ADVERTISEMENT
home / Eye Make Up
पहिल्यांदा आयलायनर लावताना तुम्हाला ‘या’ गोष्टी माहीत असायला हव्या

पहिल्यांदा आयलायनर लावताना तुम्हाला ‘या’ गोष्टी माहीत असायला हव्या

डोळे जितके आकर्षक तितकं तुमचं व्यक्तिमत्व खुलून दिसतं. चेहऱ्याच्या सौंदर्यात डोळ्यांना खूप महत्त्व आहे. यासाठीच मेकअप करताना डोळ्यांच्या मेकअपवर जास्त भर दिला जातो. जसं निरनिराळ्या त्वचेसाठी निरनिराळ्या प्रकारचे प्रॉडक्ट वापरले जातात अगदी तसंच डोळ्यांच्या आकारानुसार आणि रंगानुसार आयलायनर निवडायला हवं. नो मेकअप लुकमध्येही फक्त लिपस्टिक आणि आयलायनर लावण्यामुळे तुमचा लुक परफेक्ट होतो. यासाठीच जर तुम्ही पहिल्यांदा आयमेकअप करणार असाल अथवा आयलायनर लावणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. 

पहिल्यांदा आयलायनर लावताना –

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आय लायनर लावता तेव्हा तुमचा हात स्थिर राहत नाही. सहाजिकच हाथ थरथरल्यामुळे तुमचं आयलायनर सरळ न लागता वाकडं तिकडं लागतं अथवा पापणीवर पसरलं जातं. परफेक्ट आयलायनर लावण्यासाठी काही दिवस सराव करण्याची गरज असते. यासाठीच सुरूवातीचे काही दिवस आयलायनर पेन्सिलचा वापर करा थेट जेल अथवा लिक्विड आयलायनर डोळ्यांवर लावू नका. आजकाल बाजारात आयलायनर पेन्सिलचे अनेक प्रकार मिळतात. या पेन्सिल एखाद्या स्केचपेन प्रमाणे तुम्ही तुमच्या पापण्यांवरून ओढून आय लाईन ड्रॉ करू शकता. शिवाय डोळ्यांवर लावण्याआधी त्याची प्रॅक्टिस तुम्ही हातावर करू शकता. त्याचप्रमाणे आधी डोळ्यांच्या कोपऱ्यांवर आयलायनर लावा आणि मग दोन्ही कडा एकमेकांना जोडा. ज्यामुळे तुमचे आयलायनर लावताना ते पसरणार नाही. 

मस्कारा लावताना अशी घ्या काळजी –

डोळ्यांच्या सौंदर्यांत भर घालण्यासाठी आय मेकअप करताना काजळ आणि आयलायनरसोबत मस्काराही तितकाच महत्त्वाचा असते. मात्र नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा ती ही की मस्कारा लावण्यापूर्वीच डोळ्यांवर आयलायनर लावा. कारण जर मस्कारा लावल्यावर तुम्ही आयलायनर लावलं तर तुमचा आय मेकअप खराब होऊ शकतो. शिवाय आयलायनर लावताना डोळे उघडे ठेवा नाही तर तुमचे आयलायनर पसरून खराब होऊ शकते. त्यामुळे परफेक्ट लुक हवा तर ही काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायला हवी. 

ADVERTISEMENT

shutterstock

डोळ्यांचा आकार मोठे दिसण्यासाठी

जर तुमचे डोळे लहान असतील आणि तुम्हाला तुमचे डोळे मोठे दिसावं असं वाटत असेल तर आयलायनर लावताना या काही टिप्स फॉलो करा. डोळे मोठे दिसण्यासाठी सर्वात आधी पापण्यांच्या वरील आणि खालील भागावरील आयलायनरच्या कडा एकमेकांना जोडा. ज्यामुळे डोळ्यांचा आकार मोठा दिसेल. या शिवाय फक्त वॉटर लाईनवर आयलायनर लावू नका कारण इतर भागावर आयलायनर लावल्यामुळे डोळ्यांच्या कडा हायलाईट होतात. लहान डोळे असतील तर डोळ्यांना पांढरे अथवा बेज रंगाचे आयलायनर लावा ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचा आकार मोठा आणि आकर्षक दिसेल. 

आयलायनर कसे निवडाल –

डोळ्यांना योग्य मेकअप करण्यासाठी आयलायनर निवडताना थोडी काळजी घ्यायला हवी. कारण जर तुमचे लहान डोळे असतील तर ते तुम्हाला आय मेकअपने मोठे दिसतील असा मेकअप करावा लागेल. यासाठी आयलायनर नेहमी वॉटर लाईनवर लावा. आय लायनरच्या टिपने तुम्ही पातळ आणि जाड लाईन पापणीवर काढू शकता. त्याचप्रमाणे लहान डोळ्यांना मोठं भासवण्यासाठी नेहमी स्मज प्रूफ, वॉटर प्रूफ अथवा लॉंग लास्टिंग आयलायनरची निवड करा.

ADVERTISEMENT

shutterstock

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

डोळ्यांचे सौंदर्य खुलवणारे आयलायनर शोधत असाल (Best Eyeliners In India In Marathi)

DIY: आयशॅडोपासून तयार करा कलर आयलायनर, फॉलो करा या स्टेप्स

ADVERTISEMENT

उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनर, जे वाढवतील तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य (Waterproof Eyeliner)

12 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT