बिग बॉस

#BBM2 : अभिजीत बिचुकलेला केली सातारा पोलिसांनी अटक

Aaditi Datar  |  Jun 21, 2019
#BBM2 : अभिजीत बिचुकलेला केली सातारा पोलिसांनी अटक

#BBM2 चा दुसरा सिझन त्याच्या लाँचपासूनच चर्चेचा विषय ठरत आहे. आधी निवडणुकांमुळे लाँच लांबणीवर गेल्यामुळे हा सिझन चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर घरातील सदस्यांमधील वाद टोकाला गेले. आता भर पडली आहे ती बिग बॉसच्या घरातील सदस्याला झालेल्या अटकेची. हो…पहिल्यांदाच बिग बॉसच्या इतिहासात अशी घटना घडली आहे की, एखाद्या सदस्याला पोलिसांनी अटक केली आहे. घरातील सदस्य अभिजीत बिचुकलेला शुक्रवारी सातारा पोलिसांनी अटक केली.  

का करण्यात आली बिचुकलेला अटक

हो…हे खरं आहे की, अभिजीत बिचुकलेला शुक्रवारी सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीने अटक केली. पण ही अटक बिग बॉसमधील वक्तव्य किंवा त्यांच्याविरोधात भाजपच्या माजी नगरसेविकेने केलेल्या मागणीमुळे झालेली नसून हे प्रकरण आहे चेक बाऊंस झाल्याचं. साताऱ्यातील तब्बल 35 हजाऱ्यांच्या बिचुकले यांनी दिलेल्या चेक बाऊन्स प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 138 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणी त्यांना अटक झाली आहे. साताऱ्यातील पोलिसांच्या एक पथकाने सातारा पोलीस अधीक्षकांचे पत्र आणि कोर्टाचे नॉन बेलेबल वॉरंट आणून बिचुकलेला अटक केली.

Also Read : सनी लिओन सामाजिक कार्य

Instagram

बिचुकले सतत वादाच्या भोवऱ्यात

टास्क असो वा नसो बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमधील सदस्य सतत काही ना काही वाद करताना आढळतात. असाच वाद अभिजीत बिचुकले आणि रूपाली भोसले यांच्यात मंगळवारच्या एपिसोडमध्ये झाल्याचं दिसलं होतं. त्यामध्ये त्यांनी केलेली विधानं बिग बॉसला म्यूट करावी लागली. या संपूर्ण वादातील स्त्रियांविरोधी केलेल्या वक्तव्यांमुळे त्याला चक्क घराबाहेरुन काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी थेट मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली होती. एका भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे हीने मागणी केली होती.

Instagram

या आधीही बिचुकले यांचे पहिल्या दिवसापासून घरातील सदस्य शिवानी सुर्वे हिच्याशी वाद सुरूच होते. ती गेल्यावरही बिचुकलेंवर घरातील सदस्यांची टीका सुरूच होती. त्यातच आता हे अटक प्रकरण समोर आलं आहे.

कोण आहे अभिजीत बिचुकले?

Instagram

बिग बॉसच्या सिझन 2 चा कविमनाच्या नेत्याचा प्रोमो आल्यावर सर्वांना वाटलं की, खासदार रामदास आठवले बिग बॉसमध्ये येणार का, अशी चर्चा होती. पण समोर चेहरा आला तो साताऱ्याच्या अभिजीत बिचुकलेचा.  बिचुकलेने आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मूळच्या साताराच्या असलेल्या बिचुकलेने आतापर्यंत नगरसेवक ते अगदी राष्ट्रपतीपदापर्यंतची निवडणुक लढवली आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना देखील त्याने खुले आव्हान दिल्याचं ऐकिवात आहे. एकूण 20 वेळा निवडणुक लढवूनही तो एकदाही जिंकलेला नाही. असं म्हणतात की, त्याने स्वत:ला 2019 साली मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असल्याचं पोस्टरदेखील लावल्याची चर्चा आहे.

बिग बॉसचा दुसरा सिझन ठरतोय वादग्रस्त

बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमधून आधी शिवानीला बाहेर जावं लागलं आणि आता बिचुकलेला अटक करण्यात आली. या सिझनमधील सदस्य प्रत्येक बाबतीत वाद घालताना दिसत आहेत. त्यातच आता अटक प्रकरणामुळे टीआरपीवर नक्कीच परिणाम होणार आहे. यापुढे आता या शोमध्ये काय घडणार याची उत्सुकता आहे. तुम्हाला काय वाटतं या अटक प्रकरणावरून बिग बॉसमध्ये पुढे काय होईल? शिवानीची घरात पुन्हा परत येईल का? 

हेही वाचा –

#BBM2 मध्ये बिचुकलेनंतर नवा टार्गेट होतोय सेट

#BBM2 : बिग बॉसच्या घरातली शाळा

उतरन फेम रश्मी देसाईचा बिग बॉस 13 मध्ये भाग घेण्यास नकार

Read More From बिग बॉस