ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
How to keep blankets smelling fresh in marathi

कपाटात ठेवल्यामुळे ब्लॅंकेटला येत असेल वास तर फॉलो करा या टिप्स

हिवाळा संपताच कपाटात ब्लॅंकेट ठेवले जातात ते थेट पुढच्या वर्षी पुन्हा हिवाळा सुरू होतो तेव्हाच बाहेर निघतात. आता पुन्हा कडक हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सहाजिकच सर्वांच्या कपाटामधून ब्लॅंकेट बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र जवळजवळ वर्षभर तसेच ठेवल्यामुळे या ब्लॅंकेटला थोडा कुबट वास येतो. असे वास येत असलेले ब्लॅंकेट अंगावर घेणं नकोसं होतं. ब्लॅंकेट जाड आणि जड असल्यामुळे ते धुताही येत नाहीत अथवा लवकर सुकत नाहीत. यासाठी अशी राखा तुमच्या ब्लॅंकेटची स्वच्छता ज्यामुळे ते नेहमीच राहतील फ्रेश आणि सुंगधित

ब्लॅंकेट नेहमी वेगवेगळ्या बॅगेत ठेवा 

ब्लॅंकेटला वास येऊ नये यासाठी ब्लॅंकेट कव्हर वापरणं जास्त फायद्याचं ठरेल. बऱ्याचदा आपल्याला कपाटात घडी घालून ब्लॅंकेट ठेवायची सवय असते. मात्र जर तुम्ही प्रत्येक ब्लॅंकेट ठेवताना ते वेगवेगळ्या क्लिन बॅगेत ठेवले तर त्यांना कुबट वास येत नाही. यासाठी तुम्ही स्वच्छ कापडी बॅग वापरू शकता अथवा सुती कापडात ते गुंडाळून ठेवू शकता. वेगवेगळे ठेवल्यामुळे त्यांना इतर कपड्यांचा वास येत नाही.या बॅगेत जर तुम्ही एका छोट्या कापडाच्या पुरचुंडीत गु्ंडाळून सुकलेला चाफा, कडुलिंबाची पाने अथवा लवंग ठेवली तरी त्याला छान सुंगध येईल.

हिवाळ्यात उबदार कपड्यांची निगा राखण्यासाठी सोप्या टिप्स

कडक ऊन दाखवा

हिवाळा सुरू होताच सूर्याचे चांगले दर्शन घडते. त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात काही वेळ तु्म्ही जर तुमचे वापरलेले अथवा कपाटात ठेवलेले ब्लॅंकेट ठेवले तर त्यातील दुर्गंध दूर होतोच शिवाय ब्लॅंकेट निर्जंतूक होतात.उन्हात ठेवल्यामुळे जीवजंतूंचा नाश होतो आणि ब्लॅंकेट पुन्हा वापरण्यासाठी सुरक्षित ठरतात. दिवसभर कमीत कमी दोन तास तरी ऊन देणं यासाठी गरजेचं आहे. उन्हात ठेवल्यानंतर पुन्हा लगेच ब्लॅंकेट कपाटात ठेवू नका. थोड्यावेळ असेच मोकळ्या हवेवर ठेवा आणि मग ते कपाटात ठेवून द्या.

ADVERTISEMENT

कपड्यावरील डाग कसे काढावे, जाणून घ्या सोपे उपाय (How To Remove Stains From Clothes)

धुताना काळजी घ्या 

जर तुम्ही ब्लॅंकेट धुण्याचा विचार करत असाल तर ते वेगवेगळे धुवा. कारण एकत्र धुतले तर त्यांचे रंग एकमेकांना लागू शकतात. बऱ्याचदा ब्लॅंकेटसाठी नैसर्गिक रंग वापरले जातात. शिवाय काही ब्लॅंकेट हलक्या रंगाचे तर काही गढद रंगाचे असतात त्यामुळे धुताना याची काळजी घेणं गरजेचं आहे. शिवाय हार्श डिटर्जंट न वापरता वुलन फॅब्रिकसाठी वापरण्यात येणारे सॉफ्ट लिक्विड डिटर्जंट यासाठी वापरा.

एअर फ्रेशनर वापरा 

ब्लॅंकेट कपाटात ठेवायचंच असेल तर तुम्ही त्याला वास येऊ नये यासाठी एअर फ्रेशनर वापरू शकता. यासाठी घरीच एअर फ्रेशनर बनवणं खूप सोपं आहे. बेकींग सोडा आणि कोणत्याही इसेंशिअल ऑईलचा वापर तुम्ही करू शकता. हे मिश्रण कपाटात ठेवा ज्यामुळे तुमच्या संपूर्ण कपाटालाच छान वास येईल ज्यामुळे ब्लॅंकेटचा वास नक्कीच कमी होईल.

बेकिंग सोड्याचे हे ‘25’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का (Benefits Of Baking Soda In Marathi)

ADVERTISEMENT
08 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT