ADVERTISEMENT
home / Eye Make Up
त्वचेचं नुकसान न करता असा काढा आय मेकअप

त्वचेचं नुकसान न करता असा काढा आय मेकअप

आय मेकअप हा संपूर्ण मेकअपमध्ये खूप महत्त्वाचा ठरतो. कारण सर्व मेकअप व्यवस्थित केला आणि फक्त आयमेक अप बिघडला तरी तुमचा पूर्ण लुक खराब होण्याची शक्यता असते. यासाठीच आयमेकअपवर नेहमीच जास्त भर दिला जातो. सध्या तर आयमेकअपचे विविध ट्रेंडच मार्केट मध्ये आहेत. निरनिराळे लुक करून तुम्ही सुंदर दिसू शकता. मात्र यासाठी न्युयॉन अथवा ग्लिटरच्या आयशॅडो वापरल्यानंतर त्या व्यवस्थित काढणंही तितकंच गरजेचं असतं. कारण अशा प्रॉडक्टमध्ये ते बराच काळ टिकण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी अनेक केमिकल्सचा वापर केलेला असतो. वॉटरप्रूफ मेकअप व्यवस्थित काढला नाही तर तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यासाठी जाणून घ्या आयमेकअप कसा काढावा. 

आयमेकअप काढण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स –

आय मेकअप काढण्याची एक योग्य पद्धत आहे. जर त्या पद्धतीने मेकअप काढला तर तुमच्या त्वचेचं कधीच नुकसान होणार नाही.

स्टेप 1 – हात स्वच्छ धुवा

कोरोनाच्या काळात कोणताही मेकअप करताना आणि काढताना ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप असायला हवी. यासाठीच आय मेकअप काढण्यापूर्वी तुमचे हात स्वच्छ धुवायला मुळीच विसरू नका. 

ADVERTISEMENT

Shutterstock

स्टेप 2 – मेकअप घासून काढू नका

बऱ्याच जणींना मेकअप घाईघाईत आणि  घासून काढण्याची  सवय असते. ही अतिशय चुकीची पद्धत आहे. कारण यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं.  जेव्हा तुम्हाला आय मेकअप काढायचा असतो तेव्हा याबाबत अतिशय सावध असायला हवं. कारण  तुमच्या डोळ्यांची त्वचा खूपच नाजूक आणि मुलायम असते. यासाठीच मेकअप काढण्यासाठी चांगल्या मेकअप रिमूव्हरचा वापर करा आणि कापूस अथवा कॉटन पॅडने हळूवार तुमचा मेकअप काढा.

स्टेप 3 -चेहरा क्लिझिंग करा

मेकअप काढल्यावर त्वचा क्लिंझिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मेकअप काढल्यावर लगेचच एखादं सौम्य क्लिंझर वापरून त्वचा स्वच्छ करा. ज्यामुळे तुमच्या त्वचेमध्ये खोलवर मुरलेले मेकअपचे कण निघून जातील आणि त्वचा खोलवर स्वच्छ होईल.

ADVERTISEMENT

Shutterstock

स्टेप 4 – चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा

मेकअप रिमूव्हर आणि क्लिंझिंगचा वापर केल्यावर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करणं आवश्यक आहे. याचं कारण रिमूव्हर आणि क्लिंझिंगमुळे त्वचेतून बाहेर पडलेले मेकअपचे कण पाण्यासोबत निघून जातील आणि तुमच्या त्वचेला थंडावा मिळाल्यामुळे त्वचेचे ओपन पोअर्स पुन्हा पूर्ववत होतील. आय मेकअपचे कण बऱ्याचदा तुमच्या पापण्या, डोळ्यांचे कोपरे यांच्यावर अडकून बसतात. पाण्यामुळे तुमचा आय मेकअप स्वच्छ होण्यास चांगली मदत होते.

स्टेप 5 – त्वचा मॉईस्चराईझ करा

आय मेकअप आणि चेहऱ्यावरील इतर भागावरील मेकअप काढून टाकल्यावर तुमची त्वचा कोरडी आणि रूक्ष होते. यासाठीच त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी लगेचच त्वचेवर चांगलं मॉईस्चाईझर लावण्याची गरज असते. तुम्ही एखादं चांगलं सीरमदेखील यासाठी वापरू शकता. 

त्यामुळे आय मेकअप करण्याची मुळीच भीती बाळगू नका. फक्त तो वेळेवर आणि व्यवस्थित काढा आणि त्यानंतर त्वचेची योग्य निगा राखा. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होणार नाही. आय मेकअपसाठी वापरण्यात आलेले प्रॉडक्ट वॉटरप्रूफ असल्यामुळे ते व्यवस्थित काढणं गरजेचं असतं. 

ADVERTISEMENT

Shutterstock

डोळ्यांवर विगन आणि चांगल्या दर्जाचे प्रॉडक्ट वापरायचे असतील तर मायग्लॅमच्या प्रॉडक्टने आय मेकअप करा. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

हायड्रेटिंग फेशिअल करेल तुमची त्वचा परफेक्ट (Hydrating Facial For Skin In Marathi)

डाळिंबाच्या या घरगुती फेसपॅकने मिळेल मुरूमांपासून सुटका

DIY : मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी लागणारं सोल्युशन असं करा स्वतःच तयार

29 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT