xSEO

द वरून मुलींची नावे | D Varun Mulinchi Nave

Vaidehi Raje  |  May 16, 2022
D Varun Mulinchi Nave

नावाच्या पहिल्या अक्षराचा मुलीच्या आयुष्यावर खूप परिणाम होतो. पहिले अक्षर व्यक्तीचा स्वभाव देखील दर्शवते. नावाच्या पहिल्या अक्षराचा मुलीच्या आयुष्यावर केवळ नकारात्मकच नाही तर सकारात्मक प्रभावही पडतो. मुलीमध्ये कोणती वैशिष्ट्ये आहेत आणि कोणते गुण आहेत, हे सर्व नावाच्या पहिल्या अक्षरावर अवलंबून असते असे ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञ सांगतात. नावाच्या पहिल्या अक्षराचा मुलीच्या आयुष्यातील सर्व पैलूंवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळेच बाळाचे नाव ठेवताना खूप विचार करून ठेवले जाते कारण हे नाव बाळाच्या संपूर्ण आयुष्यभरासाठी असते. साधरणपणे जर तुमच्या बाळाच्या पत्रिकेनुसार  नावाचे आद्याक्षर ‘द’ आले असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार बाळाची रास मीन असेल. हल्ली बरेच लोक राशीनुसार जे अक्षर आले आहे ते एक पाळण्यातले नाव ठेवतात आणि आईवडिलांच्या नावावरून बाळाचे दुसरे नाव ठेवतात जे एरवी हाक मारण्यासाठी व व्यवहारांसाठी वापरले जाते. 

नावाच्या सर्व अक्षरांना काही ना काही अर्थ असतो पण नावाचे पहिले अक्षर सर्वात प्रभावशाली मानले जाते. असे म्हणतात की तुमचे नाव ज्या अक्षराने सुरू होते त्या अक्षरात सर्वाधिक ऊर्जा असते. तुमच्या बाळाचे आद्याक्षर द आले असेल किंवा तुम्हाला द वरून बाळाचे नाव (D Varun Mulinchi Nave Marathi) ठेवायचे असेल तर याठिकाणी द वरून मुलींची नावे दिलेली आहेत. तुम्हाला नाव ठरवण्यास सोपे जावे म्हणून येथे नावाचा अर्थ देखील दिला आहे. यापैकी एखादे नाव तुम्हाला तुमच्या परीसाठी नक्कीच आवडेल. तुमच्या मुलींसाठी रॉयल मराठी नावे शोधत असाल तर खाली वाचा.

द वरून मुलींची नावे – D Varun Mulinchi Unique Nave

द वरून मुलींची नावे

जर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव द अक्षरावरून ठेवण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही तुमच्या मुलीसाठी पूर्णपणे वेगळे असे नाव शोधत असाल तर ही यादी नक्की पहा. या यादीत छान छान नावे अर्थासकट दिलेली आहेत. तुमच्या घरात जुळ्या बाळांच्या रूपाने दुप्पट आनंद आला असेल तर जुळ्या मुलींची युनिक नावे तुमच्यासाठी खास निवडली आहेत.

नाव नावाचा अर्थ 
दामिनी वीज 
देवी देवी 
दिया दिवा 
दैवी पवित्र 
दीपा प्रकाश, दिवा 
दक्षाहुशार 
दिती तेज 
दर्या समुद्र 
दिता देवी लक्ष्मी 
दिना दैवी 
देवकी श्रीकृष्णाची आई 
दाक्षायणी देवी पार्वती 
देविना प्रभावशाली 
ज्ञानदा ज्ञान देणारी 
ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका 
दिव्या दुर्गा देवी 
दुर्गा देवी पार्वतीचे एक रूप 
दुर्गेश्वरी दुर्गा देवी 
द्रिती  धैर्य 
दीक्षा देवाकडून मिळालेली भेट 
द वरून मुलींची नावे

अधिक वाचा – य वरून मुलींची नावे

द वरून मुलींची नावे मराठी – D Varun Mulinchi Nave Marathi

द वरून मुलींची नावे

प्रत्येकालाच आपल्या लाडक्या लेकीसाठी एक सुंदर आणि खास नाव हवे असते. तुम्हीही लाडक्या लेकीसाठी द अक्षरावून छानसे नाव शोधत असाल तर खालील लिस्ट वाचा. यातले एखादे नाव नक्कीच तुमच्या पसंतीस उतरेल. 

अधिक वाचा – ‘प’ वरुन मुलींची नावे जाणून घ्या

दित्या दुर्गा देवीचे एक नाव 
दुर्वा गणपतीला वाहिली जाणारी एक पवित्र व औषधी वनस्पती   
द्रुवा पवित्र 
दुर्वी तारका 
दनिका चांदणी 
दवाणी मंजुळ आवाज 
दारिका कन्या 
दर्शा दृष्टि 
दैवीका दैवी ऊर्जा 
दामिता राजकन्या 
दातिनी दान करणारी 
दिप्तातेजस्वी, चमकणारी 
दीप्ती तेजस्वी 
देष्णा देवाकडून मिळालेली भेट 
देविका दैवी 
देवीरा पृथ्वी 
देहिनी पृथ्वी 
देसीहा आनंदी 
देवशा देवाचा अंश असलेली 
दुलारी प्रिय 
द वरून मुलींची नावे

अधिक वाचा – व वरून मुलींची नावे मराठी, अर्थासह घ्या जाणून

द वरून मुलींची नावे

हल्ली नव्या पालकांना आपल्या बाळांसाठी तीच ती कॉमन जुनी नावे नको वाटतात. आई-बाबा आपल्या लाडक्या बाळासाठी एखादे युनिक पण सुंदर अर्थाचे नाव शोधत असतात. तुम्हाला जर द वरून मुलींची ट्रेंडिंग नावे हवी असतील तर आम्ही तुमच्यासाठी ही लिस्ट तयार केली आहे. यातले एखादे नाव तुमच्या छोटुकलीला नक्कीच शोभून दिसेल. 

दितीका सावधान असणारी 
दीक्षितादीक्षा घेतलेली , निष्णात 
दुहिता कन्या 
दर्पणा आरसा 
दिपाली दिव्यांची रांग 
देवांशी देवांचा अंश असलेली 
देवंती देवांचा अंश असलेली 
देवांगी दैवी 
देवस्वी दुर्गा देवी 
देलिना सुंदर 
देवेशि दुर्गा देवी 
देवमाला हार 
देवयानी देवीसारखी 
द्वितीया दुसरी 
द्रुविकाचांदणी 
दक्षिता सुंदर 
दुर्गेशी दुर्गा देवी 
दर्शिका हुशार 
दीपशिखा दिशा दाखवणारी 
दर्शिनी सुंदर 
द वरून मुलींची नावे

अधिक वाचा – ‘थ’ वरून मुलींची नावे, युनिक आणि अर्थपूर्ण

द वरून मुलींची नावे

तुमच्या बाळाचे आद्याक्षर जर द आले असेल तर ही यादी वाचा आणि यातले एखादे छानसे नाव तुमच्या लाडक्या लेकीसाठी फायनल करा. या यादीत द वरून मुलींची प्रसिद्ध नावे दिलेली आहेत. यातील काही नावे देवीची आहेत त्यामुळे त्यांचा अर्थ देखील सुंदर आणि पवित्र आहे. 

दया करुणा
दिनेशा सूर्यदेवता 
दयावती दयाळू 
दिपाक्षी तेजस्वी डोळ्यांची 
देवकन्या दैवी 
दीपांती प्रकाशाचा किरण 
दानेश्वरी लक्ष्मी देवी / अन्नपूर्णा / दान देणारी 
देवर्षीनी देवतांची गुरु 
दिपान्वितादीपावली 
दिग्विजयी जग जिंकणारी 
दिगंबरी देवी 
दमयंती राजकन्येचे नाव 
देवस्मिता देवाचे हास्य 
द्रौपदी द्रुपद राजाची कन्या 
देववामिनी भारद्वाजाची कन्या 
दर्पणीका लहान आरसा 
दक्षिण्या पार्वती 
दिविजा देवीसारखी सुंदर 
द्विजा लक्ष्मीसारखी 
दिशानी चारही दिशांची स्वामिनी 
द वरून मुलींची नावे

अधिक वाचा – श’ वरून मुलींची नावे, साजेशी आणि अर्थपूर्ण

द वरून मुलींची सुंदर नावे – D Varun Mulinchi Sundar Nave 

द वरून मुलींची नावे

तुमच्या छोट्याश्या सुंदर बाहुलीसाठी द अक्षरावरून तिला शोभेल असे सुंदर नाव तुम्ही शोधत असाल तर पुढील यादी नक्कीच तुमच्या मदतीस येईल. या यादीत द वरून मुलींची सुंदर नावे खास तुमच्यासाठी निवडली आहेत. यातले तुमच्या आवडीचे सुंदर नाव तुमच्या बाळासाठी फायनल करा. 

दृसीला सामर्थ्यवान 
दृष्या दृष्टी 
दृष्टी नजर 
दुर्वानीका प्रिय असलेली 
दनवी दानशूर 
दिव्यनयनी सुंदर डोळ्यांची 
दक्षकन्या सती 
दारणी देवी पार्वती 
दक्षिणा दान 
दर्शना अवलोकन 
दर्शिता बघणे/ प्रदर्शन 
दयामयी दयाळू 
दीना देवी 
दीपल प्रकाश 
दीपकला दुपारनंतरची वेळ 
दीपान्निता तेजाची स्वामिनी 
दीपिका प्रकाश 
देवाहुतिमनुची एक कन्या 
देवकली संगीतातील एक राग 
देवश्री लक्ष्मी देवी 
द वरून मुलींची नावे

बाळासाठी नाव ठेवणे म्हणजे सोपे काम नव्हे. त्यासाठी खूप विचार करावा लागतो कारण हा बाळासाठी तुम्ही घेत असलेला पहिला महत्वाचा निर्णय असतो. तुम्ही निवडलेले नाव बाळासाठी जन्मभर पुरणार असते. त्यामुळे बाळासाठी नाव निवडतात त्याचा अर्थ देखील लक्षात घ्या. तुमच्या बाळाचे आद्याक्षर द आले असेल तर वर द वरून मुलींची नावे दिलेली आहेत. त्यातील काही सुंदर नावे तुमच्या लेकीसाठी शॉर्टलिस्ट करा आणि तुमच्या गोड लेकीचे छानसे गोड नाव ठेवा. 

Photo Credit – istockphoto . pexels

अधिक वाचा – ल वरून मुलींची नावे

N Varun Mulinchi Nave

Read More From xSEO