Advertisement

Skin Care Products

फेस शीट मास्क वापरण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Sep 21, 2020
फेस शीट मास्क वापरण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स

Advertisement

फेस शीट मास्क वापरणे हा झटपट ग्लो मिळवण्याचा एक सोपा उपाय आहे. घरच्या घरी हे स्कीन केअर प्रॉडक्ट वापरून तुम्ही फेशिअलप्रमाणे सुंदर ग्लो तुमच्या चेहऱ्यावर आणू शकता. त्यामुळे सध्या फेस शीट मास्क वापरण्याकडे अनेकींचा कल दिसून येतो. आजकाल फेस शीट मास्क बाजारात सहज उपलब्ध असतात. हे शीट मास्क छोट्याशा पॅकमध्ये मिळत असल्यामुळे तुम्ही ते तुमच्या बॅगेतून कॅरीदेखील करू शकता. फेस शीट मास्कमुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. शिवाय ब्युटी पार्लर अथवा स्पामध्ये जाऊन महागडी फेशिअल ट्रिटमेंट करण्यापेक्षा ते स्वस्तही पडतात. दिवसभर काम करून थकल्यावर त्वचेचे लाड करण्यासाठी तुम्ही एखादे आवडीचे गाणं ऐकत, बेडवर निवांत पडून राहून हा मास्क तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमकही येईल आणि तुमचा दिवसभराचा ताणही कमी होईल. फेस शीट मास्क वापरण्यापूर्वी तुम्हाला ते लावण्याची स्टेप बाय स्टेप ट्रिक माहीत असायला हवी. यासाठी जाणून घ्या यासाठी ही सोपी युक्ती…

Shutterstock

फेस शीट मास्क लावण्याची सोपी आणि स्टेप बाय स्टेप पद्धत –

त्वचेवर झटपट ग्लो मिळवण्यासाठी तुम्हाला दोन ब्युटी प्रॉडक्टची गरज लागेल. एक म्हणजे तुमच्या त्वचेला सूट होणारा एक छान शीट मास्क आणि फेस रोलर अथवा मसाजर. या दोन वस्तू तुम्हाला काहीच मिनिटांमध्ये फ्रेश लुक मिळवून देऊ शकतात. 

स्टेप 1 – फेस शीट मास्क आणि ब्युटी रोलर पंधरा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. 

स्टेप 2 – या वेळेत चेहरा स्वच्छ धुवून आणि कोरडा करून घ्या. लक्षात ठेवा शीट मास्क लावण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर धुळ, माती, प्रदूषण असता कामा नये.

स्टेप 3 – फ्रीजमधून फेस शीट मास्क आणि ब्युटी रोलर बाहेर काढा.

स्टेप 4-  फेस शीट मास्कचे पॅकिंग उघडा आणि मास्क चेहऱ्यावर व्यवस्थित पसरवा. 

स्टेप 5 – मास्कची सीरम असलेली बाजू त्वचेवर लावा आणि पॅकेटमध्ये उरलेले सीरमदेखील मास्कवर पसरवा. 

स्टेप 6 – थंडगार ब्युटी रोलर मास्कवर कमीत कमी तीन ते चार मिनिटे फिरवा. 

स्टेप 7 – पंधरा मिनिटे एखादं मंद स्वरातील अथवा तुमच्या आवडीचे गाणं ऐकत बेडवर पडून राहा. डोळे बंद करून निवांत पडून राहिल्यामुळे तुमच्या त्वचेला आराम मिळतो.

स्टेप 8 – शीट मास्क काढून टाका आणि चेहऱ्यावरील उरलेले सीरम त्वचेत मुरण्यासाठी बोटांनी हलका मसाज करा. 

स्टेप 9 – चेहरा धुवू नका. सीरम तुमच्या त्वचेत व्यवस्थित मुरू द्या.

स्टेप 10 – त्वचा वरून लॉक करण्यासाठी चेहऱ्यावर आणि मानेवर लाईटवेट मॉईस्चराईझर लावा. 

 

Shutterstock

शीट मास्क लावल्यामुळे त्यातील पोषक सीरम तुमच्या त्वचेत मुरून तुम्हाला इन्स्टंट ग्लो मिळतो. तुम्ही ब्युटी रोलर न फिरवताही मास्क लावू शकता. मात्र थंडगार ब्युटी रोलर चेहऱ्यावर फिरवण्यामुळे तुमच्या  चेहऱ्याला छान मसाज मिळतो. ज्यामुळे शीट मास्कमधील सीरम त्वचेत व्यवस्थित मुरतं. फेस शीट चेहऱ्यावरून काढून टाकल्यावरही तुम्ही  तुमच्या  त्वचेला उत्तेजित करण्यासाठी अथवा चेहऱ्यावर लावलेले ब्युटी प्रॉडक्ट त्वचेत मुरवण्यासाठी ब्युटी रोलरचा वापर करू  शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं रक्ताभिसरण सुधारतं, त्वचेला ऑक्सिजनचा पूरवठा होतो आणि तुम्हाला फ्रेश लुक मिळतो. हा उपाय केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक 

अधिक वाचा –

घरच्या घरी बनवा हेअर जेल,जाणून घ्या कसं

घरी असलेल्या वेगवेगळ्या नेलपेंटपासून तयार करा या सोप्या डिझाईन्स

आकर्षक ओठ करणारी ‘लिप ब्लशिंग’ ट्रिटमेंट नक्की काय आहे