ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
cleaning hacks

लोकप्रिय क्लीनिंग हॅक्स जे प्रत्यक्षात अजिबात कामाचे नाहीत

स्वच्छता हे एक असे काम आहे जे आपल्याला दररोजच करावे लागते. काहींना हे काम करणे खूप आवडत असले तरीही बऱ्याच लोकांसाठी घराची पूर्ण स्वच्छता करणे हे एक कंटाळवाणे आणि कष्टाचे काम आहे. जेव्हा आपल्याकडे दररोज घर स्वच्छ करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो तेव्हा आपण क्लिनिंग हॅक्स किंवा क्लिनिंग टिप्स शोधत असतो जेणे करून आपले स्वच्छतेचे काम झटपट व कमी कष्टात होईल. आपल्याला इंटरनेटवर विविध क्लिनिंग हॅक्स सापडतात जे आपले काम सोपे करण्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात ते कितपत प्रभावी आहेत, हे सांगता येत नाही. आपल्यापैकी अनेक लोक फारसा विचार न करता या क्लिनिंग हॅक्सचे अनुसरण करण्यास सुरवात करतात. फेक न्यूज ही समस्या ही केवळ पत्रकारिता आणि राजकारणापुरती मर्यादित नाही. हल्ली फेक कन्टेन्ट ही समस्या सगळीकडे पसरलेली आहे.आजकाल डिजिटल मीडियामुळे माहिती पसरणे अत्यंत सोपे झाल्यामुळे चुकीची माहिती अगदी पटापट पसरते. हे फेक कन्टेन्ट सगळीकडेच बेमालूमपणे लपलेले असते. अगदी घरगुती टिप्स आणि हॅक्स सुद्धा किती खऱ्या आणि किती खोट्या असतात हे ही कळणे खूप कठीण आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लोकप्रिय हॅक्स सांगणार आहोत ज्या प्रत्यक्षात अजिबात काम करत नाहीत. 

Cleaning Hacks
Cleaning Hacks

कोका-कोला हे एक उत्तम टॉयलेट क्लीनर

तुम्ही तुमच्या घरचे टॉयलेट खरं तर तांत्रिकदृष्ट्या कोकने स्वच्छ करू शकता. कारण बहुतेक कार्बोनेटेड सोडाजमध्ये सायट्रिक आणि फॉस्फोरिक ऍसिड असतात जे गंज आणि इतर काही डाग विरघळण्यास मदत करतात.पण त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट होत नाहीत. टॉयलेटमध्ये सोडा किंवा कोकची एक अख्खी बाटली ओतल्यानेही जीवाणू मरणार नाहीत आणि त्यामुळे जे चिकट अवशेष मागे राहतील जे तुम्हाला नंतर स्वच्छ करावे लागतील. त्यामुळे डाग काढण्यासाठी म्हणून तुम्ही कधी सोडा वापरू शकता, परंतु टॉयलेटच्या नियमित साफसफाईसाठी कोक काहीही उपयोगाचे नाही, तर तुम्हाला पारंपारिक टॉयलेट क्लिनरच वापरणे फायदेशीर आहे. 

केवळ गरम पाण्याने सर्व जंतू नष्ट होणे

गरम पाणी काही जीवाणू नष्ट करू शकते, परंतु ते पाणी देखील खरोखर गरम म्हणजे उकळते असले पाहिजे.100 °C या तापमानावर पाणी उकळते. याच तापमानावर बहुतेक जंतू नष्ट होतात. यातही काही जंतू नष्ट होत नाहीत जे गरम तापमानात जिवंत राहू शकतात. या जंतूंना नष्ट करायला 0 °C वर तापमान आणावे लागते. पण घरात हे करणे आपल्याला शक्य होत नाही.आणि बहुतेक होम वॉटर हीटर्स हे 120°F म्हणजे 48.8889 °C  वर सेट केलेले असल्याने, तुमच्या वॉटर हिटरचे गरम पाणी जंतू नष्ट करू शकणार नाही. म्हणूनच जंतू आणि जीवाणू नष्ट करण्यासाठी तुम्हाला अँटीबॅक्टेरियल क्लीनर किंवा हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर करावा लागेल. 

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून स्वच्छता

Cleaning Hacks
Cleaning Hacks

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरने बऱ्याच गोष्टी स्वच्छ करता येतात. म्हणूनच बरेच लोक स्वच्छतेसाठी या दोन्हींचे मिश्रण करतात. पण सोडा आणि व्हिनेगर हे स्वतंत्रपणे चांगली स्वच्छता करतात पण जेव्हा आपण यांचे मिश्रण करतो तेव्हा मात्र त्याचा स्वच्छतेसाठी फारसा उपयोग होत नाही. कारण बेकिंग सोडा हा बेस आहे आणि व्हिनेगर हे ऍसिड आहे. जेव्हा ऍसिड आणि बेस एकत्र होतात तेव्हा ते एकमेकांना न्यूट्रलाइज करतात. म्हणून  या मिश्रणाचा तुम्हाला स्वच्छतेसाठी काही उपयोग होणार नाही.

ADVERTISEMENT

तर यापुढे कुठल्याही फेक क्लिनिंग हॅक्सवर ट्राय केल्याशिवाय विश्वास ठेवू नका. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

05 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT