याप्रमाणेच सर्व स्टेप्स वापरून तुम्ही डबल कोट मस्कारा लावा.
स्टेप 6 – स्पुलीने करा ब्रश
सर्वात शेवटची स्टेप म्हणजे तुम्ही एका स्वच्छ स्पुलीने आपल्या पापण्यांना ब्रश करून घ्या. असं का करायचं असा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर यामुळे तुमच्या पापण्या क्लंप होण्यापासून वाचतात. तसंच तुमच्या पापण्यांना अधिक मस्कारा लागला असेल तर तोदेखील निघून जातो. तुमचा फायनल लुक आता यानंतर तयार आहे. डोळ्यांची सुंदरता वाढविण्यासाठी तुम्ही मस्कारा लावण्याच्या या स्टेप्स नक्की वापरून पाहा.
या गोष्टींकडे द्या लक्ष
- मस्कारा लावल्यानंतर काही महिला पापण्या कर्ल करतात. असे अजिबात करू नका. यामुळे पापण्या तुटतात
- तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वस्तू दुसऱ्या व्यक्तींच्या वापरत नाही त्याप्रमाणेच मेकअप उत्पादनांचाही वापर करू नका. विशेषतः मस्कारा, काजळ आणि आयलायनरसारख्या उत्पादनांचा तर अजिबातच नाही. यामुळे तुम्हाला अलर्जी होऊ शकते
- तुम्ही जेव्हा कुठून बाहेरून येता, तेव्हा पापण्यांवरून मस्कारा काढायला विसरू नका. मस्कारा जास्त वेळ पापण्यांना राहिला तर पापण्या तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो
- याशिवाय एक्सपायर झालेले कोणतेही उत्पादन वापरू नका. डोळे हा अतिशय संवेदनशील भाग आहे. त्यामुळे अलर्जी होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे
या स्टेप्स तुम्ही वापरल्या तर मस्कारा लावणे अजिबात कठीण नाही. तुम्हाला योग्य टेक्निक जाणून घेण्याची गरज आहे. तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी नक्की याचा उपयोग करून पाहा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक