आरोग्य

त्वचेचे विकार आयुर्वेदिक उपाय | Skin Diseases Ayurvedic Remedies In Marathi

Vaidehi Raje  |  Jun 30, 2022
त्वचेचे विकार आयुर्वेदिक उपाय | Skin Diseases Ayurvedic Remedies In Marathi

त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे, जो पाणी, प्रथिने, चरबी आणि खनिजांनी बनलेला आहे. तुमची त्वचा तुमच्या शरीराचे जंतूपासून संरक्षण करते आणि शरीराचे तापमान नियंत्रित करते. त्वचेतील मज्जातंतू तुम्हाला गरम आणि थंडीसारख्या संवेदना जाणवण्यास मदत करतात. त्वचा ही शरीरातील केस, नखे, तैल ग्रंथी आणि घाम ग्रंथींसह, इंटिग्युमेंटरी (इन-TEG-you-MEINT-a-ree) प्रणालीचा भाग आहे. “इंटिग्युमेंटरी” म्हणजे शरीराचे बाह्य आवरण होय. टिश्यूजच्या तीन स्तरांनी आपली त्वचा तयार होते. ते म्हणजे एपिडर्मिस हा वरचा थर, डर्मिस हा मधला थर व हायपोडर्मिस हा सर्वात खालचा थर किंवा फॅटी लेयर असे हे तीन स्तर असतात. एपिडर्मिस हा त्वचेचा वरचा थर आहे जो तुम्ही पाहू शकता आणि ज्याला स्पर्श करू शकता. केराटीन हे त्वचेच्या पेशींमधील एक प्रथिन आहे ते इतर प्रथिनांसह त्वचेच्या पेशी बनवते आणि हा थर तयार करण्यासाठी एकत्र चिकटून राहते. आपली बाह्यत्वचा ही शरीराचा संरक्षणात्मक अडथळा म्हणून कार्य करते. 

एपिडर्मिस हे संक्रमणास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणू आणि जंतूंना तुमच्या शरीरात आणि रक्तप्रवाहात प्रवेश करण्यापासून रोखते. तसेच शरीराचे पाऊस, उष्णता, ऊन आणि इतर घटकांपासून देखील संरक्षण करते. एपिडर्मिस सतत नवीन त्वचेच्या पेशी बनवत असते. या नवीन पेशी तुमच्या शरीरात दररोज मृत झालेल्या अंदाजे 40,000 जुन्या त्वचेच्या पेशींची जागा घेतात. दर तीस दिवसांनी आपल्याला नवीन त्वचा येते. एपिडर्मिसमधील लँगरहॅन्स पेशी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा भाग आहेत. ते जंतू आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. आपल्या बाह्यत्वचेची ही प्रमुख कार्ये आहेत. आपल्या त्वचेवर सतत चहूबाजूंनी जिवाणू व जंतू हल्ला चढवत असतात. आपल्या शरीरात त्या जंतूंशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती असते. पण जर आपण आपल्या त्वचेची व शरीराची नीट काळजी घेतली नाही तर ती रोगप्रतिकारक शक्ती कमी पडते आणि त्वचेला तसेच शरीरात संक्रमण होते. कधी ऍलर्जीमुळे तर कधी संक्रमणामुळे विविध त्वचाविकार होतात. हे त्वचेचे विकार आयुर्वेदिक उपाय करून देखील बरे होऊ शकतात. त्वचाविकार कमी प्रमाणात असेल तर त्यावर घरगुती उपचार देखील करता येतात. आपल्यापैकी अनेक लोक त्वचेचा दाह होत असल्यास किंवा खाज येत असल्यास इंटरनेटवर अंगाला खाज येणे उपाय सांगा असे सर्च करतात. या लेखात आपण बघूया विविध त्वचा रोगाचे प्रकार व त्वचाविकारांची कारणे काय आहेत आणि त्यावर कोणते आयुर्वेदिक उपाय करता येतील. 

त्वचा रोगाची कारणे | Causes Of Skin Disease In Marathi

त्वचेचे रोग म्हणजे त्वचेला झालेले संक्रमण किंवा ऍलर्जीमुळे त्वचेच्या संरचनेत झालेला बदल होय. या रोगांमुळे पुरळ, जळजळ, खाज सुटणे किंवा त्वचेत इतर बदल होऊ शकतात. त्वचेचे काही आजार हे अनुवांशिक देखील असू शकतात, तर सदोषमुळे जीवनशैलीमुळे काही त्वचाविकार होऊ शकतात. त्वचेच्या आजारांमध्ये तुमच्या त्वचेचा दाह, जळजळ किंवा खाज सुटणे, सूज येणे, पुरळ उठणे, गांधी उठणे हे त्रास होतात किंवा त्वचेत इतर बदल होतात. काही त्वचा रोग किरकोळ असतात.तर काही त्वचाविकार गंभीर लक्षणे निर्माण करतात. मुरूम,  अलोपेसिया अरेटा,एटोपिक डर्माटायटीस (एक्झिमा),सोरायसिस, Rosacea, त्वचेचा कर्करोग, गजकर्ण, सुरमा, Urticaria हे काही सामान्यपणे आढळणारे त्वचाविकार आहेत. त्वचेच्या फॉलिकल्समध्ये तेल, बॅक्टेरिया आणि मृत त्वचा जमा झाल्याने पोअर्स ब्लॉक होतात व तिथे संक्रमण झाल्याने मुरूम येतात. 

त्वचेचे विकार आयुर्वेदिक उपाय

अलोपेसिया अरेटा मध्ये केस लहान पॅचमध्ये गळतात.तर एक्झिमा मध्ये त्वचा कोरडी पडते व त्वचेला खाज सुटते ज्यामुळे त्वचेवर सूज, क्रॅक किंवा खवलेपणा येतो. सोरायसिस मध्ये खवलेयुक्त त्वचा तयार होते जी सूजू शकते किंवा गरम वाटू शकते.Rosacea या त्वचाविकारात लालसर, जाड त्वचा येते आणि सहसा चेहऱ्यावर मुरूम येतात तर त्वचेच्या कर्करोगात त्वचेच्या असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ होते. याशिवाय कोड किंवा वैद्यकीय भाषेत Vitiligo या त्वचाविकारात  त्वचेवर गुलाबी किंवा पांढरे डाग येतात. त्वचेत melanin हे रंगद्रव्य तयार न झाल्याने हे डाग उठतात. जीवनशैलीतील काही कारणांमुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. अंतर्निहित आरोग्य स्थिती तुमच्या त्वचेवर देखील परिणाम करू शकते. त्वचा रोगांच्या सामान्य कारणांमध्ये पुढील कारणे समाविष्ट आहेत. 

तुमच्या छिद्रांमध्ये किंवा केसांच्या कूपांमध्ये अडकलेले बॅक्टेरिया, तुमच्या थायरॉईड, किडनी किंवा रोगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम करणाऱ्या परिस्थिती, पर्यावरणीय ट्रिगर्सशी संपर्क येणे  जसे की ऍलर्जीन किंवा संक्रमित व्यक्तीची त्वचा, जेनेटिक्स, तुमच्या त्वचेवर राहणारे बुरशी किंवा परजीवी जंतू,  IBD- इरिटेबल बॉवेल सिंड्रोमवरची औषधे,व्हायरस, मधुमेह, तीव्र सूर्यप्रकाश या कारणांमुळे विविध त्वचाविकार होऊ शकतात.

अधिक वाचा – त्वचेच्या समस्या आणि त्वचा रोग घरगुती उपाय 

त्वचेचे विकार आयुर्वेदिक उपाय खालील प्रमाणे

ऋतू कुठलाही असो ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे किंवा ज्यांना ऍलर्जीचा त्रास आहे तसेच ज्यांना सोरायसिस, एक्झिमा असे जुनाट त्वचा रोग आहेत त्यांना वर्षभर त्रास होतो. खास करून हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्याने त्यांना जास्त त्रास होतो. पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढते त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते तसेच उन्हाळ्यात घामामुळे त्वचेला विविध प्रकारे त्रास होऊ शकतो. या ऋतूमध्ये बहुतेक लोकांना दाद, खरुज, पुरळ, फोड, एक्जिमा, पिंपल, फंगल इन्फेक्शन आणि सोरायसिस इत्यादींचा त्रास होतो. त्वचारोग हा एक अतिशय गंभीर आजार आहे ज्यामध्ये त्वचेवर पुरळ किंवा ऍलर्जीचा खुणा दिसतात. त्वचेवर खाज, वेदना आणि जळजळ असाही त्रास होतो. कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या आजारावर उपचार करणे  आणि स्वच्छता, आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे यांचा महत्त्वाचा वाटा असतो. निष्काळजीपणामुळे हे आजार संपूर्ण शरीरात पसरू लागतात.

त्वचेचे विकार आयुर्वेदिक उपाय

हिवाळ्यात गजकर्ण /नायटा, खरूज आणि खाज येण्याची समस्या सामान्य आहे. खाज हा असा आजार आहे की त्यापासून पूर्णपणे मुक्त होणे आवश्यक आहे. अन्यथा ही समस्या तुम्हाला पुन्हा पुन्हा सतावू शकते. हा आजार टाळण्यासाठी लोक भरपूर पैसा आणि वेळ खर्च करतात, तरीही त्यांना फायदा मिळत नाही. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मंदार वनस्पतीचे दूध घरगुती उपाय म्हणून वापरू शकता. यासाठी तुम्हाला ४ ते ५ थेंब लागतील.

मोहरीच्या तेलात लसणाच्या काही पाकळ्या टाकून हलके कोमट करून बाधित त्वचेवर लावा. याने खाज आणि खरुजची समस्या दूर होते. कोरड्या त्वचेची तक्रार असल्यास मोहरीच्या तेलात हळद मिसळून त्वचेवर हलका मसाज केल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. हळद बारीक करून तीळाच्या तेलात मिसळून शरीरावर मसाज केल्याने त्वचारोग मुळापासून दूर होतात. चेहऱ्यावरील काळे डाग आणि व्रण दूर करण्यासाठी शुद्ध पाण्यात हळद मिसळून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. या उपायाने डाग दूर होतात. तसेच कारल्याचा रस प्यायल्याने शरीरातील रक्त शुद्ध होते. सकाळी अनशापोटी  एक चतुर्थांश कारल्याचा रस प्यायल्याने त्वचा रोग बरे होतात. दाद, खरुज आणि खाज यासारखे आजार बरे करण्यासाठी कारल्याचा रस त्वचेवर लावावा.

अधिक वाचा – घाम कमी येण्यासाठी उपाय

अंगाला खाज येणे त्वचा विकार आणि त्यावर आयुर्वेदिक उपाय

अंगावर खाज येते उपाय सांगा

अंगाला खाज सुटणे हा जरी एक साधा आजार असला तरी सत्य हे आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला हा आजार होतो तेव्हा ती व्यक्ती त्रस्त होते. खाज येण्याची अनेक कारणे असू शकतात. कधीकधी खाज सुटणे हे अनेक रोगांचे लक्षण देखील असू शकते. आयुर्वेदानुसार सर्व रोग वात, पित्त आणि कफ यांच्या असंतुलनामुळे होतात. वात आणि कफ दोषांमुळे अंगाला खाज सुटते..कधी कधी त्वचेवर ऍलर्जीमुळे देखील खाज येते.. याला त्वचेचा एक प्रकारचा आजारही म्हणता येईल. शरीराच्या कोणत्याही एका भागात आणि संपूर्ण शरीरात किंवा शरीराच्या वेगवेगळ्या भागातही खाज येऊ शकते. सामान्यतः कोरड्या त्वचेमध्ये खाज येण्याची समस्या अधिक दिसून येते. याशिवाय काही महिलांना गर्भधारणेमध्येही हा त्रास होऊ शकतो. तसेच वायू प्रदूषण, धूळ आणि मातीच्या संपर्कामुळे त्वचेला खाज येऊ शकते. तर काही लोकांना विशिष्ट प्रकारच्या अन्नाची ऍलर्जी असते. त्या लोकांनी ते अन्न खाल्ले तर त्यांच्या अंगाला खाज सुटू शकते. कधी एखाद्या औषधाच्या साइड इफेक्टमुळेही अंगाला खाज येऊ शकते.  हानिकारक केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादनांच्या वापरामुळे त्वचेला त्रास होऊन खाज येऊ शकते. तसेच आहारात पुरेशा प्रमाणात चरबी नसल्यास त्वचेवर खाज येण्याची समस्या उद्भवू शकते. किंवा मूत्रपिंडाचा आजार, रक्तात लोहाची कमतरता किंवा थायरॉईडची समस्या असल्यासही खाज येऊ शकते.

आयुर्वेदिक उपचारांमुळे शरीरातील दोष संतुलित होतात आणि रोग शांत होतात.

वाचा – चामखीळ येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

गजकर्ण खाज त्वचा विकार आणि त्यावर आयुर्वेदिक उपाय | Ringworm Ayurvedic Remedies In Marathi

अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय

गजकर्णाला आयुर्वेदात दद्रु म्हणतात. हे त्वचेवर झालेले संक्रमण आहे. गजकर्ण घरगुती उपाय करून बरे होऊ शकते. त्वचेवर लाल किंवा हलके तपकिरी गोल आकाराचे व्रण उमटते आणि तिथे खाज सुटते. गजकर्ण होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे स्वच्छतेची व्यवस्थित काळजी न घेणे, ज्यामुळे बुरशीचे जंतू त्वचेमध्ये प्रवेश करतात. ही समस्या मुख्यतः अशा ठिकाणी उद्भवते जिथे हवामान दमट आणि लोकसंख्या जास्त असते. आयुर्वेदात त्वचेच्या आजारांवर विविध उपचार सांगितले आहेत. गजकर्ण नियंत्रित करण्यासाठी लेप हा सर्वात जास्त वापरला जाणारा बाह्य उपचार आहे. गजकर्णाच्या उपचारांसाठी शंखपुष्पी, हरिद्रा (हळद), अरग्वध (अमलतास), चक्रमर्द आणि पलाश यांसारख्या औषधी वनस्पतींची आयुर्वेदिक चिकित्सक शिफारस करतात. दद्रुघन वटी, महामरिच्यादी तेल, आरोग्यवर्धिनी तेल, आरोग्यवर्धिनी वटी, करंजादी तेल आणि कैशोर गुग्गुल यांचा उपयोग गजकर्ण नियंत्रित करण्यासाठी केला जातो.

औषधी वनस्पती व तूप यांचे मिश्रण करून लेप तयार केला जातो. हा लेप रोग बरे करण्यास आणि लक्षणे दूर करण्यास मदत करतो.  गजकर्णाच्या उपचारासाठी वेगवेगळ्या औषधी वनस्पतींपासून वेगवेगळ्या पेस्ट तयार केल्या जातात, जसे की: मुळ्याच्या रसात चक्रमर्द, मुळ्याच्या रसात शिग्रूची साल (दहजन), मंजिष्ठ, त्रिफळा (आमलकी, विभितकी आणि हरितकी), लाख , हरिद्रा, गंधक व  मोहरीचे तेल, आंबट दह्यात विडंगाचे दाणे, मोहरी, चक्रमर्द, आणि काळे मीठ, ताकामध्ये दुर्वा, हरितकी फळाची साल, चक्रमर्द बिया आणि तुळशीची पाने असे औषधी घटक वापरून लेप तयार केले जातात आणि ते बाधित त्वचेवर लावण्यात येतात. 

गजकर्णावर पोटातून घेण्यासाठी देखील आयुर्वेदिक औषधे दिली जातात. दद्रुघन वटी टॅब्लेटच्या स्वरूपात उपलब्ध आहे, या फॉर्म्युलेशनमध्ये चक्रमर्द हा सक्रिय घटक आहे. हे गजकर्ण आणि पांढरे डाग यांसारख्या सर्व प्रकारच्या त्वचेच्या संसर्गाच्या उपचारांमध्ये वापरले जाते. तसेच महामरिच्यादी तेलअनेक नैसर्गिक औषधी वनस्पतींपासून बनवले जाते. या तेलात जटामांसी, नागरमोथा, पिपली, दारुहरिद्र, हरिद्रा, दूध, वत्सनाभ, कुठ, कणेर मूल, रक्तचंदन  इंद्रायणमूल, हरीतला आणि श्वेत निशोथ या वनस्पती असतात.  हे तेल गजकर्ण आणि फोडांसारख्या त्वचेच्या अनेक संक्रमणांवर उपचार करण्यास मदत करते.

आरोग्यवर्धिनी वटी ही एक सुप्रसिद्ध आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे जे त्वचेच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाते. यामध्ये प्रामुख्याने त्रिवृत व इतर हर्बोमिनरल जसे की कडुनिंब, त्रिफळा, अभ्रक भस्म, ताम्र भस्म हे घटक असतात. या घटकांमध्ये पित्त विरेचन, कफ शमन आणि वात अनुलोमन गुणधर्म आहेत आणि त्रिदोष शामक म्हणूनही काम करते. आरोग्यवर्धिनी वटी शरीरातील दोष संतुलित करण्यात आणि शरीर शुद्ध करण्यात मदत करते. त्यामुळे गजकर्णासह त्वचेचे अनेक आजार आटोक्यात आणण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अर्थात गजकर्णावर उपचार हे व्यक्तीच्या स्वभावावर आणि अनेक घटकांवर ठरवण्यात येतात  त्यामुळे योग्य औषध आणि निदानासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अधिक वाचा – उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्या उपाय

खरूज नायटा त्वचा विकार आणि आयुर्वेदिक उपाय


खरूज नायटा हा असा आजार आहे जो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त प्रमाणात उद्भवतो. हा आजार सामान्यतः हिवाळ्यात व पावसाळ्यात या आजाराचा उद्रेक वाढतो. नायटा हा आजार शरीराच्या मऊ भागांवर, खास करून डोक्याजवळ उद्भवतो. पण असे नाही की हा आजार  फक्त डोक्याच्या जवळच होतो. हे संक्रमण कुठेही होऊ शकते. नायट्याला Tinea असे नाव आहे. या आजाराचे संक्रमण खाल्यास त्वचेवर गोल आकाराचे चट्टे येतात. चट्टे आल्यावर तिथे खास सुटते आणि त्वचेचा दाह होतो. या आजाराने संक्रमित व्यक्तीच्या वस्तू किंवा कपडे इतरांनी वापरल्यास त्यांनाही संसर्ग होऊ शकतो. नायट्याचा चट्टा लहान असताना खाजवला तर तो वेगाने पसरतो. हा चट्टा वाढल्यास त्यात पुरळ होते व कधी पस होतो. जर त्याकडे दुर्लक्ष केले तर ते वाढू शकते आणि गंभीर स्वरूप धारण करू शकते. म्हणूनच शारीरिक स्वच्छता पाळावी, उन्हाळ्यात घामाने भिजलेले कपडे अंगावर जास्त काळ ठेवू नयेत आणि पावसाळ्यात ओले कपडे घालू नयेत.  नायट्यावर आयुर्वेदिक उपचार केल्यास जुनाट नायटाही बरा होतो.

खरूज नायटा वर घरगुती उपाय

अधिक वाचा – शरीरातील उष्णता कमी करण्याचे उपाय

सुरमा त्वचा रोग आयुर्वेदिक उपाय

सुरमा त्वचा रोग उपाय

त्वचेवर होणाऱ्या एका प्रकारच्या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे त्वचेवर डाग पडतात. याला साध्या भाषेत ‘शिबं’ किंवा ‘सुरमा’ म्हणतात. यात मान, पाठ, छाती, खांदे या ठिकाणी पांढरे अस्पष्ट डाग दिसू लागतात. सुरमा त्वचा रोग झाला असेल तर त्यावर आयुर्वेदिक उपाय करता येतात. 

अधिक वाचा – उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्या उपाय

पुरळ त्वचा रोग आणि आयुर्वेदिक उपाय

त्वचेचे आजार अनेक प्रकारचे असतात. जसे की गजकर्ण, खरुज, खाज,, फोड, गोवर, मुरुम इ. यामध्ये त्वचेवर पुरळ उठते. तसेच ऍलर्जी झाली असेल तरीही त्वचेवर पुरळ उठते. अनेक बाबतीत आपण आयुर्वेदिक आणि घरगुती उपचारांनी हा आजार बरा करू शकतो, परंतु घरगुती उपचारांनी पुरळ बरे होत नसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता चांगल्या त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.  अंगावर पुरळ उठत असेल तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता.

पुरळ घरगुती उपाय

इसब त्वचारोग आयुर्वेदिक उपाय | Eczema Ayurvedic Remedies

इसब त्वचारोग घरगुती उपाय

एक्झिमाच्या लक्षणांमध्ये त्वचेवर लाल पुरळ येणे, वारंवार खाज सुटणे, जळजळ होणे, गजकर्ण यांचा समावेश होतो. म्हणूनच तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटावे. कमीत कमी साबण, शॅम्पू  आणि डिटर्जंट वापरा. अधिक केमिकल युक्त गोष्टी वापरणे थांबवा. आंघोळीसाठी ग्लिसरीन साबण वापरा. आंघोळीनंतर संपूर्ण शरीरावर खोबरेल तेल लावा. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोणतेही अँटी फंगल क्रीम वापरा. साबण आणि डिटर्जंट वापरल्यानंतर कपडे चांगले धुवा. कपड्यांवर साबण आणि डिटर्जंट जमा होऊ देऊ नका. कपडे पूर्णपणे कोरडे झाल्यावरच घाला. मीठ जपून वापरा. एक्झिमच्या जखमेतून पस किंवा पाणी बाहेर पडल्यास स्वच्छ पाण्याने धुवावे. इसब त्वचारोग वर घरगुती उपाय करता येतात.

सोरायसिस आयुर्वेदिक उपचार | Psoriasis Ayurvedic Remedies

सोरायसिस हा त्वचेचा विकार आहे. हा विकार T लिम्फोसाइट्स नावाच्या पेशींमुळे होतो, जे शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीचा भाग आहेत आणि काही इंटरल्यूकिन तयार करतात. या विकार आणि रोगांमध्ये अनुवांशिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. सोरायसिस हा एक ऑटोइम्युन रोग आहे जो तुमच्या वयाशी संबंधित नाही, परंतु तो मुख्यतः प्रौढांमध्ये होतो. त्वचारोग तज्ज्ञ या आजाराचा संबंध मधुमेह, हृदयविकार आणि तणावाशी जोडतात. या आजाराचे खरे कारण अद्याप कळलेले नाही. परंतु, आयुर्वेदात या आजाराचे मुख्य कारण शरीराची कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती मानली जाते. कारण जेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते, तेव्हा बॅक्टेरियाचा पहिला हल्ला आपल्या त्वचेवर होतो. सोरायसिसची काही लक्षणे सामान्य असतात आणि काही लक्षणे वैयक्तिक असतात.

सोरायसिस घरगुती उपचार

हा असा एक आजार आहे. ज्याचा कायमस्वरूपी उपचार कोणत्याही डॉक्टरकडे नसून पर्यायी औषधाच्या रूपाने आयुर्वेदात त्याचे यशस्वी उपचार उपलब्ध आहेत. सोरायसिसची लक्षणे कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. आयुर्वेदिक औषधांनी त्वचेवरील पुरळ कमी होते. आणि भविष्यात सोरायसिसची लक्षणे उद्भवू नयेत म्हणून अशा औषधी वनस्पती दिल्या जातात. आयुर्वेद उपचारात सोरायसिसच्या रुग्णांसाठी शरीर स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जातो. कारण तुमचे शरीर नीटनेटके आणि स्वच्छ राहिल्यास सोरायसिसचा प्रादुर्भाव रोखता येतो. सोरायसिसच्या रुग्णांनी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा. सोरायसिसच्या रुग्णांनी त्यांची दिनचर्या सुधारली पाहिजे. मनावर फार ताण येऊ देऊ नये. सोरायसिस आणि इतर आजारांबाबत आयुर्वेदाचेही असेच मत आहे, की प्रथम आहार सुधारला पाहिजे आणि सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे. तरच या आजारावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवता येईल. सोरायसिस प्रमाणेच नागिण रोग का होतो या विषयी तुम्हाला माहीत असायलाच हवं.

अधिक वाचा – सोरायसिस म्हणजे काय जाणून घ्या सर्व माहिती 

Acne Ayurvedic Remedies | त्वचेचे विकार आयुर्वेदिक उपाय

अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय

शरीरावर पुरळ किंवा मुरुम दिसण्याचे कारण एकच आहे. अतिक्रियाशील तेल ग्रंथी, मृत त्वचेच्या पेशींचे भरपूर प्रमाण आणि बॅक्टेरियामुळे पुरळ येते. जेव्हा बॅक्टेरिया वाढतात, तेव्हा त्वचेची रंध्रे ब्लॉक होतात आणि सुजतात. दाह झाल्यानंतर पुरळ गळूच्या स्वरूपात त्वचेत खोलवर पोहोचते. हे सिस्ट खूप वेदनादायक असू शकतात. अनेकदा लोक या प्रकारच्या मुरुमांसाठी कायमस्वरूपी उपचार शोधतात. उन्हाळ्यात मुरुम येणे सामान्य गोष्ट आहे. पण जेव्हा हे मुरुम सिस्ट बनतात तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या सौंदर्यावर होतो. पिंपल्स दूर करण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु कोणते उत्पादन तुम्हाला शोभेल आणि कोणते नुकसान करेल हे माहीत नसते. पण असे अनेक आयुर्वेदिक घरगुती उपाय आहेत, ज्याचा वापर करून तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स रातोरात निघून जातील. ताजे संपूर्ण सेंद्रिय शिजवलेले पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, गोड आणि रसाळ फळे, शेंगांचे सूप आणि ऑलिव्ह ऑइल यांचा आहारात समावेश करा. काही कारणामुळे जर चेहऱ्यावर डाग पडले असतील तर त्यावरही घरगुती उपाय केल्यास डाग कमी होण्यास मदत होते.

Seborrheic Dermatitis Ayurvedic Remedies

तुमच्या टाळूवर किंवा शरीरावर कोंडा व लाल, खाज सुटणारे पुरळ seborrheic dermatitis मुळे होते. हा त्वचेचा रोग डोक्यातील कोंडा, इसब, सोरायसिस किंवा त्वचेच्या ऍलर्जीच्या लक्षणांसारखाच आहे ज्याचे निदान अनेकदा होत नाही. हे खरंच तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, कारण सेबोरेहिक डर्माटायटिसचे पॅच पुन्हा पुन्हा वाढतात. या त्वचेच्या त्रासांना तोंड देण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुर्वेदात उपाय आहेत. आयुर्वेद हा एकमेव उपचार आहे, जो सेबोरेहिक डर्माटायटीसचा मुळापासून उपचार करतो. Seborrheic dermatitis हा एक आजार आहे जो तुमच्या शरीरात कफ आणि वायु दोषांच्या वाढीमुळे होतो. म्हणून, आयुर्वेदिक चिकित्सक शिफारस करतात की तुम्ही थंड आणि कोरडे हवामान टाळावे. आयुर्वेद सेबोरेरिक त्वचारोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी खालील औषधी वनस्पतींची देखील शिफारस करतो.

त्वचेचे विकार आयुर्वेदिक उपाय

Hives Ayurvedic Remedies In Marathi

अंगावर खाज येते उपाय सांगा

शरीरात urticaria किंवा अंगावर पित्ताच्या गाठी उठण्याची अनेक कारणे आहेत. याकडे ऍलर्जी म्हणून पाहिले जाते. आयुर्वेदामध्ये, अर्टिकेरियाचे वर्णन शीतपित्त असे केले जाते. शीतपित्त हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. ज्यामध्ये स्थीत म्हणजे ‘थंड’ आणि पित्त म्हणजे ‘उष्णता’. हे सामान्यत: तीव्र थंडीच्या संपर्कात असताना उद्भवते. व पित्त  ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रुग्णाच्या शरीराच्या एका भागावर किंवा संपूर्ण शरीरावर लाल पुरळ उठतात आणि या पुरळांना अत्यंत खाज सुटते.

अधिक वाचा – पित्तावर घरगुती उपाय करून घरच्या घरीच मिळवा आराम

Fungal Infection Ayurvedic Remedies In Marathi 

फंगल इन्फेक्शन ही एक प्रकारची त्वचेशी संबंधित समस्या आहे. फंगल इनफेक्शनचे अनेक प्रकार आहेत. कोणत्याही व्यक्तीला बुरशीजन्य संसर्ग होतो जेव्हा बुरशीचे जंतू शरीराच्या कोणत्याही भागावर आक्रमण करतात आणि आपली प्रतिकारशक्ती या संसर्गाशी लढण्यास सक्षम नसते. वातावरणात जास्त आर्द्रता असल्यास बुरशीजन्य संसर्गाची समस्या अधिक असते. आपल्या सभोवताली बुरशीचे अस्तित्व असते. हवा, माती, पाणी, झाडे अशा अनेक ठिकाणी बुरशीच्या संसर्गासाठी जबाबदार असलेले बुरशीचे जंतू विकसित होतात. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने बुरशीची वाढ होते.  बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही अ‍ॅलोपॅथिक औषधांसोबतच आयुर्वेदिक पद्धतीचा अवलंब करू शकता. आयुर्वेदिक उपचार खूप प्रभावी ठरू शकतात.आयुर्वेदात बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी अनेक प्रकारचे लेप आहेत. हे तुम्ही घरीच तयार करू शकता. याशिवाय बाजारातही आयुर्वेदिक लेप मिळतात ज्यांचा वापर फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी करता येतो. 

त्वचेचे विकार आयुर्वेदिक उपाय

त्वचेच्या आजारासंबंधी पडणारे काही सामान्य प्रश्न – FAQ 

प्रश्न – त्वचेच्या आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार कसे केले जातात?

उत्तर – आयुर्वेदिक पद्धतीत एक्झिमाचा उपचार मुख्यतः पंचकर्म थेरपीने केला जातो. ही पद्धत सोरायसिस आणि मुरुमांसारख्या त्वचेच्या इतर आजारांसाठी देखील वापरली जाते. पंचकर्म थेरपी घेण्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक चिकित्सकाला भेट द्यावी लागेल.

प्रश्न – आयुर्वेदिक औषधाने त्वचेच्या समस्या दूर होऊ शकतात का?

उत्तर – आयुर्वेदिक दृष्टीकोनातून, त्वचेचे रोग हे शरीरातील कफ, पित्त व वाट या त्रिदोषांच्या असंतुलनामुळे होतात. आयुर्वेदानुसार या तीन दोषांचे संतुलन साधणे महत्वाचे आहे. आयुर्वेदिक उपचार हे संतुलन प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करतात. आयुर्वेद दीर्घकालीन त्वचा रोग व इसब यांसारख्या जुनाट स्थितींवर उपचार करू शकतो.

प्रश्न – त्वचारोगासाठी कोणते आयुर्वेदिक औषध उत्तम आहे?

उत्तर – Azadirachta Indica  म्हणजेच कडुलिंबात बुरशीविरोधी, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि रक्त शुद्ध करणारे गुणधर्म आहेत. सोरायसिस, खाज सुटणे, चिडचिड आणि त्वचेचा खडबडीतपणा, एक्झिमा आणि मुरुमांवर हे प्रभावी आहे. तसेच फ्लॅक्ससीड म्हणजेच अळशीचा उपयोग एक्झिमा आणि सोरायसिस बरा करण्यासाठी केला जातो.

प्रश्न- पंचकर्माने त्वचा रोग बरे होतात का?

उत्तर- त्वचा रोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या डी-टॉक्सिफिकेशन थेरपीज केवळ रूग्णांसाठीच नाहीत तर आजार नसलेल्या लोकांसाठी देखील उपयुक्त आहेत. पंचकर्म थेरपी आरोग्य टिकवून ठेवण्यास, आयुर्मान वाढवण्यास, वजन कमी करण्यास, त्वचेचे आरोग्य राखण्यास आणि शरीराबरोबरच मनाचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत करते.

त्वचा हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. त्वचा इतर विविध कार्यांसह रोगांपासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. म्हणूनच त्वचेचे आरोग्य राखणे खूप महत्वाचे आहे. हल्ली जीवनशैलीतील बदल, प्रदूषण, भेसळयुक्त अन्न , ताणतणाव व इतर अनेक घटकांमुळे त्वचारोगांचे प्रमाण खूप वाढले आहे. पण त्वचेचे विकार आयुर्वेदिक उपाय करून बरे होण्यासारखे असतात.  परंतु येथे नमूद केलेले कोणतेही उपाय वापरण्यापूर्वी नेहमी आयुर्वेदिक चिकित्सकाचा सल्ला घ्या. हे अत्यंत महत्वाचे आहे, कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी अनुकूल असेलच असे नाही. 

फोटो क्रेडिट – istockphoto

हेही वाचा :

चेहऱ्यावरील खड्डे जाण्यासाठी उपाय

Read More From आरोग्य