ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Ranveer Vs Wild with Bear Grylls

‘रणवीर Vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ मध्ये थरारक अनुभव घेताना दिसतोय रणवीर सिंग 

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग एक असा अभिनेता आहे जो नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करण्यास मागेपुढे पाहत नाही. हा अभिनेता बहुमुखी प्रतिभेचे एक जिवंत उदाहरण आहे आणि त्याची प्रभावी कार्यपद्धती त्याच्या या टॅलेंटचा मोठा पुरावा आहे. बँड बाजा बारात मध्ये सरळसाध्या मुलाची भूमिका करण्यापासून ते पद्मावतमधील क्रूरकर्मा अल्लाउद्दीन खिलजी साकारण्यापर्यंत रणवीर नेहमीच त्याच्या अभिनयाने चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यात यशस्वी झाला आहे. आणि आता तो जंगलातल्या थरारक साहसासाठी सज्ज झाला आहे. आता रणवीर बेअर ग्रिल्स बरोबर चॅलेंज पूर्ण करताना दिसणार आहे. तो आता ‘रणवीर Vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ या कार्यक्रमात बेअर ग्रिल्ससोबत दिसेल.या नव्या चॅलेंजमुळे रणवीर सिंग सध्या खूप चर्चेत आहे. याआधी अक्षय कुमार, रजनीकांत, अजय देवगण आणि विकी कौशल यांनीही बेअर ग्रिल्स बरोबर चॅलेंज पूर्ण केले आहे. यावेळचा शो मागील शोपेक्षा खूपच वेगळा असणार आहे. यावेळी या शोमध्ये रणवीरला संपूर्ण प्रवासात कोणते चॅलेंज पूर्ण करायचे आहेत हे प्रेक्षक ठरवणार आहेत. या नवीन वेब शोमध्ये रणवीर बेअर ग्रिल्ससोबत सर्बियाच्या जंगलात फिरताना दिसणार आहे. हा शो लवकरच नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे.

असा असेल हा कार्यक्रम 

या ऍडव्हेंचर शोमध्ये रणवीर आणि बेअर ग्रिल्स जंगलातील वन्य प्रवासात आपले साहस आजमावताना दिसतील. या शो चे ट्रेलर काही दिवसांपूर्वी आले होते. आणि आता नुकतेच रणवीर Vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्सच्या नवीन प्रोमोचे अनावरण करण्यात आले आहे ज्यामध्ये रणवीर चक्क एक किडा खाताना दिसला आहे. 30 सेकंदाच्या या प्रोमोमध्ये रणवीर जेवणाच्या टेबलावर बसून त्याच्या जेवणाची वाट पाहत होता आणि त्याला जंगलात कोणत्या प्रकारचे अन्न खावे लागेल यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी त्याला एक किडा दिला गेला होता. त्यावेळी रणवीरला तो किडा गिळण्यासाठी फार कष्ट करावे लागले पण कसेबसे त्याने हे अवघड काम करून दाखवले. यानंतर प्रोमोमध्ये रणवीर जंगलासाठी तयार असल्याचे घोषित केले गेले. या प्रोमोला कॅप्शन दिले होते, “मेनू में क्या है? आप ही बताओ! रणवीर सिंग काय खातो, कुठे जातो, कसा झोपतो, सब कुछ! भारतातील पहिला इंटरॅक्टिव्ह स्पेशल पहा – रणवीर Vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स”.

रणवीर Vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स हा एक इंटरॅक्टिव्ह शो असेल ज्यामध्ये प्रेक्षकांना शोमधील रणवीरच्या प्रत्येक हालचालीवर निर्णय घेता येईल आणि तो पर्वत चढताना, अस्वल आणि लांडगे यांच्याशी लढताना, अळ्या व किडे खाताना आणि बरेच काही करताना दिसेल. हा शो 8 जुलै रोजी Netflix वर येणार आहे. 

प्रेक्षकांनी दिली अशी प्रतिक्रिया

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर लोकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. या क्लिपवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘रणवीर, तू खरंच खूप धैर्यवान आहेस.’ तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘रणवीर सर जी, या नवीन शोसाठी तुम्हाला शुभेच्छा.’ याशिवाय बहुतांश युजर्स या पोस्टवर फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

ADVERTISEMENT

या चित्रपटांमध्ये दिसणार रणवीर 

रणवीरच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो नुकताच ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात दिसला होता. याशिवाय रणवीर अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. तो लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो ‘अनियन’ चित्रपटाच्या रिमेकमध्येही काम करत आहे. या दोन चित्रपटांशिवाय तो करण जोहरच्या रॉकी आणि रानी की प्रेम कहानीमध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

07 Jul 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT