आपली हल्लीची लाईफस्टाईल पाहता धावपळीमध्ये नीट जेवण खाणं होत नाही. तसंच सततचा ताणही असतो. यामुळे फार कमी वयात साखरेचं दुखणं अर्थात मधुमेह बऱ्याच जणांना. अशावेळी गोड पदार्थ आवडत तर असतात. पण साखर नियंत्रणात नसल्यामुळे तुम्हाला गोड पदार्थ खाता येत नाहीत. पण असं असलं तरीही तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकता. त्यावरील उपाय म्हणजे शुगर फ्री (Suger Free) चा वापर. शुगर फ्री म्हणजे बाजारात मिळणारी साखर नाही. तर असे पदार्थ ज्यामध्ये साखरेचं प्रमाण नाही. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना शुगर फ्री मिठाई कशी करायची याची माहिती नसते. त्यासाठी आम्ही ITM, IHM, नेरूळमधील लेक्चरर शेफ निरंजन गद्रे यांच्याकडून काही खास रेसिपी जाणून घेतल्या आहेत. तुम्हीही याचा वापर करून घरच्या घरी शुगर फ्री मिठाई तयार करू शकता. आम्ही तुमच्यासाठी पाच खास मिठाईच्या रेसिपी आणल्या आहेत.
1. डेट्स रोल (खजूर रोल्स)
आपण नेहमी मिठाईच्या दुकानामध्ये विविध मिठाई पाहतो. पण नेहमी आपल्या मनात हाच विचार येतो की, आपल्याला यापैकी काहीही घरी करता येणार नाही. पण तुम्ही डेट्स रोल नक्की घरी करू शकता. हे करणंही सोपं आहे. शिवाय यामुळे वजन अथवा शरीरात साखर वाढण्याचा धोकाही नाही.
साहित्य
1 चमचा तूप
250 ग्रॅम काळे खजूर
50 ग्रॅम डेसिकेटेड खोबरं
100 ग्रॅम मिक्स ड्रायफ्रूट्स
50 ग्रॅम पॉपी सिड्स
कृती
खजूराचे लहान तुकडे करून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये एक चमचा तूप घालून खजूराचे तुकडे यामध्ये नीट भाजून घ्या. हे तुकडे सॉफ्ट होईपर्यंत पाच मिनिट्स नीट शिजवा. नंतर गॅसवरून हा पॅन खाली घ्या. त्यामध्ये डेसिकेटेड खोबरं आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करा. नंतर हे मिश्रण घेऊन त्याला रोलचा आकार द्या आणि त्यावर पॉपी सिड्स लावा. हे रोल्स तुम्ही फ्रिजमध्ये ठेवा. काही वेळानंतर हे रोल्स खाण्यास तयार असतात. यामध्ये तुम्हाला कोणतंही साखरेचं प्रमाण जास्त नसतं. खजूर हा तुमच्या शरीराला नक्कीच चांगला असतो. शिवाय ही मिठाई बनवणंदेखील अतिशय सोपं आहे.
2. सत्तू बर्फी
सत्तू आपल्या शरीराला चांगलं पोषक तत्व देतात. सत्तूमुळे खरं तर तुमची भूक नियंत्रणात राहाते. याने पोट पटकन भरतं आणि त्याशिवाय हे मिठाई स्वरूपात असेल तर चवीला अधिक चांगलं लागतं. सत्तूचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही ही मिठाई करून ठेवली आणि जेवणानंतर मधल्या वेळात ही खाल्ली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो.
साहित्य
250 ग्रॅम सत्तू
1 मोठा चमचा साजूक तूप
150 ग्रॅम बारीक कापलेला गूळ
4-5 बारीक कापलेले अंजीर
पाणी
½ चमचा दालचिनी पावडर
½ चमचा वेलची पावडर
100 ग्रॅम मिक्स ड्रायफ्रूट्स
कृती
नॉनस्टिक पॅनमध्ये तूप घ्या. तापल्यावर त्यात सत्तू घालून भाजून घ्या. नंतर बाजूला ठेवा. दुसऱ्या पॅनमध्ये पाणी घालून त्यात गूळ घालून ते उकळवा. त्यामध्येच अंजीर घालून साधारण 2-3 मिनिट्स शिजू द्या. मध्यम आचेवर गॅस ठेवा. त्यावरून भाजलेले सत्तू मिक्स करा आणि वेलची पावडर व दालचिनी पावडर घाला. हे नीट शिजल्यावर एका ताटात हे सर्व मिश्रण काढा आणि नीट पसरवा. त्यावर ड्रायफ्रूट्स पसरवा. नंतर व्यवस्थित तुकडे करून तुम्ही हे खायला देऊ शकता.
3. शेंगदाण्याची पोळी
हा थोडा वेगळा आणि सहसा न ऐकलेला प्रकार आहे. पण यामधून तुम्हाला पौष्टिक तत्व शरीराला मिळतात. तसंच हे घरच्या घरी बनवायला अधिक सोपं आहे. तुम्ही नेहमीच्या वस्तूंमध्येच ही मिठाई तयार करू शकता. तुमच्या नेहमीच्या खाण्यासाठी तुम्ही हे घरात तयार करून ठेवू शकता.
साहित्य
100 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे
100 ग्रॅम गूळ
1 चमचा वेलची पावडर
250 ग्रॅम गव्हाचं पीठ
आवश्यकतेनुसार पाणी
थोडसं तूप
कृती
भाजलेले शेंगदाणे गूळ आणि वेलची पावडरसह मिक्सरमधून वाटून घ्या. कणीक पोळीप्रमाणेच नीट भिजवून घ्या. पाणी आणि तेलाचा वापर यामध्ये पोळीच्या कणकेप्रमाणेच करा. त्यानंतर कणकेचा गोळा करून वरील शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण त्यामध्ये भरा आणि पराठ्याप्रमाणे लाटा. तूपावर मस्तपैकी भाजून घ्या. त्यावर पुन्हा एकदा तूप घालून तुम्ही सर्व्ह करू शकता. यामध्ये असणारी पोषक तत्व तुमच्या शरीराला नक्कीच आवश्यक असतात.
मुंबईतील या ठिकाणी तुम्हाला चाखता येतील ‘झक्कास’ Street Food
4. सफरचंद बर्फी
सफरचंद आपल्या शरीरासाठी किती पोषक ठरतं हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कधीकधी घरामध्ये खूप सफरचंद आपण आणून ठेवतो. पण नुसतं खायचा कंंटाळा येतो. मग अशावेळी तुम्ही सोपी आणि सहज बनणारी सफरचंद बर्फी तयार करू शकता.
साहित्य
10 सफरचंद
दुधी 300 ग्रॅम
मावा 200 ग्रॅम
गुलाबपाणी 20 मिली
साजूक तूप 50 ग्रॅम
गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या 10 ग्रॅम
कृती
7 सफरचंद आणि दुधी एकत्र किसून मिक्स करा. पॅनमध्ये तूप गरम करा. त्यामध्ये मावा घाला आणि भाजून घ्या. उरलेल्या 3 सफरचंदाचा रस काढून घ्या आणि यामध्ये मिक्स करा. व्यवस्थित जाड होईपर्यंत मंद आचेवर हे भाजत राहा. एका ट्रे मध्ये पूर्ण तूप लावून घ्या. त्यावर हे तयार झालेलं मिश्रण घाला आणि पसरवून घ्या. तुम्हाला हव्या तशा त्याच्या वड्या करून घ्या आणि वरून गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या टाका. त्यानंतर फ्रिजमध्ये गार करा आणि मग सर्व्ह करा.
मुंबईची शान असलेला वडापाव खायचाय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
5. बीट घारगे
बीटामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबीन वाढायला मदत होते. बऱ्याचदा काही जणांना नुसतं बीट खायला आवडत नाही. मग अशावेळी तुम्ही हे वेगळ्या प्रकारचे बीटाचे घारगे तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करत बसायची गरज भासत नाही.
साहित्य
100 ग्रॅम बीट
अर्धा किलो गव्हाचं पीठ
पाणी
मीठ
50 ग्रॅम गूळ
तळण्यासाठी तेल
कृती
बीट किसून घ्या. त्यात किसलेला गूळ आणि थोडं मीठ घाला. हे मिश्रण बाजूला ठेवून द्या. बीटाला पूर्ण पाणी सुटू द्यावं. त्यानंतर त्यात कणीक घालून हवं तेवढं नीट घट्ट भिजवून घ्या. थोडा वेळ हे तिंबत ठेवा. नंतर याचे लहान गोळे करून थोडे लाटून घ्या. तेल गरम करून त्यात तळा आणि मस्त घारगे तयार.
उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ खाल्ले तर होऊ शकतो आरोग्यावर उलट परिणाम
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.