नख सुंदर दिसणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असेल तर आजचा विषय तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. नेलपेंटचे वेगवेगळे रंग आणि प्रकार पाहिल्यानंतर तुम्हाला ते नक्कीच ट्राय करुन पाहण्याची इच्छा होत असेल. हल्ली अगदी सर्रास सांगितला जाणारा नवीन प्रकार म्हणजे जेलपॉलिश. नेलपॉलिशसारखाच दिसणारा हा प्रकार जेलपॉलिश म्हणून का ओळखला जातो याचे कुतूहल तुम्हाला असेल तर तुम्हाला या दोघांमधील फरक जाणून घ्यायला हवा. कारण या दोघांच्या किंमतीमध्ये प्रचंड तफावत असते. नेमका या दोघांमध्ये काय फरक आहे आणि यांच्या वापरण्याच्या पद्धतीमध्ये काय फरक आहे ते आज जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला नेमकी कशाची निवड करायची ते कळेल.
सुंदर लांब, नखं आवडतात.. मग नक्की करुन पाहा nail extensions
नेलपॉलिश आणि जेलपॉलिशमधील फरक
- नेलपॉलिश आणि जेलपॉलिश यांची बनवण्याची पद्धत एकसारखीच असली तरी जेलपॉलिशमधील काही घटक त्याला वेगळे बनवत असतात.
- जेलपॉलिश ही थोडीशी घट्ट असते.त्यामुळे ती लावताना थोडीशी वेगळी वाटते.
- जेलपॉलिशमध्ये नेलपॉलिशसारखेच रंग मिळतात पण हे रंग थोडे जास्त उठून दिसतात .
- जेल पॉलिश लावल्यानंतर ती सुकण्यासाठी थोडा वेळ लागतो. नेलपॉलिश ही नुसती वाऱ्यावर वाळते. पण जेल पॉलिश वाळण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि ही इतर नेलपेंटसारखी वाळवता येत नाही. तिचे फिनिशिंग चांगले हवे असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी खास मशीन वापरावी लागते. तरच ही जेलपॉलिश छान वाळते.
- जेलपॉलिश अनेक जण वापरतात कारण ती जास्त काळ टिकते.
- नेलपॉलिश लावल्यानंतर ती जरा काम केली की, निघण्याची शक्यता असते. नेलपॉलिश अर्धवट निघते. पण जेलपॉलिश तशी निघत नाही. ती काढण्यासाठीही थोडी मेहनत घ्यावी लागते.
- नेलपॉलिश ही तुम्ही कोणत्याही एक्सपर्टच्या मदतीशिवाय लावू शकता. अगदी घरी सुद्धा तुम्हाला लावता येऊ शकते.
- जेलपॉलिश लावण्यासाठी तुम्ही जर प्रोफेशनलची मदत घेतली तर तुम्हाला त्याचा फायदा अधिक होतो. हल्ली अनेक नेलस्पा असतात जिथे तुम्हाला जेल पॉलिश लावून दिली जाते.
- तिथे अगदी काही मिनिटात हे काम होते. कारण त्यांच्याकडे सगळे साहित्य उपलब्ध असते पण घरी लावताना ही जेलपॉलिश पटकन सुकत नाही. पण हल्ली अशा काही जेलपॉलिश आहेत ज्या तुम्हाला घरीही लावता येतील अशा आहेत.
- नेलपेंटमध्ये तुम्हाला स्पार्कल, ग्लॉसी, मॅट असा वेगवेगळा पर्याय मिळतो. जेलपाॉलिशच्या नावातच जेल आहे यामध्ये बेस प्रकार मिळतो. जर तुम्हाला त्यावर काही करायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागते.
- किंमतीच्या बाबतीत सांगायचे तर नेलपॉलिश हल्ली 15 रुपयांपासून मिळतात. त्या सहज उपलब्ध असतात. पण जेलपॉलिश या तुम्हाला काही चांगल्या दुकानांममध्येच मिळू शकतात. तुम्हाला जेलपॉलिशच्या ब्रँड्सबद्दल काहीच माहिती नसेल तर आधी तुम्ही त्या संदर्भात माहिती काढून घ्या आणि मगच तुम्ही त्या विकत घ्या.
आता जेलपॉलिश आणि नेलपॉलिशमधला फरक तुम्हाला नक्कीच कळला असेल तुम्हाला सतत रंग बदलायचा असेल तर तुमच्यासाठी नेलपॉलिश उत्तम आहेत. पण तुम्हाला एखादा रंग 15 दिवसांहून अधिक काळ नखांवर टिकलेला चालत असेल तर तुम्ही जेलपॉलिश वापरु शकता.
सतत नेलपेंट लावल्यामुळे नखांना होऊ शकतात हे त्रास
नखं वाढवण्यासाठी नक्की वापरा ‘हे’ सोपे घरगुती उपाय (How to Grow Nails Faster in Marathi)