लाडक्या आजीचा वाढदिवस म्हणजे एकदम खास दिवस असतो. जी आजी तिचा सगळा वेळ आणि प्रेम आपल्याला देत असते, जी सतत आपलं कौतुक करत असते त्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Aaji Birthday Wishes In Marathi) अत्यंत खास असले पाहिजेत. आपली आजी म्हणजे आपली दुसरी आईच असते आणि आपल्याला तिच्याबद्दल खूप कृतज्ञ वाटले पाहिजे. ज्या नातवंडांना आजी-आजोबांचे प्रेम मिळते त्यांचे बालपण खूप सुखात जाते.
Table of Contents
- Happy Birthday Aaji Wishes In Marathi | आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
- Special Birthday Wishes For Grandmother In Marathi। आजीच्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा
- Happy Birthday Aaji In Marathi From Grand Daughter । आजीला नातीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Happy Birthday Aaji Wishes From Grandson । आजीला नातवाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये
- कुटुंबाकडून आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश । Birthday Wishes for Grandmother From Family in Marathi
विशेषत: अशा दिवसात जेव्हा आई-बाबा त्यांच्या कामात खूप व्यस्त असतात आणि इच्छा असून देखील आपल्याबरोबर वेळ घालवू शकत नाहीत तेव्हा आपले आजी-आजोबा आपल्यासाठी धावून येतात आणि आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आपण आपल्या आजीचा विशेष प्रकारे सन्मान केला पाहिजे आणि तिच्या वाढदिवसानिमित्त तिला खास शुभेच्छा देऊन तिचा दिवस आणखी खास केला पाहिजे. खरं तर आपल्या आजी-आजोबांवर आपले प्रेम असतेच. पण ते कधी शब्दांत व्यक्त करणेही गरजेचे असते. नुसतं Happy Birthday Aaji अशा शुभेच्छा देण्यापेक्षा तुमच्या गोड आजीसाठी तितक्याच गोड आणि हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा (Happy Birthday Wishes For Grandmother In Marathi ) निवडा आणि तिला त्यांच्या नातवंडांचा विशेष अभिमान वाटण्याची संधी द्या.
Happy Birthday Aaji Wishes In Marathi | आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
आपला वाढदिवस हा वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे हा दिवस प्रत्येकासाठीच खास असतो. या दिवशी संपूर्ण दिवस तुमच्या प्रियजनांबरोबर साजरा करावा असे आपल्याला वाटते. आपला वाढदिवस असला की घरचे आपल्यासाठी तो दिवस खास बनवण्यासाठी विशेष कष्ट घेतात. मग आपणही तेच करायला हवे नाही का? या वर्षी, तुमच्या आजीचा वर्षातील सर्वात खास दिवस आणखी आनंदात जावा म्हणून खाली दिलेल्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Happy Birthday Wishes For Grandmother In Marathi) यातून एखादा खास मेसेज निवडा.
-माझी प्रिय आजी, आजच्या दिवसाप्रमाणे तू नेहमी आनंदी आणि निरोगी रहावे अशी माझी देवाकडे प्रार्थना! माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
-प्रिय आजी, मला आठवतंय तेव्हापासून तू माझी डोळ्यात तेल घालून काळजी घेतलीस आणि मला तुझ्या मऊ उबदार कुशीत घेऊन खूप प्रेम दिलेस. सायीसारख्या मऊ आणि साखरेसारख्या गोड अश्या माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
-आजी, जेव्हा मी तुझ्या सुंदर व प्रेमळ डोळ्यांकडे पाहतो तेव्हा मला एक अनुभवी स्त्री दिसते जिने कायम मला प्रेम दिले आणि वाईट गोष्टींपासून माझे रक्षण केले! वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी!
-प्रिय आजी, तू मला कसे जगावे आणि प्रेम कसे करावे हे शिकवले! मला तुझा खूप अभिमान आहे. तुझा दयाळूपणा, प्रेम आणि शहाणपण हे गुण माझ्यात देखील यावेत असा मला आशीर्वाद दे. आजच्या या खास दिवशी मी हीच प्रार्थना करतो की देव तुला निरोगी आणि सुखी आयुष्य देवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नमस्कार आजी!
-आजी ही मुलांसाठी दुसरी आई असते. आमच्यासाठी तू आमची आई, बहीण आणि मैत्रीणही झालीस. तुझी नातवंड झाल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी!
-आजी, इतकी वर्षे आम्हाला जो गोड गोड खाऊ करून खायला घालते आहेस, तू त्या लाडवांपेक्षाही जास्त गोड आहेस. तुझा सहवास आणि तुझे प्रेम असेच आम्हाला आणखी शंभर वर्षे मिळो. तुझे पुढचे आयुष्य निरोगी आणि सुखी असो हीच देवाकडे प्रार्थना आहे. Happy Birthday Aaji!
-जेव्हा जेव्हा मला गरज होती तेव्हा तू नेहमीच माझ्यासाठी उभी राहिलीस. जेव्हाही माझ्या डोळ्यात पाणी आले, तेव्हा तू नेहमीच तुझ्या कुशीत घेऊन मला प्रेमाने समजावले. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी, तुझे प्रेम कायम मला मिळत राहो हीच प्रार्थना!
-तू जगातील सगळ्यात बेस्ट आजी आहेस. जर मला नवीन आजी निवडण्याची संधी मिळाली तर मी पुन्हा पुन्हा तुलाच निवडेन! आजी, तू माझ्यासाठी प्रेरणा आहेस. तुझ्या अनुभवाच्या शिदोरीने तू मला शहाणे केलेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी.
-कोणतीही भेटवस्तू तुझ्यावरचे माझे प्रेम व्यक्त करू शकत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी!
-तुझ्या प्रेमळ हसूइतकी जगात दुसरी कुठलीच सुंदर गोष्ट नाही.माझ्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
-प्रिय आजी, क्युटपणा आणि प्रेमळ स्वभावाच्या बाबतीत तुझी बरोबरी कुणीच करू शकत नाही. आम्ही सगळे तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो आणि तुला आणखी शंभर वर्षांचे निरोगी व सुखी आयुष्य लाभो हीच मनोकामना! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी..
वाचा – भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Special Birthday Wishes For Grandmother In Marathi। आजीच्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा
आपली आजी आपल्यावर जितके प्रेम करते आणि जितकी काळजी घेते तितकी कोणीही घेत नाही. ती नेहमीच आपल्या आवडीचा खाऊ करते ,आपल्यासाठी तिच्याकडे वेळ असतो आणि कायम आपल्या आवडीच्या वस्तू आपल्याला भेट म्हणून देते., म्हणूनच तुम्ही तिला तिच्या वाढदिवसासाठी असेच खास काही करू इच्छित असाल तर आजीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा (Aaji Birthday Wishes In Marathi) देऊन तुम्ही तुमच्या आजीवरचे प्रेम व्यक्त करू शकता. ती तुमच्यासाठी किती खास आहे आणि तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे हे तुम्ही या संदेशांद्वारे तिच्यापर्यंत पोहोचवू शकाल. असेच जर लाडक्या वडिलांचा वाढदिवस असेल तर त्यांनाही खास शुभेच्छा तुम्ही देऊ शकता.
-आजी, तू आमच्यासाठी खूप काही करतेस, आमच्यावर किती प्रेम करतेस. तुझ्या अनुभवी सल्ल्याने आयुष्य बदलते, तू आमची किती काळजी घेतेआजी, तुझ्या खास दिवसासाठी एकच इच्छा ,तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा
-तुझ्या सगळ्यात आवडत्या नातवाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आजी…सगळ्यांसमोर कदाचित तू मान्य करणार नाहीस, पण मीच तुझा सगळ्यात लाडका आहे.
-तू मला सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी एक शिकवण होती. तू दिलेल्या शिकवणीमुळे मी तुझ्यासारखीच चांगली आणि दयाळू व्यक्ती होण्याचा प्रयत्न करतोय.तू मला जे काही शिकवले त्याबद्दल धन्यवाद! आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
-आजी, आपण एकत्र घालवलेला प्रत्येक दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे. तू मला तुझे प्रेम आणि तुझ्या अनुभवाची शिदोरी दिली आणि मला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली. जगातल्या सगळ्यात बेस्ट आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
-तुझ्या माझ्यावरच्या प्रेमाची मी इतर कोणाशीही तुलना करू शकत नाही. तुझ्यासारखी आजी मिळाल्याने मी धन्य आहे. तू माझी आई झालीस, वेळेला गुरु झालीस आणि थोडीशी मैत्रीणही झालीस ! तू माझ्यासाठी देवाने पाठवलेली एक देवदूत आहेस जी माझ्या कठीण काळात माझे रक्षण करते. वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी!
-माझी प्रिय आजी, तुझ्याकडे कायम माझी बडबड ऐकण्यासाठी, माझ्याशी खेळण्यासाठी, बोलण्यासाठी, माझ्याबरोबर हसण्यासाठी वेळ होता. माझ्यासाठी तुझे दरवाजे नेहमीच खुले होते. माझा विश्वास आहे की तुला देवानेच माझ्यासाठी पाठवले आहे. माझ्या गोड आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
-आजी, तू सगळ्या कुटुंबाला जोडून ठेवणारा एक मऊ पण मजबूत रेशमी धागा आहेस. तुझ्याशिवाय या कुटुंबाची कल्पनाही आम्ही करू शकत नाही. देव तुला आणखी शंभर वर्षांचे आयुष्य देवो. वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा आजी!
-मायेचा, प्रेमाचा अखंड स्रोत असलेल्या माझ्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा! आजी, तुझ्या प्रेमामुळे माझे बालपण व संपूर्ण आयुष्यच आनंदाने भरून गेले आहे.
-आजी, तू म्हणतेस की तुझं वय झालेय, पण तुझा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. आमच्या आनंदाच्या झऱ्याला , प्रेमाच्या सागराला वाढदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा!
-माझ्या गोड आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.तुझ्या गोड स्वभावापुढे गोड लाडू, पेढे, केक आणि चॉकलेटही फिके आहेत. तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात गोडवा भरून राहिला आहे.
Happy Birthday Aaji In Marathi From Grand Daughter । आजीला नातीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
आजीसाठी तिची नात म्हणजे तिची एक छोटीशी मैत्रीण असते. नातीला हौसेने नटवणे, तिला प्रेमाने खाऊ घालणे ते तिच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेणे असा महत्वाचा रोल आजी निभावते. म्हणूनच आजी व नातीचे नाते खूप स्पेशल असते.
-आई-वडिलांसोबत ज्या आजीनेही
मला खूप प्रेमाने वाढवले
आज वाढदिवस आहे त्या आजीचा
जिने मला लहानपणापासून पडताना सावरले
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी!
मी जेव्हा आजीचे सुरकुतलेले हात माझ्या हातात घेते
तेव्हा मला माझे बालपण आठवते
असं वाटतं त्या रम्य बालपणात परत जावं
आणि आजीच्या उबदार कुशीत गोष्टी ऐकत झोपावं!
Happy birthday Aaji!
– प्रत्येक कामात तुझी स्फूर्ती आणि उत्साह
आम्हाला तुझ्या वाढत्या वयाची
अजिबात जाणीव होऊ देत नाही.
तुझा हाच उत्साह कायम असाच राहो.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आजी…
चिऊ काऊच्या गोष्टी सांगत मांडीत बसवून मला भरवलेस जेवण
– माझ्यावर प्रेम करायला आजी तुला लागत नाही कारण
देवाकडे हीच प्रार्थना, पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा
आजी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
– माझी आजी खूप खास आहे
आम्हा सगळ्यांना सतत हसवते,
भाग्यवान असतात ते लोक
ज्यांना तुझ्यासारखी आजी मिळते…
वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी!
-जेव्हा आजीचा प्रेमळ हात डोक्यावर असतो
आणि तिचे प्रेम मिळते
नेहमी सुख आणि आनंदाने
आमचे आयुष्य भरून वाहते
-तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य कधीही जाऊ नये
तुझ्या डोळ्यात पाणी कधीही येऊ नये
पूर्ण होवोत तुझ्या सर्व इच्छा
प्रत्येक जन्मी तूच आजी म्हणून मिळावी हीच माझी सदिच्छा..!
आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-आजी, तू रोज देवाकडे आमचे सुख मागतेस
आमच्यासाठी प्रार्थना करतेस
आज मात्र तुझ्या वाढदिवशी
मी देवाकडे तुझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत आहे!
मला वर्षानुवर्षे आजीचे असेच प्रेम मिळो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी!
-आईवडिलांसोबतच माझ्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
-जशी सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही तसेच तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यातील आनंदाची पूर्ती होत नाही. हॅपी बर्थडे आजी!
वाचा – बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Aaji Wishes From Grandson । आजीला नातवाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये
आजीसाठी नातू म्हणजे तिच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती असते. मुला/मुलीपेक्षाही जास्त आजीला नातू प्रिय असतो. त्याच्यासाठी काय करू नि काय नको असे तिला होते. तुमचीही आजी अशीच क्युट आहे ना? मग तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा तर दिल्याच पाहिजेत. आजोळी गेलो की आजी आजोबांप्रमाणेच मामाही आपले तितकेच लाड करतो. त्यामुळे मामाचाही वाढदिवस लक्षात ठेवायला हवाच.
– तुझ्या असण्यानेच आमचे आयुष्य आनंदी आणि सुखी आहे. तू नेहमी आनंदी व निरोगी राहावीस हीच आजच्या दिवशी देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी..
– मी नेहेमी आनंदी राहतो. माझ्या आयुष्यात दुःखाची वादळे येत नाहीत. कारण आजीरूपी सुरक्षाकवच कायम माझ्या पाठीशी उभे आहे. आजी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व नमस्कार.
– माझी लाडकी आजी ही माझा सन्मानआणि माझा मान आहे. मला नेहमी हिम्मत देणाऱ्या,माझा अभिमान असलेल्या, माझ्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-जिने मला बोट धरून चालायला शिकवले ,माझ्यासाठी स्वतःकडे दुर्लक्ष केले ,माझे अश्रू पुसून नेहेमी मला कुशीत घेतले, अशा पर्वतासारख्या कणखर, सायीसारख्या मऊ आणि साखरेसारख्या गोड माझ्या आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
-आजी तुझ्या मायेचा स्पर्श उबदार,नेहेमीच देतेस मला आश्वासक आधार, अजूनही भरवतेस प्रेमाचे घास , भरतेस माझ्या मनात उत्साह आणि विश्वास, आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
– आजी म्हणजे छान छान गोष्टी
आजी म्हणजे बालपणीच्या सुंदर आठवणी
आजी म्हणजे अनुभवांची शिदोरी
आजी म्हणजे मायेची माय, दुधावरची साय!
अशा माझ्या प्रेमळ आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाचा – 50th Birthday Wishes In Marathi
कुटुंबाकडून आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश । Birthday Wishes for Grandmother From Family in Marathi
जशी आई लाड करते त्यापेक्षाही जास्त मावशी लाड करते. त्यामुळे मावशीला तर आठवणीने बर्थडेच्या खास शुभेच्छा द्यायला हव्याच. आपले कौतुक करायला मावशी ,मामा, आत्या हे सगळेच हजर असतात. पण या प्रत्येकालाच आजी नेहमीच आधार व प्रेम देते आणि काळजी घेते. आजीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा पाठवून, तुम्ही तिला सांगू शकता की तिचे तुमच्या जीवनात किती महत्वाचे स्थान आहे आणि तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे. आजी असली म्हणून काय झालं, तिच्या खास दिवशी तर तिचं कौतुक व्हायलाच हवं! म्हणून आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Aaji Birthday Wishes In Marathi ) पाठवून हा दिवस साजरा करा.
-आजी म्हणजे जीवनाच्या पुस्तकातील सुंदर पान
आजी म्हणजे संस्काराचा अमूल्य साठा छान
आजी म्हणजे आम्हा नातवंडांना खूप खूप आवडणारी
सर्व लाड पुरवणारी, कुशीत घेऊन झोपवणारी
Happy Brithday Aaji ! Love You…
-अंगाखांद्यावर खेळवते ती आजी
छोट्या छोट्या गोष्टींतून जीवनाचे सार सांगते ती आजी
खरच भाग्यवान असतात ती मुले
ज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळते!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी!
– आजी तुझ्या मांडीवर डोके ठेऊन गोष्टी ऐकत मी आकाशातल्या चांदण्या मोजल्या, तू सांगितलेल्या कथेत मला स्वतःचाच शोध लागला. माझ्या प्रत्येक स्वप्नामध्ये माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या माझ्या स्ट्रॉंग पण गोड आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
– आजी तुझ्या निस्वार्थ प्रेमाची छाया मला मिळाली हे माझे भाग्य आहे. तुला दीर्घायुष्य मिळो हीच देवाकडे प्रार्थना आहे कारण तुझ्याशिवाय घराला घरपण नाही. आजी तुझे प्रेम असेच कायम आम्हाला मिळो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
– आजी तुझ्या रूपाने या घरात लक्ष्मीच नांदते आहे. तुझ्यामुळे या घराला घरपण आहे. आमचे सगळे दुःख पदरात घेऊन आमचे सुख द्विगुणित करणाऱ्या आमच्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आजी ही कुटुंबाचा अविभाज्य घटक असते. घरात वडीलधाऱ्यांची सावली असणे ही देवाची कृपा आहे, त्यामुळे त्यांना अधिक आदर आणि प्रेम दिले पाहिजे. म्हणूनच जेव्हा आजीचा वाढदिवस असतो तेव्हा तिच्यासाठी काहीतरी खास केले पाहिजे म्हणजे ती आनंदी होईल.
अधिक वाचा –