ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
फुलर ब्रेस्टसाठी सिलिकॉन ब्रा चा नाही तर या ट्रिक्सचा करा वापर

फुलर ब्रेस्टसाठी सिलिकॉन ब्रा चा नाही तर या मेकअप ट्रिक्सचा करा वापर

परफेक्ट फिगर असणं कोणत्या मुलीला आवडत नाही? सगळ्यांनाच परफेक्ट फिगर हवी असते. पण ती सगळ्यांनाच मिळते असं नाही. उंची, फिगर आणि फिट शरीर हे सर्वांनाच हवं असतं. पण प्रत्येक मुलीला ते मिळतंच असं नाही. तर काही जणी आपल्या छातीच्या आकारमुळेही त्रस्त असतात. विशेषतः त्या मुली ज्यांच्या छातीचा आकार लहान असतो आणि त्यामुळे त्यांना पॅडेड ब्रा वापराव्या लागतात. तर काही अभिनेत्रींची फिगर परफेक्ट असते मात्र फोटोशूटदरम्यान त्यांना फुलर ब्रेस्ट दाखवावी लागते. पण तुम्हाला माहीत आहे का अभिनेत्री फुलर ब्रेस्ट (Fuller Breast) कशी दाखवतात. तुम्हालाही लेहंगा घातल्यानंतर अथवा साडी नेसताना फुलर ब्रेस्टचा पर्याय हवा असेल तर तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करा. यामुळे तुमचा लुक अधिक आकर्षक होतो आणि तुम्ही घातलेल्या ड्रेसमध्येही तुम्ही अधिक सुंदर दिसता.

फुलर ब्रेस्टचे सिक्रेट

बऱ्याचदा आपल्याला अनेक अभिनेत्री या फुलर ब्रेस्टमध्ये दिसून येतात.  पण तुम्हाला माहीत आहे का की या अभिनेत्रींची ही फुलर ब्रेस्ट कोणत्याही सिलिकॉन अथवा पॅडेड ब्रा मुळे नाही तर मेकअपमुळे येते.  हो हेच फुलर ब्रेस्टचं सिक्रेट आहे. कोणत्याही पार्टीदरम्यान तुम्हाला फुलर ब्रेस्ट लुक हवा असेल तर तुम्ही योग्य मेकअप  हॅक्सचा वापर करून हा लुक मिळवू शकता. तुम्ही घरच्या घरीही हा फुलर ब्रेस्ट मेकअप करू शकता.  तुम्हाला नियमित मेकअप करायची सवय असेल तर तुम्ही आरामात मेकअपची मदत घेऊन फुलर ब्रेस्ट लुक मिळवू शकता. 

लग्न असो वा साखरपुडा, ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरी मेकअप

फुलर ब्रेस्ट मेकअप म्हणजे काय

ब्रेस्ट मेकअपच्या बाबतीत तुम्ही कदाचित ऐकलं असेल. पण अनेक चित्रपटात, फॅशन शो, टॉक शो दरम्यान जेव्हा तुम्हाला मॉडेल्स आणि अभिनेत्री क्लिव्हेज फ्लॉन्ट करताना दिसतात तेव्हा फुलर ब्रेस्टचा मेकअप त्यांना करण्यात आलेला असतो.  आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की,  इतकी नितळ त्वचा कशी दिसते अथवा सर्व अभिनेत्रींचा लुक अथवा छातीचा आकार व्यवस्थित कसा दिसतो. त्यामागील सिक्रेट म्हणजे याचा योग्यरित्या केलेला मेकअप. त्यामुळेच त्यांचे क्लिव्हेज शार्प दिसून येते आणि त्यांनी घातलेल्या गाऊन अथवा मॉडर्न ड्रेसना अधिक चांगला लुक मिळतो. 

ADVERTISEMENT

लहान डोळ्यांसाठी परफेक्ट आय मेकअप

तुम्हालाही करता येईल असा लुक

मेकअपच्या सहाय्याने तुम्हालाही फुलर ब्रेस्ट लुक नक्कीच करता येईल. यासाठी तुम्हाला तुमच्या स्किन टोन शेड हायलाईटचा वापर करावा लागेल. आपल्या चेहऱ्याच्या स्किन टोनपेक्षा दोन शेड्स लाईट असायला हव्यात. हायलाईट लावण्यापूर्वी शरीरावर मॉईस्चराईज लावणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर आपल्या स्किन टोनला मॅचिंग असणारे फाऊंडेशन अथवा कन्सिलर वापरा. हे व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. जेणेकरून त्वचेवर कोणत्याही तऱ्हेचे पॅच दिसणार नाहीत. गाऊन अथवा कोणताही ड्रेस घालण्यापूर्वी हा मेकअप करून घ्या.  जेणेकरून तुमचे कपडे नंतर मेकअपने खराब होणार नाहीत.  आपल्या त्वचेनुसार योग्य शेड निवडा. अन्यथा दिसायला ते अत्यंत खराब दिसू शकते. तसंच फुलर मेकअप कसा करायचा हे तुम्हाला कळत नसेल तर आम्ही दिलेला व्हिडिओ पाहून तुम्ही हा मेकअप नक्कीच करू शकता. 

सेलिब्रिटीसारखा मेकअप हवा असेल तर वापरा उत्कृष्ट मेकअप उत्पादने

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

02 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT