ADVERTISEMENT
home / आरोग्य
hernia upay in marathi

हर्निया ची लक्षणे आणि उपाय (Hernia Symptoms And Upay In Marathi)

आजकाल आपण बरेचदा ऐकतो की, हर्नियाची सर्जरी झाली. पण प्रत्येकाला हर्निया काय आणि तो कसा होतो याची माहिती नसते. म्हणूनच जाणून घेऊया हर्निया म्हणजे काय आणि यावरील उपायपद्धती. ज्याबद्दल माहिती करून घेणे आवश्यक आहे. बरेच जणांना असंही वाटतं की, हर्निया हा रोग फक्त पुरूषांना होतो. पण असं नाहीयं, हा रोग स्त्री आणि पुरूष कोणालाही होऊ शकतो. अगदी लहान बाळ किंवा जन्मजातही असू शकतो. जाणून घेऊया हॅर्नियाचे लक्षणे आणि उपाय (hernia symptoms and upay in marathi).

हर्निया म्हणजे काय (Hernia Meaning In Marathi)

हर्निया तेव्हा होतो जेव्हा तुमच्या शरीरातील एखादी मांसपेशी किंवा उतीला उभार येतो आणि जे वाढू लागतं. हर्निया हे जास्तकरून पोटात होतो. उदाहरणार्थ आतड्या, पोटातील आंतरभागाचे कमकुवत क्षेत्रातून बाहेर वाढणार हर्निया. खरंतर एक पोटाचा हर्निया हा कॉमन आहे. पण जांघेचा वरचा भाग, पोटाची बेंबी आणि खालील भागातही हर्निया होतो. जास्तकरून हर्निया आरोग्यासाठी धोकादायक नसतो पण तो आपोआप बराही होत नाही. या लेखात जाणून घेऊया हर्निया म्हणजे काय, हर्नियाची लक्षण (hernia symptoms in marathi), हर्नियाची कारण, हर्निया उपाय (hernia upay in marathi), हर्नियावरील ईलाज, हर्निया कसा टाळावा, हर्नियामध्ये काय टाळाव. 

What Is Hernia In Marathi

ADVERTISEMENT

हर्निया म्हणजे काय – What Is Hernia In Marathi

कधी कधी हर्नियाशी निगडीत संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्जरी करणं आवश्यक होतं. जर हर्नियाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन कोणताही उपचार न केल्यास ते वाढू शकतं आणि वेदनादायी ठरू शकतं. त्यात तुमच्या पोटातील आतड्याचा भाग अडकून तुमच्या आतड्याला यामुळे इजा होऊ शकते. ज्यामुळे वेदना आणि बद्धकोष्ठ होऊ शकते. हर्नियामुळे याच्या आसपासच्या भागात सूज येणे आणि वेदना होऊ शकतात.

हर्नियाचे प्रकार (Types Of Hernia In Marathi)

हर्निया या रोगात काही प्रकार आढळतात. तसंच विशिष्ट प्रकारचा हर्निया हा विशिष्ट वयोगटातील व्यक्तींना होतो. जाणून घेऊया हर्नियाचे प्रकार. 

ADVERTISEMENT

इनगुईनल हर्निया (Inguinal Hernia)

Inguinal hernia हर्निया हा सर्वात सामान्य प्रकार आहे. एक रिसर्चनुसार, सर्व आढळणाऱ्या हर्नियामध्ये 70 टक्के प्रमाणात हा हर्निया आढळतो. हा हर्निया तेव्हा होतो जेव्हा तुमच्या आतड्यातील कमकुवत ठिकाणी किंवा पोटातील आतल्या बाजून सूज येते, अशावेळी बरेचदा इनगुनल हर्निया असतो. या प्रकारचा हर्निया महिलांच्या तुलनेतर पुरुषांमध्ये जास्त आढळतो. 

हाईटल हर्निया (Hiatal Hernia)

Hiatal hernia तेव्हा होतो जेव्हा तुमच्या पोटाचा भाग तुमच्या छातीच्या पिंजऱ्यातून डायाफ्रामच्या माध्यमातून निघतो. डायाफ्राम म्हणजे मासंपेशींची एक चादर आहे जी तुमच्या फुफ्फुसांना हवा आत घेण्यास मदत करते. या हर्नियाच्या प्रकारात तुमच्या पोटाचा भागाल हे छातीपासून वेगळं करतं. या प्रकारचा हर्निया 50 वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. एखाद्या मुलामध्ये हे स्थिती आढळल्यास हा साधारणतः जन्मजात दोष असतो. हाईटल हर्निया हा नेहमी गॅस्ट्रोएस्फॉजन रिफ्लक्समागील कारण बनतो. ज्यामुळे जळजळ होऊ लागते.

अंबिलिकल हर्निया (Umbilical Hernia)

अंबिलिकल हर्निया हा 6 महीन्यापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळतो. असा हर्निया तेव्हा होतो जेव्हा त्यांची आतडी पोटाच्या त्वचेच्या आधाराने खालच्या बाजूला वाढतात. अशावेळी तुमच्या मुलाच्या बेंबी आणि आसपासच्या भाग उठावदार दिसू लागतो. खासकरून अशी मुलं रडताना हे जास्त दिसून येतं. हा एकमेव असा हर्निया आहे जो आपोआप दूर होतो. कारण हळूहळू मुलांच्या पोटातील मांसपेशी मजबूत होत जातात. साधारणतः मुल एक वर्षाची असेपर्यंत हा हर्निया दूर न झाल्यास, तो बरा करण्यासाठी सर्जरी करावी लागू शकते.

इंसिजनल हर्निया (Incisional Hernia)

तुमच्या पोटाच्या सर्जरीनंतर हा हर्निया तुम्हाला होऊ शकतो. तुमच्या आतडीला पाडलेली चिर किंवा त्याच्या आसापासच्या भागात कमकुवत टीश्यूंच्या माध्यमातून धक्का लागू शकतो. ज्यामुळे हा हर्निया होऊ शकतो.

ADVERTISEMENT

हर्निया होण्याची कारणं (Causes Of Hernia In Marathi)

मुख्य रूपात हर्निया मांसपेशींचा कमकुवतपणा आणि तणाव यामुळे होतो. या कारणांनुसार हर्निया कधी लवकर तरी कधी बऱ्याच कालावधीनंतर विकसित होऊ शकतो. 

 • मांसपेशींचा कमकुवतपणा हे सामान्य कारणात सामील होतं.  
 • गर्भात असताना पोटाची वाढ योग्यरित्या न झाल्यास असा दोष जन्मजातच दिसून येतो. 
 • वाढत्या वयात होणारा हर्निया.
 • खूप काळापर्यंत होणाऱ्या जुन्या खोकल्याच्या त्रासामुळेही हर्निया होऊ शकतो. 
 • एखाद्या जखमेमुळे किंवा सर्जरीनंतर शरीरावरील तणाव वाढल्यासही हर्निया होऊ शकतो.

हर्नियाचे मुख्य कारण तुमच्या मांसपेशींमधील कमकुवतपणा असल्यास खालील कारणही यामागे असू शकतात.

 • गर्भवती असताना पोटावर जास्त दबाव पडल्यास. 
 • बद्धकोष्ठामुळे जेव्हा आतड्यांवर तणाव जाणवू लागतो. 
 • जास्त वजन उचलल्याने. 
 • पोटात पाणी होणे किंवा जलोदर
 • अचानक वजन वाढल्यामुळे. 
 • शरीरातील एखाद्या भागाच्या सर्जरीनंतर
 • सतत खोकला किंवा शिंकाच्या त्रासामुळे.

