लाईफस्टाईल

सुदृढ शरीरप्रकृतीसाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टीप्स (Health Tips In Marathi)

Trupti Paradkar  |  Apr 16, 2019
Health Tips In Marathi

आयुष्यात निरोगी आणि सुदृढ शरीरप्रकृती प्रत्येकालाच हवी असते. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी शरीर प्रकृती असणं फारच कठीण झालं आहे. मात्र प्रयत्न केल्यास जीवनात काहीच अशक्य असू शकत नाही. त्यामुळे हेल्दी आणि निरोगी जीवनशैलीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निरोगी जीवनासाठी फार काही करण्याची गरज नाही. जीवनशैलीत थोडेफार बदल आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोण तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी नक्कीच मदत करू शकते. यासाठीच आम्ही तुम्हाला सुदृढ शरीरप्रकृतीसाठी काही सोप्या टीप्स (health tips in marathi) सांगत आहोत. ज्यांचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

निरोगी जीवनासाठी फॉलो करा या टीप्स (Daily Health Tips In Marathi)

निरोगी जीवनशैली आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी (marathi health tips) या काही गोष्टींची अवश्य काळजी घ्या.

सुदृढ शरीर बनवण्यासाठी आहार (Balance Diet)

आजकालच्या भेसळयुक्त आणि केमिकलयुक्त आहारामुळे शरीरावर विपरित परिणाम होतो. यासाठीच निरोगी राहण्यासाठी आधी आहारात विशेष बदल करण्यासाठी गरज आहे. आहाराबाबत विषय आला की अनेकजण कमी खा, एखादी गोष्ट आहारात वर्ज्य करा अथवा समाविष्ठ करा हेच सल्ले दिले जातात. मात्र यापेक्षा तुम्ही जो आहार घेत आहात तो संतुलित आहे का हे तपासणे फार गरजेचे आहे. तुम्ही जो आहार घेता त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीर प्रकृतीवर होत असतो. त्यामुळे आहारातून सर्व प्रकारची पोषणमुल्येै शरीराला मिळत आहेत का याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आहारात योग्य प्रमाणात कर्बोदकं, जीवनसत्व, लोह, प्रथिने आणि क्षार मिळणे गरजेचे आहे. ही सर्व पोषक मुल्ये तुम्हाला तुमच्या आहारातून मिळत असतात. मात्र जर शरीराला पुरेश्या प्रमाणात जीवनसत्वं मिळाली नाहीत तर त्याची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टर तुम्हाला औषधे अथवा इतर कृत्रिम गोष्टींमधून ती घेण्याचा सल्ला देतात. अशी वेळ तुमच्यावर येऊ नये असं वाटत असेल तर संतुलित आहार घेण्यावर भर द्या. ज्यामध्ये सर्व प्रकारची तृणधान्ये, कडधान्ये, डाळी, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे आणि फळ भाज्या, मांस, अंडी, सुकामेवा, दूध आणि दुधाचे पदार्थ, योग्य प्रमाणात तेल आणि तूप यांचा समावेश करा.

निरोगी राहण्यासाठी आणि चिरतरूण दिसण्यासाठी फिटनेस टीप्स (Health & Fitness Tips For Women)

वेळेवर खा (Eat On Time)

कामाच्या गडबडीत अनेकांना वेळेत न खाण्याची सवय असते. काम करता करता उशीर होतो आणि जेवणाची वेळ निघून जाते. वेळेवर न खाण्याने अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. अपचन, अॅसिडिटी, आम्ल पित्त, अंगावर पित्त उठणे, त्वचा समस्या हे वेळेवर न खाण्याने निर्माण होतात. कारण मानवी शरीर वात, पित्त आणि कफ या तीन दोषांवर अवलंबून असते. वेळेवर न खाण्याने या त्रिदोषांचे संतुलन बिघडते. यासाठीच दिवसभरातील तुमच्या खाण्याच्या वेळा ठरवा आणि त्यानुसार खाण्याचा प्रयत्न करा.

सकाळचा न्याहारी चुकवू नका (Don’t Skip Breakefast)

सकाळची न्याहारी अथवा नाश्ता याला फार महत्व आहे. कारण रात्रीचे जेवण आणि रात्रीची झोप यामुळे जवळजवळ आठ ते दहा तास शरीराला अन्नाचा पुरवठा केला जात नाही. म्हणूनच हा उपवास मोडण्यासाठी काहीतरी पौष्टिक खाऊन दिवसाची सुरूवात करणे गरजेचे असते. ज्यामुळे दुपारचे जेवण करेपर्यंत शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते आणि दिवसाची सुरूवात फ्रेश होते. मात्र हे सर्व माहीत असूनही अनेकजण सकाळी नाश्ता करण्याचा कंटाळा करतात. ज्यामुळे त्यांच्यामध्ये सकाळपासूनच निरूत्साह निर्माण होतो. यासाठीच दररोज सकाळी न चुकता पौष्टिक नाश्ता करा. यासाठी तुम्ही सकाळी एखादे फळ खाऊ शकता ज्यामुळे तुम्हाला त्वरीत शक्ती मिळेल. सकाळच्या नाश्त्यामध्ये डोसा, पोहे, उपमा, शिरा, इडली, ओट्स, कॉर्नफ्लेक्स, दूध आणि एखादे फळ अथवा फळांचा रस यांचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला दुपारच्या जेवणाआधी अपथ्यकारक खावेसे वाटणार नाही.

साखर आणि मीठाचे प्रमाण कमी करा (Avoid Sugar And Salt)

साखर आणि मीठामुळे स्वयंपाक रूचकर होतो. मात्र अती प्रमाणात साखर आणि मीठाचे सेवन केल्यामुळे शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. अती प्रमाणात खालेल्या साखरेमुळे तुमचे वजन अनियंत्रित होते. तर अती मीठामुळे रक्तदाब आणि ह्रदयविकार होण्याचा धोका वाढतो. मधूमेह, ह्रदयविकार हे सायलेंट किलर विकार आहेत. यासाठीच वेळीच आहारातून साखर आणि मीठाचे प्रमाण कमी करा.

वाचा – हर्नियाचे प्रकार

नियमित व्यायाम करा (Do Regular Exercise)

शरीराला नियमित व्यायामाची गरज असते. आजकाल दिवसभर बैठे काम अथवा सतत लॅपटॉपवर काम केल्यामुळे शरीराची पुरेशी हालचाल होत नाही. शरीराची पुरेशी हालचाल न झाल्यामुळे त्याचा दुष्परिणाम तुमच्या शारीरिक क्रियेवर होतो. ज्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी साठते आणि आरोग्य बिघडू लागते. याउलट नियमित व्यायाम केल्यामुळे शरीर मजबूत आणि स्नायू बळकट होतात. दिवसभर काम करण्याचा उत्साह वाढतो. व्यायामामुळे शरीर आणि मन निरोगी होते. यासाठी दिवसभरात कमीतकमी तीस मिनीटे व्यायाम करा. यासाठी दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे चालण्याचा अथवा धावण्याचा व्यायाम करा. ह्रदय, फुफ्फुसांची गती आणि स्नायुंची हालचाल जलद गतीने करणाऱ्या व्यायामप्रकारांना अॅरोबिक्स व्यायाम असे म्हणतात. यासाठी आठवड्यातून तीन दिवस सायकल चालविणे, पोहणे, दोरीवरच्या उड्या मारणे असे व्यायाम प्रकार करा ज्यामुळे तुम्ही फिट आणि हेल्दी रहाल (health tips in marathi).

सकारात्मक विचार करा (Be Positive)

सतत सकारात्मक विचार केल्यामुळे तुमचे मन प्रसन्न आणि शरीर निरोगी राहते. कारण याचा चांगला परिणाम तुमच्या शरीर आणि मनावर होतो. नकारात्मक विचारसरणीमुळे तुमचे आरोग्य बिघडते. यासाठी सतत मनात चांगले आणि आरोग्यदायी विचार येण्यासाठी प्रार्थना आणि मेडीटेशनचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. रात्री झोपताना अथवा सकाळी उठल्यावर काही मिनीटे प्रार्थना अथवा मेडीटेशन करा. ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल आणि दिवसाची सुरूवात प्रसन्न होईल. इतरांबद्दल सतत कृतज्ञतेची भावना असल्यामुळे देखील तुमचे मन आनंदी राहील ज्याचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येईल.

कुटुंबाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी – टीप्स

ताण-तणाव दूर ठेवा (Manage Stress)

ऑफिस आणि घरातील कामाचा ताण यामुळे तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यामुळे मेंदूला पुरेसा आराम मिळत नाही. सतत काम केल्यामुळे कुटुंबियांना वेळ देता येत नाही. ज्यामुळे नातेसंबध दुरावले जातात. निरोगी आणि आनंदी जीवनसाठी घर आणि कामाच्या ताणाचे योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. असे न केल्यास त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. यासाठी कामाच्या वेळेत ऑफिसचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ऑफिसचे काम घरी न नेता घरी असताना घरातील कामे आणि कुटुंबिय यांना पुरेसा वेळ द्या. ज्यामुळे तुमच्या जीवनातील कामाचा समतोल राहील. अधिक कामाचा ताण न आल्यामुळे तुमचे मन आणि मेंदू स्वस्थ राहील. घर आणि ऑफिसप्रमाणेच सामाजिक कार्यात सहभाग घ्या. ज्यामुळे तुमच्या सामाजिक मानसन्मान मिळेल आणि जीवनात सुखी झाल्याची भावना मनात कायम राहील. आरोग्यावर काही घोषवाक्य आणि सुविचार असतात जे तुम्हाला प्रेरणा देतात. तेदेखील वाचा.

पुरेशी झोप घ्या (Get Enough Sleep)

आरोग्यशास्त्रानूसार माणसाने किमान सात ते आठ तास शांत झोप घेणंं गरजेचं आहे. मात्र आजही अशी अनेक माणसं आहेत जी रात्री किमान दोन ते तीन तासदेखील नीट झोपू शकत नाहीत. काहींंना अंथरूणावर पडल्या झोप लागते तर काहीजण रात्रभर तळमळत राहतात. आजकाल झोपेच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. यासाठी नियमित पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. लवकर झोप येण्यासाठी रात्री उशीरापर्यंत टिव्ही अथवा मोबाईलवर वेळ घालवू नका. झोपण्याआधी अंघोळ करा, मनाला आनंद देणारी गाणी ऐका ज्यामुळे तुम्हाला शांत आणि निवांत झोप येईल.

व्यसनांपासून दूर रहा (Avoid Alcohol And Smoke)

मद्यपान आणि धूम्रपानाचा शरीरावर वाईट परिणाम होतो हे माहीत असूनही अनेकजण व्यसनांच्या आहारी जातात. इतरांच्या संगतीमुळे काही लोक व्यसनांना बळी पडतात. आजकाल थ्रील अथवा मौज म्हणून देखील तरूण पिढी व्यसने करताना दिसून येते. मात्र याचे अनेक दुष्परिणाम त्यांना भविष्यात भोगावे लागतात. यासाठीच वेळीच व्यसनांपासून दूर रहा. जर तुम्ही व्यसनांच्या आहारी गेला असाल तर लवकरात लवकर व्यसनमुक्ती केंद्र अथवा समुपदेशकांच्या मदतीने व्यसन सोडण्याचा प्रयत्न करा.

वाचा – तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम

मुबलक पाणी प्या (Drink Plenty Of Water)

मानवी शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. कारण मानवी शरीर सत्तर टक्के पाणी असतं. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेश्या पाण्याचा पुरवठा करणं गरजेचं आहे. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा तुमचे शरीर डिहायड्रेट होते. यासाठी दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार आपल्या शरीराच्या वजनाचा 10 व्या भागाला 2 ने वजा केल्यास जी संख्या येईल तितकं लीटर पाणी आपण प्यायला हवं. समजा की, तुमचं वजन 70 किलो आहे तर त्याचा 10 वा भाग 7 असेल. आता त्याला 2 ने वजा केल्यास 5 संख्या येईल. याचाच अर्थ असा की, तुम्हाला रोज 5 लीटर पाणी प्यायला हवं. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याने तुमचं पोट स्वच्छ होतं. ज्यामुळे सहाजिकच तुम्ही निरोगी राहता. तुमच्या शरीराला किती पाणी पिणं गरजेचं आहे हे जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मात्र दररोज पाणी पिण्यास मुळीच विसरू नका.

तुमच्या मनातील काही प्रश्न (FAQ’s)

1. गरोदरपणात सुदृढ राहण्यासाठी कोणता आहार घ्यावा?

गरोदरपणी तुम्हाला योग्य आणि पोषक आहाराची सर्वात जास्त गरज असते. कारण तुमच्या आहारावर तुमच्या गर्भाचे पोषण होत असते. वास्तविक प्रत्येक व्यक्तीची शरीरप्रकृती निरनिराळी असल्यामुळे प्रत्येकीचा आहार हा निराळा असू शकतो. यासाठीच तुमच्या शरीरप्रकृतीनुसार डॉक्टरांच्या सल्लाने तुमचा आहार ठरवा. साधारणपणे तुम्ही तुमच्या आहारात दूध, दूधाचे पदार्थ, ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या अशा पोषकतत्वांचा समावेश करू शकता.

2. वजन कमी करण्यासाठी काय करावे?

पोषक पदार्थांपेक्षा इतर अपथ्य गोष्टी खाण्याकडेच नेहमी आपला कल असतो. सतत जंकफूड, चायनीज, वडापाव, चिप्स खाण्याने तुमचे वजन हळू हळू वाढू लागते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी मग तुम्ही अनेक उपाययोजना करता. कृत्रिम उपचार करून तुमचे वजन काही काळापुरते नियंत्रित झाल्यासारखे वाटते मात्र पुन्हा ते वाढू लागते. शिवाय अती व्यायाम अथवा वजन कमी करण्याचे उपचार केल्यामुळे तुमचे वजन तर कमी होते मात्र त्याचबरोबर चेहऱ्यावरचे तेजदेखील कमी होत जाते. गाल आत गेल्यावर चेहऱ्यामधला फ्रेशनेस कमी दिसू लागतो. पुरेसे पोषण न झाल्यामुळे सतत थकल्यासारखे वाटते आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. मात्र वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि त्वचा फ्रेश दिसण्यासाठी संतुलित आहाराचा आहारात समावेश करा. यासोबतच नियमित व्यायाम करा ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास महत होईल.

3. आजारपणांपासून दूर राहण्यासाठी नेमके काय करावे?

वातावरणातील बदल आणि रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे तुम्हाला आजारपणांना तोंड द्यावे लागते. यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करा. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि व्यसनांपासून दूर राहिल्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते. शिवाय वाढत्या वयानुसार काही आजारपणे पाठीशी लागतात. काही आजार हे सायंलेट किलर असतात. जे अचानक समोर येऊन उभे राहतात. पण त्या आजारपणाची सुरूवात फार आधीपासून झालेली असते. यासाठी जीवनशैलीत योग्य ते बदल करा. शिवाय चाळीशीनंतर नियमित हेल्थ चेकअप करण्याचा मुळीच कंटाळा करू नका. कारण त्यामुळे एखादे गंभीर आजारपण तुम्हाला वेळीच रोखता येऊ शकते.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

You Might Like This:

सायकल चालवण्याचे फायदे

मानसिक आरोग्य मूल्यांकन बद्दल देखील

रोज योगा करत आहात, तर लक्षात ठेवा खास गोष्टी

Follow These Perfect Diet For Perfect Figure In Marathi

फोडणीतील चिमूटभर ‘हिंग’ आरोग्यासाठी असतं लाभदायक

Read More From लाईफस्टाईल