सर्वांनाच आपल्या चेहऱ्यावर डागकोणालाही नको असतात. आपला चेहरा क्लीन, गोरा आणि चमकदार करण्यासाठी महिला बरेच प्रयत्न करतात. पण कधी आरोग्यामुळे तर कधी सूर्यकिरणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर कधी ना कधीतरी डाग पडतातच. अशा डागांमुळे चेहरा खूपच काळसर दिसू लागतो. या अडचणींपासून सुटका हवी असल्यास, आम्ही तुम्हाला 12 घरगुती उपाय (Chehryasathi Gharguti Upay) सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा चेहरा क्लीन आणि चमकदार होण्यास मदत होईल. खरं तर चेहरा निस्तेज होण्याची काही कारणे आहेत. धूळ, सतत प्रदूषण, चेहऱ्यावर तेल जमणे, चेहऱ्यावर घाण जमा होणे ही अत्यंत महत्त्वाची आणि मुख्य कारणे आहेत (Common Causes Of Dull Skin) ज्यामुळे चेहरा निस्तेज होतो. पण यावर तुम्ही अगदी सहजपणाने घरगुती उपाय करून चेहरा अधिक स्वच्छ, गोरा आणि चमकदार बनवू शकता. चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय (Chehra Ujalnyasathi Gharguti Upay) आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत.
1. ऑलिव्ह ऑईल (Oilve Oil)
2. कोरफड जेल (Aloe Vera)
3. ग्रीन टी (Green Tea)
4. उटणे (Ubtan)
5. नारळाचे तेल (Coconut Oil)
6. टॉमेटो (Tomato)
7. पपई (Papaya)
8. दही (Curd)
9. हळद (Turmeric)
10. बेकिंग सोडा (Baking Soda)
11. बटाटा (Potato)
12. FAQ’s
ऑलिव्ह ऑईल (Oilve Oil)
साहित्य
- एक चमचा ऑलिव्ह ऑईल
- एक स्वच्छ टॉवेल
- एक मग कोमट पाणी
कसा कराल उपाय
- आपल्या हातावर एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या आणि पूर्ण चेहऱ्याला लावा आणि मग हलक्या हाताने मालिश करा
- त्यानंतर कोमट पाण्यात टॉवेल भिजवा आणि आपला चेहरा पुसून घ्या
- हा प्रयोग तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रात्री झोपण्यापूर्वी नियमित करा
फायदा
यामुळे नक्की चेहरा कसा उजळेल असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर तुमच्यासाठी ऑलिव्ह ऑईल हे चांगले उत्तर आहे. चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय (Chehra Sathi Gharguti Upay) करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा नक्की वापर करा. ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटिऑक्सिडंट असून त्वचेवरील कोशिकांना फ्री रॅडिकल्सपासून वाचविण्याचे काम करते. एनसीबीआयच्या संकेतस्थळावर प्रकाशित एका शोधानुसार, ऑलिव्ह तेलामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण आढळतात. हे हलकी जमख भरण्यासाठी आणि त्वचेवरील वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते. तसंच एका शोधानुसार, ऑलिव्ह ऑईलचा उपयोग सूर्याच्या किरणांपासून होणारी त्वचेची हानी कमी करण्यासाठीही होतो. यामुळे चेहरा अधिक हायड्रेट आणि मॉईस्चराईज करण्यासस मदत मिळते आणि चेहरा उजळण्यासाठीही याचा फायदा होतो.
कोरफड जेल (Aloe Vera)
साहित्य
एक चमचा कोरफड जेल
कसा करा उपाय
- रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेलने चेहऱ्याला हलक्या हाताने मालिश करा
- तसंच ठेवा आणि झोपा
- सकाळी उठून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा
फायदा
कोरफडमध्ये त्वचेला फायदा करून देणारे अनेक घटक आढळतात. यामध्ये केवळ जखम भरणारे गुण नाहीत तर त्वचेला मॉईस्चराईज करणारे गुणही आहेत. कोरफडमध्ये अँटिएजिंग गुण असून चेहरा अधिक तजेलदार आणि चमकदार करण्यासाठी याचा उपयोग होतो. चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय करताना (Chehryasathi Gharguti Upay) तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. याचे गुण चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि यातील अँटिअॅक्ने गुण चेहऱ्यावरील मुरूमं कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसंच चेहरा अधिक मऊ आणि मुलायम बनविण्यासाठीही याचा उपयोग होतो.
ग्रीन टी (Green Tea)
साहित्य
- एक चमचा ग्रीन टी अथवा एक ग्रीन टी बॅग
- एक कप पाणी
- दोन चमचा पिठी साखर
- एक चमचा मिल्क क्रिम अथवा दुधाची साय
कसा करा उपाय
- पाणी उकळा आणि ग्रीन टी त्यात उकळून घ्या. हे पाणी थंड करून घ्या
- थंड झाल्यावर त्यात पिठी साखर आणि दुधाची साय अथवा मिल्क क्रिम मिक्स करा
- हे मिश्रण तुम्ही स्क्रबप्रमाणे चेहऱ्याला लावा
- 10 मिनिट्स झाल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि स्वच्छ करा
- हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून एक अथवा दोन वेळा लावा
फायदा
आरोग्यासाठी ग्रीन टी चे अनेक फायदे होतात. पण त्वचेसाठीही तुम्ही याचा फायदा करून घेऊ शकता. चेहरा उजळविण्यासाठी घरगुती उपाय (Chehryasathi Upay) करत असाल तर तुम्ही ग्रीन टी चा नक्की वापर करा. यामधील पॉलिफेनोल्स सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेला वाचवते आणि त्वचेच्या कॅन्सरसारख्या आजारापासूनही दूर राखण्यास मदत करते. इतकंच नाही तर प्रिमॅच्युअर एजिंगपासूनही रक्षण करते. त्वचेतून निघणाऱ्या तैलीय पदार्थांपासून रोखण्यासही ग्रीन टी चा वापर होतो. यामुळे मुरूमं होत नाहीत. चेहऱ्यावर अधिक चमक आणण्यासाठी तुम्ही याचा नक्की वापर करून पाहा.
उटणे (Ubtan)
साहित्य
- 1 कप मसूर डाळ अथवा बेसन
- पाव कप कच्चे तांदूळ
- 8-9 बदाम
- अर्धा कप दलिया
- चिमूटभर हळद
- पाणी अथवा गुलाबपाणी
कसा करा उपाय
- मसूर डाळ अथवा बेसन, तांदूळ आणि बदाम वेगवेगळे मिक्सरमधून काढून त्याची पावडर करून घ्या
- ही पावडर केल्यावर त्यात दलिया आणि हळद मिक्स करा
- त्यात पाणी अथवा गुलाबपाणी मिक्स करून पेस्ट तयार करा
- ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि सुकल्यावर पाण्याने स्वच्छ तोंड धुवा
- तुम्ही ही पेस्ट मान, गळा आणि हातावरही लाऊ शकता
- दर 10 दिवसाने एकदा याचा प्रयोग करा
फायदा
चेहरा उजळ्यासाठी घरगुती उपाय करताना (Chehra Sathi Gharguti Upay) तुम्ही उत्तम उपाय वापरू शकता तो म्हणजे घरगुती उटणे. त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी अनादी काळापासून उटण्याचा वापर करण्यात येत आहे. हा उटण्यामधील डाळ, तांदूळ आणि दलियामुळे त्वचेतील घाण निघण्यास मदत मिळते. तसंच हे स्क्रबप्रमाणे काम करते. चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. यातील हळद ही अँटिसेप्टिक असून चेहऱ्याला उजळपणा मिळवून देते. तसंच विटामिन ई युक्त बदाम हे एजिंगची समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतात.
नारळाचे तेल (Coconut Oil)
साहित्य
नारळाचे तेल
कसा करा उपाय
- थोडेसे नारळाचे तेल घ्या आणि संपूर्ण चेहरा आणि मानेला लावा
- रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा प्रयोग करा (तेलकट त्वचा असेल तर याचा उपयोग करू नका)
फायदा
चेहऱ्यावर उजळपणा आणण्यासाठी काय करायचे असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर चेहरा उजळविण्यासाठी घरगुती उपाय करताना नारळाच्या तेलाचा वापर करा. घरात सगळ्यांकडेच हे उपलब्ध असते. नारळाचे तेल हे नैसर्गिक मॉईस्चराईजरप्रमाणे काम करते. तसंच सेरोसिस आणि एक्झिमासारख्या त्वचेसंबंधी रोगासाठीही हे फायदेशीर ठरते. नारळाच्या तेलामुळे त्वचेला थंडावा प्राप्त होतो. तसंच प्रदूषण आणि ऊन्हापासूनही चेहऱ्याचे संरक्षण करण्यास मदत मिळते. चेहऱ्यावर वाढत्या वयाचा परिणाम कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो.
टॉमेटो (Tomato)
साहित्य
- अर्धा टॉमेटो
- एक चमचा चंदनाची पावडर
- चिमूटभर हळद
कसा करा उपाय
- टॉमेटो कापून घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करा. त्याआधी त्यातील बी काढून टाका
- या तुकड्यांमध्ये चंदन पावडर आणि हळद मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्या
- ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि 15 मिनिट्स तसंच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा
- आठवड्यातून एक ते दोन वेळा ही पेस्ट तुम्ही नियमित स्वरूपात वापरा
फायदा
चेहऱ्यावर उजळपणा आणण्यासाठी टॉमेटोचा वापर तुम्ही अशा प्रकारे करून पाहा. यामध्ये लायकोपिन असते जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून चेहरा निस्तेज होण्यापासून रोखते. तसंच तुम्ही टॉमेटोचा फेसपॅकही यासाठी वापरू शकता.
पपई (Papaya)
साहित्य
- पपईचे साल
- 1 चमचा मध
- 1 चमचा दूध
कसा करा उपाय
- पपईचे साल, दूध आणि मध हे एकत्र करून मिक्सरमधून पेस्ट तयार करून घ्या
- ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा
- थोडा वेळ सुकू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा
फायदा
पपईचे साल हे त्वचेवर उजळपणा आणण्यासह त्वचेवरील डाग कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते. पपई हा चेहरा उजळविण्यासाठी घरगुती उपाय म्हणून उत्तम पर्याय आहे. त्वचेला मॉईस्चराईज करण्यासाठीही याचा उपयोग होतो. तसंच चेहरा अधिक उजळतो. यामध्ये असणारे विटामिन ए चेहऱ्यावरील निस्तेजता घालविण्यास मदत करते.
दही (Curd)
साहित्य
- अर्धा कप दही
- एक अथवा दोन चमचे लिंबाचा अथवा संत्र्यांचा रस
कसा करा उपाय
- एका बाऊलमध्ये दही घ्या. त्यात दोन चमचे लिंबाचा अथवा संत्र्यांचा रस मिक्स करा
- हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि 10-15 मिनिट्स तसंच ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा
- तुम्हाला हवं तर तुम्ही नुसत्या दह्याचा वापरही करू चेहऱ्यावर करू शकता
फायदा
चेहरा उजळविण्यासाठी घरगुती उपाय (Chehra Sathi Gharguti Upay) करायचा विचार येतो तेव्हा दही हा पर्याय नक्कीच योग्य आहे. दह्याचा फेसमास्क अथवा फेसपॅक हा त्वचेसाठी उत्कृष्ट ठरतो. दही त्वचा उजळविण्यासाठी, मॉईस्चराईज करण्यासाठी आणि इलास्टिसिटी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते.
हळद (Turmeric)
साहित्य
- अर्धा चमचा हळद
- 4 चमचे बेसन
- दूध अथवा पाणी
कसा करा उपाय
- बेसन आणि हळद पावडरची पेस्ट बनवा. त्यात भिजवताना पाणी अथवा दुधाचा वापर करा
- ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा आणि सुकू द्या. सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा
- आठवड्यातून एक अथवा दोन वेळा तुम्ही या पेस्टचा वापर करा
फायदा
हळदीचे अनेक फायदे आहे. विशेषतः चेहरा उजळविण्यासाठी घरगुती उपायांमध्ये हा पर्याय नेहमीच पहिला समजण्यात येतो. त्वचेला चांगले राखण्यासाठीही याचा उपयोग होतो. यामध्ये अँटिसेप्टिक असल्याने फोटोएजिंग आणि सोरायसिसपासूनही वाचवते. मुरूमांची समस्या असल्यास त्यावर उपयोगी ठरते. तसंच हळदीच्या फेसपॅकमध्ये बेसन असेल तर चेहऱ्याला एक्सफोलिएट करून त्यातील घाण बाहेर काढण्यास मदत मिळते.
बेकिंग सोडा (Baking Soda)
साहित्य
- 1 चमचा बेकिंग सोडा
- 1 चमचा ऑलिव्ह ऑईल
- अर्धा चमचा मध
कसा करा उपाय
- एका वाटीत बेकिंग सोडा, ऑलिव्ह ऑईल आणि मध हे मिश्रण तयार करून घ्या
- हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि काही मिनिट्स तसंच सुकू द्या. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा
- तुम्ही 10-15 दिवसातून एक वेळा या मिश्रणाचा चेहऱ्यावर वापर करून घेऊ शकता
फायदा
चेहरा उजळण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो त्यात बेकिंग सोड्याचा वापर तुम्ही करून घेऊ शकता. चेहरा उजळविण्यासाठी घरगुती उपायांमध्ये बेकिंग सोडा डेड स्किन हटविण्याचे काम करतो. तसंच यामुळे त्वचेला वेगळीच चमक मिळते. याशिवाय यामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात जे चेहऱ्यावरील किटाणू मारून टाकण्याचे काम करतात. तसंच सनबर्नपासूनही सुटका मिळवून देते. बेकिंग सोडा वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करून घ्या.
बटाटा (Potato)
साहित्य
बटाटा
कसा करा उपाय
- बटाट्याची साले काढून घ्या. पाण्यात बटाटा भिजवा अथवा बटाट्याची पेस्ट करून घ्या
- ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि काही वेळ सुकल्यानंतर चेहरा धुवा
फायदा
बटाट्यामध्ये शरीरावरील काळे डाग काढून टाकणारे गुण आढळतात. त्यामुळे तुम्ही चेहऱ्यासाठीही याचा उपयोग करू शकता. चेहरा उजळविण्यासाठी घरगुती उपाय करताना बटाटा हा अतिशय सोपा उपाय आहे.
गुलाबपाणी (Gulab Jal)
साहित्य
- आवश्यकतेनुसार गुलाबपाणी
- कापूस
कसा करा उपाय
- गुलाबपाणी थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा
- त्यानंतर गुलाबपाण्यात कापूस बुडवा आणि चेहरा पुसून घ्या
फायदा
त्वचेचे पीएच संतुलन राखण्यासह अतिरिक्त तेलाचेही संतुलन गुलाबपाणी करते. चेहरा उजळविण्यासाठी घरगुती उपाय म्हणून याकडे नेहमीच पाहिले जाते. त्वचेवर जमलेली घाण काढणे, त्वचा हायड्रेट करणे आणि मॉईस्चराईज करणे यासाठी याचा उपयोग होतो. तसंच फाईन लाईन्स आणि सुरकुत्यांपासूनही त्वचेला वाचविण्यास आणि त्वचा अधिक तरूण दिसण्यास आणि चमकदार दिसण्यासाठी याचा उपयोग होतो.
प्रश्नोत्तरे (FAQ’s)
1. नैसर्गिकरित्या चेहरा उजळविण्यासाठी काय करावे?
चेहरा उजळविण्यासाठी अनेक घरगुती उपाय आम्ही तुम्हाला लेखात दिले आहेत. याचा उपयोग करण्यासह रोज पौष्टिक आहार, फळांचे सेवन आणि योग्य डाएट तुम्ही करणे आवश्यक आहे.
2. एका रात्रीत चेहऱ्यावर उजळपणा कसा आणावा?
कोणत्याही उपायाने एका रात्रीत उजळपणा येऊ शकत नाही. त्यासाठी योग्य जीवनशैली आणि योग्य घरगुती उपायांचा तुम्ही वापर करा. तसंच तुम्ही चेहरा उजळविण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी गुलाबपाणी, बदाम तेल अशा नैसर्गिक तेलांचा वापर करा.
3. चेहरा उजळविण्यासाठी व्यायामाचा काही उपयोग होतो का?
अर्थात तुम्ही नियमित व्यायाम केल्याने शरीराला योग्य रक्तपुरवठा मिळतो आणि त्यामुळे चेहऱ्यावर चांगली चमक राहते आणि चेहरा उजळविण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होतो.