ADVERTISEMENT

हर्नियाची लक्षणे (Hernia Symptoms In Marathi)

कोणत्याही हर्नियातील सर्वात सामान्य लक्षण म्हणजे प्रभावित भागात एक गाठ तयार होऊ लागते. Inguinal hernia च्याबाबतीत तुमच्या जांघेच्या हाडाच्या दोन्ही बाजूला गाठ झाल्यासारखं दिसू लागतं. ज्या ठिकाणी तुमची जांघ आणि पोट जोडलेलं असतं. जेव्हा तुम्ही उभे राहता, वाकता किंवा खोकता, तेव्हा स्पर्शाच्या माध्यमातून तुम्हाला हर्निया जाणवू लागण्याची शक्यता असते. जर तुमच्या मुलाला हर्निया झाल्यास तो रडताना तुम्हाला हर्निया आढळतो. साधारणतः मुलं रडू लागल्यावर पोटाला एक उठाव आलेला दिसेल हे आहे umbilical hernia चं एकमात्र लक्षण.

इनगुईनल हर्नियाची लक्षणं (Symptoms Of Inguinal Hernia)

हर्निया झालेल्या भागात वेदना होणं किंवा बैचेनी जाणवणं (खासकरून पोटाच्या खालच्या भागात), खासकरून जेव्हा तुम्ही वाकता, खोकला आल्यावर किंवा उठताना दबाव किंवा जडपणा जाणवणं. उठाव आलेल्या ठिकाणी जळजळ किंवा उत्तेजना जाणवणे.

हाईटल हर्नियाची लक्षणं (Symptoms Of Hiatal Hernia)

अॅसिड रिफ्लक्स हे तेव्हाच होतं जेव्हा पोटातील अॅसिडमुळे जळजळ होते. छातीत दुखू लागतं किंवा काही वेळा काहीच लक्षण दिसत नाहीत. तुम्हाला कधी कधी हा हर्निया झाल्याचं कळतच नाही. त्यामुळे नियमित शारीरिक चाचणी करणं आवश्यक आहे.

हर्नियाची तपासणी (Diagnosis Of Hernia In Marathi)

हर्नियाची तपासणी

ADVERTISEMENT
 • साधारणतः शारीरिक तपासणीच्या माध्यमातून इनगुईनल हर्नियाची तपासणी केली जाऊ शकते. जेव्हा तुम्ही उभे असता किंवा खोकला आल्यावर तुम्हाला तणाव जाणवल्यास डॉक्टर तुमच्या पोटाची तपासणी किंवा वाढलेला उठाव जाणवू शकतात. 
 • जर तुम्हाला हाईटल हर्निया असेल तर डॉक्टर बॅरियम एक्स-रे किंवा एंडोस्कोपीने त्याची चाचणी करू शकतात. बॅरियम एक्स-रेमध्ये पचनतंत्राचा एक्स-रे काढला जातो.
 • एंडोस्कोपीमध्ये तुमच्या गळ्याच्या खालील आणि पोटामध्ये एक छोटा कॅमेरा लावला जातो. यामुळे डॉक्टरांना तुमच्या पोटातील अंतर्गत भाग तपासता येतो. जर तुमच्या मुलाला अंबलिकल हर्निया असेल तर तुमचे डॉक्टर अल्ट्रासाऊंड करून घेण्यास सांगतात. अल्ट्रासाऊंडमध्ये तुमच्या शरीराच्या आतील संरचनाचा फोटो बनवण्यासाठी उच्च प्रतीच्या ध्वनी तरंगांचा उपयोग केला जातो.

हर्नियावरील उपचार (Treatment For Hernia In Marathi)

तुम्हाला हर्नियावरील उपचारांची गरज आहे की नाही हे हर्नियाचा आकार आणि त्याच्या लक्षणांच्या गंभीरतेवरून ठरतं. हर्नियाच्या उपचारांमध्ये जीवनशैलीतील बदल, औषधं किंवा सर्जरी यासारखे उपाय सामील आहेत.

जीवनशैलीतील बदल आणि हर्निया (Changes In Lifestyle)

आहारातील बदलांमुळेही बरेचदा हर्नियावर इलाज केला जाऊ शकतो. पण यामुळे हर्निया पूर्णतः बरा होत नाही. जास्त कॅलरीयुक्त जेवण, जेवणानंतर लगेच वाकणे किंवा वळणे टाळा. तसंच तुमचं वजन नियंत्रणात ठेवा. काही व्यायामांच्या मदतीनेही तुम्ही हर्नियाच्या आसपासच्या मांसपेशी मजबूत करण्यास फायदा होतो. ज्यामुळे हर्नियाची लक्षणं कमी होतात. 

जीवनशैलीतील बदल आणि हर्निया

ADVERTISEMENT

हर्नियावरील सर्जरी (Surgery)

जर तुमचा हर्निया वाढत असेल किंवा त्यामुळे दुखत असल्यास त्यावरून त्याच्यावर करण्यात येणारे उपाय ठरवले जातात. हर्नियाची सर्जरी करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. हर्नियाची ओपन किंवा लेप्रोस्कोपिक सर्जरी करून तो बरा केला जातो. 

 • लेप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये एका छोट्या कॅमेराचा वापर करून आणि सर्जरीची छोटी उपकरणं वापर करण्यासाठी काही छोट्या चिरा देऊन हर्नियाची सर्जरी केली जाते. लेप्रोस्कोपिक सर्जरी केल्यामुळे हर्नियाच्या आसपासच्या उतींना कमी हानी पोचते. 
 • ओपन सर्जरीनंतर पुन्हा आरोग्य सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी जातो. यामध्ये तुम्हाला कमीतकमी  सहा आठवडे चालणं शक्य होत नाही. दुसरीकडे लोप्रोस्कोपीचा रिकव्हरी वेळ खूपच कमी आहे, पण यामध्ये हर्निया पुन्हा होण्याची शक्यता असते. तसंच सर्व प्रकारच्या हर्नियावर लेप्रोस्कोपी करणं शक्य नसतं.

हर्नियावरील औषधं (Medication)

जर तुुम्हाला हाईटल हर्निया झाला असेल तर ओवर-द-काउंटर आणि प्रिस्क्रीप्शन औषधं घेऊन पोटातील अॅसिड कमी करता येत. ज्यामुळे हर्नियाचा त्रास कमी होऊन लक्षणंही कमी होतात. यामध्ये अँटीसिड्स, एच -2 रिसेप्टर ब्लॉकर्स, (H-2 receptor blockers) आणि प्रोटॉन पंप इनहिबिटरचा समावेश आहे.

हर्नियामुळे उद्भवणाऱ्या समस्या (Complications In Hernia)

जर तुम्ही वेळीच हर्नियावर ईलाज केला नाहीतर तो वाढू शकतो आणि जास्त वेदनादायीही ठरू शकतो. ज्यामध्ये तुमच्या आतड्यांना बाधा होई शकते. विना उपचार हर्निया पोटाच्या आसपासच्या उतींवर अधिक दबाव टाकू शकतो. त्यामुळे सूज येणं किंवा वेदना होऊ शकतात. रक्तप्रवाह थांबून पेशींवर परिणाम होऊ शकतो. त्या मृत होऊ शकतात. त्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हर्नियावर तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे.

ADVERTISEMENT

हर्निया वर उपाय (Hernia Upay In Marathi)

हर्नियावर काही घरगुती उपायांचाही तुम्ही अवलंब करू शकता. या उपायांनी हर्निया पूर्णतः बरं होऊ शकत नाही पण काही प्रमाणात हर्नियामध्ये होणाऱ्या वेदना आणि सूज यावर नक्कीच आराम मिळतो. तुम्हाला एखादी एलर्जी असल्यास कोणताही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

एरंडेल तेल (Castor Seed Oil)

एरंडेल तेल हे नेहमीच पोटाशी निगडीत आजारांवरील उपाचारासाठी वापरलं जातं. कारण या तेलामुळे तुमच्या पोटात एक पातळ अस्तर तयार होतं. जे तुमच्या पोटात जळजळ होण्यापासून थांबवतं आणि सहज पचन घडवून आणतं. तुम्ही एरंडेल पोटात घेऊही शकता किंवा त्याचा पॅक बनवून पोटावर ठेवून त्याची ऊब घेऊन शकता. वेदनादायी हर्नियावर हा चांगला उपाय आहे. 

असा करा वापर : एरंडेल तेलाचा वापर करण्यासाठी तुम्ही रोज एक कप दूधात अर्धा चमचा एरंडेल तेल घाला आणि त्याचं सेवन करा.

कोरफडाचा रस (Aloe Vera Juice)

कोरफडाचा रस

ADVERTISEMENT

कोरफडाचे फायदे अनेक आहेत. कोरफडमध्ये नैसर्गिकरित्या ज्वलनशामक आणि थंडावा देणारे घटक आहेत. ज्यांना हर्नियामध्ये वेदना होतात तेव्हा कोरफडाचा ज्यूस घेण्याचा सल्ला केला जातो. भविष्यातील हर्निया होण्याची शक्यता टाळण्यासाठी तुम्ही जेवणाआधी कोरफडाचा गर किंवा ज्यूसचं सेवन करू शकता.


असा करा वापर : एक ग्लास पाण्यात दोन चमचे कोरफड ज्यूस मिक्स करा आणि घोट घोट प्या. त्यामुळे तुम्हाला हर्नियाच्या वेदना आणि सूज दूर होईल.

बर्फाचा शेक (Ice Pack)

बर्फाचा शेक

बर्फ हा हर्नियावरील सर्वात जुना, सोपा आणि प्रचलित उपाय आहे. हर्निया झालेल्या जागेवर तुम्ही बर्फ लावल्याने जरा आराम पडतो. दुखणंही कमी होतं आणि सूजही कमी होते. जर तुम्हाला वेदनादायी हर्निया असल्यास आजपासूनच बर्फाचा वापर करायला सुरूवात करा. 

ADVERTISEMENT

असा करा वापर : ज्या ठिकाणी हर्निया झाला असेल त्या ठिकाणी बर्फाने शेक द्या. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. सूज कमी होईल आणि वेदनाही दूर होतील.

आलं (Ginger Root)

आलं

आल्याचं मूळं हे पोटातील गॅस्ट्रीक एसिडमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतं. हे हर्नियातील वेदनाही कमी करतं. यातील ज्वलनशामक गुणांमुळे हे इतर उपायाप्रमाणेच प्रभावी आहे. याच सेवन तुम्ही आल्याचा रस (वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रमाण ठरवावं.) किंवा कच्च्या आल्याचा तुकडाही खाऊ शकता. 

असा करा वापर : जर तुम्हाला हर्निया झाला असेल तर नियमितपणे सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी आलं घालून उकळलेलं पाणी पिऊ शकता. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. 

ADVERTISEMENT

काळी मिरी पावडर (Black Pepper Powder)

काळी मिरी पावडर

काळी मिरी ही फक्त पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी उपयोगी नाहीतर तर याचे अनेक आरोग्यदायी उपयोग आहेत. काळी मिरीही पोटावरील आजारांवर आणि हर्नियावरही गुणकारी आहे. 

असा करा वापर : हर्नियासाठी तुम्ही काळा मिरीच्या पावडरचा वापर करू शकता. कोमट पाण्यात तुम्ही एक चतुर्थांश काळी मिरी पावडर घालून ते एक दिवसाआड पिऊ शकता. ज्यामुळे हर्नियातील वेदनांवर नक्कीच आराम मिळेल.

भाज्यांचा ज्यूस (Vegetable Juice)

भाज्यांचा ज्यूस

ADVERTISEMENT

हर्नियावरील सगळ्यात सोपा आणि गुणकारी उपाय म्हणजे एक ग्लास भाज्यांचा ज्यूस. ज्यामध्ये गाजर, पालक, कांदे, ब्रोकोली आणि केल यासारख्या भाज्यांचा समावेश असेल. या भाज्यांमधील जीवनसत्त्व आणि ज्वलनशामक गुण हर्नियामुळे होणाऱ्या वेदना आणि जळजळ कमी करतात. या व्हेजिटेबल ज्यूसमध्ये तुम्ही चिमूटभर मीठ घातल्यास हे अजूनच परिणामकारक ठरले. 

असा करा वापर : बाजारात उपलब्ध असलेल्या ताज्या भाज्यांचा उदाहरणार्थ पालक, गाजर, ब्रोकोली आणि इतर पालेभाज्या वापरून ज्यूस करून घ्या आणि त्यात चवीपुरतं मीठ घाला. हा व्हेजिटेबल ज्यूस तुम्ही नियमितपणे घेतल्यास बद्धकोष्ठ दूर होऊन शरीरावर पडणारा ताण दूर होईल. जे हर्नियासाठी भाज्यांचा रस फायदेशीर आहे.

हर्नियापासून बचाव (How To Prevent Hernia In Marathi)

तुम्ही नेहमीच कमकुवत मांसपेशींना थांबवू शकत नाही ज्या हर्निया उत्पन्न होण्याचं कारण असतात. पण तुम्ही शरीरावरील तणाव कमी करू शकता. यामुले तुुम्ही झालेला हर्नियाची वाढ किंवा हर्निया होण्याची शक्यता टाळू शकता. हर्नियापासून बचावासाठी पुढील उपाय करा. 

ADVERTISEMENT
 • धूम्रपान करू नका.
 • सतत येणारा खोकला टाळण्यासाठी जेव्हा तुम्ही आजारी असाल तेव्हाच डॉक्टरांना दाखवा. 
 • शरीराचं वजन नेहमी आटोक्यात ठेवा. ज्यामुळे तुमच्या पोटावर दबाव पडणार नाही. 
 • लघवी थांबवून ठेऊ नका, त्यामुळेही तुमच्या आतड्यांवर ताण येऊ शकतो. 
 • जास्त वजन जे तुम्हाला पेलवणार नाही ते उचलणं टाळा. 

तसंच हर्नियाच्या सुरूवातीच्या लक्षणांना ओळखणंही महत्त्वाचं आहे. उपचार केल्याशिवाय हर्निया बरा होत नाही. सुरूवातीच्या काळातील तपासणी किंवा जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने तुम्ही हर्नियाचा प्रभाव कमी करू शकता आणि आरोग्याला असणारा धोका टाळू शकता. 

हर्नियाबाबत विचारले जाणारे काही प्रश्न – FAQ’s

1. हर्निया किती गंभीर असू शकतो ?

हर्नियावर योग्य वेळी उपचार न केल्यास काही गंभीर समस्या उद्भवू शकतात. जसं हर्निया वाढल्यामुळे पेशींना होणारा रक्तपुरवठा थांबणे किंवा पेशी मृत होणे. अशा गंभीर समस्या जास्तकरून पुरूषांना होणाऱ्या हर्नियात आढळतात.

2. हर्निया कसा ओळखावा ?

इनगुईनल किंवा इंसिजनल हर्निया या प्रकारात जास्तकरून शरीर तपासणीवरून हर्निया तपासला जातो. जर तुम्हाला हाईटल हर्निया असल्यास तो डॉक्टरांना एक्स-रे किंवा एंडोस्कोपीवरून कळू शकतो.

ADVERTISEMENT

3. हर्निया फुटू शकतो किंवा त्यामुळे मृत्यू होऊ शकतो का ?

हर्नियामुळे तुम्हाला वेदना होऊ शकतात, तुमच्या पेशी मृत होऊ शकतात. परिणामी, संसर्ग होऊ शकतो किंवा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे वेळीच हर्नियावर उपचार घ्या.

4. हर्नियाकडे दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकतं ?

छोटा, मऊ हर्नियामुळे वेदना होत नाहीत तसंच त्यावर उपचाराची गरजही पडत नाही. पण काही हर्नियामध्ये तुम्हाला वेदना जास्त प्रमाणात होतात. ज्यामुळे तुम्हाला मळमळणं आणि उलटी होण्यासारखा त्रास होऊ शकता किंवा सर्जरी करण्याची गरजही पडू शकते.

5. इनगुईनल हर्नियामध्ये कोणते पदार्थ किंवा खाणं टाळावं ?

हर्निया झाला असल्यास तुमच्या डाएटमध्ये तुम्ही फळ, हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्याचा समावेश करावा. यामुळे तुमचं पचन सहज होईल. धूम्रपान करणं टाळा कारण धूम्रपानामुळे कफ होऊ शकतो, ज्यामुळे हर्निया उद्भवतो.

12 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT