श्रीगणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी पाहा 'हे' मराठी चित्रपट

श्रीगणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी पाहा 'हे' मराठी चित्रपट

घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली असली तरी यंदा सगळीकडे कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे हा उत्सव नेहमीसारखा नक्कीच नसेल. घरात अगदी साध्या पद्धतीने आणि फक्त कुटुंबियांसोबत यंदा आपल्याला बाप्पाचे स्वागत करावे लागणार आहे. दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाची धमाल काही न्यारीच असते. म्हणूनच या चित्रपटांच्या माध्यमातून घरातच या उत्सवाचा आनंद घेऊ या. आम्ही तुमच्यासोबत असे काही मराठी चित्रपट शेअर करत आहोत. ज्यामध्ये श्रीगणेशचतुर्थी गणेशोत्सवाची धुम दाखवण्यात आली आहे. 

अष्टविनायक -

राजदत्त यांच्या  दिग्दर्शनाखाली निर्माण झालेला अष्टविनायक हा चित्रपट तुमच्या नक्कीच लक्षात असेल. या चित्रपटात सचिन पिळगांवकर यांची महत्त्वाची भूमिका होती. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यावर आधारित हा चित्रपट होता. ज्यामध्ये सचिन यांच्यासोबत वंदना पंडित, राजा गोसावी, शरद तळवळकर, डॉ. वसंतराव देशपांडे, रमेश भाटकर, शर्मा गोसावी, पद्मा चव्हाण, उषा चव्हाण,आशा काळे, जयश्री गडकर, रविंद्र महाजनी आणि अशोक सराफ अशा दिग्गज कलाकारांनी काम केलं होतं. यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध दैवत अष्टविनायकांचे दर्शन घडवण्यात आलेलं आहे. 

मोरया -

मोरया हा चित्रपट दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्तेचे निर्मिती आहे. राजकारणावर आधारित या चित्रपटामध्ये आजकालच्या सार्वजनिक गणेशोत्वाचे दर्शन घडवण्यात आलेलं आहे. मराठीतील हा एक बिग बजेट चित्रपट होता. ज्यात संतोष जुवेकर, स्पृहा जोशी, परी तेलंग, चिन्मय मांडलेकर, दिलीप प्रभावळकर, जनार्दन परब, गणेश यादव यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट एक सुपरहिट चित्रपट ठरला होता. ज्यातून लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे ढासळत असलेले स्वरूप रेखाटण्यात आले होते

वक्रतुंड महाकाय -

पुर्नवसू नाईक यांच्या दिग्रदर्शनाखाली तयार करण्यात आलेला वक्रतुंड महाकाय चित्रपट ऐन गणेशोत्वात प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यामुळे या चित्रपटाला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. हा चित्रपट बॉंम्ब ब्लास्टवर आधारित होता.  गणपतीच्या सॉफ्ट टॉयमध्ये लपविण्यात आलेला बॉम्ब आणि त्यातुन घडणारी कथा यात दाखवण्यात आली होती. गणेश चतुर्थीच्या दिवशी हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा असा आहे. 

गोविंदा -

आत्माराम धरणे यांनी दिग्दर्शित केलेला गोविंदा हा चित्रपट राजकारणात तरूण मुलांचा कसा गरजेपुरता वापर केला जातो यावर आधारित आहे. या चित्रपटाचे ट्रॅक सॉंग गणेशोत्सवावर आधारित असून ते अभिनेता स्वप्नील जोशीवर चित्रित करण्यात आलेलं आहे. ज्यातून तु्म्हाला तुमच्या आत्मशक्तीची जाणिव होऊ शकते. या गाण्यासाठी हा चित्रपट तुम्ही  नक्कीच पाहू शकता. 

लोकमान्य एक युगपुरूष -

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. लोकमान्यांनी लोकांनी एकत्र यावं यासाठी त्याकाळी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. त्यामुळे या गोष्टीचे स्मरण करण्यासाठी आणि इतिहास जाणून घेण्यासाठी यंदाच्या गणेश चतुर्थीला हा चित्रपट कुटुंबासह नक्की पाहा. या चित्रपटात सुबोध भावे यांनी लोकमान्याची भूमिका साकारली आहे तर हा चित्रपट ओम राऊत यांमी दिग्दर्शित केलेला आहे. 

 

 

या व्यतिरिक्त व्हेटिंलेटर, मेमरी कार्ड अशा अनेक मराठी चित्रपटांमधून गणेशोत्सव दाखवण्यात आलेला आहे. बॉलीवूडच्याही अनेक चित्रपटांमध्ये गणेशोत्सवाची धमाला पाहायला मिळते. टेलिव्हिजनवर तर गणेशोत्सवामध्ये आवर्जून गणेश चर्तुर्थी स्पेशल एपिसोड शूट केले जातात. त्यामुळे यंदा घराबाहरे पडून सार्वजनित उत्सवाचा आनंद नाही घेता आला तरी घरात बसून तुम्ही कुटुंबासोबत या चित्रपटांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करू शकता. 

फोटोसौजन्य - इन्साग्राम आणि युट्यूब

अधिक वाचा -

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी लावायलाच हवी ही evergreen गाणी (Best Ganpati Songs In Marathi)

श्रावण महिन्याचे महत्त्व आणि यातील महत्त्वाचे उपवास (List of Festivals In Shravan Month)

अष्टविनायकाची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्या

‘गणेश चतुर्थी’ बद्दलची संपूर्ण माहिती (Ganesh Chaturthi Information In Marathi)