ADVERTISEMENT
home / आरोग्य
शेपूची भाजी खाण्याचे फायदे

शेपूची भाजी खाण्याचे फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकीत | Shepuchi Bhaji Benefits In Marathi

पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. म्हणून त्या खाव्यात असे कितीही सांगितले तरी पालेभाज्यांमध्ये असलेली शेपूची भाजी मात्र अनेकजण खायला बघत नाही. कारण ती खाल्यानंतर सतत करपट ढेकर येत राहतात. पण केवळ वासामुळे जर तुम्ही भाजी खात नसाल तर तुम्हाला कदाचित या भाजीचे फायदे माहीत नाहीत. अगदी थोडीशी शेपूची भाजी shepuchi bhaji जरी तुम्ही खाल्ली तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल. (शेपूच्या भाजीला ‘डील’ असे देखील म्हणतात) शेपूची भाजी बाजारात सहज उपलब्ध असते. त्याची पान अगदीच पातळ असतात. बाराही महिने ही भाजी उपलब्ध असते. बाजारात शेपूची भाजी मिळणार नाही असे अजिबात होत नाही. अगदी लहानशी जुडीही एका दिवसासाठी पुरेशी असते. मुगाची डाळ घालून शेपूची भाजी shepuchi bhaji केली जाते. भाकरी किंवा पोळीसोबत ही भाजी खाल्ली जाते. आज आपण शेपूची भाजी खाण्याचे फायदे (shepu bhaji benefits in marathi) जाणून घ्या.

शेपूच्या भाजीमधील पोषकत्वे (Nutritional Value Of Shepu Bhaji)

Nutritional Value Of Shepu Bhaji
Instagram

शेपूच्या भाजी फायदे जाणून घेण्याआधी भाजीमधील पोषकत्वे shepuchi bhaji जाणून घ्या म्हणजे तुमच्या शरीराला नेमकी कोणती पोषकत्वे मिळतात हे देखील तुम्हाला यातून कळू शकेल. 

व्हिटॅमिन C  : 141%

लोह :  36%

व्हिटॅमिन B6 : 10%

कॅल्शिअम : 20 %

मॅग्नेशिअम : 13 %

पोटॅशिअम : 21 %

कोलेस्ट्रॉल : 0 %

डाएटरी फायबर : 2.1 ग्रॅम

प्रोटीन :  3.5 ग्रॅम

कॅलरीज : 43

कार्बोहायड्रेट :  7 ग्रॅम

शेपूच्या भाजीचे फायदे (Shepu Bhaji Benefits In Marathi)

Shepu Bhaji Benefits In Marathi
Instagram

शेपूच्या भाजीमधील पौष्टिक तत्वे जाणून घेतल्यानंतर जर तुम्ही आहारात त्याचा समावेश केला तर तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच मिळतील. शेपूची भाजी खाण्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर shepuchi bhaji recipe in marathi ही देखील आपण जाणून घेणार आहोत.

ADVERTISEMENT

पोटाचे विकार करते दूर

खूप जणांना पोटाचे विकार असतात. विशेषत: पोट होण्याची समस्या खूप जणांना असतात. जर तुम्हाला पोटासंदर्भात काही विकार असेल तर तुम्ही शेपूची भाजी shepuchi bhaji खायला हवी. पोटाचे विकार यामध्ये पोट साफ होणे, पोट दुखणे, पोट फुगणे असे त्रास असतील तर तुम्ही आहारात शेपूच्या भाजीचा समावेश व्हायला हवा.

वजन नियंत्रणात ठेवण्यास करते मदत

बद्धकोष्ठेतेचा त्रास असेल तर अशा लोकांचे वजन कारण नसताना वाढते. खूप वेळा वजन वाढण्याचे कारण पोट साफ न होणे हे असते. जर तुमचे पोट खराब असेल आणि या कारणामुळे तुमचे वजन वाढत असेल तर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही शेपूची भाजी shepuchi bhaji आहारात समाविष्ट करायला हवी. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.

निद्रानाशाचा त्रास करते कमी

हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना निद्रानाशचा त्रास असतो. तुम्हालाही रात्री झोप लागत नसेल तर तुम्ही शेपूची भाजी हमखास खायला हवी. शेपूमध्ये फ्लेवोनाईड्स आणि व्हिटॅमिन B हे घटक असतात जे तुमचे मन आणि मेंदू शांत ठेवण्याचे काम करतात. जर तुमचे मन आणि मेंदू शांत असेल तर तुम्हाला झोपही चांगली लागते. शेपूची भाजी रोज जेवणात अगदी थोडीशी जरी शेपूची भाजी असेल तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा मिळण्यात मदत मिळेल.

हार्मोन्सचे संतुलन राखण्यास करते मदत

हार्मोन्सचा सर्वाधिक त्रास हा महिलांना होत असतो. हार्मोन्स कमी जास्त झाले की, त्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो. जर तुम्हाला अनियमित मासिक पाळीचा त्रास असेल किंवा तुम्हाला मासिक पाळी येणार असेल तर तुमच्या आहारात शेपूची भाजी असायला हवी. कारण शेपूमध्ये असलेल्या पोषकतत्वांमुळे तुमचे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.

ADVERTISEMENT

मासिक पाळीतील त्रास करते कमी

मासिक पाळीशी निगडीत त्रास तुम्हाला असेल तर तुमच्यासाठी शेपूची भाजी shepuchi bhaji ही तुमच्यासाठी फारच चांगली आहे. अनेकदा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे  मासिक पाळीत पोट दुखणे, रक्तस्राव अनियमित असणे असे काही त्रास होऊ लागतात. त्यामुळे मासिक पाळीतला हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही शेपूच्या भाजीचा आहारात समावेश करायला हवा. शेपूची भाजी खाण्याचे फायदेमध्ये महिलांसाठी हा अत्यंत महत्वाचा असा फायदा आहे.

हाडांना आणते बळकटी 

shepuchi bhaji हाडांना बळकटी देण्यासाठी फारच फायद्याची असते. कॅल्शिअमचा घटक असल्यामुळे शेपूची भाजी ही फारच फायद्याची ठरते. जर तुम्हाला सांधेदुखी असेल तर तुम्ही आहारात शेपूची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने समाविष्ट करायला हवी. हाडांना बळकटी आणण्यासाठी तुम्ही नक्कीच शेपूची भाजी खायला हवी.

मधुमेहींसाठी चांगली

मधुमेही व्यक्तिंना काही भाज्या खाण्याची परवानगी नसते. एखादी भाजी खाताना त्यातली साखर बघून त्यांना ती खावी लागते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही शेपूच्या भाजीचे सेवन तुम्ही करायला हवे. shepuchi bhaji फायदे जाणून घेत खास मधुमेहींसाठी तुम्ही ही भाजी खायला हवी.

पचनशक्ती करते चांगली

पालेभाज्या या पचनशक्ती चांगली करण्यासाठी फायद्याचे असतात. त्यामुळे पालेभाज्या खाण्यास सांगितले जाते. शेपूची भाजी ही अगदी त्याच पद्धतीने फायद्याचे आहे. पचनशक्ती चांगली करण्यासाठी शेपूची भाजी shepuchi bhaji खायला हवी. शेपूची भाजी खाल्यामुळे अगदी काहीच दिवसात तुम्हाला त्याचे फायदे जाणवतील. शेपूची भाजी खाल्ल्यानंतर आलेले ढेकर खूप जणांना आवडत नाही. पण त्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते.

ADVERTISEMENT

ह्रदय आरोग्यासाठी चांगले

ह्रदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात असणे गरजेचे असते. हल्ली अनेकांना सर्रास होणारा त्रास म्हणजे कोलेस्ट्रालचा. जर तुम्हालाही कोलेस्ट्रॉल असेल तर तुम्ही शेपू खायलाच हवा. शेपूच्या भाजीमुळे वाईट कोलेस्ट्राल शरीरातून कमी होते आणि शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची वाढ होते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिले तर तुमचे हृदयाचे कार्य सुरळीत चालते.

शेपू भाजी रेसिपी मराठी (Shepuchi Bhaji Recipe In Marathi)

शेपूची भाजी खूप जणांना आवडत नाही. पण जर तुम्ही शेपूची भाजी थोडी वेगळ्या आणि चांगल्या पद्धतीने केली तर ती भाजी चवीला चांगली लागते. shepuchi bhaji recipe in marathi यासाठी आम्ही काही खास रेसिपीज शोधून काढल्या आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेल.

मूग डाळ घातलेली शेपूची भाजी

Shepuchi Bhaji Recipe In Marathi
Instagram

साहित्य : स्वच्छ केलेली शेपूची भाजी, लसूण, मीठ,मिरची, हळद, भिजवलेली मूग डाळ
कृती:
शेपूची भाजी चांगली स्वच्छ करुन घ्या. कढईत तेल गरम करुन घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मिरची, ठेचलेला लसूण, हळद घाला. लसूण चांगली लाल झाल्यानंतरत त्यानंतर त्यामध्ये  भिजवलेली मूग डाळ घाला. तिचा रंग बदलला की, मग त्यामध्ये शेपूची भाजी घाला. त्यात मीठ घालून भाजी मंद गॅसवर झाकून ठेवा. भाजीला आपोआप पाणी सुटेल आणि भाजीचा सुगंध येईल. शेपूची भाजी तयार. ही भाजी चपाती, भाकरीसोबत चांगली लागते.

शेपूची पातळ भाजी

शेपूची पातळ भाजी
Instagram

शेपूची भाजी shepuchi bhaji जर तुम्हाला भात आणि भाकरीसोबत खायची असेल तर तुम्ही अशाप्रकारे शेपूची पातळ भाजी करु शकता.

साहित्य: स्वच्छ केलेली शेपूची भाजी, मिरची, शेंगदाणे, बेसन, मोहरी, जीरं, ठेचलेले लसूण

कृती:

ADVERTISEMENT
  • सगळ्यात आधी शेपूची भाजी स्वच्छ करुन चांगली चिरुन घ्या. त्यानंतर एक कुकरचे भांडे घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली शेपूची भाजी, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि शेंगदाणे घेऊन त्यामध्ये पाणी घाला. आता कुकरचे झाकण लावून त्याची एक शिटी काढून घ्या.
  • कुकर थंड झाल्यावर त्यामध्ये जाईल तेवढे बेसन घाला. बेसनच्या गुठळ्या होणार नाही यासाठी गुठल्या मोडून घ्या. 
  • आता एक कढईमध्ये तेल गरम करा. मोहरी- जीरं चांगल तडतडू द्या. त्यानंतर त्यामध्ये लसूण घालून ते चांगलं भाजून घ्या. आता त्यामध्ये शेपूची भाजी घाला.
  • बेसन चांगले शिजू द्या.बेसन चांगले शिजले की, मस्त चपाती आणि भाकरीसोबत खा.

शेपू पालकची भाजी

शेपू- पालक एकत्र करुनही तुम्ही शेपूची थोडी हटके भाजी करु शकता.ही शेपूची भाजी shepuchi bhaji  कशी करायची  ते जाणून घेऊया.

साहित्य: शेपूची भाजी, पालकाची जुडी,  चणा डाळ, शेंगदाणे, हिरवी मिरची, लाल मिरची, लसूण, सुकं खोबरं  

कृती :  

कुकरच्या भांड्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली शेपूची भाजी आणि तेवढ्याच प्रमाणात पालकची भाजी घ्या. त्यामध्ये चणा डाळ- शेंगदाणे घ्या. त्यामध्ये पाणी घालून तुम्ही एक शिटी काढून घ्या. 

एका मिक्सरच्या भांड्यात लसूण, सुकं खोबरं, मिरची याची पेस्ट करुन घ्या. आता यामध्ये शिजलेले पालक- शेपू घाला. त्यामध्ये बेसन घालून हे फिरवून घ्या. कढई गरम करुन त्यामध्ये तेल गरम करुन त्यामध्ये लसूण, हिंगाची फोडणी द्या. त्यात लाल सुकी मिरची घालून  बेसनचे मिश्रण घाला. आता ते चांगले शिजवून घ्या. ही भाजी कशासोबतही चांगली लागते.

आता नक्कीच तुम्ही अशाप्रकारे शेपूची भाजी shepuchi bhaji करु शकता.

 तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. शेपूची भाजी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते का?

पालेभाज्या या पोट साफ होण्यासाठी फारच फायद्याच्या असतात. अनेकदा वजन वाढीचा त्रास हा बद्धकोष्ठतेमुळे किंवा पोट साफ न झाल्यामुळेही होतो. शरीरातील फॅट कमी करुन शरीराला योग्य पोषकत्वे मिळवण्यासाठी शेपूची भाजी मदत करते. त्यामुळे शेपूची भाजी वजन कमी करण्याचा विचार करण्यासाठी खायला हवी.

2. शेपूची भाजी सुकवून पुन्हा वापरता येते का?

नाही, शेपूची भाजी शक्यतो सुकवली जात नाही. शेपूची भाजी सुकवून खूप जण त्याचा वापर ओरिगॅनो किंवा स्प्रिकलर म्हणून वापर करतात.  शेपूची भाजी जर तुम्हाला खायची असेल तर ती फ्रेश खायला हवी. ती अधिक चविष्ट आणि पौष्टिक असते. 

ADVERTISEMENT

3. बडीशेप आणि शेपू सारख्याच आहेत का?

नाही, अजिबात नाही. बडीशेपचा सुगंध आणि शेपूचा सुगंध हा पूर्णपणे वेगळा आहे. खूप जणांना तो एकसारखा असल्यासारखे वाटते पण असे अजिबात नाही. त्यामुळे बडीशेप आणि शेपू यासारख्या नाही. बडीशेपच्या पानापासून अशी भाजी  बनवता येत नाही.

अधिक वाचा

जुलाब वर घरगुती उपाय (Julab Gharguti Upay In Marathi)

मुंग्या येणे लक्षणं आणि घरगुती उपाय (Mungya Yene Upay In Marathi)

ADVERTISEMENT

Anulom Vilom Benefits In Marathi |अनुलोम विलोम प्राणायाम मराठी माहिती

18 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT