Combination Skin

निरोगी त्वचेसाठी ब्युटी टिप्स (Beauty Tips For Skin In Marathi)

Aaditi Datar  |  Jun 26, 2019
Beauty Tips For Skin In Marathi

प्रत्येकालाच आपली त्वचा सुंदर आणि नितळ असावी असं वाटतं. त्यासाठी प्रत्येकजण विविध उपाय आणि स्किन केअर प्रोडक्ट्स वापरत असतात. पण त्वचा सुंदर बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला माहीत असला पाहिजे आपल्या त्वचेचा प्रकार.तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या त्वचा नक्की कोणत्या प्रकारची आहे. सामान्यतः त्वचेचे पाच प्रकार असतात. कोरडी त्वचा, तेलकट त्वचा, मिश्र त्वचा, सामान्य त्वचा आणि संवेदनशील त्वचा. या पाच प्रकारच्या त्वचेपैकी आपली त्वचा कशी ओळखावी आणि त्याची काळजी कशी घ्यावी, त्वचा रोग घरगुती उपाय याबाबतची माहिती आम्ही या लेखात देत आहोत.

 

ब्युटी टिप्स मराठी

आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण आणि सर्वात मोठा भाग म्हणजे त्वचा. जी आपल्या शरीरावर एखाद्या आवरणासारखं काम करते. ज्याच्या बाहेरील भागास एपिडर्मिस असंही म्हणतात. बऱ्याच जणांना अनेक त्वचा समस्यांचा सामना करावा लागतो. पण त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास त्वचा निरोगी ठेवता येईल. 

Also, Read – Oil Control Cleanser In Marathi

त्वचेचे विविध प्रकार (Types Of Skin In Marathi)

 

आजकाल प्रत्येकजण आपल्या त्वचेच्या प्रकाराबाबत बऱ्यापैकी जागृत असतो आणि त्यानुसारच स्कीन प्रोडक्ट्सचा वापरही आपण करतो. वर सांगितल्याप्रमाणे साधारणतः त्वचेचे पाच वर्गात वर्गीकरण होतं. जर तुम्हाला तुमच्या त्वचेचा नेमका प्रकार माहीत नसल्यास खालील माहिती नक्की वाचा. त्वचेचा प्रकार जाणून घेऊन त्याप्रमाणेच घरगुती उपाय किंवा ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करा.

Also Read : त्वचा आणि केसांसाठी गुलाब पाण्याचे फायदे

सामान्य त्वचा (Normal Skin In Marathi)

 

खूप कमी जणांची सामान्य त्वचा असते. ही त्वचा विशेषतः चमकदार, डागविरहीत आणि आकर्षक असते. ही त्वचा तेलकट किंवा कोरडी नसते. पण वातावरणातील बदलाचा या त्वचेवर परिणाम होताना मात्र दिसून येतो. त्यामुळे या त्वचेसाठी तुम्ही फेसवॉश, क्लींजर आणि फेसपॅकचा वापर करून योग्य काळजी घेऊ शकता. जर हिवाळ्याच्या दिवसात ही त्वचा कोरडी वाटल्यासही तुम्ही फेसपॅकचा वापर करू शकता. त्वचेचा योग्य प्रकार कळल्यानंतर त्वचेची काळजी घेणं सोपं होतं.

ब्युटी टिप्स मराठी

सामान्य त्वचा कशी ओळखाल

– चमकदार त्वचा 

– डागविरहीत त्वचा 

– उजळलेली त्वचा

वाचा – साध्या आणि सोप्या ब्युटी टिप्स मराठी

तेलकट त्वचा (Oily Skin In Marathi)

 

तेलकट किंवा ऑईली स्कीन त्वचेचा असा प्रकार आहे ज्यामध्ये चरबीयुक्त ग्रंथीतून बाहेर पडणाऱ्या स्त्रावामुळे तेल दिसतं. त्वचेवर तेलाचा थर साचतो, ज्यामुळे त्वचा तेलकट दिसू लागते. त्वचा तेलकट झाल्यामुळे त्यावर धूळ, माती आणि इतर वातावरणातील घटक चिकटतात. या प्रकारच्या त्वचेवर जास्त प्रमाणात पिंपल्स येतात. त्यामुळे या त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. या त्वचेचा एक फायदा म्हणजे योग्य काळजी घेतल्यास त्या व्यक्तींचं एज लगेच दिसून येत नाही. पण तेलकट त्वचेला तेवढ्याच स्कीन प्रोब्लेमसचा सामनाही करावा लागतो. जसं पिंपल्स, ओपन पोर्स, त्वचा लाल होणे किंवा खाज येणें.

ब्युटी टिप्स मराठी

 

तेलकट त्वचा कशी ओळखाल 

– चरबीयुक्त ग्रंथीतून बाहेर पडणार सीबम किंवा तेल 

– चेहऱ्यावर धूळ-माती चिकटणं

– त्वचा सतत तेलकट दिसणं

वाचा – तेलकट त्वचेवरील उपाय आणि टीप्स

मिश्र त्वचा (Combination Skin In Marathi)

 

मिश्र त्वचा किंवा कॉम्‍बिनेशन स्‍कीन एक अशी त्वचा आहे ज्यामध्ये दोन प्रकार आढळतात. या त्वचा नॉर्मल आणि ऑईली त्वचेचं कॉम्बिनेशन असते. त्यामुळे तुम्हाला दिवसातून 3-4 वेळा चेहरा धुवावा लागतो. अशा प्रकारची त्वचा नाक आणि कपाळाच्या जागी तेलकट असते. तर बाकी चेहरा कोरडा असतो. त्यामुळे या मिश्र त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.

ब्युटी टिप्स मराठी

 

मिश्र किंवा कॉम्बिनेशन त्वचा कशी ओळखाल 

– त्वचा ऑईली आणि कोरडी असणे 

– त्वचेवर डाग आढळणे 

कोरडी किंवा ड्राय त्वचा (Dry Skin In Marathi)

 

ड्राय किंवा कोरडी त्वचा ही जी बघताच तुम्हाला कोरडेपणा दिसून येतो. ही त्वचा चमकदार नसते. या प्रकारच्या त्वचेवर सुरकुत्या लगेच दिसून येतात. अशी त्वचा आर्द्र राहत नाही त्यामुळे पावडर लावू नये. पावडर लावल्यास त्वचेचा कोरडेपणा अजून जास्त दिसून येईल. कोरडी त्वचा जास्त खेचल्यासारखी वाटते. त्यामुळे शक्य असल्यास रात्री झोपताना या त्वचेवर नाईट क्रिम आणि थंडीच्या दिवसात कोल्ड क्रिमचा वापर करावा. ज्यामुळे त्वचेची आर्द्रता कायम राहील आणि त्वचा मऊ होईल. कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय म्हणून तुम्ही हे करू शकता.

Also Read: Winter Skin Care Tips For Dry Skin In Marathi

ब्युटी टिप्स मराठी

 

कोरडी त्वचा कशी ओळखाल 

– त्वचा ओढल्यासारखी वाटणे 

– आर्द्रता नसणे 

– तजेलदार न वाटणे 

– त्वचेला जळजळ होणे

संवेदनशील त्वचा (Sensitive Skin In Marathi)

 

सामान्यतः इतर त्वचा प्रकारांपेक्षा संवेदनशील त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण चरबीयुक्त ग्रंथीतून जास्त स्त्राव झाल्यास आणि आपल्या त्वचेवर त्याचा थर जमा होतो. ज्यामुळे त्वचेवर डाग आणि पिंपल्स येण्याची शक्यता असते. ज्यांची स्कीन सेन्सेटीव्ह असेल त्यांनी ती जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावी. तसं न केल्यास संवेदनशील त्वचेवर लगेचच धूळ किंवा तेल जमा झाल्याचं दिसून येतं. जर तुमची त्वचा संवेदनशील असल्यास तुम्ही कोणत्याही प्रकारचं फेशियल आणि ब्लीच करू शकत नाही. अशा प्रकारच्या त्वचेची तुम्हाला जास्त काळजी घेणं आवश्यक आहे.

ब्युटी टिप्स मराठी

 

संवेदनशील त्वचा कशी ओळखावी 

– त्वचा लाल होणं 

– त्वचेला खाज येणं 

– लाल रॅशेस येणं 

-डाग किंवा पिंपल्स येणं 

– कोणत्याही केमिकल रिएक्शनला संवेदनशील असणं.

तुमचा त्वचा प्रकार ओळखण्यासाठी करून पाहा या टेस्ट (How To Know Your Skin Type In Marathi)

 

त्वचेचा प्रकार ओळखण्यासाठी वरील लक्षणं उपयोगी न पडल्यास तुम्ही घरच्याघरी काही सोप्या टेस्ट करून ती ओळखू शकता.

टिश्यू पेपर टेस्ट 1 (Tissue Paper Test 1)

आपल्या त्वचेची काळजी घेताना आपण बरेचदा टिश्यू पेपरचा वापर करतो. ज्यामुळेही आपल्याला बरेचदा स्कीनचा प्रकार ओळखण्यात मदत होते. टिश्यू पेपरने चेहरा साफ केल्यावर आपल्याला कळतं की, आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे. जसं त्वचा खूप कोरडी किंवा ऑईली आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर सर्वात आधी गाल, नाक आणि कपाळावर टिश्यूपेपर फिरवून टेस्ट करा. मग टिश्यूपेपरचं निरीक्षण करा.

जर टिश्यू पेपरवर जास्त तेल दिसलं तर तुमची त्वचा तेलकट आहे. जास्त कोरडी वाटली तरी तुमची त्वचा कोरडी आहे. त्वचेच्या काही भागावर तेल दिसल्यास तुमची त्वचा कॉम्बिनेशन स्कीन आहे. जर तुमच्या त्वचेवर जळजळ जाणवली तर तुमची त्वचा संवेदनशील कॅटेगरीमध्ये येते.

टिश्यू पेपर टेस्ट 2 (Tissue Paper Test 2)

टिश्यू पेपरचा वापर करून स्कीन ओळखण्याचा दुसरा प्रकार म्हणजे सकाळी उठल्यावर चेहरा धुवा आणि 30 मिनिटं वाट पाहा. त्यानंतर टिश्यू पेपर चेहऱ्यावर ठेवून प्रेस करा. मग त्या टिश्यू पेपरचं निरीक्षण करा.

वाचा – भारतीय सौंदर्य टिप्स

त्वचेचे कोणत्या कारणांमुळे नुकसान होते (Causes Of Skin Damage In Marathi)

 

त्वचेचं नुकसान होण्यामागे अनेक कारण असू शकतात. या कारणांमध्ये तुमचं रूटीन, आहार किंवा त्वचेच्या विशिष्ट प्रकारांमुळेही तुमची त्वचा खराब होऊ शकते. नजर टाकूया यातील काही प्रमुख आणि आश्चर्यकारक घटकांवर.

1. पाण्याचा वापर (Use Of Water)

आपण बरेचदा अनेक ब्युटी प्रोडक्ट्स घेण्यासाठी पैसे खर्च करतो. पण आपल्याला हे कळत नाही की, त्वचेची समस्या ही पाण्याशी निगडीतही असू शकते. त्यामुळे दिवसातून तुम्ही किती ग्लास पाणी पिता, याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच अनेकवेळा तुमच्या घरी येणाऱ्या पाण्याच्या प्रकारावरही तुमचे स्कीन प्रोब्लेम्स अवलंबून असतात. जसं तुमच्याकडे जड पाणी येत असल्यास त्याने चेहरा धुतल्यास साबण किंवा फेसवॉस नीट निघत नाही. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रकारावरही तुमच्या स्कीनचे प्रोब्लेम्स अवलंबून असतात. पाणी पिणं आणि पाण्याचा वापर या दोन्ही गोष्टी त्वचेसाठी आवश्यक आहेत. 

2. तणाव (Stress)

तुम्ही बरेचदा ऐकलं असेल की, जास्त ताण असल्यास केस अकाली पांढरे होतात. ताणाचा परिणाम फक्त तुमच्या केसावरच नाहीतर त्वचेवरही होतो. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, त्वचा तेलकट होऊन पिंपल्स येणं असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे स्ट्रेस मॅनेज करणं तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी आवश्यक आहे. जर तुमचं मन आणि मेंदू शांत असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर दिसेल.

3. दुधाचे पदार्थ (Dairy Foods)

तुम्हाला दूध आणि दुधाचे पदार्थ फार आवडतात का? कारण स्कीम्ड दूध, कॉटेज चीज किंवा दूधाच्या पदार्थांमुळेही अॅक्ने येऊ शकतात. तज्ज्ञ सांगतात की, ज्या मुली टीएनजमध्ये जास्त दूध पितात त्यांना जास्त प्रमाणात पिंपल्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे दूध घ्या पण ठराविक प्रमाणात.

4. टूथपेस्ट (Toothpaste)

तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल की, तुमच्या टूथपेस्टच्या फ्लेवरमुळेही तुमच्या चेहऱ्यावर लालसरपणा किंवा पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे बेसिक टूथपेस्ट जी टार्टर फ्री असेल, तीच वापरा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर झालेला बदल लगेच जाणवेल.

5. सूर्यप्रकाश आणि बाहेर फिरणं (Exposure From Sun)

सूर्यप्रकाशाचा परिणा तुमच्या त्वचेवर फक्त बाहेर पडल्यावरच नाहीतर घरात असतानाही होऊ शकतो. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाशही तुमच्या त्वचेसाठी हानीकारक ठरू शकतो. कारण युव्ही किरणही तुमच्या खिडकीतून तुमच्या त्वचेवर परिणाम करतात. ज्यामुळे सुरकुत्या किंवा चट्टे चेहऱ्यावर उठू शकतात. त्यामुळे त्वचेची घरात किंवा बाहेर असताना योग्य काळजी घ्या.

                               वाचा – केसांसाठी मसाज करण्याचे फायदे

कशी घ्याल तुमच्या त्वचेची काळजी (Beauty Tips For Skin Care)

 

प्रत्येक त्वचेचा जसा वेगवेगळा प्रकार आहे. त्याचप्रमाणे त्वचा प्रकारानुसार तिची काळजी घ्यावी लागते. त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी आहार ही तसा घ्यावा लागतो. तसंच वेगळं ब्युटी रूटीन तुम्हाला फॉलो कराव्या लागतात.

तेलकट त्वचेसाठी खास टिप्स (Tips For Oily Skin Care In Marathi)

त्वचा जर तेलकट किंवा ऑईली असेल तर तिची विशेष काळजी घ्यावी लागते. कधी कधी ऑईली स्कीन ही हार्मोनल बदलांमुळे किंवा जीवनशैलीमुळेही होते. पाहूया अशी त्वचा असल्यास कशी काळजी घ्यावी.

वाचा – घरी फेशियल करण्याच्या पद्धती (Facial Steps In Marathi)

कोरड्या त्वचेसाठी खास टिप्स (Tips For Dry Skin In Marathi)

 

कोरडी त्वचा असणाऱ्यांना थंडीच्या दिवसात जास्त काळजी घ्यावी लागते. कारण शुष्क वातावरणाचा परिणाम हा त्चचेवर आपोआपच होत असतो. त्यामुळे ड्राय स्कीन असणाऱ्यांना त्वचेची आर्द्रता कायम राखण महत्त्वाचं आहे.

कॉम्बिनेशन त्वचेसाठी खास टिप्स (Tips For Combination Skin In Marathi)

 

कॉम्बिनेशन त्वचा असणाऱ्यांना दोन्ही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. कोरडी आणि तेलकट असे त्यांच्या त्वचेचे दोन भाग पडतात. 

नॉर्मल त्वचेसाठी खास टिप्स (Tips For Normal Skin In Marathi)

 

जर तुमची स्कीन संवेदनशील, तेलकट किंवा कोरडी नसेल तर तिला सामान्य म्हणजेच नॉर्मल स्कीन असं म्हटलं जातं. 

वाचा – केसांसाठी मसाज करण्याचे फायदे आणि हेअर मसाजसाठी टिप्स

संवेदनशील त्वचेसाठी खास टिप्स (Tips For Sensitive Skin Care In Marathi)

 

ज्यांची त्वचा संवेदनशील असेल त्यांनी त्वचेची जास्त काळजी घेण्याची गरज असते. कारण कोणत्याही प्रोडक्ट किंवा हवामानातील बदलांचा त्यांच्या त्वचेवर लगेच परिणाम दिसून येतो. 

तुमच्या त्वचेसाठी वापरून पाहा ही खास प्रोडक्ट्स (Best Skin Care Products Of All Skin Types)

क्लिंजर (Cetaphil Gentle Skin Cleanser)

तुमची स्कीन क्लिंज करण्यासाठी हे उत्तम क्लिंजर आहे. या क्लिंजरमुळे तुमची त्वचा कोरडी होत नाही. मुख्य म्हणजे हे क्लिंजर कोणत्याही त्वचा प्रकारासाठी सूटेबल आहे. याच्या वापराने तुमच्या त्वचेवरी नैसर्गिक तेलही कायम राहतं आणि त्वचा मॉईश्चराईज होऊन त्वचेवरील छिद्रही मोकळी राहतात.

फेसपॅक (Aroma Magic Insta Radiance Green Tea Pack)

 

जोजोबा ऑईल, कोरफड जेल आणि बी वॅक्स अशा घटकांनी युक्त हा फेसपॅक तुमच्या त्वचेला छान तजेला देतो. त्वचेसाठी कोरफडीचा उपयोगअधिक चांगला होतो.

टोनर (Kara Purifying Toner)

सर्व ब्युटी प्रोडक्ट्सपैकी हे एक उत्तम प्रोडक्ट आहे. हे टोनर अल्कोहोल फ्री असून तुमच्या त्वचेवरील पोर्स स्वच्छ करतं. यामध्ये काकडी आणि गुलाबाचा अर्क आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर जास्तीच तेल येत नाही.

मॉईश्चराईजर (Neutrogena Oil-Free Moisturizer)

कोणत्याही हवामानात चेहऱ्याला मॉईश्चराईज करणं गरजेचं आहे. हे मॉईश्चराईजर लाईटवेट असून कॉम्बिनेशन स्कीनसाटी फारच उत्तम आहे. कॉम्बिनेशन त्वचा असणाऱ्यांनी टी झोनमध्ये हे लावाव.

सनस्क्रीन (Lotus Herbals Safe Sun Uv Screen Matte Gel SPF50)

उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा कोणत्याही ऋृतूत सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे. ज्यांच्या चेहऱ्यावर अॅक्ने आहेत त्यांनी हे मॅट फिनीश आणि ऑईल फ्री सनस्क्रीन नक्की वापरून पाहावं. यामुळे तुमच्या चेहऱ्याचं सूर्यप्रकाशापासून होणारं नुकसान नक्कीच थांबेल.

Also Read : Types Of Pimples, Causes & Ways To Get Rid Of It In Marathi

Read More From Combination Skin