ADVERTISEMENT
home / Skin Care Products
फेस टोनर की फेस सीरम उत्तम त्वचेसाठी कशाची करावी निवड (Face Toner Vs Face Serum)

फेस टोनर की फेस सीरम उत्तम त्वचेसाठी कशाची करावी निवड (Face Toner Vs Face Serum)

त्वचा कायम सुंदर आणि नितळ दिसावी असे आपल्या प्रत्येकाला वाटते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण चेहा स्वच्छ धुतो, मेकअप काढतो, मॉश्चरायझरचा वापर करतो. महिन्यातून एकदा चेहऱ्यावर फेशियल करतो. पण या सगळ्या गोष्टी करताना त्वचेची काळजी रोजच्या रोज घेण्यासाठी फेस टोनर (Face Toner) की फेस सीरम (Face Serum) यापैकी काय चांगले आहे याचा विचार करत असाल तर आज आपण या दोघांमध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊया. म्हणजे त्वचेसाठी तुम्ही नेमकं काय वापरायला हवे ते तुम्हाला कळू शकेल. चला जाणून घेऊया या दोन्हीमधला फरक. करुया सुरुवात 

फेस टोनर म्हणजे काय? (What is Face Toner)

फेस टोनर

Instagram

ADVERTISEMENT

फेस टोनर हे एक वॉटर बेस्ड सोल्युशन आहे. त्यामध्ये असलेले वेगवेगळे घटक तुमच्या त्वचेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. टोनरचा उपयोग त्वचेवर केल्यामुळे त्वचेचे पोअर्स कमी होण्यास मदत मिळते. तेलकट त्वचेसाठी फेस टोनर हे फार महत्वाचे असते. त्वचेच्या पोअर्सच्या खोलवर जाऊन त्वचा स्वच्छ ठेवण्याचे काम फेस टोनर करते. त्यामुळे फेस टोनर त्वचेसाठी फारच फायदेशीर असते. 

फेस सीरम म्हणजे काय (What Is Face Serum)

फेस सीरम

Instagram

ADVERTISEMENT

फेस सीरम हे एक प्रकारचे लाईटवेटेड मॉश्चरायझर आहे. ज्याचा बेस पाण्याचा असला तरी त्यापेक्षा ते थोडे अधिक जड आणि पारदर्शक असते. फेस सीरमचा उपयोग प्रत्येक दिवशी केला जातो. यामध्ये असलेले घटक त्वचेला तजेला आणून त्याला दिवसभर फ्रेश ठेवण्याचे काम करतात. फेस सीरमध्ये साधारणपणे व्हिटॅमिन C, ग्लायकोलिक अॅसिड असे घटक असतात जे त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे आंघोळीनंतर आणि मेकअप कररण्यापूर्वी फेस सीरम हे अगदी मस्ट आहे.

जाणून घ्या फेस टोनर आणि फेस सीरममधील फरक (Difference Between Toner and Serum for Face)

फेस टोनर आणि फेस सीरम हे दोन वेगळे स्किन प्रोडक्ट आहे. पण या दोघांपैकी तुम्ही कशाची निवड करायला हवी हे माहीत नसेल तर या दोघांमध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊया.

वैशिष्ट्यफेस टोनर (Face Toner)फेस सीरम (Face Serum)
घटक (Key Ingredients)फेस टोनरमध्ये त्वचेच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो. पण हे वॉटर बेस असल्यामुळे यामध्ये अॅलोवेरा, गुलाबपाणी,व्हिटॅमिन ,E,C असे घटक समाविष्ट असतातफेस सीरममध्ये ग्लायकोलिक अॅसिड, व्हिटॅमिन C , हायअलुरॉनिक असे बेसिक घटक असतात. याशिवाय त्वचेच्या प्रकारानुसार हे घटक बदलतात.
पोत (Texture)फेस टोनर हे वॉटर बेस्ड असतात. त्यामुळे ते एखाद्या सुगंधी पाण्याप्रमाणेच लागतात. चेहऱ्यावर लावल्यानंतर ते दिसून येत नाही.फेस सीरम हे हाताला पाण्यापेक्षा थोडे जाड लागत असले तरी ते चिकट लागत नाही तर त्वचेमध्ये पटकन मुरतात.
पिंपल्सवर करतात काम (Work On Pimples) तुमच्या त्वचेच्या पोअर्समध्ये जाऊन तुमची त्वचा स्वच्छ ठेवण्याचे आणि तुम्हाता त्वचेसंदर्भात कोणताही त्रास होऊ न देण्यासाठी हे फायदेशीर असतात. पिंपल्स असल्यास त्याला आहे त्या जागीच कमी करण्याचे काम करतात.फेस सीरममध्ये त्वचेसाठी आवश्यक असलेले ग्लायकोलिक अॅसिड आणि सॅलिसिलिक अॅसिड पिंपल्स वर येण्याआधीच त्यांना दाबण्याचे काम करते.
PH पातळी राखण्याचे काम(Balancing PH Level)तुमच्या त्वचेची स्वच्छता राखण्याचे काम टोनर उत्तम करते. टोनर तुमच्या त्वचेवरील अशुद्धता काढून त्वचेतील हानिकारक बॅक्टेरीयाला मारण्याचे काम करते. त्यामुळे तुमची PH पातळी राखण्याचे काम करते.फेस सीरम हे PH पातळी राखण्याचे काम करते. पण ते टोनर किंवा क्लिन्झरच्या तुलनेत कमी आहे.
तारुण्य टिकवणे (Reducing Age Signs)त्वचेवरील पोअर्स मोठे होणे म्हणजे त्वचा वार्धक्याकडे झुकणे. चेहऱ्यावरील हेच पोअर्स कमी करण्याचे काम टोनर करते त्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली आणि तरुण दिसते.सुरकुत्या कमी करणे, त्वचा अधिक सुंदर करण्याचे काम सीरम करते. सीरममधील वेगवगळे घटक तुमच्या त्वचेवर तारुण्य टिकवण्यास मदत करतात.
वापर (Usage)मेकअप काढल्यानंतर आणि आंघोळीनंतर तुम्ही टोनरचा उपयोग केला तर उत्तम त्यामुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स स्वच्छ होण्यासोबतच तुमच्या त्वचेचे पोअर्स कमी होतात.मेकअप करण्यापूर्वी आणि आंघोळीनतंर तुम्ही सीरम वापरल्यास तुमचा चेहरा मेकअप आणि दिवसभरासाठी तयार होतो.
कोणत्या त्वचेसाठी योग्य (Suitable For What Skin Type)तेलकट त्वचा असणाऱ्यांनी फेस टोनरचा उपयोग करायला हवा असे सांगितले जाते. तेलकट त्वचेसाठी हे फारच फायदेशीर आहे.सगळ्या त्वचेच्या प्रकारासाठी फेस सीरम उपलब्ध आहे. सगळ्यांनी त्याचा वापर करायला हवा.

ADVERTISEMENT

त्वचेसाठी निवडा बेस्ट स्किन टोनर (Best Face Toner In Marathi)

तुम्हाला स्किन टोनर निवडायचे असेल तर तुम्ही काही खास टोनरची निवड केली आहे. त्याचा उपयोग ही तुम्ही करु शकता.

British Rose Petal-Soft Gel Toner

गुलाबपाणी हे उत्त स्किन टोनर आहे. तुम्हाला अगदी नॅचरल आणि मॉश्चरायझिंग असे टोनर आहे. तुम्ही याचा उपयोग अगदी कधीही करु शकता. पण हे टोनर साध्या गुलाबाचे नाही तर ब्रिटीश रोझच्या पाकळ्यांपासून केलेले टोनर आहे. त्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली दिसते.

फायदे (Pros): नैसर्गिक घटकांमुळे तुमची त्वचा अधिक चांगली होण्यास मदत मिळते. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

तोटे (Cons): याची किंमत ही तुलनेने अधिक आहे. त्यामुळे तुम्हाला ते बजेटच्या बाहेर वाटू शकते. 

ADVERTISEMENT

Vitamin C Face Toner For Pigmentation And Dark Spots Removal

चेहऱ्यासाठी व्हिटॅमिन C हे एक उत्तम घटक आहे. चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग घालवून त्याचे डाग घालवण्यास हे टोनर मदत करते.  तुमच्या पोअर्सना स्वच्छ करण्याचे काम हे टोनर करते. याशिवाय तुमचे कोलॅजन बुस्ट करण्याचे कामही हे टोनर करते

फायदे (Pros):  व्हिटॅमिन C च्या गुणांनी युक्त असे हे टोनर कोणत्याही त्वचेसाठी फारच चांगले आहे. 

तोटे (Cons): पण याची किंमत थोडी जास्त आहे.

Glow Iridescent Brightening Toner

माय ग्लॅम उत्पादित हे टोनर त्वचेला मॉश्चरायईज करण्यासाठी फारच चांगले आहे. कोणत्याही त्वचेच्या प्रकारासाठी हे टोनर उत्तम असून यामध्ये असलेले घटक तुमच्या त्वचेला तजेला आणण्याचे काम करतात. त्यामुळे तुम्ही याचा अगदी सहज वापर करु शकता. 

ADVERTISEMENT

फायदे (Pros): चेहऱ्याला नॅचरल ग्लो देण्याचे काम हे फार उत्तम पद्धतीने करते. शिवाय हे बजेटमध्ये बसेल असे ही आहे.

तोटे (Cons): याचे फार काही तोटे नाहीत

निवडा बेस्ट फेस सीरम (Best Face Serum In Marathi)

फेस सीरम त्वचेसाठी वापरण्याचा निर्णय तुम्ही घेतला असेल तर तुमच्यासाठी काही खास फेस सीरमची निवड आम्ही केली आहे.

ADVERTISEMENT

St. Botanica Vitamin C 20%, E & Hyaluronic Acid Face Serum

सेंट बोटानिका या कंपनीचे अनेक दर्जेदार प्रोडक्ट अनेकांच्या आवडीचे आहे. त्यांचे हे सीरम हे त्वचा हायड्रेट, उजळणे आणि मुलायम करण्याचे काम करते. त्वचेवरील वार्धक्याच्या खुणा कमी करुन पिंपल्स कमी करते. त्वचेचा सैलपणा कमी करण्याचे काम करते.

फायदे (Pros):  या प्रोडक्टमध्ये असलेले अँटीऑस्किडंट गुणधर्म त्वचा डॅमेज करण्यापासून वाचवतात.  त्वचा हायड्रेट करण्यास मदत करतात.

तोटे (Cons): याचे पॅकेजिंग फार आकर्षक नाही

Plum Grape Seed & Sea Buckthorn Glow-Restore Face Oils Blend

100 %  वीगन आणि नॅचरल घटकापासून तयार करण्यात आलेले हे फेस सीरम ऑईल ब्लेंडमध्ये तयार करण्यात आलेले आहे. तेल असले तरी त्याचा स्पर्श तेलासारखा अजिबात लागत नाही. ते त्वचेवर अगदी छान पसरते. 

ADVERTISEMENT

फायदे (Pros):  प्रोडक्टटची किंमत आणि त्याचे आकर्षक घटक फेस सीरमला अधिक चांगले बनवतात. 

तोटे (Cons): फेस ऑईल असा उल्लेख केल्यामुळे अनेकांना हे फेस ऑईल वाटते. 

Body Shop Drops Of Light Brightening Serum

स्किन प्रोडक्टच्या बाबतीत द बॉडी शॉप नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. त्यांचे हे सीरम अत्यंत लाईट असून ते त्वचेमध्ये अगदी सहज मुरते. त्वचा मुलायम आणि सुंदर दिसण्यास मदत करते. त्वचेवरील काळे डाग काढून टाकण्यास मदत करते.

फायदे (Pros):  सीरममधील घटक आणि त्याचे फायदे हे फारच आकर्षित करणारे आहेत. त्याचे फायदे पाहता ते एकदा तरी वापरुन पाहावे असे आहे

ADVERTISEMENT

तोटे (Cons): किंमतीचा विचार केला तर हे एक महागडे सीरम आहे. 

टोनरचा असा करा वापर (When To Use Toner And How To Use)

असे लावा टोनर

Instagram

ADVERTISEMENT

टोनरचा वापर करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर असा करा टोनरचा वापर 

  • टोनरचा वापर हा तुम्ही आंघोळीनंतर आणि घरी आल्यानंतर मेकअप काढल्यानंतर करु शकता.
  •  एका कॉटन पॅडवर टोनर घेऊन तुमच्या चेहऱ्याला लावा. तुम्ही झोपताना याचा वापर केला तरी चालेल.
  • टोनरचा अतिप्रयोग करणेही चांगले नाही. त्यामुळे कॉटन पॅडवर अगदी कमीच टोनर घ्या.

फेस सीरम कसा करा उपयोग (When To Use Face Serum And How To Use)

फेस सीरम

Instagram

ADVERTISEMENT

फेस सीरम फायदे जाणून घेतल्यानंतर त्याचा वापर करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही असा करा त्याचा वापर 

  • आंघोळीनंतर किंवा चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर तळहातावर थोडे फेस सीरम घ्या.
  •  चेहऱ्याच्या सगळ्या भागाला लावून  चेहऱ्यावर त्याने मसाज करा. 
  • फेस सीरम असे जरी त्याचे नाव असले तरी ते तेलकट नसते. त्यामुळे तुमचा चेहरा तेलकट होत नाही. 

फेस टोनर आणि फेस सीरममधील कोणते घटक टाळावेत (Ingredients of Face Toner & Serum)

कोणतेही मेकअप प्रोडक्ट निवडताना त्यामध्ये काही हानिकारक घटक टाळणे फार महत्वाचे असते. दोन्ही प्रोडक्ट घेताना त्यामध्ये पॅराबिन आणि SLS आहे की नाही ते पाहा. या शिवाय तुम्ही यामध्ये तुमच्या त्वचेला त्रासदायक असे अॅसिड टाळा. या काही गोष्टींची काळजी घेत तुम्ही  फेस टोनर आणि फेस सीरम निवडू शकता.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. त्वचेसाठी टोनरची गरज असते का?
 ब्युटी प्रोडक्टमध्ये टोनरचा वापर हा अनिवार्य नाही. पण त्वचा कायम चिरतरुण राहात नाही. त्वचा सैल पडणे, त्यावर सुरकुत्या येणे हे वयपरत्वे होत असते. पण त्वचा अधिक काळासाठी तरुण राहावी असे वाटत असेल तर तुम्ही टोनरचा उपयोग करणे गरजेचे असते. टोनरच्या उपयोगामुळे त्वचेवरील पोअर्स (छिद्र) टोन्ड होण्यास मदत मिळते. त्यामुळे त्वचेसाठी टोनर हे महत्वाचे असते. 

ADVERTISEMENT

2.  टोनरचा वापर केल्यानंतर फेस सीरमचा उपयोग केला तर चालेल का?
हो, टोनर नंतरच अनेकदा फेस सीरम वापरण्याचा सल्ला दिला जातो. टोनरमुळे तुमची त्वचा टोन्ड झाल्यानंतर त्यावर फेस सीरम कमालीचे काम करते. तुमच्या त्वचेला आवश्यक असलेले पोषक घटक अधिक चांगल्या पद्धतीने मिळवण्याचे काम करते. त्यामुळे चेहऱ्याची इलास्टिसिटी अधिक काळासाठी टिकून राहते. 

3. फेस टोनरच्या वापराने काही फरक पडतो का?
तुम्ही फेस टोनरचा सातत्याने वापर केलात तर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये झालेला फरक नक्की जाणवेल. तुमच्या त्वचेवर ओपन पोअर्स असतील तर ते कमी करण्याचे काम टोनर करते. टोनरच्या वापरामुळे तुमच्या त्वचेला चांगली चमकही मिळते. 

You Might Also Like

Homemade Vitamin C Serum in English

ADVERTISEMENT

 

22 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT