Natural Care

फंगल इनफेक्शनचे प्रकार आणि नैसर्गिक उपाय (Fungal Infection On Skin In Marathi)

Trupti Paradkar  |  Nov 3, 2020
Fungal Infection On Skin In Marathi

फंगल इनफेक्शन अथवा बुरशीजन्य इनफेक्शन ही समस्या आजकाल अनेकांना वारंवार जाणवते. फंगल इनफेक्शन तेव्हाच होतं जेव्हा बाहेरील बुरशी तुमच्या शरीरातील काही खास भागांवर कब्जा करतात. तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर तुमचे शरीर या फंगसला प्रतिकार करू शकत नाही आणि तुमच्या त्वचेवर याचा परिणाम होतो. फंगस अथवा बुरशी वातावरणातील हवा, पाणी, माती, वृक्षवेलींवर वाढत असते. मात्र यातील काही प्रकार हे माणसाच्या शरीरावर पोसले जातात. इतर जीवजंतूप्रमाणेच ते आपल्या आरोग्यासाठी हितकारक नसतात. म्हणूनच अशा फंगल इनफेक्शनवर तातडीने उपचार करायला हवेत. शिवाय फंगल इनफेक्शन वारंवार होऊ नये यासाठी योग्य ती काळजी  घ्यायला हवी.

फंगल इनफेक्शनचे प्रकार (Types Of Fungal Infection In Marathi)

त्वचेवर येणारी खाज, पुरळ, लालसरपणा आणि इतर बदल हे फंगल इनफेक्शन ओळण्याचे संकेत आहेत. फंगल इनफेक्शन निरनिराळ्या प्रकारचे असू शकते यासाठी ते ओळखण्यासाठी ही माहिती वाचा.

अॅथलीट्स फूट (Athlete’s Foot)

पायांच्या बोटांमध्ये होणारे इनफेक्शन अॅथलीट फूट (Athlete’s Foot) अथवा टीनिया पेडीस (Tinea Pedis) या नावाने ओळखले जाते. मराठीत याला काही लोक चिखल्या होणं असंही म्हणतात. कारण बऱ्याचदा हे इनफेक्शन पावसाळ्यात होताना दिसते. खेळाडूंनाही हे इनफेक्शन वारंवार होत असल्यामुळे याला अॅथलीट फूट असं म्हणतात. सतत पायात घट्ट बूट घातल्यामुळे हे इनफेक्शन होण्याचा धोका असू शकतो. पावसाळ्या पाण्यात पाय भिजल्यामुळे अथवा उन्हाळ्यात घामामुळे हे इनफेक्शन होऊ शकते.

लक्षणे –

अॅथलीट फूट न होण्याची काय काळजी घ्यावी –

Instagram

जॉक इच (Jock Itch)

जॉक इच (Jock Itch) मध्ये दोन पायांच्या मधील भागात म्हणजे जांघेत खाज येते आणि इनफेक्शन होते. या इनफेक्शनला  (Tinea Cruris) असंही म्हटलं जातं. फंगस हे उष्ण आणि मऊ जागी पोसले जातात. म्हणूनच हे इनफेक्शन शरीराच्या अशा भागावर होते जिथे जास्त घाम येतो आणि मोकळी हवा लागत नाही. 

लक्षणे –

जॉक इच होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी –

वाचा – सुरमा त्वचा रोगावरील उपाय

रिंगवर्म (Ringworm)

रिंगवर्म इनफेक्शनला नायटा अथवा गजकर्ण असंही म्हटलं जातं. या इनफेक्शनला शास्त्रीय भाषेत (Tinea Corporis) असं म्हणतात. त्वचेवरल डेड स्किनवर पोसले जाणारी ही एक बुरशी आहे. हे इनफेक्शन शरीरावर कुठेही होऊ शकते. नखे अथवा केसांमध्येही हे इनफेक्शन दिसून येते. रिंगवर्म ही अशी बुरशी आहे ज्यामुळे जॉक इच अथवा एथलीट फूट होते. मात्र जेव्हा हे इनफेक्शन शरीराच्या इतर भागांवर होते तेव्हा त्याला रिंगवर्म, नायटा, गजकर्ण असं म्हणतात. गजकर्ण कारणे, लक्षणं आणि घरगुती उपाय.

लक्षणे –

रिंगवर्म होऊ नये यासाठी काय करावे 

वाचा – त्वचेच्या समस्या आणि त्यावरील झटपट उपाय

Instagram

यीस्ट इनफेक्शन (Yeast Infection)

यीस्ट इनफेक्शनचा प्रकार महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. या इनफेक्शनला cutaneous candidiasis असंही म्हणतात. कॅनडीडा नावाच्या बुरशीमुळे हे इनफेक्शन होते. तुमच्या शरीरातील ओलसर, उष्ण भागात ही बुरशी तग धरते. त्यामुळे तोंड, काख आणि जांघेत, योनामार्गात हे इनफेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. योनिच्या यीस्टच्या संसर्गासाठी घरगुती उपचार करून पहा. अॅंटिबॉडीज घेणाऱ्या लोकांनादेखील हे इनफेक्शन होऊ शकते.

लक्षणे –

यीस्ट इनफेक्शन होऊ नये यासाठी काय करावे –

Instagram

नेल फंगस (Nail Fungus)

नेल फंगस या इनफेक्शनमध्ये तुमच्या हाता-पायाच्या बोटांची नखे पिवळी पडतात. हे इनफेक्शन वाढल्यास तुमचे नख काढून टाकावे लागते. एका नखामुळे सर्व नखांवर हे इनफेक्शन पसरू शकते. थोड्या प्रमाणावर असताना यावर योग्य ते उपचार करून ते रोखता येऊ शकते. मात्र त्याचा प्रभाव तीव्र असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. 

लक्षणे –

नेल फंगस होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी –

Instagram

फंगल इनफेक्शन नैसर्गिक उपाय (Natural Remedies For Fungal Infection In Marathi)

जर फंगल इनफेक्शन सौम्य स्वरूपाचे असेल तर साध्या घरगुती उपचारांनीही ते पटकन बरे होऊ शकते. यासाठी जाणून घ्या फंगल इनफेक्शनवर कोणते उपाय करावे.

अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

फंगल इनफेक्शन कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर आहे कारण ते अॅंटि बॅक्टेरिअल आणि अॅंटि फंगल आहे. अॅपल सायडर व्हिनेगरमुळे फंगल इनफेक्शनची वाढ आतून आणि बाहेरून दोन्हीकडून रोखता येऊ शकते. एका संशोधनानुसार पाण्यात डायल्युट केलेले अॅपल सायडर व्हिनेगर लावण्यामुळे यीस्ट इनफेक्शन रोखण्यात यश मिळालेले आहे. तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगर निरनिराळ्या पद्धतीने वापरू शकता. जसं की तोंडांवाटे घेण्यासाठी अथवा मलमाप्रमाणे इनफेक्शनवर लावण्यासाठी. मात्र यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर खरेदी करताना ते सेंद्रिय आणि चांगल्या दर्जाचे असेल याची खात्री करून घ्या. 

कसा कराल वापर –

Fungal Infection Upay Marathi

दही (Yogurt)

दह्यामध्ये शरीरासाठी योग्य लॅक्टो बॅक्टोरिआ असतात. ज्यामुळे तुमच्या आतड्यांमधील कार्य सुरळीत होते. दह्यातील चांगले बॅक्टेरिआ बुरशीजन्य इनफेक्शनला नष्ट करण्यास मदत करतात. एका संशोधनानुसार दही ते आतड्यांसाठी आणि त्वचेसाठी एखाद्या अॅंटि बॅक्टेरिअल क्रीमप्रमाणे कार्य करते. मात्र लक्षात ठेवा फंगल इनफेक्शन कमी करण्यासाठी नेहमी साधे दहीच वापरावे. ज्यामध्ये कोणत्याही रंग अथवा  सुंगधाचा वापर केलेले असू नये. कारण असे सुंगधित योगर्ट वापरण्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होऊ शकते.

कसा कराल वापर –

टी ट्री ऑईल (Tea Tree Oil)

टी ट्री ऑईल नैसर्गिकरित्या अॅंटि सेप्टिक आणि अॅंटि फंगल असते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी टी ट्री ऑईलचा वापर ब्युटी ट्रिटमेंटमध्ये केला जातो. तुम्ही टी ट्री ऑईल फंगल इनफेक्शन दूर करण्यासाठीदेखील वापरू शकता. अॅथलीट फूट सारख्या फंगल इनफेक्शनमध्ये यामुळे चांगला बदल झालेला आढळून आलेला आहे.

कसा कराल वापर –

हळद (Turmeric)

हळदीसारखा नैसर्गिक उपचार त्वचेवर शोधूनही सापडणार नाही. फार पूर्वीपासून हळद त्वचेवरील जखमा अथवा इतर समस्या दूर करण्यासाठी वापरण्यात येत आहे. हळदीमध्ये अॅंटि व्हायरल आणि अॅंटि फंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे फंगल इनफेक्शनमधील बुरशी नष्ट होऊ शकते. हळद अथवा अॅपल सायडर व्हिनेगर प्रमाणेच हळद थेट त्वचेवर लावू नये. हळद त्वचेवर लावताना ती नेहमी नारळाचे तेल अथवा नारळाच्या दूधात मिक्स करून लावावी. 

कसा कराल वापर –

Fungal Infection On Skin In Marathi

कॅनबेरी ज्युस (Cranberry Juice)

कॅनबेरी ज्युसमध्ये अॅंटि बॅक्टेरीअल घटक असल्यामुळे हा ज्युस पिण्यामुळे तुमच्या पोटातील अनेक समस्या कमी होतात. एवढंत नाही तर कॅनबेरी ज्युसमुळे तुमचे फंगल इनफेक्शनही कमी होऊ शकते. एका संशोधनानुसार कॅनबेरी ज्युसमुळे यीस्ट सारखे फंगल इनफेक्शन कमी झालेले आढळून आलेले आहे. मात्र यासाठी कॅनबेरी ज्युस ट्राय करताना तो पूर्णपणे सेंद्रिय आणि साखर विरहित असेल याची काळजी घ्या. कॅनबेरी ज्युसमुळे तुमचे पोट स्वच्छ होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते ज्यामुळे त्वचेवरील फंगल इनफेक्शन हळूहळू कमी होत जाते. 

कसा कराल वापर –

लसूण (Garlic)

 

फंगल इनफेक्शन दूर करण्यासाठी लसूण वापरणे हा थोडा कंटाळवाणमा उपाय असू शकतो. कारण लसणाला उग्र वास येतो मात्र हा तितकाच परिणामकारक उपाय आहे हे विसरू नका. लसणामध्ये अॅंटि फंगल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे फार पूर्वीपासून कोणत्याही इनफेक्शनला दूर करण्यासाठी लसणाचा वापर हमखास केला जातो. लसणामुळे तुमची रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. यासाठीच आहारात नेहमी लसणाचा वापर करावा. एवढंच नाही तर लसणाच्या पाकळ्या ठेचून त्याचा रसदेखील तुम्ही या इनफेक्शनवर लावू शकता. 

कसा कराल वापर –

Fungal Infection Upay Marathi

नारळाचे तेल (Coconut Oil)

नारळाचे तेल हे त्वचेच्या कोणत्याही समस्येवर अगदी रामबाण औषध आहे. नारळाच्या तेलात चांगले फॅटि अॅसिड आणि व्हिटॅमिन ई असते. यासाठीच स्किन केअरमध्ये नारळाच्या तेलाचे घटक वापरले जातात. फंगल इनफेक्शनवर नारळाचे तेल गुणकारी आहे कारण त्यामध्ये नैसर्गिक अॅंटि फंगल घटक असतात. थेंबभर नारळाचे तेल तुमच्या कोणत्याही प्रकारच्या फंगल इनफेक्शनला दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. शिवाय त्याचे कोणतेही दुष्परिणाम त्वचेवर होत नाहीत. 

कसा कराल वापर –

कोरफड (Aloe Vera)

कोरफड हे अॅंटि बॅक्टेरिअल आणि अॅंटि ऑक्सिडंट असल्यामुळे अनेक स्किन केअर प्रॉडक्टमध्ये याचा वापर केला जातो. एका संशोधनानुसार कोरफड त्वचेच्या कोलेजीनच्या निर्मितीला प्रेरणा देते असं दिसून आलं आहे. ज्यामुळे ते अॅंटि एजिंग क्रिममध्येही आवर्जून वापरले जाते. जर तुम्हाला फंगल इनफेक्शन झाले असेल तर तुम्ही कोरफड वापरू शकता कारण कोरफडामुळे बॅक्टेरिआची वाढ रोखून धरली जाते. कोरफडाचा रस पिण्यामुळे तुमच्या अपचनाच्या  समस्या कमी होतात. पोट स्वच्छ झाल्यामुळे तुमचे फंगल इनफेक्शन नक्कीच कमी होते. 

कसा कराल वापर –

Fungal Infection Treatment In Marathi

कडूलिंब (Neem Leaves)

कडूलिंब अॅंटि फंगल, अॅंटि बॅक्टेरिअल आहे हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. त्यामुळे तुमचे फंगल इनफेक्शन दूर करण्यासाठी तुम्ही  कडूलिंबाचा वापर नक्कीच करू शकता. कडूलिंबामुळे नैसर्गिक पद्धतीने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात.

कसा कराल वापर –

ऑरेगेनो ऑईल (Oregano Oil)

ऑरेगेनो ऑईलमध्ये थायमॉल आणि इतर औषधी घटक असल्यामुळे या तेलामुळे कोणतेही इनफेक्शन कमी होऊ शकते. त्वचेच्या इनफेक्शनवर थेट वापर करण्यासाठी तुम्ही ऑरेगेनो तेल नक्कीच वापरू शकता. 

कसा कराल वापर –

फंगल इनफेक्शनबाबत मनात असेलेले निवडक प्रश्न – FAQ’s

1. फंगल इनफेक्शन दूर करण्याचा जलद मार्ग कोणता?

कोणतेही इनफेक्शन त्याचे निदान होताच लगेच उपचार केल्याने पटकन बरे होते. आपले रक्त शुध्द करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला फंगल इनफेक्शन झाले आहे हे समजताच आम्ही वर दिलेले नैसर्गिक उपचार करा आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

2. फंगल इनफेक्शनबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे कधी गरजेचं असते ?

आम्ही वर दिलेले नैसर्गिक उपचार करून देखील काहीच फरक जाणवला नाही. त्वचेवर सतत खाज, जळजळ, दाह आणि लालसरपणा जाणवत असेल तर तुम्हाला त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

3. फंगल इनफेक्शनवर कोणतेच उपचार केले नाही तर काय होते ?

दुर्बल प्रतिरक्षा प्रणाली आणि खराब स्वच्छतेमुळे बुरशीजन्य संक्रमण होतात. जर फंगल इनफेक्शनर कोणतेच उपचार केले नाहीत तर तुमच्या त्वचेच्या समस्या अधिक वाढू शकतात. त्यामुळे फंगल इनफेक्शनवर वेळीच उपचार करणे गरजेचं आहे.

Read More From Natural Care