Table of Contents
- 7 व्या महिन्यातील लक्षणे (Symptoms of 7th Months In Marathi)
- सातव्या महिन्यातील शरीरातील बदल (Changes In Body)
- सातव्या महिन्यातील बाळाची वाढ (Child’s Growth)
- काळजी कशी घ्यावी (Pregnancy Care Tips For Mothers In Marathi)
- सातव्या महिन्यात करण्यात येणाऱ्या टेस्ट आणि स्कॅनिंग (7th Month Scanning)
- गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात कशी घ्याल काळजी (What To Do In 7th Month)
- काय करू नये (What Not To Do In 7th Month)
- वडिलांनी घ्यायची काळजी (Pregnancy Care Tips For Fathers In Marathi)
- प्रश्नोत्तरे (FAQ’s)
गर्भावस्थेच्या दुसऱ्या तिमाहीला अगदी आनंदी काळ असं म्हटलं जातं. तर तिसऱ्या तिमाहीमध्ये अर्थात 7 व्या महिन्यापासून अत्यंत काळजी बाळगावी लागते. तिसरी तिमाही म्हणजे डिलिव्हरीचा काळ जवळ येणे. बाळाचा गर्भात अत्यंत वेगाने विकास चालू असतो. सातवा, आठवा आणि नववा महिना बाळाला खूप जास्त जपावे लागते. बाळाचे वजन नीट वाढते आहे की नाही, त्याची हालचाल नीट आहे की नाही या बारीक सारीक गोष्टींकडे खूपच लक्ष द्यावे लागते. सातव्या महिन्यापासून असे कोणतेही काम करू नका. ज्यामुळे आपल्या बाळाला हानी होईल. गरोदरपणाच्या 7 व्या महिन्यात नक्की तुमची आणि बाळाची कशी काळजी घ्यायची यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. सातवा महिना म्हणजे 25 व्या आठवड्यापासून ते 28 व्या आठवड्यापर्यंत हा कालावधी असतो. या काळात बाळाची वाढ कशी होते आणि तुम्ही काय काळजी घ्यायला हवी याची माहिती तुम्हाला आम्ही देत आहोत.
7 व्या महिन्यातील लक्षणे (Symptoms of 7th Months In Marathi)
Symptoms of 7th Months In Marathi
गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात काही लक्षणे दिसून येतात. सर्व लक्षणे सर्वांनाच जाणवतील असंही नाही. प्रत्येक महिला आणि प्रत्येक बाळ हे वेगळे असते. पण काही सामाईक लक्षणांबद्दल आपण जाणून घेऊया. सातव्या महिन्यात ही लक्षणे दिसू शकतात.
फॉल्स लेबर अर्थात ब्रेक्सटन हिक्स संकुचन – गर्भावस्थेची दिवस वाढू लागतात आणि तुम्ही सातव्या महिन्यात जेव्हा प्रवेश करता तेव्हा तुम्हाला फॉल्स लेबरची लक्षणे दिसू लागतात. साधारण 30 सेकंदाचे हे संकुचन असते. पण हे सर्वांनाच जाणवते असे नाही.
योनी स्रावामध्ये वाढ – गर्भावस्थेत योनीमधून स्राव होणे हे अत्यंत कॉमन आहे. सुरूवातीच्या दिवसात अशा प्रकारच्या संक्रमणापासून रोख लावण्यास याची मदत होते. पण बाळाच्या वाढीनुसार बाळाच्या डोक्याचा दबाव अधिक होत जातो. त्यामुळे योनीमधून स्राव येतो. हे सामान्य आहे. पण या स्रावामधून दुर्गंध येत असेल तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
स्तनांमधून द्रव निघणे – दुसऱ्या तिमाहीपासूनच स्तनांमधून एक चिकट पिवळ्या रंगाचा द्रव निघू लागतो. याला कोलोस्ट्रम असं म्हटलं जातं. दिवसातून कधीही हा स्राव होऊ शकतो. डिलिव्हरी जशजशी जवळ येते तसा हा द्रव रंगहीन होतो आणि ही सामान्य प्रक्रिया आहे. सर्वच महिलांसह असं होतं असं नाही. पण कोणालाही असा अनुभव येत असेल तर ही गोष्ट अत्यंत सामान्य आहे. घाबरून जायची गरज नाही.
अपचन – गरोदरपणाच्या काळात अपचनाची समस्या आणि बद्धकोष्ठता ही लक्षणं कॉमन आहेत. या दरम्यान पोट फुगणे, छातीत जळजळ होणे आणि मळमळणे ही प्रक्रिया सातव्या महिन्यातही असते. तिसऱ्या तिमाहीत ही समस्या अधिक वाढते. बाळ विकसित होते त्यानुसार पचन तंत्र व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळेच ही समस्या वाढीला लागते.
सातव्या महिन्यातील शरीरातील बदल (Changes In Body)
7th Month Of Pregnancy And Care Tips In Marathi
तिसरी तिमाही म्हणजे अंतिम तिमाही असते. सातव्या महिन्यात तुमचे पोट अधिक वाढलेले असते आणि अनेक शारीरिक बदल दिसून येतात.
- सातव्या महिन्यात गरोदर असणाऱ्या महिलेचे वजन खूपच वाढते. हे सामान्य आहे. साधारण पाच किलोच्या आसपास या महिन्यात वजन वाढते. त्याशिवाय गर्भाशय वाढल्यामुळे पोट खेचले जाते आणि अधिक स्ट्रेचमार्क दिसू लागतात
- गर्भाशय वाढल्यामुळे बेंबी वर येते आणि कधीतरी श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. गर्भाशय वर आल्यामुळे ही समस्या निर्माण होते
- पहिल्या तुलनेत स्तन अधिक वाढतात. निप्पलच्या आसपासचा भाग काळा आणि अधिक गडद होऊ लागतो
- सतत पोट वाढू लागते आणि त्यामुळे तुम्हाला समोरचा भाग दिसेनासा होतो. तुम्ही वाकूही शकत नाही
- रक्तप्रवाह जलद असल्याने पायांमध्ये आणि कधी कधी चेहऱ्यालाही सूज येते. हे अत्यंत सामान्य आहे
- बरेचदा रात्री झोप येत नाही आणि आली तरी श्वास घ्यायला त्रास होतो
गरोदरपणात छातीत दुखणे कारणे आणि घरगुती उपाय
सातव्या महिन्यातील बाळाची वाढ (Child’s Growth)
7th Month Of Pregnancy And Care Tips In Marathi
आधीचे सहा महिने आईने खूपच काळजी घेतलेली असते. त्यानुसार बाळाची सातव्या महिन्यातील वाढ नक्की कशी आहे ते जाणून घेऊया
- गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यापर्यंत बाळाचा अर्ध्यापेक्षा अधिक विकास झालेला असतो
- तुमचे बाळ आता बाहेरील आवाजाला प्रतिसाद द्यायला तयार असते आणि त्याशिवाय पोटातच आळस देणे, जांभई देणे या सर्व गोष्टी बाळाने सुरू केलेल्या असतात
- या महिन्यात बाळाला भुवई आणि डोळ्यांच्या पापण्याही आलेल्या असतात
- डोळ्यांची उघडझाप व्हायला सुरूवात याच महिन्यात होते
- याशिवाय गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात बाळ साधारण 14 इंच लांब असते आणि त्याचे वजन एक किलो अथवा त्यापेक्षा थोडे अधिक असते
काळजी कशी घ्यावी (Pregnancy Care Tips For Mothers In Marathi)
शेवटच्या तिमाहीची सुरूवात सातव्या महिन्यापासून होते. या दरम्यान काळजी घेण्याची गरज असते. तुमची जीवनशैली कशी आहे आणि तुम्ही काय खात आहात आणि कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेच हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण याचा तुमच्या गर्भावस्थेवर प्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यापूर्वी आपण काय खायचे आणि काय नाही खायचे हे जाणून घेऊया.
काय खावे सातव्या महिन्यात (What to eat)
7th Month Of Pregnancy And Care Tips In Marathi
गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात तुम्हाला खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. ही शेवटची तिमाही असते त्यामुळे तुम्ही जे काही खाल ते पौष्टिकच असायला हवे, जेणेकरून तुमच्या बाळाला योग्य पोषण मिळू शकते.
लोहयुक्त खाद्यपदार्थ – तिसऱ्या तिमाहीत रक्ताच्या कमतरतेपासून वाचण्यासाठी तुम्ही भरपूर प्रमाणात लोहयुक्त पदार्थांचे सेवन करा. जेवणामध्ये याचा समावेश करून घ्या
कॅल्शियमयुक्त पदार्थ – गर्भावस्थेमध्ये बाळाच्या विकासासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. विशेषतः तिसऱ्या तिमाहीमध्ये. अतिरिक्त कॅल्शियम मात्र घेऊ नका
मॅग्नेशियमयुक्त खाणे – मॅग्नेशियम, कॅल्शियम हे पदार्थ तुमच्या बाळाला अधिक पोष्टिकता मिळवून देतात. त्यामुळे याचे व्यवस्थित सेवन करावे
डीएचएयुक्त खाणे – डीएचए एक फॅटी अॅसिड आहे, ज्यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास चांगला होतो. त्यामुळे तुम्ही संत्र्याचा रस, दूध आणि अंडी याचे सेवन करावे
फॉलिक अॅसिड – बाळाच्या हाडांच्या मजबूतीसाठी आणि मेंदूच्या विकासासाठी फॉलिक अॅसिड गरजेचे असते. हे बाळाला स्पायना बिफिडासारख्या विकारांपासून वाचवते. त्यामुळेच डॉक्टर्स गर्भवती महिलांना फॉलिक अॅसिडचे औषधही घ्यायला सांगतात
फायबरयुक्त जेवण – सातव्या महिन्यादरम्यान गर्भाशय खूपच वाढलेले असते. त्यामुळे पचनतंत्र प्रक्रियादेखील बिघडते. या कारणाने बद्धकोष्ठतेचा त्रास अनेक महिलांना होतो. यापासून वाचण्यासाठी फायबरयुक्त जेवण जेवावे
विटामिन सी – विटामिन सी देखील तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे संत्रे, लिंबू यासारख्या पदार्थांचाही समावेश करून घ्यावा.
गरोदरपणाच्या 7 व्या महिन्यात काय खाऊ नये
गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात छातीत जळजळ, पायांवर सूज आणि बद्धकोष्ठता अशा समस्या निर्माण होणं अत्यंत कॉमन आहे. त्यामुळे कोणते पदार्थ खाणे टाळावे हेदेखील तुम्हाला माहीत असायला हवे.
मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थ – सातव्या महिन्यात अति मसालेदार खाण्यापासून दूरच राहा. यामुळे छातीतील जळजळ वाढण्यास मदत मिळते आणि त्याचा बाळावरही परिणाम होतो
अति सोडियमयुक्त पदार्थ – शरीराला सूज येणे ही कॉमन गोष्ट आहे. यापासून वाचण्यासाठी सोडियमचे प्रमाण तुम्ही कमी करायला हवे. जास्त मीठ असणाऱ्या पदार्थांकडे दुर्लक्ष करा. वेफर्स, डब्बाबंद पदार्थ अथवा बाजारातील लोणचं खाणे टाळा
कॅफेन, अल्कोहोल – गर्भावस्थेमध्ये दारू, तंबाकू, सिगरेट आणि कॅफेनयुक्त पदार्थ अर्थात चहा – कॉफी याचे सेवन टाळा. यामुळे बाळाला त्रास होतो
जंक फूड – या दरम्यान पिझ्झा – बर्गर, बाहेरचे चाट, भजी असे पदार्थ तुमच्या शरीराला त्रासदायक ठरू शकतात. तसंच यामध्ये कोणतेही पोषक तत्व नाही. तुम्हाला खावेसेच वाटत असेल तर घरच्या घरी बनवून खा. त्यामध्ये गाजर, काकडी, टॉमेटोचा वापर करून तुम्ही खा.
गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात करता येणारा व्यायाम (Exercise)
7th Month Of Pregnancy And Care Tips In Marathi
व्यायाम हा प्रत्येकासाठी आवश्यक असतो. तुम्हाला केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही तर मानसिकदेखील अधिक बळ मिळवून देतो. सातवा महिना ही शेवटची तिमाही सुरू होते त्यामुळे असा व्यायाम करावा जेणेकरून तुम्हाला आणि बाळाला त्रास होणार नाही. गरोदरपणात सोपी योगासने करू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही अनुलोम – विलोम करून हळूवार चालण्याचा व्यायाम करू शकता. अधिक जोरजोरात चालू नका. व्यायाम करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा आणि इन्स्ट्रक्चरचा सल्ला घ्या. मात्र नियमित स्वरूपात तुम्ही प्राणायाम नक्कीच करू शकता.
सातव्या महिन्यात करण्यात येणाऱ्या टेस्ट आणि स्कॅनिंग (7th Month Scanning)
7th Month Of Pregnancy And Care Tips In Marathi
गरोदरपणात नियमित स्वरूपात डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे बाळाचा विकास आणि त्याच्या आरोग्यावर व्यवस्थित नजर राहाते. कोणत्या चाचण्या यावेळी करून घ्यायला हव्यात जाणून घ्या
- या दरम्यान डॉक्टर बाळाच्या विकासासाठी पूर्ण तपासणी करून घेतात. बाळाच्या हृदयाचे ठोके जाणून घेण्यासाठी फीटल हार्ट रेट मॉनिटरिंग, तुमचा रक्तप्रवाह योग्य आहे की नाही, गर्भाशयाचा आकार आणि कोणत्याही प्रकारचा त्रास नाही यासाठी लघ्वीची तपासणी करण्यात येते
- याशिवाय बायोफिजिकल प्रोफाईल टेस्ट (Biophysical Profile Test) आणि कॉन्ट्रक्शन स्ट्रेस टेस्ट (CST) करण्यात येते. ही एक अल्ट्रासाऊंड टेस्ट असून यामध्ये बाळाच्या विकासाबाबत कळते. ही टेस्ट तिसऱ्या तिमाहीत करण्यात येते.
गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात कशी घ्याल काळजी (What To Do In 7th Month)
खाणेपिणे – या दरम्यान सर्वात जास्त लक्ष खाण्यापिण्यावर केंद्रित करावे. गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात तुम्ही ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे सेवन करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अक्रोड आणि समुद्री मासळीचे सेवनही करू शकता
नियमित फिरणे – रोज न चुकता फिरायला जाणे गरजेचे आहे. तुमच्यासाठी याचा फायदा होतो. यामुळे नॉर्मल डिलिव्हरीसाठी फायदा होतो
नियमित तपासणी करून घ्यावी – डॉक्टरांंकडे जाऊन बाळाची आणि आपल्या तब्बेतीची नियमित तपासणी करून घ्या. यामध्ये अजिबात हलगर्जीपणा करू नका. बाळासाठी अतिरिक्त पोषणाची गरज असल्यास, त्यानुसार आपल्या खाण्यापिण्यात बदल करण्याची जबाबदारी तुमचीच आहे
योग्य औषधे घ्या – गर्भावस्थेमध्ये तुम्ही जे पदार्थ खाता तेच तुमच्या शरीरासाठी पोषक ठरतात असं नाही. बाळाचा विकास होण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा योग्य आणि वेळेवर खाऊन उपयोग करून घ्या.
स्वतःला व्यस्त ठेवा – सतत झोपू नका. डिलिव्हरी जसजशी जवळ येते तसतशी भीती वाढत जाते. त्यामुळे जास्त विचार न करता स्वतःला कोणत्या ना कोणत्या तरी कामात गुंतवून घ्या. तसंच वाचन करा आणि चांगले संगीत ऐका.
काय करू नये (What Not To Do In 7th Month)
चुकीच्या पद्धतीने झोपू नका – या दरम्यान तुम्ही कोणत्या पद्धतीने झोपताय याकडे नीट लक्ष द्या. डाव्या बाजूला शक्यतो झोपा. सरळ झोपून नका. डाव्या बाजूला झोपणे या अवस्थेत चांगले समजण्यात येते
पोटाच्या बाजूला वाकू नका – सातव्या महिन्यात तुम्ही कधीही पटकन उठू नका आणि पोटाच्या बाजूने वाकू नका. तुमचे पोट वाढलेले असल्यामुळे त्यावर दबाव आल्यास, बाळासाठी हानिकारक ठरते. त्यामुळे ही गोष्ट पक्की मनात ठेवा
वडिलांनी घ्यायची काळजी (Pregnancy Care Tips For Fathers In Marathi)
- सातव्या महिन्यात तुमचे आवाज बाळ ओळखू लागते. त्यामुळे आईसह वडिलांनीही आपल्या मुलाशी नाते जोडावे. बाहेरून पोटाला हात लावावा आणि त्याच्याशी बोलावे.
- कामात करा मदत – घरातील कामांमध्ये तुम्ही तुमच्या पत्नीला मदत करा. तुम्हाला जेवण बनवता येत नसेल तर किमान घरात स्वच्छता करायला मदत करा
- संयम बाळगा – गर्भावस्थेच्या या दिवसात महिलांची चिडचिड वाढते आणि मूड बदलत असतो. सगळ्या गोष्टी संयमाने हाताळा. होणाऱ्या आईची गर्भारपणात आणि गर्भारपणानंतरही काळजी घ्या.
प्रश्नोत्तरे (FAQ’s)
सातव्या महिन्यात सहसा पाठीवर झोपण्यास मनाई करण्यात येते. यामुळे बाळाला पोहचणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे डाव्या बाजूला झोपायला सांगण्यात येते.
ब्रेकस्टन हिक्स अथवा लेबर पेनमध्ये अंतर असते. लेबर पेन हे सतत सुरू असते. तर ब्रेक्सटन हिक्स केवळ 30 सेकंदासाठी असते. लेबर पेन हे पाठीतून सुरू होऊन वरपर्यंत येते. तर ब्रेकस्टन हिक्समध्ये पोटात दुखते.
वाढत्या वजनामुळे पाय दुखणे आणि पायाला सूज येणे हे कॉमन आहे. यातून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही पायांना तेलाने हलका मसाज करा. झोपताना पायाखाली उशी ठेवा आणि पाय वर करून झोपा. तसंच पायाची बोटं हलकी हलकी ओढा. यामुळे आराम मिळेल.