मराठी साहित्यात अनेक लेखक होऊन गेले. त्यापैकी नेहमी साहित्यामध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे व. पु. काळे. आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा खचायला होतं तेव्हा जर तुम्ही लेखक व. पु. काळे विचार वाचलेत अथवा व पु काळे यांचे कोट्स आणि व पु काळे कविता वाचायला घेतल्या तर तुमच्या मनामध्ये पुन्हा एक नवी उमेद आणि आशा निर्माण होते. वसंत पुरूषोत्तम काळे यांचे मराठीमध्ये कोट्स (Va. Pu. Kale Quotes In Marathi) आयुष्याला एक नवी प्रेरणा मिळवून देतात. मराठी सुविचार हे नेहमीच आयुष्याला प्रेरणा देतात आणि विचारकरायला लावणारे आहेत आणि हेच विचार व. पु. काळे यांनी खूप सुंदररित्या मांडले आहेत. लेखक व. पु. काळे यांनी आयुष्यावर भरभरून लिहिले आहे. असेच काही त्यांचे प्रसिद्ध आणि आयुष्याला प्रेरणा देणारे कोट्स आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. व. पु. काळे यांचे लिखाण इतके सुंदर आहे की मराठी साहित्यामध्ये या लिखाणाला विशेष स्थान आहे. मराठी साहित्या लेखक व. पु. काळे यांच्या लिखाणाशिवाय अपूर्ण आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. पाहूया असेच काही व. पु. काळे यांचे कोट्स
आयुष्यावर व. पु. काळे यांचे कोट्स (Va. Pu. Kale Quotes On Life In Marathi)
1. शिस्तीशिवाय जीवन म्हणजे सुकाणूशिवाय जहाज
2. आयुष्यात एक वेळ अशी येते की, जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते
3. मनस्ताप ही अवस्था अटळ आहे. पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे जागच्या जागी राहतात. त्यातून पाणी पिता आलं नाही तर त्यात फुलं ठेवता येतात
4. आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेले पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं
5. तुमचा स्वतःचा आयुष्याचा अनुभव हाच तुमचा गुरू. कारण प्रचीतीचं झगझगीत तेजोवलय त्याच्या पाठीशी उभं असतं
6. प्रगतीचा रस्ता कोणत्याही दिशेने जाणारा असो त्याचं प्रस्थान मनातच हवं
7. अनेक समस्या त्या क्षणी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा
8. तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात. मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो
9. छान राहायचं..हसायचं! पोटात ज्वालामुखी असतानाही, हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना?
10. प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडचा प्रॉब्लेम कधी अस्तित्वाच नसतो
11. गणिताच्या उत्तरासारखी तुम्ही आयुष्याकडून अपेक्षा करता आणि जास्त दुःखी होता
12. सगळे कागद सारखेच, त्याला अहंकार चिकटला की, त्याचे सर्टिफिकेट होतं
13. आपलं काहीच चुकलेलं नाही ही भावनाच माणसाला नव्या क्षणाचं स्वागत करायला बळ देते
14. काळ फक्त माणसाचं वय वाढवतो, आठवणींंना वार्धक्याचा शाप नसतो
15. आयुष्यातला सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतंं ते साध्य करून दाखवणं
16. निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात
17. आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड आपण करतो ते कारणच बऱ्याचदा आपल्याबरोबर राहात नाही. मग राहून राहून मनात येतं, काही नव्हतं तेव्हाच सुखी होतो
18. सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्याच्या आयुष्यात सर्वात अपमानास्पद क्षण कोणता? आपलाही वापर केला जातो हा क्षण
19. चालताना विचाराला आणि विचारामुळे चालण्यास गती मिळते
20. ज्याच्याशी लढायचंय त्याचा पूर्ण परिचय असावा, हा युद्धाचा पहिला नियम आहे
वाचा – वाचनप्रेमींसाठी उत्कृष्ट मराठी कादंबरी नावे (Best Marathi Books)
प्रेमाबद्दल व. पु. काळे यांचे कोट्स (Va. Pu. Kale Quotes On Love In Marathi)
1. प्रेमाच्या प्रांतात स्वतःकडे कमीपणा घ्यायची वृत्ती लागते. स्वतःला लहान समजण्यातलं मोठेपण मिळवायचं असतं
2. जेवढं घट्ट नातं तेव्हढे तीव्र मानपान, परक्या माणासाला आपलं प्रेमही देणं लागत नाही तसंच रागही…
3. मन मारून मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करायला मिळालेली कुशी सुरक्षित
4. ज्याच्याजवळ सावरण्याची शक्ती आहे तो कुणाला आवरत बसत नाही
5. पुरूषांना पण व्यथा असतात. पण त्यांच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायम त्यांना हवी असते. उडून जाणारं अत्तर त्यांना आवडत नाही
6. ड्रिंक्स असाततच पण नशा असते ती सहवासाची आणि किक चढते ती गप्पांची!
7. काही वेळा मानलेल्या नात्यात प्रेम सापडतं. पण सख्या नात्यात ओढा आढळत नाही
8. मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येतं. स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन
9. बोलणी फिसकटली की, मोडतो तो व्यवहार, प्रेम नव्हे!
10. ‘प्रेम’ म्हणजे मरण असतं. मी हा शब्ध प्रेमात आणि भक्तीत उरत नाहीत. मरणात तेच होतं. ज्याला जिवंतपणी प्रेम अनुभवायचं आहे, तोच खरं प्रेम करू शकतो.
11. प्रेम घडतं, घडवून आणता येत नाही
12. स्वतःवरच तुफान प्रेम करणाऱ्या माणसाला शत्रू नसतात – व. पु. काळे
13. उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा. चांगुपणाने वागण्यात स्पर्धा कमी असते त्यामुळे त्या मार्गाने जावं
14. प्रेम केल्यानेच प्रेम समजतं
15. प्रेम हाही एक तऱ्हेचा वातच आहे. वात झालेला माणूस दहा दहा माणसांना आवरत नाही. प्रेमात पडलेला माणूसही अनावर असतो
16. ज्याला प्रेम समजतो, शब्द समजतो तो वेळ पाळतो, नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो, तो वेळ साधतो
17. त्याग हाच प्रेमाचा पाया आहे हे ज्यांनी ज्यांनी जाणलं त्यांना प्रेम शब्दातूनच व्यक्त करण्याची पाळी येत नाही. त्यांची प्रेमाची यात्री निःशब्द असते. मौन हाच त्यांचा गाभा असतो.
18. जोडीदाराशी संंवाद न होणं यासारखं नरक नाही
19. रोज रोज प्रेम करतो म्हणणे म्हणजचे प्रेम नसते…तर आपल्या आयुष्यात कोणीतरी अशी व्यक्ती असणे जिच्यावर आपला इतका विश्वास असणे की तुम्ही त्यांना कितीही दूर केलेत तरी, त्यांचे मन कितीही दुखावलेत तरीही ते तुमची साथ सोडणार नाहीत. ते केवळ तुमचेच होते, तुमचेच आहेत आणि तुमचेच राहतील
20. प्रेमात पडलेली व्यक्ती फक्त प्रियकर असते. ती प्रिय असेल तेच बोलते. प्रिय असेल तेवढच बघते, ऐकते, स्पर्शून घेते. प्रियकर म्हणजे आदर्शवाद. माणूस म्हणजे वास्तववाद
वाचा – World Book Day: जाणून घेऊया पु.ल. देशपांडे यांची पुस्तके
व. पु. काळे यांचे मजेशीर आणि उपहासात्मक कोट्स (Funny & Satirical Quotes)
1. एकत्र राहण्यासाठी अक्षता लागत नाहीत तर अंडरस्टँडिंग लागतं
2. प्रतिसाद देणारं मन साद देणाऱ्या मनाइतकं विशाल असतं
3. ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते
4. माणसांचे चेहरे कसे असतात? तर भारताने जागतिक बँकेकडून काढलेलेल कर्ज त्यांना त्यांच्या बेसिकमधून फेडायचंय असे
5. पापणीच्या आत झालेली पुटकुळी फक्त डोळ्यांंना समजते, म्हणून कोणी डोळा फोडतो काय?
6. सुंदर मुलीसाठी झुरायला फार अक्कल लागत नाही
7. कबुतराला गरूडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही
8. व्यवहारापलीकडे जगात खूप आनंद आहेत, नया पैशात मांडता न येणारे
9. पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते हा बायकांचा चुकीचा समज आहे. आकर्षण आणि प्रेम या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत
10. Identity Cards सारखी विनोदी गोष्ट या जगात दुसरी काही नसेल. आपण आहोत कसे हे त्यांना हवं असतं. त्याऐवजी आपण दिसतो कसे ते पाहून ते ओळखतात
11. वैयक्तिक टीकास्पद सवयी समजासाठी सोडायच्या असतात. तेव्हा सभ्यतेच्या मर्यादा इतरांसाठी पाळायच्या नसतात
12. कौतुकाला थोडी हेव्याची किनार असल्याशिवाय त्याला खरी खुमारी येत नाही
13. संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की, माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करत नाही
14. माणूस निराळा वागतोय तो कामातून गेला असं आपण पटकन बोलतो. पण तसं नसतं या सगळ्याचा अर्थ तो फक्त आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो
15. विरोधक एक असा गुरू आहे जो तुमच्यातील कमतरता परिणामांसह दाखवून देतो
16. एखादी वस्तू मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते तेव्हाच ती स्वीकार करण्यायोग्य मानावी. ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल
17. स्टोव्हची जातच लहरी पुरूषाप्रमाणे. शेगड्या बिचाऱ्या गरीब असतात. एव्हर रेडी! स्टोव्हचं तसं नाही. त्याची मिजास सांभाळली तरच पेटणार
18. बायकोपेक्षा मैत्रीण जास्त विश्वास ठेवते म्हणून क्षमा करण्याची ताकद बायकोपेक्षा मैत्रिणीत जास्त असते
19. तासनतास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं यासारख्या यातना नाहीत. पण कुणीतरी आपली वाट पाहत आहे या जाणीवेसारखं दुसरं सुखही नाही. या जाणीवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडतात
20. आयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संतती लाभली की धकाधकीची वाटचाल ही सरळ वाटते. निखारे सौम्य होतात. काट्यांची टोकं बोथट होतात आणि सारं सोपं सोपं होऊन जातं
आई असते जीव तर बाबा आयुष्याचा आधार (Father’s Day Quotes In Marathi)
व. पु. काळे यांचे स्त्री आणि पुरूषांवरील कोट्स (Va. Pu. Kale’s Quotes On Women And Men)
1. रतीसुखाच्या वेळेला बाईला अंधार सोबती वाटतो. पुरूषांना उजेड हवा असतो. बाईने डोळे मिटून घेतले की ती चिन्मयापर्यंत पोहचते. पुरूष मृण्मयात मातीच्या शरीराशी थांबतो. तो चैतन्यापर्यंत पोहचत नाही
2. आमच्या संसाररथाला स्वार्थ आणि अहंकार असे दोन उथळलेले अश्व आहेत. कृष्णासारखा सारथी नाही
3. माणसाला संसारात काय हवं असतं. मनमिळावू जोडीदार, भागेल एवढी प्राप्ती. पहिला नंबर काढणारी जरी नाही तरी पास होत जाणारी मुलं, छोटसं घर. नव्वद टक्के एवढ्यावर तृप्त असतात
4. नवरा बायकोचं नातं म्हटलं की मायेचा ओलावा आला. थोडंसं का असेना पण दोघांना एकत्र गप्पागोष्टी करण्यासाठी एखादा स्वतंत्र कोपरा लागतोच
5. सर्वात जवळची माणसंच जास्त तऱ्हेवाईकपणे वागतात. त्याचं आपण मुळीच मनाला लावून घेऊ नये. परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा करून घेऊ नये याचा घरबसल्या धडा मिळावा हा त्यांचा सद्हेतू असतो. एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख निर्माणच होत नाही
6. देखणी माणसं सगळ्यांनाच मोहत पाडतात. पण एखाद्या देखण्या माणसाबद्दल आपलेपणाची भावना कधी निर्माण होते? तो प्रेमळ असेल तर. लाघवी, नम्र, मनमिळावू असा वैष्णवजन असेल तर. उन्मत्त सौंदर्यावर कोण लुब्ध होईल?
7. पोरगी म्हणजे एक झुळूक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही
8. पुरूषांना नक्की काय हवं असतं? फक्त स्त्रीसोख्य? मग असल्या वृत्तीची माणसं लग्न का करतात? मजेत एकट्याने राहावं. इच्छातृप्तीसाठी बाजार काही ओस पडलेला नाही. पण तसं होणार नाही. ह्या पुरूषांना मोलकरीण, स्वयंपाकीण, शय्यासोबतीण, मैत्रीण, पत्नी आणि पोरांची जबाबदारी उचलणारी एक परिचारिका हवी असते. त्याशिवाय ती मिळवती हवी पण तिला लौकिक नको. एका बायकोत त्यांना इतकं हवं असतं
9. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही
10. तुझं व्यक्तीमत्व निर्भिड असावं. रोखठोक पण सरळ, बाणेदार तरीही नम्र आणि त्याहीपेक्षा पारदर्शक. अर्थात विलक्षण धैर्य असल्याशिवाय हे रूपांतरण संभवत नाही
रोमॅंटिक कादंबरींची लिस्ट (Romantic kadambari in marathi)
मैत्रीवर व. पु. काळे यांचे कोट्स (Va. Pu. Kale Quotes On Friendship In Marathi)
Va. Pu. Kale Thoughts In Marathi
तुमच्या मैत्रीचा अर्थ उलगडून सांगण्यासाठी मराठी मैत्री चारोळ्या तर असतीलच. पण त्यासोबतच खास व.पु. काळेंचे हे मैत्रीवरील कोट्सही नक्की वाचा.
1. मित्र परिसारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं
2. लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस
3. मैत्री म्हटलं की काय असावं आणि काय नसावं याचं चिंतन करावं
4. प्रेम, मैत्री, संगोपन, शुषूश्रा या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं वाटलं की, त्याची सहजता गेली
5. पहिल्या वहिल्या भेटीत माणसं किती जवळची व्हावीत याला काही हिशेब असतो का? गणित असतं का? मैत्री म्हटलं की, खरं तर हिशेब, गणित वगैरे व्यावहारिक शब्द टिकतच नाहीत. तरीही हेच शब्द पटकन पुढाकार का घेतात?
6. मैत्रीचे धागे हे कोळ्याच्या धाग्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहूनही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाहीत
7. ज्या माणसाशी आपण मैत्री करतो त्याला अंशतः तरी समृद्ध करण्याची पात्रता आपल्यापाशी आहे का हे पाहावं
8. कोणती फुले टाळायची हे फुलपाखरांनीही समजतं
9. मोहरून जाणं ही अवस्था मैत्रीत महत्त्वाची. ही अवस्था टिकवायची असते
10. आपल्यावाचून कुणाचं तरी अडतं ही भावना फारच सौख्यदायक असते
गौतम बुद्धांची शिकवण आणावी आचरणात, आयुष्य होते सुखकर (Gautam Buddha Quotes In Marathi)
व. पु. काळे यांचे आनंदी कोट्स (Va. Pu. Kale Quotes On Happiness In Marathi)
Va. Pu Kale Suvichar In Marathi
1. विचाराइतकं देखणं दुसरं काहीही नाही
2. माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी. मग दुनिया तुमचं कौतुक करते
3. सतत वाहतं राहिलं की जवळ काही उरत नाही
4. काही काहींना खुद्ध स्वतःच्या मनाचीच मागणी कळत नाही
5. स्वतःचं स्वतःचं घर सांभाळायचं हे मला गोगलगाईने सांगितलं
6. संसार ही एक जबाबदारी असते त्याचं ओझं वाटायला लागलं की गंमत गेली
7. स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस हा स्वतःच एक खणखणीत नाणं असतो
8. प्रेम केल्यानेच प्रेम समजतं
9. भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरं
10. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असणार ही आशा सुटत नाही. म्हणूनच आपण जगतो
व. पु. काळे कविता (Va. Pu. Kale Marathi Kavita In Marathi)
Va Pu Kale Quotes In Marathi
1. अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत
असला तरीही प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं
2. सर्वात सूक्ष्म काही असेल तर विचारच.
म्हणून अस्वस्थ, उद्धस्त करण्याची त्याची शक्ती अफाट
3. कितीकदा कडाडून एकमेकांशी भांडलो,
एकमेकांना सोडून नाही कुठे रमलो
4. जळणाऱ्या निखाऱ्याचं तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असतं.
बसणाऱ्यानं शेकोटीपासून किती अंतरावर बसायचं,
यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.
ऊब हवी की चटके हवेत हे
ज्याचं त्याने ठरवायचं असतं
5. जन्माला आला तो वंशाचा दिवा झाला,
पहिल्याच दिवशी त्याला जबाबदारीचा शिक्का लागला
6. दुःख आणि डोंगर यांच्यात फार साम्य असतं.
लांब अंतरावरून दोन्ही गोजिरी दिसतात.
एका डोंगराला पार करावं तर त्याच्या मागे दुसरा डोंगर असतोच.
तसंच दुःखाचं.
जवळ गेलं की या दोन्ही गोष्टी पार करता येणार नाहीत असं वाटतं.
त्याचं रौद्र रूप लांब गेलं की गोजिरवाणं होतं
7. संसार असाच असतो.
लाकडाचा धूर डोळ्यात जातो
म्हणून चूल पेटवायची थांबायचं नसतं.
दरी निर्माण झाली म्हणजे
आपण खोल जायचं नसतं.
ती दरी पार करायची असते
8. जी माणसं भावनाप्रधान असतात,
त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त
धक्का लागला तर दोनापैकी एक काहीतरी होतं.
ती माणसं गप्प बसतात,
मनातल्या मनात कुढतात
आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून
सगळं आयुष्य एखाद्या बाभळीच्या झाडासारखं
शुष्क घालवतात.
याउलट काही माणसं चिडून उठतात.
सारासार विचार गुंडाळून ठेवतात
आणि मग सगळ्यांवर वार करत सुटतात.
अशी माणसं एकेकाळी भावनाप्रधान होती,
हे सांगून खरं वाटत नाही
9. एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा.
परिसराचं मौन म्हणजे एकांत आणि
परिवारातही असताना पोरकं वाटणं हे एकाकीपण.
एकाकी पटलं तर मनसोक्त रडावं.
अश्रू म्हणजे दुबळेपणा नव्हे.
पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात
आणि दिसेनासे होतात तसाच माणूसही हलका होतो,
आकाशाजवळ पोहचतो.
असंच कोणतंतरी दुःख पार केल्यावर तुकाराम ‘तू का आकाशाएवढा’ असं लिहून गेला असेल
10. सांत्वन म्हणजे दुःखाचे मूल,
मूल आईपेक्षा मोठं कसं होईल?
मूल मोठं व्हायला लागलं की,
आई आणखीन मोठी व्हायला लागते.
म्हणून समजूत घालणारं कुणी भेटलं की,
हुंदके अधिक वाढतात.
वाईट मूड चांगला करण्यासाठी तुम्हाला आनंदी ठेवतील हे आनंदी कोट्स (Quotes On Happiness)
व. पु. काळे सुविचार (Va. Pu. Kale Thoughts In Marathi)
Va Pu Kale Quotes On Life In Marathi
1. स्पर्शसुख म्हणजे प्रेम नाही. हा प्रेमाचा मूळ रंग नाही. तो नुसता अभिलाषेचा तवंग. एक सवंग लालसा. जाता – येता भेटत राहाते – जाणवते. स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लागते. रस्त्याने जाताना लादली जाते. ऑफिसच्या लिफ्टमध्येसुद्धा ती सुटाबुटात चिकटून जाते. वर पुन्हा सॉरीचं गुलाबपाणी शिंपडायचं आणि त्यावर एक ओशट हास्य. सगळीकडे ही लालसा थैमान घालताना दिसते.
2. आठवणी खरंच चांदण्यांसारख्या असतात कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही
3. ऐश्वर्य आणि सौंदर्य यांना मदत करायला सगळेच झटत असतात
4. डोळे असणाऱ्या माणसाला दुसऱ्याचं सुख बघवत नाही. पाप नजरेचं असतात असं म्हणतात ते उगीच नाही
5. एखादा फुगा फुगवता फुगवता एखाद्या क्षणी फुटतो, तो फुटल्यावर समजतं की किती फुगवायला नको होता
6. कोण कुणाला शोभतं आणि शोभेल याचा माणूस फार विचार करतो
7. खर्च झाल्याचं दुःख नाही हिशेब लागला नाही की, त्रास होतो
8. जखम करणारा विसरतो, पण ज्याला जखम झाली आहे तो मात्र विसरत नाही
9. कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं, कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रूंदावत जातो
10. बऱ्याचदा विसरायचं म्हटलं की, सगळंच आठवतं
You Might Like These:
Motivational Quotes In Marathi (प्रेरणात्मक कोट्स मराठीमध्ये)