लग्नसराई

सुष्मिता सेन तिच्या बॉयफ्रेंडसोबत नोव्हेंबरमध्ये करणार लग्न

Aaditi Datar  |  Aug 1, 2019
सुष्मिता सेन तिच्या बॉयफ्रेंडसोबत नोव्हेंबरमध्ये करणार लग्न

सुष्मिता सेन तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतच्या नात्याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. दोघांनाही बरेचदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे मग ते भारतात असो वो भारताबाहेर. एवढंच नाहीतर रोहमन सुष्मिताच्या मुली रिनी आणि अलिसासोबतही क्वालीटी टाईम स्पेंड करताना दिसतो. आता बातमी आहे की, सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

नोव्हेंबरमध्ये करणार लग्न

बॉलीवूडच्या गॉसिप क्वीन्सकडून अशी बातमी कळत आहे की, या वर्षाच्या शेवटी म्हणजे नोव्हेंबरमध्ये सुष्मिता आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन लग्न करणार आहेत. तसं पाहता या आधीही या दोघांच्या लग्नाच्या बातम्या आल्या होत्या पण त्यांना अफवा म्हणत नकार देण्यात आला होता. पण आता एका मीडिया रिपोर्टनुसार सुष्मिता सेन आपल्या भावाच्या राजीव सेनच्या लग्नानंतर स्वतःही लग्न करण्याबाबत सीरियस झाली आहे.

फ्रेंच किस बद्दल देखील वाचा

या रिपोर्टनुसार रोहमनने, सुष्मिताला लग्नासाठी प्रपोज करूनही झालं आहे आणि सुष्मिताने त्याच्या प्रपोजलला होकारही दिला आहे. तुमच्या माहितीसाठी रोहमन शॉल हा सुष्मिता सेनपेक्षा तब्बल 15 वर्षाने छोटा आहे.

मागच्या वर्षीच झालं नात्यावर शिक्कामोर्तब

सुष्मिता सेन नेहमीच तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. रोहमन शॉलसोबतचं आपलं नातं सुष्मिता अगदी खुलेआम स्वीकारलं आहे. मागच्या वर्षी सुष्मिता आपल्या मुलींसोबत आणि रोहमनसोबत आग्र्यातील ताजमहाललाही भेट दिली होती. तेव्हाच त्यांनी इंस्टाग्राम पोस्टच्यामार्फत आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. तसंच सुष्मिताच्या भावाच्या म्हणजेच राजीव सेनच्या लग्नातही सुष्मिता आणि रोहमनची जोडी प्रत्येक कामाला पुढे होती. 

जेव्हा रोहमनने सुष्मिताला म्हटलं I Love You

फक्त सुष्मिता सेन नाही तर त्याच्या बॉयफ्रेंड रोहमननेही आपल्या प्रेमाची कबुली खुलेआम दिली आहे. नुकतंच रोहमनने इंस्टाग्राम अकाउंटवर सुष्मिताला किस करतानाचा एक फोटोही शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने सुष्मिताला I Love You म्हणत तिच्या गालावर पडणाऱ्या डिंपल्सचं कौतुक केलं होतं.

लव्ह बर्डसचं एकत्र व्हेकेशन

सुष्मिता सेन सध्या जास्तीत जास्त वेळ सध्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत स्पेंड करताना दिसत आहे. नुकतंच तिने आपल्या दोन्ही मुली आणि रोहमनसोबत अर्मेनियालाही भेट दिली होती. आपल्या इन्स्टा अकाउंटवर सुष्मिताने या व्हेकेशनचे सुंदर फोटोजही शेअर केले होते.

सुष्मिता आणि रोहमनच्या लग्नाबाबतच्या अपडेट्ससाठी फॉलो करा #POPxoMarathi.

हेही वाचा –

#Engagement – मिस युनिव्हर्स सुश्मिताला मिळाला मिस्टर परफेक्ट

सुश्मिता सेननंतर तिच्या भावाच्या नात्यात दुरावा,प्रसिद्धीसाठीचा हा दिखावा

सुष्मिता सेन आहे बॉयफ्रेंडची #lifeline, पाहा फोटो

पुन्हा एकदा मिस युनिव्हर्स सुश्मिताचं ‘ब्रेकअप’

Read More From लग्नसराई