ADVERTISEMENT
home / Natural Care
रोज खरबूज खा आणि आठवड्याभरात मिळवा सुंदर त्वचा

रोज खरबूज खा आणि आठवड्याभरात मिळवा सुंदर त्वचा

 त्वचा चांगली हवी असेल तर आहारात चांगल्या फळांचा समावेश असायलाच हवा असे अनेकदा सांगितली जाते. सगळ्या फळांमध्ये असे काही खास घटक असतात जे त्वचेसाठी फारच फायदेशीर ठरतात. कलिंगड या गटातील फळ अर्थात ‘खरबूज’ (cantaloupe) हे त्वचेसाठी फारच चांगले असते. पाणीदार अशा फळांमध्ये याचा समावेश होतो. साधारण बाराही महिने हे फळ उपलब्ध असते. त्याच्या नित्य सेवनामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. पण त्वचेवर याचे कमालीचे फायदे दिसून येतात. जर तुम्ही आठवडाभर याचे सेवन केले तर तुम्हाला तुमच्या त्वचेत कमालीचा फरक जाणवेल. तुम्हीच तुमच्या त्वचेच्या प्रेमात पडाल. चला जाणून घेऊया खरबूजचे त्वचेसाठी असलेले फायदे

फायबरयुक्त पदार्थांचं सेवन न केल्यास होतील ‘हे’ गंभीर परिणाम

त्वचा ठेवते हायड्रेट

खरबूजचे सेवन

Instagram

ADVERTISEMENT

 खरबूज मध्ये व्हिटॅमिन K आणि E मोठ्याप्रमाणात असते. त्वचा चांगली ठेवण्यासाठी हे दोन घटक फारच महत्वाचे असतात.  खरबूज हे पाणीदार असे फळ आहे. या फळामध्ये व्हिटॅमिन B  देखील मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये असलेले अन्य घटक त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. त्वचेला ग्लो देण्यासाठी हे फळ फारच फायदेशीर असते. हे फळ खाऊन झाल्यावर फळाची सालं चेहऱ्याला घासा. तुम्हाला त्यामुळेही फ्रेश वाटेल.

 

तारुण्य टिकवते

त्वचा चिरतरुण राहावी असं कोणाला वाटणार नाही. वय कितीही झालं तरी त्वचा ही कायम चांगली आणि फ्रेश दिसावी असे आपल्या सगळ्यांनाच वाटते. वार्धक्याच्या खूणा वयोमानानुसार त्वचेवर येणे अगदी स्वाभाविक आहे. पण आहारात खरबूज असेल तर ही प्रक्रिया मंदावते. खरबूजमध्ये व्हिटॅमिन C असते. ज्यामुळे त्वचा अधिक चांगली दिसण्यास मदत मिळते.  त्वचेची इलास्टिसिटी टिकवून ठेवण्याचे काम खरबूज करते. गरोदर महिलांनी तर हे फळ हमखास खायला हवे. त्यामुळे गरोदरपणानंतरही त्वचा खराब होत नाही. उलट तुमच्या त्वचेचा ग्लो कायम टिकून राहतो. 

चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर या कोलॅजन बुस्टरचे करा सेवन

ADVERTISEMENT

त्वचा विकारांना ठेवते दूर

त्वचा विकारांना ठेवते दूर

Instagram

त्वचा विकार हे वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. चेहऱ्यावर पुरळ, पुटकुळ्या येण्याचा त्रास हा अनेकांना असतो. पण तुमच्या शरीरात योग्य गोष्टी जात असतील. तुमचे पोटाचे आरोग्य चांगले राहात असेल तर तुम्हाला त्वचा विकार होत नाहीत. शिवाय त्वचेच्या आतल्या थरात जाऊनही त्वचेचे आरोग्य निरोगी ठेवण्यासही खरबूज मदत करते. त्यामुळे आपोआपच तुमची त्वचा अधिक चांगली दिसू लागते.

इन्स्टंट व्हिटॅमिन C चे सेवन करा आणि मिळवा सुंदर त्वचा

ADVERTISEMENT

आठवडाभर असे करा खरबूजचे सेवन

खरबूज

Instagram

खरबूजचे फायदे जाणून घेतल्यानंतर आता त्याचे सेवन करण्याचा विचार करत असाल तर


1.सकाळी नाश्ता झाल्यानंतर एका मध्यम खरबूजाचा अर्धाभाग खा. खरबूज खाल्यानंतर पोट गच्च झाल्यासारखे वाटते. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. वजन कमी करणाऱ्यांसाठीही हे फळ फायद्याचे आहे. 

ADVERTISEMENT

2. संध्याकाळच्या वेळी किंवा अरबट चरबट खाण्याच्यावेळात तुम्ही खरबूज खा. त्यामुळे तुमच्या पोटात नको ते जाण्याऐवजी काहीतरी चांगले जाते. 

3.  खरबूज सॅलेड स्वरुपातही तुम्हाला खाता येईल.  त्यामुळे तुम्ही सॅलेड किंवा स्मुदी करुनही ते खाऊ शकता. त्यामुळेही जास्तीत जास्त खरबूज तुमच्या पोटात जाईल.

आता आहारात आजच करा खरबूजचा समावेश आणि पाहा तुमच्या त्वचेत झालेला बदल

पुढे वाचा – 

ADVERTISEMENT

Benefits of Muskmelon in Hindi

13 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT