ADVERTISEMENT
home / Natural Care
पिंपल्स आले असतील तर ग्रीन टीची वाफ आहे खूपच फायदेशीर

पिंपल्स आले असतील तर ग्रीन टीची वाफ आहे खूपच फायदेशीर

चेहऱ्यावर पिंपल्स आले की, ते जाण्यासाठी आपण बरेच काही करतो. वेगवेगळे क्रिम्स किंवा जे काही उपाय शक्य असेल ते करतो. इतके करुनही पिंपल्स गेले नाहीत की मग मात्र आपण चेहरा झाकण्यापलीकडे काहीच करत नाही. पण जर तुम्हाला पिंपल्स घालवण्याचा एक सोपा आणि घरी करण्यासारखा पर्याय मिळाला तर तुम्ही हा पर्यायही नक्कीच ट्राय कराल हो ना!  तुमच्या चेहऱ्यावर कितीही मोठे पिंपल्स आले तरी देखील तुम्ही हा उपाय करु शकता आणि नितळ त्वचा मिळवू शकता. घरी असलेल्या ग्रीन टी बॅग्जचा उपयोग करुन तुम्हाला ही ब्युटी ट्रिटमेंट घेता येईल.

चेहऱ्यावर वाफ घेण्याचे हे आहेत अफलातून फायदे (Benefits Of Steaming Face In Marathi)

ग्रीन टीची घ्या वाफ

ग्रीन टीची घ्या वाफ

Instagram

ADVERTISEMENT

 यासाठी तुम्हाला अगदी बेसिक फ्लेवरची ग्रीन टी (Green Tea) लागेल. जर तुमच्याकडे आलं किंवा मसाले घातलेली ग्रीन टी असेल तर तुम्ही त्याचा उपयोग मुळीच करु नका. कारण  त्यामुळे तुम्हाला त्वचेसंदर्भात काही अन्य त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य असल्यास अगगी बेसिक ग्रीन टी किंवा लिंबू असलेली ग्रीन टी तुम्ही निवडली तरी चालू शकेल. 

  • आता जर तुम्ही वाफ घेण्याचा विचार करत असाल तर  एका भांड्यामध्ये पाणी घेऊन किंवा स्टिमरमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक ते दोन ग्रीन टी पाकीटं उघडून टाका.

  • ग्रीन टी पाण्यात चांगली मुरली की, मग एक जाड टॉवेल घेऊन तुम्ही संपूर्ण चेहऱ्याला वाफ घ्या. 
    साधारण 5  मिनिटं तरी वाफ घ्या. संपूर्ण चेहऱ्याला ग्रीन टीची वाफ मिळू द्या. त्वचेच्या पोअर्समध्ये सगळी वाफ जाणे फार गरजेचे आहे. 
  • ग्रीन टीची वाफ घेऊन झाल्यानंतर जर तुमच्या चेहऱ्यावरुन व्हाईट हेड निघत असतील किंवा पिंपल्स फुटणार असतील तर तुम्ही ते अगदी हलक्या हाताने काढून घ्या. त्यातील घाण अगदी अलगद काढा. 
  • ग्रीन टीमध्ये असलेले जखम बरे करण्याचे गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेवरच्या जखमा बऱ्या होण्यास मदत मिळते. 
  • ग्रीन टीची वाफ घेऊन आणि चेहरा स्वच्छ करुन झाल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरील पोअर्स बंद करायला विसरु नका. तुमच्या आवडीचे एखादे टोनर लावायला विसरु नका. 
  • टोनर लावल्यानंतर मग तुम्ही तुमच्या त्वचेवर एखादे चांगले क्रिम लावा. 

या चुका करतात तुमच्या त्वचेचे नुकसान

आठवड्यातून एकदा करा प्रयोग

फेस स्टीम

Instagram

ADVERTISEMENT

जर तुमच्या त्वचेवर खूपच पिंपल्स असतील तर तुमच्यासाठी ही वाफ फार फायदेशीर आहे.  पण याचा सतत प्रयोग केला तर तुम्हाला त्याचे म्हणावे तितके फायदे मिळणार नाही. ज्यांच्या त्वचेवर फार कमी पिपंल्स असतील तर तुम्ही महिन्यातून एकदा फार तर दोनवेळा हा प्रयोग करा. आणि तुम्हाला खूप जास्त पिंपल्स असतील तर आठवड्यातून फक्त एकवेळा याची वाफ घेणे तुमच्या त्वचेसाठी पुरेसे आहे. 


आता चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर फार पॅनिक होऊ नका. तुम्ही ग्रीन टीची वाफ घ्या. पिंपल्स जाण्यासोबत तुमच्या त्वचेवरील तेलग्रंथी नियंत्रणात राहण्यास मदत होते.  शिवाय तुमच्या त्वचेवर आवश्यक असलेला ग्लोही मिळतो. त्यामुळे ग्रीन टीची वाफ तुम्ही एकदा तरी हा प्रयोग नक्की करा.

डागविरहीत चेहऱ्यासाठी वापरा बडिशेपचा फेसमास्क

 जर तुम्हाला चेहऱ्यासाठी काही खास प्रोडक्ट निवडायचे असतील तर तुम्ही माय ग्लॅमचे काही उत्तम प्रोडक्ट निवडू शकता.

ADVERTISEMENT
21 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT