आरोग्य

गर्भाचे वजन वाढण्यासाठी पोषक आहार (Food To Increase Fetal Weight During Pregnancy)

Trupti Paradkar  |  Aug 13, 2020
Food To Increase Fetal Weight During Pregnancy In Marathi

गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील एक खास टप्पा असतो. याकाळात तिला सर्वजण अनेक गोष्टींचे सल्ले देत असतात. प्रेगंन्सीमध्ये काय खाऊ नये आणि काय खावं याबाबत अनेक समज गैरसमज आहेत. मात्र जर तुमच्या बाळाची वाढ गर्भात योग्य पद्धतीने व्हावी आणि त्याच्या शरीर, बुद्धीचा योग्य विकार व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा आहार अगदी परफेक्ट असणं गरजेचं आहे. कारण गर्भाचा विकास हा तुम्ही घेत असलेल्या आहारावरच अवलंबून असतो. जर तुम्ही पोषक आहार घेतला तरच तुमच्या पोटातील बाळाला पोषकतत्व मिळू शकतात. यासाठीच तुमच्या आहारात हे पदार्थ समाविष्ठ करा ज्यामुळे बाळाची योग्य वाढ आणि विकास होऊ शकेल. 

दूध (Milk)

Shutterstock

एका नुकत्याच केलेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, गरोदर स्त्रीने बाळाच्या वाढीसाठी दिवसभरात कमीत कमी पाव लीटर ते अर्धा लीटर दूध घेणं गरजेचं आहे. कारण याचा तुमच्या गर्भावर चांगला परिणाम होतो. दूधात फक्त चांगले प्रोटिन्स असतात असं नाही तर त्यात कॅलशियमही भरपूर असतं. ज्यामुळे तुमच्या बाळाची हाडांचा आणि दातांचा योग्य विकास होऊ शकतो. दूध नेहमी त्यात काहीनी न टाकता घ्यावं. पण जर तुम्हाला दूधाचा वास सहन होत नसेल तर तुम्ही ते मिल्कशेक, ओट्स अशा माध्यमातूनही घेऊ शकता. 

Shutterstock

दही अथवा योगर्ट (Yogurt)

दूध आणि दुधापासून तयार केलेलं दही अथवा योगर्टही तुमच्या गर्भाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतं. जेवणासोबत दररोज एक वाटी दही घेणं तुमच्या नक्कीच फायद्याचं आहे. कारण यातील प्रोटिन्स तर तुमच्यासाठी गरजेचे आहेतच शिवाय यातील लॅक्टिक अॅसिडमुळे आतड्यांसाठीही ते फायदेशीर ठरतं. तुम्ही नुसतं दही अथवा दह्यापासून केलेला रायता, कोशिंबीर, लस्सी, ताक नक्कीच घेऊ शकता. 

वाचा – नॉर्मल डिलिव्हरीसाठी सोपे आणि परिणामकारक उपाय

Shutterstock

पनीर अथवा चीझ (Paneer Or Cheese)

पनीर आणि चीझमधुनही तुमच्या बाळाला पुरेसे प्रोटिन्स मिळतात. पन्नास ग्रॅम पनीर अथवा चीझ हे एक ग्लास दूधाइतकेच पोषक असते. तुम्ही यापासुन तयार केलेले पास्ता, सॅंडविच, सलाड अथवा पराठा नक्कीच खाऊ शकता. पण जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर आहारात चीझचे प्रमाण मर्यादित ठेवा. पण अस असलं तरी तुम्ही लो फॅट पनीर मात्र नक्कीच आहारातून घेऊ शकता. 

फळभाज्या (Fruits)

भाज्यांमधून तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचे पोषक घटक मिळू शकतात. त्यामुळे निरनिराळ्या रंगाच्या आणि ताज्या भाज्या आहारात समाविष्ठ करा. ज्यातून तुम्हाला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळेल. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुमच्या आहारात भाज्यांचा समावेश असणं नक्कीच गरजेचं आहे. 

Shutterstock

कडधान्य (Cereals)

तुम्ही शाकाहारी असा अथवा विगन तुम्ही तुमच्या आहारात कडधान्य नक्कीच समाविष्ठ करू शकता. कारण यातून तुमच्या बाळाला पुरेसे प्रोटिन्स मिळतील. शिवाय यात मुबलक प्रमाणात लोह, फॉलिक अॅसिड आणि फायबर्स असतात जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठीच एक दिवस आड आहारातून कडधान्य जरूर घ्या.

डाळींचे प्रकार (Types Of Pulses)

महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमध्ये डाळींचे विविध प्रकार तुम्हाला नक्कीच मिळतील. त्यामुळे दररोज एक वाटी डाळ अथवा डाळीचे सूप तुम्ही नक्कीच पिऊ शकता. भाज्यांचे आणि डाळींचे अप्रतिम मिश्रण तुमच्या बाळाला सृदृढ आणि सशक्त करेल. 

Shutterstock

सोयाबीन (Soyabean)

सोयाबीनही गरोदर महिलांसाठी एक महत्त्वाचा अन्नपदार्थ आहे. सोयाबिनचा वापर यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या डाएटमध्येही केला जातो. सोया नगेट, सोया मिल्क, टोफू यांमध्ये पुरेसं लोह, कॅलशियम असतं. करण्यासाठी सोपं आणि पचनासाठी हलकं असलेलं सोयाबीन तुमच्या बाळासाठी पोषक आहे हे नेहमी लक्षात ठेवा.

शेंगभाज्या (Peanuts)

तुम्ही शेंगा सुकवून अथवा ताज्या अशा कोणत्याही प्रकारे खाऊ शकता. कारण मटार, चवळी अशा शेंगामधून तुम्हाला फक्त प्रोटिन्सच मिळतात असं नाही तर यातून तुम्हाला बी कॉम्लेक्स व्हिटॅमिन, फॉलिक अॅसिड, लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबेही मिळतं. गरोदर माता आणि तिच्या गर्भाच्या वाढीसाठी हे आहारात असणं नक्कीच योग्य आहे. शेंगभाज्यामधील फायबर्समुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास कमी जाणवतो.

चिकन (Chicken)

जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुमच्या आहारात तुम्ही चिकनचा समावेश नक्कीच करू शकता. कारण चिकनमधून योग्य प्रमाणात प्रोटिन्स मिळतात. मांसामधील प्रोटिन्स तुमच्या बाळाच्या पेशींच्या आणि स्नायूंच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. शिवाय यामुळे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनही नियंत्रणात राहते. बाळ सशक्त व्हावं यासाठी चिकन नक्कीच खा. मात्र ते जास्त मसालेदार अथवा तेलकट न करता कमी तेलात शिजवून अथवा उकडून खा. 

मासे (Fish)

माशांमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी अॅसिड तुमच्या बाळाच्या विकासासाठी गरजेचं असतं. यामुळे तुमच्या बाळाच्या मेंदूची वाढ आणि विकास होतो. तुम्ही गरोदरपणात जास्त प्रोटिन्स असलेले कोणतेही मासे खाऊ शकता. मासे फ्राय करून खाण्यापेक्षा ते सारातून अथवा उकडून खा. 

अंडे (Eggs)

जर तुम्ही शाकाहारी असाल तर प्रोटिन्ससाठी तुम्ही अंडेही खाऊ शकता. शिवाय तुम्हाला यातून व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि लोहदेखील मिळेल. अंड्यामधील प्रोटिन्स हे इतर गोष्टींमधून मिळणाऱ्या प्रोटिन्सपेक्षा सर्वोत्तम असतात. कारण त्यांच्यामध्ये प्रोटिन्ससोबत व्हिटॅमिन आणि मिनरल्सही उपलब्ध असतात. बाळामध्ये कोणतेही व्यंग निर्माण होऊ नये यासाठी गरोदर महिलांना अंडे खाण्याचा सल्ला दिला जातो. 

Shutterstock

पालेभाज्या विशेषतः पालक (Leafy Vegetables Like Spinach)

पालेभाज्या गरोदर महिलांनी अवश्य खाव्यात कारण त्यातून त्यांना पुरेशा प्रमाणात मिळते. लोहाचे पुरेसे प्रमाण पालकमध्ये मिळते म्हणून प्रेगनन्सीमध्ये पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. पालकमध्ये फॉलिक अॅसिडही भरपूर असते. गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठी हे अतिशय महत्त्वाचे असते. पालकचा समावेश आहारात असेल तर बाळाला आजारपण येण्याचा धोका कमी होतो. शिवाय यातील व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटि ऑक्सिडंटमुळे बाळ योग्य प्रमाणात वाढते. 

ब्रोकोली (Brocolli)

ब्रोकोली गरोदर महिलांनी जरूर खावी. कारण त्यामध्ये लोह, बिटा कॅरोटिन आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के मुबलक असते. तुम्ही ब्रोकोली सूप, सलाड अथवा स्मूदीच्या स्वरूपात खाऊ शकता. 

Shutterstock

कंदमुळे (Roots Vegetables)

गाजर, बटाटा, बीट अशा कंदमुळाचाही गरोदर महिलांच्या आहारात समावेश असणं गरजेचं आहे. कारण यामध्ये बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन ए असे पोषक घटक असतात. जे तुमच्या बाळाचे डोळे, फुफ्फुसे आणि त्वचेच्या विकासासाठी फायदेशीर आहेत. 

Shutterstock

आंबट फळे (Sour Fruit)

संत्र्यांसारख्या व्हिटॅमिन सी युक्त आंबट फळांचा तुम्ही आहारात समावेश करायलाच हवा. कारण यातून तुम्हाला फॉलिक अॅसिड पुरेश्या प्रमाणात मिळू शकते. फळांमधील फायबर्समुळे तुमच्या अपनचाच्या समस्या कमी होतात. शिवाय व्हिटॅमिन सी आणि लोहमुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यासाठीच गरोदरपणी आवळा, संत्रे, बेरीज अशी फळे जरूर खा. 

Shutterstock

सुकामेवा (Nuts)

बदाम, शेंगदाणे अशा सुकामेव्यामध्ये झिंक, लोह, तांबे, फॉलिक अॅसिड भरपूर असते. दोन जेवणांच्या मध्ये तुम्ही सुकामेवा खाऊ शकता. कारण यातून तुम्हाला योग्य प्रमाणात प्रोटिन्स, हेल्दी फॅट्स मिळतात. जे तुमच्या बाळाच्या वजनासाठी नक्कीच उपयोगी आहेत. जर तुमच्या बाळाचं वजन योग्य प्रमाणात नसेल तर तुम्हाला या गोष्टींचा समावेश तुमच्या आहारात करायला हवा. 

Shutterstock

2 वर्षाच्या बाळाचा आहार

गर्भाची वाढ आणि विकासाबाबत प्रश्न (FAQ’s)

1. गर्भाचे वजन किती आहे हे समजणं गरजेचे आहे का ?

होय, कारण गर्भधारणा झाल्यापासून प्रत्येक आठवड्याला गर्भाची वाढ आणि विकास होत असतो. त्यानुसार त्याचे क्रमाक्रमाने वजन वाढत असते. या वजनावरून बाळाची वाढ, बाळाचा आहार आणि त्याचा शरीराचा विकास होत असल्याचे अनुमान काढले जाते. म्हणूनच गर्भातील बाळाचे वजन योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे. 

2. गर्भाच्या वजनवर लक्ष ठेवणे कधीपासून सुरू करावे ?

डॉक्टर गरोदर महिलांची अल्ट्रा सोनोग्राफी करतात तेव्हा गर्भाचे वजनही कळत असते. त्यामुळे त्यांना गर्भाच्या आकारावरून अंदाजे त्याचे वजन किती असेल याचा अनुमान काढला जातो. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सोनोग्राफी करता तेव्हा तुम्हाला तुमच्या बाळाचे वजनही समजते. 

3. कोणते पदार्थ गरोदपणात खाऊ नये ?

अननस, पपई अशी फळे, हळद आणि खजूर सारखे गरम पदार्थ, कच्चे अंडे अथवा न शिजवलेले कच्चे मांस, मद्यपान अथवा कॅफेनयुक्त पदार्थ गरोदपणात टाळणे खूप गरजेचे आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

अधिक वाचा –

जाणून घ्या गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते (Stages Of Pregnancy In Marathi)

आई व्हायचयं? मग तुम्हाला माहीत हवा गर्भधारणेचा योग्य काळ (Ovulation Symptoms In Marathi)

गर्भपात टाळण्यासाठी घेण्याची विशेष काळजी (Miscarriage Symptoms In Marathi)

5 महिन्याच्या बाळाचा आहार

Read More From आरोग्य