ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
घराला स्वच्छ ठेवण्याकरिता 6 सोप्या टिप्स

घराला स्वच्छ ठेवण्याकरिता 6 सोप्या टिप्स

घर असो वा वॉर्डरोब असो ते व्यवस्थित ठेवणं आणि स्वच्छता राखणं म्हणजे एक टास्कच असतं. प्रत्येक गृहिणीच्या डोक्यात घराच्या साफसफाईचा विचार हा किमान दिवसातून एकदा तरी येतोच. तसंच काहीसं घरातील कपडे आणि वॉर्डरोबच्या बाबतीतही लागू होतं. या दोन्ही गोष्टी कितीही आवरून ठेवल्या किंवा स्वच्छ ठेवल्या तरी काही ना काही राहतंच. म्हणूनच या लेखात आम्ही तुम्हाला देणार आहोत या दोन्हींच्या स्वच्छतेकरिता काही सोप्या टिप्स. मग जाणून घ्या काहीही खर्च न करता घर आणि वॉर्डरोब कसं मस्त ठेवता येईल ते…

अस्ताव्यस्त नाही, मस्त-मस्त

कपडे वॉर्डरोबमध्ये नीट ठेवणं हे टास्क खूपच कठीण आहे. कारण सोमवारी कपडे आवरले तर रविवारी पुन्हा एकदा ते आवरण्याची वेळही येतेच. मग विचार येतो मोठा वार्डरोब घेण्याचा. पण महागड्या स्टोरेज युनिट्सवर पैसे खर्च करण्यापेक्षा तुमच्या नेहमीच्या कपाटातच स्कार्फ, बेल्ट आणि दुप्पटे ठेवण्याकरिता वापर करा टेन्शन रॉडचा किंवा शॉवर हूक्सचा वापर करून त्यावर हँगर लटकवून कपडे कपाटात नीट arramge करा.  

फटींवर जालीम उपाय नेलपेंट

घरातील ग्लास विंडो किंवा इतर ठिकाणी छोट्या छोट्या फटी असतील तर ते खूपच वाईट दिसतं. तसंच यामुळे किड्या-मुग्यांचाही त्रास होतो. यावर सोपा आणि जालीम उपाय म्हणजे आपल्या घरात सहज उपलब्ध असणारं क्लियर नेल पॉलीश. या नेल पॉलीशने घरातील फटी भरा. हे क्लियर असल्यामुळे दिसणारही नाही आणि लगेच सुकेलही. एकदा सुकल्यावर पुन्हा त्यावर क्लियर कोट लावा. कारण फटी भरण्यासाठी व्हाईट सिमेंट आणायला जा मग ते ग्लॉव्हज् घालून फटी भरा हा टास्कच असतो. त्यात सिमेंटमुळे हातालाही इजा होऊ शकते. त्यापेक्षा छोट्या छोट्या फटी भरण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

ADVERTISEMENT

गॅजेट्सच्या सुरक्षेसाठी तांदूळ

Shutterstock

जर तुमच्याकडील इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ओले झाले असतील तर ते लगेच बंद करा आणि सुक्या टॉवेलने पुसून घ्या. नंतर एका मोठ्या वाडग्यात तांदूळ घेऊन किमान 48 तासांसाठी त्यात हे गॅजेट्स ठेवा. त्यातील पूर्ण मॉईश्चर यामुळे शोषलं जाईल. हा उपाय तुम्ही पावसाळ्यात मोबाईलमध्ये पाणी गेल्यावरही करू शकता.

मोज्यांच्या बनवा जोड्या

मोजे कितीही घेतले तरी त्यांच्या जोड्या नीट ठेवणं कठीण काम आहे. प्रत्येक वेळ मोज्यांच्या जोडीसाठी शोधाशोध करावीच लागते. त्यातही धुवायला टाकल्यावर तर कपड्यांमध्ये मोजे शोधणं दिव्य आहे. तसंच बरेचदा मोजे हे वॉशिंग मशीनमध्ये इतर कपड्यांमध्ये अडकून खेचले जातात आणि खराब होतात. अशावेळी मोजे धुवायला टाकताना ते एका मॅश बॅगमध्ये घालून मग वॉशिंग मशीनमध्ये टाकावे. म्हणजे कपडे वाळत घालताना मोज्यांच्या जोड्या लगेच मिळतील आणि खराब होणार नाहीत.

ADVERTISEMENT

शूजची काळजी अशी घ्या

पाण्यामुळे किंवा मॉईश्चरमुळे शूज खराब होऊ नये म्हणून त्यावर तुम्ही बी वॅक्स लावून वॉटरप्रूक बनवू शकता. भरपूर प्रमाणात तुम्ही बी वॅक्स शूजवर लावून नंतर ते ब्लो ड्रायरने वितळवून घ्या. मग ते शूज किमान 30-45 मिनिटं तसेच ठेवा. तुमचे शूज अगदी नव्यासारखे भासतील. 

या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तुमच्याकडेही अशाच काही सोप्या टिप्स असतील तर आम्हाला नक्की पाठवा. तुम्हाला #POPxoMarathi वर कोणत्या विषयांवरील लेख वाचायला आवडतील हेही आम्हाला नक्की कळवा. 

हेही वाचा –

Kitchen Tips: फ्रिजची अशाप्रकारे करा साफसफाई

ADVERTISEMENT

Kitchen Tips: चुकूनही वापरू नका फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक

Vaastu Tips : घरातील दिशेनुसार करा या रोपं आणि झाडांची लागवड

09 Sep 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT