ADVERTISEMENT
home / Natural Care
चेहऱ्याला सतत मसाज करत असाल तर आताच थांबवा कारण…

चेहऱ्याला सतत मसाज करत असाल तर आताच थांबवा कारण…

मसाज आवडत नाही अशा व्यक्ती या पृथ्वीवर फारच कमी असतील. शरीराला रिलॅक्स कराणारा मसाज महिन्यातून एकदा तरी करावा असे सगळेच सांगतात. शरीरापेक्षाही तुमच्या चेहऱ्यासाठी मसाज हा आवश्यक असतो. महिन्यातून एकदा फेशिअल किंवा मसाज करणे चेहऱ्यासाठी चांगले असते. पण जर तुम्ही चेहरा चांगला राहावा म्हणून सतत मसाज करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा वेळ मिळेल तेव्हा मसाज करत असाल तर तुम्हाला असे करणे कशा पद्धतीने हानिकारक ठरु शकते ते देखील जाणून घेऊया.

त्वचा टोन्ड करण्याचे काम करतात हे फेस मसाजर, नक्की वापरुन पाहा

पिंपल्स येणे

मसाज केल्यामुळे तुमच्या रक्ताचा पुरवठा सुरळीत होतो. असे असताना मसाज केल्यामुळे पिंपल्स कसे काय येऊ शकतात असा प्रश्न पडणे अगदी साहजिक आहे. कारण तुम्ही जर सतत मसाज करत असाल तर  मसाज करताना तुमची त्वचा गरम होते. जर ती अधिक गरम झाली की, तुमच्या त्वचेची छिद्र मोकळी होतात. ती मसाज नंतर बंद केली नाही तर त्यामध्ये घाण एखादी क्रिम आत जाण्याची शक्यता असते. क्रिम त्वचेच्या आत गेल्यामुळे त्याची रिअॅक्श म्हणून तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता असते. काही जणांना हा त्रास नक्कीच जाणवत असेल.

(काहींना फेशिअल केल्यानंतर अचानक पिंपल्स येऊ लागतात)

ADVERTISEMENT

Face Sheet Mask : चेहऱ्यावर इंन्स्टंट ग्लो येण्यासाठी वापरा ‘हे’ फेस शीट मास्क

डिहायड्रेशन

डिहायड्रेशनचा होऊ शकतो त्रास

Instagram

चेहऱ्यावर मॉश्चर असणे फार गरजेचे असते. जर तुमच्या त्वचेमध्ये ओलावा असेल तर नक्कीच तुमची त्वचा अधिक चांगली दिसते. त्वचेला अधिक मसाज केला तर त्वचेमधील ओलावा अथवा मॉईश्चर कमी होण्याची शक्यता असते. यालाच डिहायड्रेशन असे म्हणतात. हे तुम्हाला होऊ द्यायचे नसेल तर तुम्ही त्वचेला अधिका काळासाठी मसाज करणे टाळा.

ADVERTISEMENT

त्वचा होते रुक्ष

एखादी कृती तुम्ही सतत करत असाल तर त्याचे फायदे  दिसणे बंद होणे. उदा. वर्कआऊटच घ्या तोच तोच व्यायाम तुम्ही सतत करत असाल तर तुम्हाला त्याचे फायदे मिळणे बंद होतात. फेस मसाजच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. तुम्ही जर सतत मसाज करत असाल तर तुमची त्वचा रुक्ष होते. प्रत्येक त्वचा ही वेगळी असते .जर तुमच्या त्वचेला मसाजची फार गरज नसेल आणि तुम्ही खूप मसाज करत राहिला तरी तुम्हाला त्याचा त्रास होतो.  त्यामुळेही अति मसाज करणे तुम्ही टाळायला हवे. चमकणार्‍या त्वचेसाठी फेस शीट मास्क वापरुन पहा.

किती मिनिटाचा करायला हवा मसाज

आता जास्त मसाज करण्याचे नुकसान तुम्हाला कळले असतील तर तुम्ही मसाजची वेळ ही निश्चित करायला हवी.  तुम्ही जर रोज घरच्या घरी मसाज करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही दोन मिनिटांपेक्षा जास्त मसाज अजिबात करायला नको. जर तुम्ही मसाजची वेळ कमी ठेवली तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. फेशियलच्या वेळीही तुमच्या स्किन एक्सपर्टला तुमच्या चेहऱ्यासाठी किती प्रेशरने आणि किती वेळासाठी मसाज करायला हवा हे कळायला हवे. नाहीतर तुमच्या त्वचेला वरील सगळे त्रास होऊ लागतील. 


आता चेहऱ्याला आवडीने मसाज करायला जाताना तुम्ही त्याचे नुकसानही जाणून घेणे गरजेचे आहे. 

तुमच्या तेलकट त्वचेसाठी हे फेस वॉश आहेत एकदम परफेक्ट (Face Wash For Oily Skin In Marathi)

ADVERTISEMENT

चेहऱ्याला इन्स्टंट ग्लो हवा असेल तर तुम्ही माय ग्लॅमचे हे उत्पादन नक्की वापरु शकता. 

04 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT